गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

          आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर  दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला.
          नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे,  लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या विचार करता काहीशी वेगळ्या वाटणाऱ्या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंक ही यावेळी काढण्यात आला आहे. कोणतीही संस्कृती पूर्णपणे अलिप्त राहून विकसीत होवू शकत नाही.कोणत्याही संस्कृतीत वेळोवेळी अन्य संस्कृतीतील चांगल्या बाबींचा स्विकार करणे सुरुच असते. त्यामुळे आमच्याकडे सर्वच होते.आम्हाला सर्वकालीक महान  संस्कृतीचा वारसा आहे. हा अभिमान खोटा आहे.दांभिकपणा आहे.तसेच आमच्या संस्कृतीवर परिणाम होईल,म्हणून अन्य संस्कृतीतील उत्तम गोष्टी स्विकारण्यास तयार नसणे चूकीचे आहे.‌आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीने देखील इतर संस्कृतीच्या अनेक बाबी सहजतेने स्विकारलेल्या आहेत. इतर संस्कृतीकडे आपण स्वीकारलेल्या बाबी आता आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आता त्यांना वेगळे म्हटले तर आपले हसु देखील होवू शकते.या देवाण घेवणीचा वारसा आम्ही मांडत आहेत,असे संपादकीयात सांगत अभिजित घोरपडे यांनी या अंकामागची पार्श्वभुमी स्पष्ट केली आहे.
       भवतालच्या 2024च्या दिवाळी अंकात आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर स्थापत्यशैली, मराठी भाषा, खाद्यसंस्कृती,मुंबईची जडणघडण, इराणी लोकांशी कोणत्या माध्यमातून आणि कश्या प्रकरे भारतीयांचा संबंध आला,ते भारतात कोणत्या प्रकारे समावून गेले, तसेच आता कोणत्याही देवळांचा अविभाज्य घटक म्हणता येईल असा महिरप हा घटक आपण इस्लामी संस्कृतीकडून घेतला यासारख्या अनेक विषयाबाबत वेगवेगळ्या 18 लेखातून सविस्तर माहिती मिळते.या 18 लेखांपैकी 3 लेखांचा अपवाद वगळता अन्य सर्व लेख संबंधित विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या तज्ञ व्यक्तींनी लिहलेले आहेत.त्यामुळे अंक खुप माहितीपुर्ण झाला आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही‌.बटाटा, मिरची या सारखे आपल्या खाण्याचा अविभाज्य भाग झालेले खाद्यपदार्थ मुळातील भारतीय नाहीत तसेच आपल्याकडे पुर्वापार असलेले मात्र सध्या काहीसे मागे पडलेले भरडधान्य बी 12 या जीवनसत्वाचे मोठे स्त्रोत आहेत.महिरप ही वास्तूरचनेतील संकल्पना भारतात कशी रुजली.इस्लामी परंपरेत तीचे स्थान काय आहे?या सारखी अनेक विषयावरची माहिती आपणास या दिवाळी अंकाच्या वाचनातून मिळते. भवतालच्या या आधीच्या दिवाळी अंकाप्रमाणेच याही अंकात  फोटो मोठ्या प्रमाणात वापरले आहेत,त्यामुळे अंकातील माहिती चटकन समजते‌
      दिवाळी अंकावर टिका करताना सातत्याने फक्त जाहिराती छापण्यासाठी दिवाळी अंक काढले जातात,असे म्हटले जाते‌.अनेक दिवाळी अंकात मोठ्या प्रमाणात असलेल्या जाहिरातीमुळे ते काही अंशी खरे देखील वाटते मात्र भवताल च्या या अंकात आपणास फक्त मलपृष्ठावरील दोन जाहिराती वगळता अन्य जाहिराती आढळत नाहीत.त्यामुळे वाचताना सातत्य रहाते वाचताना जाहिरातीमुळे येणारा अडथळा येत नाही.सध्याचा महागाईच्या काळात कोणत्याही प्रकाशनास आपले पुस्तक मासिक वाचकांपर्यत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च वसूल करत आपले साहित्य कमी किमतीत देण्यासाठी जाहिरातदार अत्यावश्यकच आहे.अस्या परिस्थितीत अन्य प्रकाशनाइतकीच किंमत (300रूपये) ठेवत जाहिरात देखील कमी घेत अंक काढण्यासाठी अभिजित घोरपडे आणि संपुर्ण भवताल टिमचे करावे तितके कौतूक कमीच आहे.त्यामुळे नविन काही जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांनी अंक वाचावाच तसेच त्यांच्या धडपडीला बळ देण्यासाठी आपण देखील हा अंक विकत घेवून वाचावा,आणि इतरांना देखील तसे सांगावे.

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुबई दिनांक'

           


   १६ नोव्हेंबर १९७९ ही  फक्त एक तारीख नहिये.  आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या 'सिहासन' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे .  आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार  पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी  कालसुसंगत वाटतो, कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व  अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तीतकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा.  चित्रपटाची  पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या  कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे  सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठेवतो त्यामुळे या चित्रपटाची पटकथा ज्या दोन कादंबरीवर आधारित आहे त्या वाचण्याची मला पूर्वीपासून इच्छा होती सिंहासनच्या दोन कादंबरीपपैकी मी सिंहासन ही कादंबरी मी खूप दिवसापूर्वीच वाचली.  मात्र 'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची माझी इच्छा मात्र काही करणाने अपूर्णच राहत होती मात्र  नुकतीच माझी  'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची इच्छा पूर्ण झाली .  मला ही कादंबरी कशी वाटली हे आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या लेखाचे प्रयोजन (ज्यांना माझ्या सिंहासन या कादंबरीच्या लेखाविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे 

         सिंहासन या कादंबरीप्रमाणे मुबई दिनांक या कादंबरीचे लेखन सुद्धा अरुण साधू यांनी केलेले आहे मात्र सिंहासन ही कादंबरी जशी वाचताना आनंद देते, सहजतेने समजते तसे दुर्दैवाने या कादंबरी विषयी म्हणता येऊ शकत नाही.  कादंबरी अनेक ठिकाणी काहीशी कंटाळवाणी होते काही प्रसंग उगीचच काही गरज नसताना काहीसे ताणले गेले आहेत असे वाटते.  सिंहासन या कादंबरीत जशी  नाट्यमयता आहे पुढे काय घडू शकेल याचा अंदाज  बांधता येत नाही.  तसे मुबई दिनांक याबाबत होत नाही पुढे काय घडू शकेल याचा अंदाज बांधता येतो

सिंहासनपेक्षा अधिक ठळकपणे डिकास्टा याचा उल्लेख येतो  डिकास्टावर लेखकाने जवळपास ५५ ते ६० पाने खर्ची घातली आहेत मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांचे पात्र देखील या कादंबरीत अधिक ठळक केले आहे तसेच मूळ चित्रपटात दाखवण्यता आलेला आणि सिंहासन या कादंबरीत ओझरता देखील उल्लेख नसणारा, स्मग्लर्स चे काळे विश्व दाखवणारा प्रसंग 'मुंबई दिनाक या कादंबरीत अधिक ऊतमपणे रंगवण्यात आला आहे डिकास्टा एव्हढीच सुमारे ५० ते ५५ पाने हा प्रसंग आणि या वेळी ज्याची हत्या होते त्या पाणीटकराचे भावविश्व उभारण्यासाठी लेखकाने उभारलेली आहे 

      सिंहासन ही कादंबरी मुख्यतः  मंत्रीमंडळातील अंतर्गत राजकारणावर भाष्य करते तर मुंबई दिनांक ही कादंबरी मुख्यतः मंत्रिमंडळाबाहेरील सत्ता नाट्यावर मार्मिक भाष्य करत बोट ठेवते . मुबई दिनांक या कादंबरीतील कथानक प्रामुख्याने पाच नायकांभोवती फिरते. स्टार वेस्टर्न या इंग्रजी दैनिकाचा मुख्य वार्ताहर, जो एका वारांगनेवर प्रेम करत असतो आणि ज्याने आपल्या प्रेमापोटी तिला ते काम करायला परावृत्त केले असते असा  अय्यर, कामगार नेता डिकास्टा,,मंत्रालयात  काम करणारा ३० वर्षीय अविवाहित आणि एका  दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करणारा लहान भावाच्या तुलनेत स्वतःला कमी समजणार किरण वझे

आणि काही कौटूंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी वाममार्गाला लागलेला आणि आणि आता त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असलेला पत्नी आणि बारा वर्षाची मुलगी असलेला पाणीटकर आणि मुखमंत्राची जिवाजीराव शिंदे हे कादंबरीचे मुख्य पाच नायक संपूर्ण कादंबरी त्यांच्या भोवती फिरते. कादंबरीची रचना प्रकरणनिहाय करण्यात आलेली असून प्रत्येक पात्राबाबत दोन प्रकरणे लेखकाने रचली आहेत जी एकामागून एक येतात सर्व पात्रांची पहिले प्रकरणे विस्तृत असून त्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश पुस्तक लेखकाने खर्च केले आहे मी लेखाच्या सुरवातीला सांगितले त्या प्रमाणे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते ते या मोठ्या असणाऱ्या ठळक रुपाने मांडलेल्या पात्र रचनेमुळेच 

सिंहासन या मराठीतील ऑल टाइम ग्रेट म्हणता येईल अश्या  चित्रपटाची मूळकथा आपल्यास चित्रपट समजण्यासाठी मदत तर करतेच मात्र राजकारण कसे चालते ? या बाबत देखील आपणास खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. आपल्या येथील इंधनाचे भाव काय असतील आपण आपल्या घामाच्या पैशातील किती रक्कम कररूपाने देणार आहोत आपला कर सरकार कोणत्या कारणास्तव खर्च करणार आहे? आपल्या प्रदेशात कोणत्या  नवीन उदयोग धंद्याच्या संधी निर्माण होणार आहेत हे सर्व राजकारणी व्यक्तीमार्फत समजते त्यामुळे राजकारण समजल्यास आपणस जवाबदार नागरिक होण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते  त्यामुळे आपण हे पुस्तक वाचघायलाच हवे 


सिंहासन या कादंबरीविषयी मी याच्या आधी लिहलेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2023/11/blog-post.html 

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

          आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फर...