बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका

 


पुस्तकाचे नाव - गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका

-लेखन - अरुण खोपकर

-प्रकाशक -ग्रंथाली प्रकाशन

मुल्य - 450 नुकतेच मी भारतीय चिञपट सृष्टीतील अत्यंत महत्तवाचे म्हणून ज्यांचे नाव घ्यावेच लागेल अश्या गुरुदत्त यांच्या जिवनावर आधारलेले  गुरुदत्त  3 अंकी शोकांतिका हे पुस्तक वाचले पुस्तक साहित्य अकादमीच्या 2016 चे पुरस्कार विजेते ज्येष्ठ सिने परीक्षक , कथालेखनकार भारतीय चिञपटसृष्टीघे जाणकार म्हणून भारताला परिचीत असणार्या श्री अरूण खोपकर यांनी लिहलेले  आहे  आणि ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे पुस्तकात गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उहापोह करता त्यांच्मा चिञपट निर्मितिच्या अंगाबाबत यामध्ये भाष्य केले आहे .  भाष्य करताना अन्य चिञपट निर्मात्याच्या अनुषंगाने गुरुदत्त कसे डावे अथवा उजवे ठरतात यावर सांगितलेले आहे . विषय कठिण असला तरी वापरलेली भाषा खुप सहज सोपी असल्याने पुस्तक रंजक झाले आहे . जे वाचतांना पहिल्यापासून पकड घेते

               आणि म्हणूनच असेल कदाचित या मुळच्या मराठी पुस्तकाचा  इंग्रजी बरोबर इटालियन या भाषेत संपुर्ण  पणे  तर फेंच्र भाषेत काहि भाग अनुवादित झाला आहे . (मराठीत माञ या पुस्तकाची पहिली आवृति संपुन दुसरी येण्यासाठी  फक्त एक पिढी अर्थात 25 वर्षे लागली . मलादेखील पुण्यातील आप्पा बळवंत चौकात हे पुस्तक सहज मिळालेले नाही . विक्रेत्याने देखील कोणते पुस्तक मागितले किती ञासाने आणले याचा पाढा पुस्तक देताना माझ्यासमोर वाचला)  आपल्या मराठीत माझ्या अल्पशा अश्या माहितीनुसार अन्य भाषेतून मराठित भषांतरीत झालेली अनेक पुस्तके आहेत .पण मराठीतून अन्य भाषेत गेलेली पुस्तके फारशी नाहित (माहितगारांनी यावर भाष्य केल्यास तो मी माझा सत्कारच समजेल )

गुरुदत्त या नावामधील दत्त या नावामुळे कदाचित त्यांना बंगाली समजले जावू शकते . माञ ते मुळचे मराठी भाषिक कोल्हापुरचे मंगेशी देवीचे आराधना करणार्या घरातील .त्या अर्थाने ते महाराष्ट्र आणि गोव्याचे सुपुञ ठरतात .अर्थात त्याच्या जडणघडणीची काहि वर्ष  बंगालमध्ये गेली . आणि त्यांच्या कुंभ राशीला हे अक्षर सुदैवी ठरत असल्याने त्यांनी गुरुदत्त हे टोपण नाव स्विकारले . ज्योतिषशास्ञाचा अनुषंगाने गेल्यास कुंभ रास गंभिरता अगम्यता सांगते (अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात त्या प्रमाणे  माझी रास जरी कुंभ असली (शततारका नक्षञ )तरी माझ्या बाबत अपवाद करावा  हि विनंती ) त्याचा प्रत्यय आपणास पुस्तक वाचतांना येतो .

गुरुदत्त यांनी प्यासामध्ये साकारलेली कवी विजय ची भुमिका ते कश्यासाठी प्रत्याक्षात जगले  असे विचार पुस्तक वाचतांना मला तरी आले . (प्यासामध्ये कवी विजय हालाखीचे जिवन संपवण्यासाठी रेल्वेच्या साह्यायाने आत्महत्या करायचे ठरवतो .शेवटचे पुण्यकार्य म्हणून तो आपला कोट ज्यात सुसाईड नोट लिहलेली असते  तो एका भिकार्याला देतो.कवि विजयच्या दुर्देवाने रेल्वे टँक बदलते ज्मामुळे तो भिकारी मरतो विजय जिवंत रहातो , माञ कोटामुळे लोकांना वाटते विजय गेला . कालांतराने कवि विजयचा कवितासंग्रह प्रचंड  लोकप्रिय

ठरतो तेव्हा त्याला हालाखिचा दिवसात झिडकारानारे लोक त्याला कशी मदत केली याचे गोडवे गातात ) कारण त्याचा चिञपटांचा विचार त्यांनी दारु आणि झोपेच्या गोळ्या यांचा सेवनाने 10 आॉक्टोबर 1964ला म्हणजेच 


पन्नास वर्षापीर्वी वयाचा 39 केली . पण आज देखील त्यांचा चिञपटातील सर जो तेरा चकाराऐ , चौदंहवी का चांद हो या आफ. ताब हो सारखी गाणी लोकांना आवडतात याचा विचार करावाच लागतो .

हार्ड बाउंड बांधणीमुळे पुस्तक छान वाटते तुम्ही त्याचा फोटो बघत असालच मुखपृष्ठ वरील त्यांचे चिञ त्यांच्या आयुष्यातील दुख सहजरित्या सांगते

पुस्तकाचा शेवटी परिशिष्ठे आहेत . ज्यात लेखकाने अन्य ठिकाणी गुरुदत्त यांच्यावर लिहलेला लेख गुरूदत्त यांची 1952 साली प्रकाशीत झालेली मुलाखत आणि गुरूदत्तांच्या आयूष्यातील महत्तवाची व्यक्ती असणार्या वहिदा रेहमान यांची गुरुदत्त यांच्याबाबत केलेले भाष्य पुस्तकाला एक वेगळाच आयाम चढवतात .

मी वाचलेले गुरुदत्तांवरील हे दूसरे पूस्तक पहिले पुस्तक म्हणजे अब्रार अल्वी यांनी लिहलेले आणि मराठीत अनूवाद झालेले Ten years with Gueudatt हे पुस्तक .अल्वी यांनी लिहलेले पुस्तक त्याचा वैयक्तीक आयुष्यावर भाष्य करते

अर्थात यावर खुप काहि बोलता येवू शकते माञ या समाज माध्यमाचा मर्यादा लक्षात घेवून थांबतो

आपला अजिंक्य तरटे

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...