बुधवार, २९ एप्रिल, २०२०

ओळख एका रत्नाची -

आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे नावारूपास  आलेल्या आहेतवहिदा   रेहमान त्यापैकीच एक  मूळच्या  तेलगू भाषिक  असणाऱ्या या मुस्लिम  धर्मीय अभिनेत्रीने आपल्या सहज सध्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ गाजवून टाकला . गाईड , प्यासा सारखे  अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले . सुरवातीच्या काळात तेलगू भाषेतील चित्रपट केलेल्या या अभिनेत्रीने अनेक पत्रकारांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आहेत .त्यापैकीच एक म्हणजे नसरीन मुन्नी कबीर  यांना. वहिदा रेहमान यांनी दिलेली मुलाखत ..नसरीन मुन्नी कबीर  यांना दिलेली प्रदीर्घ मुलाखत पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात आली आहे . मुळची इंग्रजीत असलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीचे मराठीतील ज्येष्ठ सिने पत्रकार, आणि आघाडीचे अनुवादक मिलींद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक रोहन प्रकाशनामार्फत प्रकाशीत करण्यात आले आहे.
सदर पुस्तकात मुळ लेखीकेमार्फत डिसेंबर 2012 ते नोव्हेंबर 2013 या अकरा महिन्याचा कालावधीत सुमारे दोन तासाची एक भेट या हिशोबाने पंचवीस भेटीमध्ये वहिदा रेहमान यांची घेतलेली मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे .ही मुलाखत खुपच विस्तृत घेण्यात आली आहे . सुमारे दोनशे पानाच्याया पुस्तकात जवळपास जवळपास एक पंचमांश भागात (अचूकपणे बोलायचे झाल्यास 43पाने) भाग हा वहिदा रेहमान यांच्या वैयत्किक आयुष्यातील वादळी पर्व म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल, अश्या गुरुदत्तांवर आधारीत आहे .मुळ मुलाखत 
सलग असल्याने याचा अनुवाद करताना अनुवादकातर्फे पुस्तकाच्या शेवटी संदर्भसुची देण्यात आल्याचे अनुवादकाच्या मनोगतात स्पष्ट करण्यात आले आहे .
                                   या पुस्तकांमध्ये लेखीकेने वहिदा रेहमान यांच्या अभ्यास करुन प्रश्न विचारल्याचे दिसून येते .त्यांचे बालपण , चित्रपट कारकिर्द , अभिनेता गुरुदत्त , तसेच त्यांनी ज्या फिल्म निर्माता कंपनीमार्फत हिंदी चित्रपट सृष्टीत  पाउल ठेवले, त्या गुरुदत्त फिल्म विषयी वहेदा रहेमान भरभरुन बोलल्या आहेत . त्यांनी बोलणे टाळले आहे , "गीता दत्त" यांच्याविषयी .मुलाखत जरी प्रकरणात देता सलग देण्यात असली तरी पुस्तकामध्ये मधून मधून विविध जूनी चित्रे असल्याने पुस्तक कंटाळवाणे होत नाही 
                                अनुवादित पुस्तकाची भाषा प्रवाही असल्याने पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही. अनुवादकाने या आधी गुरुदत्त यांच्याविषयीचा दोन पुस्तकांचा अनुवाद केलेला असल्याने असेल कदाचित पुस्तकात जिवंतपणा जाणवतो . पुस्तक अनुवादित असले तरी मुळ पुस्तकाचा पोत बदलल्याने आपसुकच
 मुळ इंग्रजी पुस्तक वाचण्याची इच्छा होते. अनुवादीत पुस्तकाची प्रथम आवृत्ती जूलै 2015 ला येते तर द्वितीय आवृत्ती आँक्टोबर 2015मध्ये म्हणजे अगदी मोजक्या दिवसांमध्ये येते, यावरुन पुस्तक किती अप्रतीम आहे, याचा आपणास अंदाज येतो .तर मग वाचणार ना हे अप्रतीम पुस्तक या लाँकडाउनच्या काळात


 

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...