रविवार, १ सप्टेंबर, २०२४

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east) या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते‌. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व  याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर अचानक श्रीमंती आल्यामुळे बदललेले आर्थिक जीवन ,या नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण आपल्याकडे असावे,यासाठी युरोप खंडाच्या पश्चिमेकडील देशांनी आणि अमेरिकेने खेळलेल आंतरराष्ट्रीय राजकारण.या आंतराष्ट्रीय राजकारणाला उत्तर म्हणून या प्रदेशात उभ्या राहिलेल्या विविध संघटना आणि त्यांची वाटचाल याविषयी आपणाकडे फारच कमी बोलले जाते, मात्र ही कमतरता बऱ्याच अंशी कमी होते ते याबाबत आपल्या देशांतर्गत राजकीय भूमिकेमुळे अनेकांचे नावडते संपादक झालेले गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकामुळे. गिरीश कुबेर यांनी पश्चिम आशियाशी संबंधित ,एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, तेल नावाचं वर्तमान, अधर्म युद्ध असी विविध पुस्तके लिहली आहेत.त्यातील अधर्म युद्ध हे पुस्तक मी नुकतेच वाचले.
३००पानांच्या या पुस्तकात या प्रदेशातील देशांचा प्रकरणनिहाय इतिहास वर्तमान याचा आढावा घेण्यात आला आहे.या प्रदेशातील सामाईक इतिहासाचा आढावा घेतल्यास पुर्व युरोपीय साम्राज म्हणजेच तूर्की साम्राजाचे पतन ही सर्वात मोठी घटना आहे.त्यामुळे हा आढावा तेव्हापासून म्हणजे १९व्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे १८५० पासून घेण्यात आला आहे. तूर्की साम्राजचे विघटन झाल्यावर येथे नवे सत्ताधिश कसे तयार झाले.‌ पश्चिमी युरोपीय राष्ट्रांनी आपले व्यापारी हितसंबंध सुरक्षीत करण्यासाठी या सत्ताधीकारी आणि त्यांचा विरोधकांचा कसा वापर केला. प्रदेशात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर त्यावर पडड्यामागून आपलेच नियंत्रण राहिल,यासाठी त्यांनी खेळलेले राजकारण .जगात इतरत्र पश्चिमी युरोपीय देशांनी ज्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात गळे काढले ते मानवी हक्क त्यांनीच या प्रदेशात कसे पायदळी तूडवले. तसेच सत्ता संघर्षात फक्त स्वत:चाच फायदा बघत अमेरिकेच्या गटातील भांडवलशाही देशांनी कम्युनिष्ठांचा या प्रदेशात निर्माण केलेला बागलबुवा, आणि तो कमी करण्यासाठी त्यांनी या प्रदेशावर लादलेले विनाकारणचे युद्ध.स्वत:च्या नियंत्रणात देशाचा सत्ताधिकारी नाही,हे बघून देशातील जनतेची काहीही मागणी नसताना तो अन्याय करतो असे कारण देत त्याला सत्तेपासून दूर करत देशात राजकीय अस्थैर्य निर्माण करणे.या सारख्या केलेल्या गोष्टी  दरम्यानच्या काळात या सर्व घडामोंडींमुळे त्या प्रदेशात निर्माण झालेला धार्मिक अहंपणा, कट्टरता,आणि त्याची विविध संघटनेत झालेली विभागणी ,त्याचे स्वरूप.या प्रदेशात असणाऱ्या देशांच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रदेशाच्या विकासासाठी त्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी केलेले प्रयत्न,त्याला आलेले यशापयश,या यशापयशाची कारणे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक होय. या पुस्तकात सौदी अरेबिया,इराण इराक, कुवेत सयुंक्त अरब अमिरात,अफगाणिस्तान पाकिस्तान बहरीन इजिप्त, अल्जेरीया,सिरीया,लिबिया, पॅलेस्टाईन,इस्राइल, लेबनॉन,या प्रदेशाचा आढावा घेतला आहे.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे या पुस्तकाचे लेखन करणारे गिरीश कुबेर त्यांच्या देशांतर्गत राजकारणाविषयी घेतलेल्या भुमिकेमुळे अनेकांचे नावडते आहेत.मात्र ते लक्षात ठेवत हे पुस्तक वाचायचेच नाही असे ठरवल्यास आपण एका महत्त्वाचा ज्ञानाला मुकु हे नक्की. या उलट समर्थ रामदास स्वामी यांचा ',उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकूनी द्यावे,असा संदेश आचरणात आणत ,गिरीश कुबेर यांची देशांतर्गत राजकरणाविषयीची मते मिळमिळीत म्हणून टाकून दिल्यास आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्ञान उत्तम समजून त्या विषयीचे हे पुस्तक वाचल्यास आपणास एक फार मोठा खजिना सापडेल याबाबत खात्री बाळगा.मग वाचणार ना हे पुस्तक.
अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५
९४२३५१५४०० 

इमेल पत्ता 

ajinkya.tarte2 @gmail.com

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...