मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची -

  "वाचाल  तर वाचाल, ' "एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्तीकिंवा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे ,प्रसंगी अखंडित वाचित जावे ,शहाणे करून सोडावे जना" अशी आपणास वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी वचने आपणास ज्ञात आहेतच . मात्र अनेकजण आपल्या  दैनंदिन अश्या व्यस्त वेळापत्रकामुळे इच्छा  असूनदेखील आपली वाचनाची भूक भागवू शकत नाही, अश्या लोंकाना सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात मिळणारी सुट्टी देखील कोणत्या पर्वणीसारखीच भासणार ना ? मी देखील या पर्वणीचा सदुपयोग साधत माझे गेल्या कित्येक दिवसापासून शांततेत वाचेल म्हणून  काहीसे दूर ठेवलेले ज्येष्ठ  पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या " पुतीन - महासतेच्या इतिहासाचे अस्वस्थ  वतर्मान " या पुस्तकाचे वाचन केले .   या पुस्तकावर या  आधी बरेच  काही लिहून आले आहे .न्यूज18लोकमत  (त्या वेळेचे आयबीएन लोकमत ) या वृत्तवाहिनीवर त्यांच्या रविवारी होणाऱ्या  पुस्तकविषयक कार्यक्रमात याचा उल्लेख करण्यात आला होता , हे आपल्यापैकी अनेकांना स्मरत असेलच . या सर्व बाबींचा विचार करता मी काहिस्या उशिरानेच सदर पुस्तक वाचावयास घेतले .

                जगातील एके काळच्या असणाऱ्या 2 महासत्तेपैकी एक असणाऱ्या   रशियाचा इसवीसनाच्या 9व्या

शतकापासून सद्यस्थितीपर्यंत  आढावा यात घेण्यात आलेला आहे .ज्यामध्ये सुमारे एक तृतीयांश भागात  हा रशियाचा  9व्या शतकापासून सध्याचे  राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पर्यतचा आढावा घेण्यात आला आहे .तर अन्य भागात पुस्तकाच्या नावात असणाऱ्या पुतीन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे .  पुस्तकाची भाषा गिरीश कुबेर यांच्या इतर पुस्तकांसारखीच सोपी आणि रंजक असल्याने पुस्तक इतर पुस्तकांसारखेच खिळवूनठेवते . रशियाच्या झेंड्याच्या रंगामध्ये विचारमग्न अवस्थेतील पुतीन यांची प्रतिमा पुस्तक आपल्याकडे अक्षरशः खेचून घेते

पुस्तकाची प्रस्तावना ही श्री गिरीश कुबेर यांनीच लिहलेली असून त्यामध्ये त्यांनी सदर विषयावर पुस्तक का लिहले ? हे सांगताना त्यांचा लेखनप्रवास कोणत्या वळणाने झाला ? या प्रवासात त्यांना कोणा कोणाची साथ मिळाली याबाबत सांगितले आहे ? पुस्तकाची रचना एकूण 16प्रकरणात केलेली आहे . पहिल्या चार प्रकरणात पुतीन सत्तासिहासनावर आरूढ होण्यापर्यंतचा रशियाचा इतिहास सांगितला आहे . पुढील दोन प्रकरणात पुतीन यांच्या वैयक्तिक इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे . अंतिम दोन प्रकरणात त्यांच्या समस्त वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच रशियाची पुनः एकदा  महासता बनण्यामागची मानसिकता विशद केली आहे . अन्य प्रकरणामध्ये पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून आणि केलेल्या कृतीमधून घेतलेला आहे . मात्र या प्रकारांमध्ये त्याचे चित्रण काहीश्या नकारत्मकतेने केल्याचे मला वाटते .

राजहंस प्रकाशन सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे . पुस्तकाची रचना नेहमीच्या कागदाच्या  कव्हरमध्ये केलेली आहे . जर त्याची रचना हार्ड बाउंड मध्ये केलेली असली तर पूस्तक अधिक आकर्षक झाले असते , असो .

       आपल्या मराठीत अश्या विषयांवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लेखक लेखन करतात , त्या पार्श्वभूमीवर गिरीश कुबेर यांचे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी डोळ्यासमोरून घातलेच पाहिजे . मला माहिती आहे , कुबेरांची ते लोकसताच्या संपादकीयातून मांडत असणारी मते काही जणांना आवडत नाहीत , मात्र कुबेरांच्या त्या मताच्या मागमूसदेखील या पुस्तकातून आढळत नाही . त्यामुळे ज्यांना जागतिक इतिहास आणि त्याचे वर्तमानातील परिणाम याचा मराठीमध्ये अभ्यासयाचा आहे ,अश्या व्यक्तींनी त्यांची संपादकीयेतून येणारी मते क्षणभर बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायलाच हवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...