रविवार, १ सप्टेंबर, २०२४

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east) या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते‌. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व  याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर अचानक श्रीमंती आल्यामुळे बदललेले आर्थिक जीवन ,या नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण आपल्याकडे असावे,यासाठी युरोप खंडाच्या पश्चिमेकडील देशांनी आणि अमेरिकेने खेळलेल आंतरराष्ट्रीय राजकारण.या आंतराष्ट्रीय राजकारणाला उत्तर म्हणून या प्रदेशात उभ्या राहिलेल्या विविध संघटना आणि त्यांची वाटचाल याविषयी आपणाकडे फारच कमी बोलले जाते, मात्र ही कमतरता बऱ्याच अंशी कमी होते ते याबाबत आपल्या देशांतर्गत राजकीय भूमिकेमुळे अनेकांचे नावडते संपादक झालेले गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकामुळे. गिरीश कुबेर यांनी पश्चिम आशियाशी संबंधित ,एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, तेल नावाचं वर्तमान, अधर्म युद्ध असी विविध पुस्तके लिहली आहेत.त्यातील अधर्म युद्ध हे पुस्तक मी नुकतेच वाचले.
३००पानांच्या या पुस्तकात या प्रदेशातील देशांचा प्रकरणनिहाय इतिहास वर्तमान याचा आढावा घेण्यात आला आहे.या प्रदेशातील सामाईक इतिहासाचा आढावा घेतल्यास पुर्व युरोपीय साम्राज म्हणजेच तूर्की साम्राजाचे पतन ही सर्वात मोठी घटना आहे.त्यामुळे हा आढावा तेव्हापासून म्हणजे १९व्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे १८५० पासून घेण्यात आला आहे. तूर्की साम्राजचे विघटन झाल्यावर येथे नवे सत्ताधिश कसे तयार झाले.‌ पश्चिमी युरोपीय राष्ट्रांनी आपले व्यापारी हितसंबंध सुरक्षीत करण्यासाठी या सत्ताधीकारी आणि त्यांचा विरोधकांचा कसा वापर केला. प्रदेशात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर त्यावर पडड्यामागून आपलेच नियंत्रण राहिल,यासाठी त्यांनी खेळलेले राजकारण .जगात इतरत्र पश्चिमी युरोपीय देशांनी ज्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात गळे काढले ते मानवी हक्क त्यांनीच या प्रदेशात कसे पायदळी तूडवले. तसेच सत्ता संघर्षात फक्त स्वत:चाच फायदा बघत अमेरिकेच्या गटातील भांडवलशाही देशांनी कम्युनिष्ठांचा या प्रदेशात निर्माण केलेला बागलबुवा, आणि तो कमी करण्यासाठी त्यांनी या प्रदेशावर लादलेले विनाकारणचे युद्ध.स्वत:च्या नियंत्रणात देशाचा सत्ताधिकारी नाही,हे बघून देशातील जनतेची काहीही मागणी नसताना तो अन्याय करतो असे कारण देत त्याला सत्तेपासून दूर करत देशात राजकीय अस्थैर्य निर्माण करणे.या सारख्या केलेल्या गोष्टी  दरम्यानच्या काळात या सर्व घडामोंडींमुळे त्या प्रदेशात निर्माण झालेला धार्मिक अहंपणा, कट्टरता,आणि त्याची विविध संघटनेत झालेली विभागणी ,त्याचे स्वरूप.या प्रदेशात असणाऱ्या देशांच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रदेशाच्या विकासासाठी त्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी केलेले प्रयत्न,त्याला आलेले यशापयश,या यशापयशाची कारणे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक होय. या पुस्तकात सौदी अरेबिया,इराण इराक, कुवेत सयुंक्त अरब अमिरात,अफगाणिस्तान पाकिस्तान बहरीन इजिप्त, अल्जेरीया,सिरीया,लिबिया, पॅलेस्टाईन,इस्राइल, लेबनॉन,या प्रदेशाचा आढावा घेतला आहे.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे या पुस्तकाचे लेखन करणारे गिरीश कुबेर त्यांच्या देशांतर्गत राजकारणाविषयी घेतलेल्या भुमिकेमुळे अनेकांचे नावडते आहेत.मात्र ते लक्षात ठेवत हे पुस्तक वाचायचेच नाही असे ठरवल्यास आपण एका महत्त्वाचा ज्ञानाला मुकु हे नक्की. या उलट समर्थ रामदास स्वामी यांचा ',उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकूनी द्यावे,असा संदेश आचरणात आणत ,गिरीश कुबेर यांची देशांतर्गत राजकरणाविषयीची मते मिळमिळीत म्हणून टाकून दिल्यास आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्ञान उत्तम समजून त्या विषयीचे हे पुस्तक वाचल्यास आपणास एक फार मोठा खजिना सापडेल याबाबत खात्री बाळगा.मग वाचणार ना हे पुस्तक.
अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५
९४२३५१५४०० 

इमेल पत्ता 

ajinkya.tarte2 @gmail.com

 


रविवार, १० मार्च, २०२४

माझे वाचन (भाग३)

   
मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय. त्यामुळे ज्यामुळे मला वाचनाची गोडी लागली.ती गोष्ट सध्याचा मुलांना मिळणे काहीसे अवघड आहे.आताच्या मुलांच्या पालकांना आता अन्य स्त्रोत शोधून आपल्या पाल्यांना वाचनाची गोडी लावावी लागेल.
              पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली 
मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.त्यामुळे देखील माझे वाचन बरेच समृध्द झाले मला अनेक व्यक्ती लहानपणी माझी आवड लक्षात घेवून गोष्टींची पुस्तके भेट स्वरूपात देत असे‌.त्यातून माझी वाचनाची आवड घट्ट होत गेली आता देखील लहान मुलांना भेट देताना आवर्जून पूस्तकेच भेट दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागू शकते‌.‌काही जण आताच्या मुलांच्या भावविश्वाशी जोडले जाईल असे लेखन होत नाही,असे म्हणतील त्यांना माझे सांगणे आहे की,भलेही सध्याच्या
मुलांशी जवळीक साधणारे लेखन कमी असेल मात्र हे लिखाण पुर्णतः थांबलेले नाही .शोधा म्हणजे सापडेल ,या वाक्यप्रचाराच्या अनुषंगाने शोधल्यास आजच्या मुलांच्या भावविश्वाशी एकरुप होणारे लेखन नक्कीच सापडेल
                      मी जे बाल साहित्य वाचले, त्यात निखळ मनोरंजन अधिक असे.बाल मनावर संस्कार करायचे आहेत, हा विचार मनात धरून मुलांना कंटाळवाणे वाटेल,असे साहित्य मी तरी फार  वाचलेले नाही. काही दिवसांपूर्वी व्हाटसपवर मुलांना देण्यासाठी संस्कारक्षम बालसाहित्य नाही, म्हणून ओरड करणारी एक पोस्ट बघीतली होती त्या पार्श्वभूमीवर मुद्दामुन संस्कारक्षम बालसाहित्य हा विचार मी लहानपणी बघितला नाही.काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका ख्यातनाम बाल साहित्याची निर्मिती करणाऱ्या एका ज्येष्ठ साहित्यकारासी या संदर्भात बोलणे झाले असता संस्कार करण्याची प्रथा बालसाहित्यात आणण्याचा कृतीला त्यांनी विरोध केला होता त्यांच्यामते संस्कार आणि बालसाहित्य पुर्णतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची एकमेकांत 

सरमिसळ केल्यामुळे दोन्ही गोष्टिंचा विचका होतो‌ त्यामुळे संस्कार होत नाहीत आणि मुलांना वाचनाची गोडी देखील लागत नाही.माझ्या सुदैवाने मी लहानपणी जे साहित्य वाचले त्यात ही गल्लत माझ्यासाठी तरी झाली नाही,आणि मला वाचनाची गोडी लागली.चांदोबा या मासिकात संस्कार करणाऱ्या काही कथा असतं मात्र त्यातून अत्यंत सुक्ष्म संस्कार होत असे तर मनोरंजन मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे त्यांना मनोरंजन करणारे लेखन म्हणूनच बघावे लागेल.चंपकमधून संस्कार नाहीच्याच पातळीवर होत असे. मनोरंजन मात्र मोठ्या पातळीवर होत असे.आणि याच मनोरंजनामुळे मला वाचनाची गोडी लागली ‌याच गोडीतून मी पुढे राहता झालो.ज्याचे दृश्यस्वरुप आपल्या पुढे दिसतच आहे ‌
 
 दुसऱ्या भागाची लिंक 

 
पहिल्या भागाची लिंक 
 


सोमवार, ४ मार्च, २०२४

जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

 
 साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते.
आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी जागतिक स्तरावर नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारी झपुर्झा ही वृत्तमालिका एका वर्तमानपत्रासाठी लिहली‌.पुढे ही वृत्तमालिका त्यांनी विविध भागाच्या पुस्तकांसाठी अधिक विस्ताराने लिहिली याच विस्तारीत मालिकेतील तिसरे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सहकार्याने वाचले.
झपुर्झाच्या या तिसऱ्या भागात १९ साहित्यिकांचा परिचय सुमारे 400पानाच्या माध्यमातून करुन देण्यात आला आहे.ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांना ज्याचा कवितेद्वारे ईश्वर भेटीची आस लागली ,असे कवी विल्यम वर्डसवर्थ, इंग्रजी भाषेतील पहिले कवी म्हणून ओळखले जाणारे जेफरी चॉसर, अमेरीकेतील प्रमुख विनोदी लेखन करणारे मार्क टेनी, जिवंत असताना दुर्लक्षी गेलेली मात्र  मृत्यूपश्चात  आपल्या लेखणीद्वारे सुप्रसिद्ध झालेली जॉर्ज इलीयट ही लेखिका आदि प्रमुख आहेत.
      साहित्यिकांची ओळख करून देताना सदर लेखक इथे जन्मला,त्यांचा पालकांचे हे नाव आणि हा व्यवसाय होता.त्याचे शिक्षण इथे झाले त्याचा मृत्यू वयाचा इतक्या वर्षी या प्रकारे इथे झाला.त्याने हा व्यवसाय केला ?त्यांनी हीपुस्तके लिहिली.त्याचा लेखनाचे वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य होते‌.असी ठोकळेबाज माहिती वजा ओळख करुन न देता, काहीस्या अलंकारिक पद्धतीने सुरवातीला त्यांचा ठळक नामोल्लेख टाळत, त्यांच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करत नाट्यमय केला आहे.ज्यामुळे पुस्तक चरीत्राचे असून देखील कंटाळवाणे,नुसतीच माहिती देणारे न होता वाचणीय वाचकाला गुंतवून ठेवणारे झाले आहे. मात्र हे करत असताना संबंधित साहित्यिकांची संपूर्ण तपशिलवार माहिती वाचकाला मिळेल वाचकास  फक्त वरवरचीच माहिती मिळेल ,त्यास साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा उलगडा होणार नाही,या उणीवांपासून आपले लेखन दूर राहिलं.वाचकाला अभ्यासाचे क्रमिक पुस्तक वाचले असे वाटेल.विद्यापीठाच्या अभ्यासास मदत करणारे लेखन वाटेल याची लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.     
      या पुस्तकाच्या वाचनातून आपणास १९ व्या शतकाचा दुसऱ्या अर्ध्या भागात(१८५०नंतर) आणि १९ शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात (१९५० पर्यंत) पश्चिम युरोप आणि अमेरिकेतील समाजजीवन कसे होते? त्यावेळच्या साहित्यिकांना लेखन करताना कोणत्या समस्या येत असत. साहित्यिक कोणत्या आर्थिक सामाजिक वर्गातून येत
असत.ते कोणत्या विषयावर प्रामुख्याने लेखन करत.साहित्यीकांचा या प्रकारच्या लेखनामुळे इंग्रजी, फ्रेंच आदि भाषेत साहित्याची परिभाषा कस्या प्रकारे विकसित झाली. याविषयी माहिती मिळते‌.
     निलांबरी जोशी यांच्या मदतीने अच्युत गोडबोले यांनी  लिहिलेल्या या पुस्तकामुळे भारताच्या बाहेरील जगात साहित्य कसे विकसित होत आहे? कसे विकसित झाले? .तेथील समाजजीवनाचा तेथील साहित्यावर कसा परीणाम झाला ?आदि प्रश्नांबाबत आपणास सविस्तर माहिती मिळते ,मग वाचणार ना पुस्तक 

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"


नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या तपोभूमी नाशिक या पुस्तकाखेरीज अन्य सक्षम उपाय तो कोणता? मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत वाचले.
 या प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात सुमारे २०४ पानांच्या या पुस्तकात सहजसोप्या भाषेत,ओघवत्या भाषेत वर सांगितलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. पुस्तक माहितीवर आधारित असले तरी अन्य माहितीच्या पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक रटाळ कंटाळवाणे झालेले नाही.तर वाचकांची नाशिकच्या बाबतचे जाणून  घेण्याबाबतची भुक  काहीप्रमाणात वाढवणारे,आणि या वाढलेल्या भुकेची तितक्याच ताकदीने पुर्तता करणारे झाले आहे. पुस्तक वाचतांना कुठेही  कंटाळा येणार नाही,याबाबत लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचतान सहजतेने लक्षात येते‌.पुस्तकात पहिल्या परिच्छेदात सांगितलेल्या प्रश्नांची प्रकरणनिहाय माहिती देण्यात आलेली आहे.आपण पुस्तकाचे लेखक रमेश पडवळ सर यांना त्यांच्या मटा हेरीटेज वॉकमुळे ओळखतो‌.मटा हेरीटेज ,वॉकच्या वेळी दिसणारे त्यांचे व्यक्तीमत्तातील गुणवैशिष्टे,अभ्याक त्यांचा,या पुस्तक लेखनात सुद्धा जाणवतो.
सदर पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली संदर्भसुची त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी घेतलेले कष्ट दाखवून देते‌.सध्याचा इंटरनेटच्या काळात एखाद्या परीसराविषयी माहिती सहजतेने उपलब्ध असताना तीच कॉपी पेस्ट न करता संदर्भग्रंथ
अभ्यासून पुस्तक लिहल्यातून त्यांची पत्रकारीता किती उच्च दर्ज्याची आहे,हे समजते‌ महाराष्ट्र टाइम्स सारख्या नामांकित वर्तमानपत्रात विविध जबाबदाऱ्या सांभळत त्यांनी सदर लेखन केले आहे ‌,जे खरोखरीच कौतूकास्पद आहे.समर्थ रामदास स्वामी यांची"दिसामंजी काहीतरी लिहावे,शहाणे करुन सोडावे सकल जन " ही उक्ती रमेश पडवळ सरांनी सार्थ केल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.
आपणास ज्या प्रदेशात राहतो, तेथील माहिती असणे,हे चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख आहे ‌.त्यामुळे किमान नाशिककरांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"


स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना गेल्या काळातील चालू घडामोडींचा अभ्यास चटकन होण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा घटक म्हणजे इयर बुक.वर्षभर वर्तमानपत्रांची टिपणे काढून सुद्धा अनावधानाने टिपणातून सुटलेला मुद्दा विषय यांची उजळणी करण्याचा कामात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही इयर बुक खुपचं उपयुक्त ठरतात. वर्षभरातील महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने, ती वाचून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचतो‌.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीं खेरीज पत्रकारांना एखाद्या मुद्द्यावर लेखन करताना संदर्भ म्हणून ही इयर बुक महत्त्वाची ठरतात.इंग्रजीत या प्रकारची अनेक इयर बुक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत.मात्र त्यांचा वापर करण्यासाठी इंग्रजीवर हुकुमत असणे आवश्यक आहे. आज २०२४साली  देखील अनेक व्यक्ती अस्या आहेत की,,ज्यांची इंग्रजीवर फारशी हुकूमत नाही ‌एम‌.पी.एस.सी. ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील पत्रकार अस्या प्रकारचा मोठा वर्ग यात समाविष्ट  होतो‌. हा वर्ग सदर माहिती इंग्रजीत असल्याने या इयर बुक पासून दूर आहे ‌परीणामी बुद्धीमत्ता असून देखील योग्य अभ्यास साहित्याचा अभावी ते स्पर्धेत मागे पडतात.एम.पी एस.सी खेरीज केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची मराठी भाषेत तयारी करणारे विद्यार्थी देखील यात समाविष्ट होवू शकतात,यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ईयर बुक ही संकल्पना मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.नेमकी हीच बाब हेरून गेली ११वर्ष लोकसत्ता वर्षवेध या नावाने इयर बुक काढत आहे.लोकसत्ता तर्फे २०२३या वर्षातील इयर बुक अर्थात वर्षवेध मी नुकतेच वाचले.
लोकसत्ता या दैनिकामार्फत प्रकाशित या वार्षिकात आपणास गेल्या २०२३या वर्षातील घटना या विविध प्रकरणांद्वारे सविस्तर अभ्यासता येतात. लोकसत्ता वर्षवेध मध्ये घटनांचे राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, , असे प्रदेशानुसार ,तसेच क्रिडा, आर्थिक राजकीय, सामाजिक,चर्चेतील व्यक्ती असे विषयानूसार वर्गीकरण केले आहे.ज्यामुळे या घटना अभ्यासणे सोईचे जाते. या वार्षिकात फक्त दिनांक आणि त्या दिवशीची घटना असे दिलेले नसुन, काही लेख देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.ज्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचा मोठा फायदा होतो‌ मी वर्षवेधचा सुरवातीपासूनचा वाचक आहे‌.सुरवातीच्या काही अंकामध्ये  लेख समाविष्ट नव्हते‌.मात्र गेल्या काही वर्षात प्रसिद्ध होत असणाऱ्या वर्षवेधमध्ये लेख समाविष्ट करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे,ज्यामुळे अंकाचे उपयोगिता मुल्य खुपचं वाढले आहे.वर्षवेधमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांचा वेगळा विभाग यावेळी नाहीये‌.तर अंकात विखुरलेल्या स्वरुपात लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत‌.लेख ज्या विषयावरील आहे‌.त्या विषयक घटना सांगितल्यानंतर लेख यावेळी प्रसिद्ध करण्यात आला आहे.यापुर्वी लेखांचा स्वतंत्र विभाग असे घटनांची तारखेनुसार माहिती देणारा एक विभाग आणि लेखांची माहिती देणारा दुसरा विभाग असे लोकसत्ता वर्षवेधचे स्वरूप असे जे यावेळी मोठ्या प्रमाणात बदलण्यात आले आहे.
     लोकसत्ताच्या संपादकीयामधून मांडण्यात येणाऱ्या राजकीय मतांमुळे लोकसत्ता अनेकांचा नावडता पेपर आहे,मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी माहिती तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींची सविस्तर माहिती हवी असल्यास मराठीमध्ये लोकसत्ता शिवाय दुसरा पर्याय नाही,हे देखील तितकेच खरे आहे.त्यामुळे लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या या इयर बुकचे वाचन त्यांची राजकीय मते क्षणभर बाजूला ठेवून स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त म्हणून केल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे अवघड नाही‌.फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींनी नाही तर देशाचे जवाबदार नागरीक होण्यासाठी देखील लोकसत्ता वर्षवेध वाचायलाच हवा.



शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

आपली राजकीय समज प्रगल्भ करणारे पुस्तक,"हिंदूत्व,बंधूत्व आणि नरेंद्र मोदी"

सध्या आपल्या भारतात लोकसभा निवडणूकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक गरम होत आहे.हा मजकुर लिहण्यापर्यत देशात आचारसंहिता लागू नसली तरी ती कधीही लागू शकते.कदाचित आपण हा मजकुर वाचेपर्यंत ती लागू झालेली असू शकते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर तर राजकीय वातावरण अधिकच रंगेल.अस्या या  काळात २१०देशांच्या या जगात, जगातील सर्वात मोठी असलेल्या लोकशाहीतील जवाबदार नागरीक म्हणून आपणास राजकीय पक्षांची पुर्ण समज असणे अत्यावश्यक ठरते.सत्ताधिकारी पक्षातर्फे करण्यात आलेली विकासकामे आपणास प्रत्यक्ष दिसत असली तरी, त्या पक्षाची विचारधारा काय आहे?याची आपणास माहिती मिळाल्यास आपण अधिक जागरुकपणे मतदान करु शकतो‌.मात्र या काळात माध्यमे पेड न्युज अधिकाधिक दाखवत असल्याने त्यातून योग्य ती माहिती मिळेलच ,यांची काही श्वास्वती नाही, त्यामुळे या काळात या विषयी लिहलेल्या पुस्तकाचच आपणास आधार घ्यावा लागतो‌, आणि आपली ही गरज पुर्ण होते,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लिहलेले आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित "हिंदूत्व, बंधुत्व , नरेंद्र मोदी हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावानाच्या मदतीने वाचले.
      पंतप्रधान मोदींचा ग्रोधा ते पंतप्रधान विकास मानायचा? मोदींचे हिंदुत्व खरचं भारतीयांचं परिवर्तित झालंय का? मोदी मॉडेल आणि भागवत मॉडेल यातील सुक्ष्म संघर्ष
कोणता? हिंदूत्ववादी मोदींचा ओठी परदेशातच गांधी आणि बुद्धाचे नाव जास्त वेळा का असते? मोदींचे परराष्ट्र धोरण पंडित नेहरूंच्या वारस्यातच समृध्द झाले आहे का? संघाचे हिंदूत्व सर्वमान्य आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूत्व आणि संघाचे हिंदुत्व एकच आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील विचारांची लढाई म्हणजे नक्की काय? लोकशाहीतील एक महत्त्वाचे तत्त्व असलेल्या 'बंधुता'  याविषयीची सद्य स्थिती काय आहे?मुळात "बंधुता " म्हणजे काय ? अस्या अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे सदर पुस्तक होय.
176पानाच्या या पुस्तकात 3भाग आहेत. पहिला भाग म्हणजे हिंदुत्व.या भागात 4 प्रकरणे असून यात पुस्तकांची ओळख तसेच संघाचे हिंदूत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूत्व यातील फरक आणि या दोन्हींचे डॉ.आंबेडकर यांच्या विचारधारेशी असणारे नाते.यावर प्रकाश टाकला आहे.या भागात या संकल्पनांचे टीकात्मक विश्लेषण केलेले आढळते.दुसरा भाग म्हणजे बंधूत्व.बंधुत्व या भागात ही संकल्पना मुळात काय आहे?तिचे स्वरुप आणि आवश्यकता,तसेच ती कशी लागू होते?कोणाला ती लागू होते? जगभरात तिची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होते?याबाबत तीन प्रकरणात सांगण्यात आले आहे.पुस्तकाचा तिसरा भाग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या लेखांचा आहे.11प्रकरणाच्या या भागात सरसंघचालक मोहन भागवत आणि  नरेंद्र मोदी यांच्या हिंदूत्वातील फरक, पंतप्रधान मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर मागितलेली मते,संघाला काहीसे अप्रिय असणाऱ्या महात्मा गांधी यांचा आपल्या परदेशातील दौर्यादरम्यान सातत्याने उल्लेख का करतात, तसेच परदेशी नेत्यांना आपले पुज्यनीय हेडगावकर,गोवळकर श्री गुरुजी यांच्या समाधीच्या ठिकाणी न नेता महात्मा गांधींच्या समाधीस्थळीच का नेतात? या वरुन पंतप्रधान मोदी कशी भारताची प्रतिमा जपतात? या सारख्या मुद्यावर चर्चा केली आहे.
आपण कोणत्याही विचारसरणीचे असो आपल्याला विरोधी विचारसरणी माहिती असणे समाजात आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी आवश्यक असते.तसेच आपल्या विचारसरणीची इत्यंभुत माहिती असणे विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आवश्यक आहे.त्यामुळे आपण कोणत्याही विचारसरणीचे असो,आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

माझे वाचन (भाग २ )

          
आपल्या पाल्याने वाचन करावे यामध्ये पालकांची काय भूमिका असते ?  हे आपण मागच्या भागात बघितले   या भागात आपण एखाद्याला ठराविक विषयावरची पुस्तके वाचायला कसे काय आवडू शकते ? यावर बोलूया . एखाद्यास ठराविक विषयाची पुस्तके आवडण्यात  त्याच्या सभोवातालच्या व्यक्ती कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचतात तसेच पुस्तक वाचनास सुरवात करताना त्यास कोणत्या प्रकराची पुस्तके वाचायला मिळाली ? याचा मोठा प्रभाव असतो या खेरीज व्यक्तीच्या शैक्षणिक आणि व्यावसाईक गरजेचा देखील मोठा प्रभाव असतो ? जर एखाद्यास आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर विशिष्ट विषयाची पुस्तके वाचणे क्रमप्राप्त झाले तर आयुष्याच्या पुढील टप्यावर त्या विषयाची पुस्तके वाचायची गरज नसली तरी एखादा व्यक्ती त्याच विषयाची पुस्तके वाचू शकतो 

 माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी शाळेत असताना माझ्या शाळेच्या ग्रंथपाल असणाऱ्या मॅडम आम्हाला सातत्याने सांगत असत , अरे तुम्ही विविध विषयाची माहिती देणारी पुस्तके वाचायला हवी विविध साहित्यकृती वाचायचे हे तुमचे वय नाही .तुम्ही साहित्यकृती नंतरच्या आयुष्यात वाचू शकता सध्या तुम्ही विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचून स्वतःचे सामान्यज्ञान वाढवले पाहिजे.  त्या आम्हाला जी पुस्तके निवडण्यास देत त्यातही विविध प्रकारची माहिती देणारीच पुस्तके असे. विविध प्रकारच्या साहित्यकृती त्यामुळे मी बऱ्याच उशिरा वाचल्या पुढे मीस्पर्धा परीक्षेच्या तयारीच्यादरम्यान पुन्हा एकदा मी माहिती देणारी पुस्तके वाचायला सुरवात केली त्यामुळे माझ्यामध्ये माहितीची पुस्तके वाचायची  आवड निर्माण झाली . जे तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटवरील माझे वाचन या फोटो अल्बम किंवा याच ब्लॉगवर मी ज्या पुस्तकांची ओळख करून देतो त्याचे अवलोकन केल्यास  सहज लक्षात सुद्धा येईल 

माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार सांगतोय मी ज्या प्रकारचे वाचन करतो तेच वाचन उत्तम असे समजणे चुकीचे आहे. जर कोणी साहित्यकृतीचे वाचन करत असेल तर ते  देखील योग्यच ठरेल. वाचनाचा कोणताच प्रकार योग्य किंवा अयोग्य नाहीये . वाचनाच्या प्रत्येक जातकुळीचे काही फायदे आहेत, तसेच तोटे आहेत.आता फक्त तोटे बघत, एखाद्या वाचनाच्या प्रकारास अयोग्य ठरवणे, पुर्णतः चूकीचे आहे.आता मी प्रामुख्याने ज्या प्रकारची पुस्तके

वाचतो, त्यामुळे मला विविध विषयांचे ज्ञान होत असले तरी, भाषाशैली,शद्बांचे भांडार याबाबत मी काहीसा मागे पडतो,हे नाकारण्यात काही अर्थ नाही.माझ्याउलट जर एखादा जण साहित्यकृती वाचत असेल तर, भलेही त्यांचे ज्ञान कमी असेल, मात्र तो शद्ब साठ्याबाबत प्रचंड  श्रीमंत असेल ,हे सुद्धा नाकारण्यात अर्थ नाही.आता विविध प्रकारचे ज्ञान,की विपूल प्रकारचा शद्बसाठा यापैकी कश्याला महत्व देयचे?आणि कश्याला नाही,? हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून आहे.त्याबाबत काहीही सांगणे सहजशक्य नाही. कोणत्याही प्रकारचे असले तरी चालेल मात्र ती व्यक्ती वाचन करत आहे का? याला महत्त्व देयला पाहिजे असे मला वाटते कारण अखेर वाचाल तर वाचाल!

या लेखाचा पहिला भाग वाचायचा असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा 


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blog-post_22.html


पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...