नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे, लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या विचार करता काहीशी वेगळ्या वाटणाऱ्या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंक ही यावेळी काढण्यात आला आहे. कोणतीही संस्कृती पूर्णपणे अलिप्त राहून विकसीत होवू शकत नाही.कोणत्याही संस्कृतीत वेळोवेळी अन्य संस्कृतीतील चांगल्या बाबींचा स्विकार करणे सुरुच असते. त्यामुळे आमच्याकडे सर्वच होते.आम्हाला सर्वकालीक महान संस्कृतीचा वारसा आहे. हा अभिमान खोटा आहे.दांभिकपणा आहे.तसेच आमच्या संस्कृतीवर परिणाम होईल,म्हणून अन्य संस्कृतीतील उत्तम गोष्टी स्विकारण्यास तयार नसणे चूकीचे आहे.आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीने देखील इतर संस्कृतीच्या अनेक बाबी सहजतेने स्विकारलेल्या आहेत. इतर संस्कृतीकडे आपण स्वीकारलेल्या बाबी आता आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आता त्यांना वेगळे म्हटले तर आपले हसु देखील होवू शकते.या देवाण घेवणीचा वारसा आम्ही मांडत आहेत,असे संपादकीयात सांगत अभिजित घोरपडे यांनी या अंकामागची पार्श्वभुमी स्पष्ट केली आहे.
भवतालच्या 2024च्या दिवाळी अंकात आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर स्थापत्यशैली, मराठी भाषा, खाद्यसंस्कृती,मुंबईची जडणघडण, इराणी लोकांशी कोणत्या माध्यमातून आणि कश्या प्रकरे भारतीयांचा संबंध आला,ते भारतात कोणत्या प्रकारे समावून गेले, तसेच आता कोणत्याही देवळांचा अविभाज्य घटक म्हणता येईल असा महिरप हा घटक आपण इस्लामी संस्कृतीकडून घेतला यासारख्या अनेक विषयाबाबत वेगवेगळ्या 18 लेखातून सविस्तर माहिती मिळते.या 18 लेखांपैकी 3 लेखांचा अपवाद वगळता अन्य सर्व लेख संबंधित विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या तज्ञ व्यक्तींनी लिहलेले आहेत.त्यामुळे अंक खुप माहितीपुर्ण झाला आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.बटाटा, मिरची या सारखे आपल्या खाण्याचा अविभाज्य भाग झालेले खाद्यपदार्थ मुळातील भारतीय नाहीत तसेच आपल्याकडे पुर्वापार असलेले मात्र सध्या काहीसे मागे पडलेले भरडधान्य बी 12 या जीवनसत्वाचे मोठे स्त्रोत आहेत.महिरप ही वास्तूरचनेतील संकल्पना भारतात कशी रुजली.इस्लामी परंपरेत तीचे स्थान काय आहे?या सारखी अनेक विषयावरची माहिती आपणास या दिवाळी अंकाच्या वाचनातून मिळते. भवतालच्या या आधीच्या दिवाळी अंकाप्रमाणेच याही अंकात फोटो मोठ्या प्रमाणात वापरले आहेत,त्यामुळे अंकातील माहिती चटकन समजते
दिवाळी अंकावर टिका करताना सातत्याने फक्त जाहिराती छापण्यासाठी दिवाळी अंक काढले जातात,असे म्हटले जाते.अनेक दिवाळी अंकात मोठ्या प्रमाणात असलेल्या जाहिरातीमुळे ते काही अंशी खरे देखील वाटते मात्र भवताल च्या या अंकात आपणास फक्त मलपृष्ठावरील दोन जाहिराती वगळता अन्य जाहिराती आढळत नाहीत.त्यामुळे वाचताना सातत्य रहाते वाचताना जाहिरातीमुळे येणारा अडथळा येत नाही.सध्याचा महागाईच्या काळात कोणत्याही प्रकाशनास आपले पुस्तक मासिक वाचकांपर्यत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च वसूल करत आपले साहित्य कमी किमतीत देण्यासाठी जाहिरातदार अत्यावश्यकच आहे.अस्या परिस्थितीत अन्य प्रकाशनाइतकीच किंमत (300रूपये) ठेवत जाहिरात देखील कमी घेत अंक काढण्यासाठी अभिजित घोरपडे आणि संपुर्ण भवताल टिमचे करावे तितके कौतूक कमीच आहे.त्यामुळे नविन काही जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांनी अंक वाचावाच तसेच त्यांच्या धडपडीला बळ देण्यासाठी आपण देखील हा अंक विकत घेवून वाचावा,आणि इतरांना देखील तसे सांगावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा