या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- पुस्तक प्रकार - नियतकालिके (12)
- पुस्तक प्रकार - वाचनीय वृत्तपत्रीय सदरे (1)
- पुस्तक प्रकार -मराठीत अनुवादित (11)
- पुस्तक प्रकार ईबुक (2)
- पुस्तक प्रकार छापील (25)
- भाषा - इंग्रजी (4)
- भाषा - मराठी (38)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- लेखक - स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
- लेखक- अच्युत गोडबोले (19)
- लेखक- गिरीश कुबेर (6)
- लेखिका मीना प्रभू (4)
- विचसारसरणी -हिंदुत्ववादी (1)
- विचारसरणी - दलित साहित्य (1)
- विचारसरणी - विद्रोही साहित्य (3)
- विचारसरणी - समाजवादी (1)
- विषयानुसार - पर्यावरण (3)
- विषयानुसार - क्रीडाविश्व (3)
- विषयानुसार - अभिनेता गुरुदत्त (4)
- विषयानुसार - अर्थशास्त्राविषयक (4)
- विषयानुसार - इतिहास (4)
- विषयानुसार - गुन्हेगारी (3)
- विषयानुसार - चीन (3)
- विषयानुसार - तंत्रज्ञान (2)
- विषयानुसार - नाशिक (4)
- विषयानुसार - महिलांचे भावविश्व (6)
- विषयानुसार - मानसशास्त्र (6)
- विषयानुसार - व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (1)
- विषयानुसार -वैद्यकीय (3)
- विषयानुसार :संगीत (1)
- विषयानुसार- पश्चिम आशिया (3)
- विषयानुसार- राजकीय (11)
- सर्वसाधारण (9)
- साहित्य (11)
- साहित्य प्रकार - विनोदी या प्रकारात मोडणारे. (1)
- साहित्य प्रकार - कथासंग्रह (4)
- साहित्य प्रकार - कांदबरी (7)
- साहित्य प्रकार - काव्यसंग्रह (1)
- साहित्य प्रकार - नाटक (1)
- साहित्य प्रकार- निबंध (2)
- साहित्येत्तर (15)
- साहित्येत्तर प्रकार - चरित्र (21)
- साहित्येत्तर प्रकार - प्रवासवर्णन (6)
- साहित्येत्तर प्रकार - माहितीप्रधान (29)
- साहित्येत्तर प्रकार - वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (2)
शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३
सायबर क्षेत्रातील आपला वावर सरंक्षित होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक
गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३
अति तिथे माती किती खरे समजण्यासाठी वाचावे असे पुस्तक The evil eye of Chess
या पुस्तकात आठ अस्या जगविख्यात बुद्धीबळपटुंची ओळख करून देण्यात आली आहे की, ज्यात बुद्धीबळाविषयक मोठी गुणवत्ता अगदी ठासून भरली होती. मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे तत्व त्यांनी आचरणात न आणल्यामुळे त्यांचा अंत फारच हृदयदायक झाला,एकाला आयुष्याचा शेवटची काही वर्षे मनोरुग्णालयात काढावी लागली,तर एका बुद्वीबळपटूला आयुष्याचा अखेरच्या टप्प्यात रस्त्यावर
भीक मागावी लागली. गोष्ट चांगली असो किंवा वाईट तिच्या आहारी जाणे नेहमीच मनुष्याचा घात करणारे असते, हा संदेश हे पुस्तक आपणास देते.सुमारे ५५पानाच्या या पुस्तकात आपणास ज्या ८बुद्वीबळपटुंविषयी लेखक आपणास माहिती देतो,त्यामध्ये बॉबी फिशर, मिखाईल ताल, पॉल मोर्फी, विल्हेम स्टाइनिट्ज़, ,अकीबा रूबीनस्टेन,अलेक्जेंडर अलेखीन,कार्लोस टोरे रेपेटो सारखे जगविख्यात बुद्धीबळ खेळाडू आहेत. ज्यांना जून्या बुद्धीबळपटुंची माहिती आहे,त्यांना या सर्व बुद्धीबळपटुंची खेळ किती उत्कृष्ट पद्धतीचा होता हे सर्व माहिती असेलच,ज्यांना या खेळाडुंना खेळ माहिती नाही,ते इंटरनेटवर याविषयी सहजतेने माहिती घेवू शकतात.सर्वोत्तम अस्या वर्गवारीत मोडणाऱ्या या सर्व खेळाडुंचा अंत फारच दूर्दैवी झाला याला कारणीभूत ठरले ते एक निमित्य, ते म्हणजे खेळात किती झोकुन देयचे? वैयक्तिक आयुष्यात खेळ कुठे थांबवायचा, आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य व्यतीत करायचे या बाबत त्यांची झालेली गल्लत. या चूकीची शिक्षा त्यांनी स्वतः.च्या आयुष्याचे मातेरे करत भोगली. आपण रोजच्या
जगण्यात खेळात नाही पण इतर क्षेत्रात असी चूक टाळण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या वाक्प्रचारानुसार मोठी गुणवत्ता असून देखील ती वाया गेलेल्या या बुद्धीबळपटुंच्या चरित्रातून अति तिथे माती या म्हणीचा अनुभव घेण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे, मग वाचणार ना हे पुस्तक?अजिंक्य तरटे
9552599495
9423515400
बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३
परग्रहवासीची अदभुत कहाणी,..प्रेषित...
अजिंक्य तरटे
9552599495
9423515400
अतिशय रंजक भाषेत विश्वाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक A brief history of Time
आपल्या रामायण आणि महाभारत अस्या पौराणिक मालिकांमध्ये अनेकदा "मे समय हुं!" असे म्हटले गेल्याचे आपण बघितले असेलच. तर समय किंवा ज्याला आपल्या मराठीत वेळ म्हणतात, ही संकल्पना आपल्याला मुळातून समजावून घेयची असेल तर, आपण वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे, जेष्ठ खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी मुळातील इंग्रजी भाषेत लिहिलेले, मात्र ज्याच्या मराठी भाषेत देखील अनुवाद झाला आहे, असे "A brief history of Time". या पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला असला तरी मुळातील पुस्तक वाचण्याचा आनंद काही औरच. तो आनंद मिळवण्यासाठी मी नुकतेच मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचले.
अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत हे पुस्तक लिहिले आहे.तसेच या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे.तीची मांडणी देखील रंजकतेने करण्यात आली आहे. त्यामुळे ज्याला खगोलभौतिकी या विषयाचे फारसे ज्ञान नाही,असी व्यक्ती देखील हे पुस्तक वाचून खगोलभौतिकी या विषयात बऱ्यापैकी पारंगत होवू शकते.शिवाय आधीच सांगितलेल्या प्रमाणे यांची भाषा देखील सोपी आहे.त्यामुळे ज्यांना
खगोलभौतिकी शास्त्रचा अभ्यास करायचा आहे , मात्र सध्या त्यांची या विषयाची पाटी पुर्णतः कोरी आहे, अस्या व्यक्तींनी खगोलभौतिकी या विषयाचा अभ्यासाचा श्रीगणेशा या पुस्तकाद्वारे करणे सर्वोत्तम राहिल. मुलभूत ते मध्यम प्रगत स्वरूपाचे ज्ञान ते यातून मिळवू शकतील. खगोलभौतिकी शास्त्रचा विचार करता वेळ
म्हणजे काय ?वेळ
कधी अस्तित्वात आला
?तो अस्तित्वात येण्याचा
आधी काय होते?
आपण ज्या विश्वात
राहतोय,ते विश्व
कधी अस्तित्वात आले?
या विश्वाचा विस्तार
किती मोठा आहे?
विश्वाच्या विस्ताराचा बाहेर काय
आहे? मुळात हे
विश्व कसे अस्तिवात
आले? विश्वाच्या अस्तित्वाचा
आधी काय होते?विश्वाचा कधी मृत्यू
होवू शकतो का?
असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास
या पुस्तकाच्या वाचन
केल्यास सहजतेने मिळतात.
मुलीची शालेय फी भरण्यासाठी पैसे नसल्याने ते मिळावेत, या हेतूने लिहलेले हे पुस्तक आपणास खगोलभौतिकी या विषयाची मोठ्या प्रमाणात माहिती देते. पुस्तकाचे लेखक स्टिफन हॉकिंग हे त्यांनी विश्व जन्म या संकल्पनेवर केलेल्या संशोधनासह ज्या शारिरीक विकलांगतेवर मात करत त्यांनी खगोलशास्त्रात संशोधन केले, त्यामुळे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या पुस्तकात कोठेही मोठेपणाचा हेका पुढे केल्याचे दिसत
नाही.भौतिकशास्त्र जाणण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्याला तस्याच उत्सुक शिक्षकाने दिलेले ज्ञान म्हणजे सदर पुस्तक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे पुस्तक ज्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे असी व्यक्ती देखील समजू शकते असे आहे,तर मग वाचणार ना हे पुस्तक?
अजिंक्य तरटे
9552599495
9423515400
सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३
परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.
साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम
आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत थांबलेला ...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्र...














