बुधवार, २९ एप्रिल, २०२०

ओळख एका रत्नाची -

आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे नावारूपास  आलेल्या आहेतवहिदा   रेहमान त्यापैकीच एक  मूळच्या  तेलगू भाषिक  असणाऱ्या या मुस्लिम  धर्मीय अभिनेत्रीने आपल्या सहज सध्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ गाजवून टाकला . गाईड , प्यासा सारखे  अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले . सुरवातीच्या काळात तेलगू भाषेतील चित्रपट केलेल्या या अभिनेत्रीने अनेक पत्रकारांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आहेत .त्यापैकीच एक म्हणजे नसरीन मुन्नी कबीर  यांना. वहिदा रेहमान यांनी दिलेली मुलाखत ..नसरीन मुन्नी कबीर  यांना दिलेली प्रदीर्घ मुलाखत पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात आली आहे . मुळची इंग्रजीत असलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीचे मराठीतील ज्येष्ठ सिने पत्रकार, आणि आघाडीचे अनुवादक मिलींद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक रोहन प्रकाशनामार्फत प्रकाशीत करण्यात आले आहे.
सदर पुस्तकात मुळ लेखीकेमार्फत डिसेंबर 2012 ते नोव्हेंबर 2013 या अकरा महिन्याचा कालावधीत सुमारे दोन तासाची एक भेट या हिशोबाने पंचवीस भेटीमध्ये वहिदा रेहमान यांची घेतलेली मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे .ही मुलाखत खुपच विस्तृत घेण्यात आली आहे . सुमारे दोनशे पानाच्याया पुस्तकात जवळपास जवळपास एक पंचमांश भागात (अचूकपणे बोलायचे झाल्यास 43पाने) भाग हा वहिदा रेहमान यांच्या वैयत्किक आयुष्यातील वादळी पर्व म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल, अश्या गुरुदत्तांवर आधारीत आहे .मुळ मुलाखत 
सलग असल्याने याचा अनुवाद करताना अनुवादकातर्फे पुस्तकाच्या शेवटी संदर्भसुची देण्यात आल्याचे अनुवादकाच्या मनोगतात स्पष्ट करण्यात आले आहे .
                                   या पुस्तकांमध्ये लेखीकेने वहिदा रेहमान यांच्या अभ्यास करुन प्रश्न विचारल्याचे दिसून येते .त्यांचे बालपण , चित्रपट कारकिर्द , अभिनेता गुरुदत्त , तसेच त्यांनी ज्या फिल्म निर्माता कंपनीमार्फत हिंदी चित्रपट सृष्टीत  पाउल ठेवले, त्या गुरुदत्त फिल्म विषयी वहेदा रहेमान भरभरुन बोलल्या आहेत . त्यांनी बोलणे टाळले आहे , "गीता दत्त" यांच्याविषयी .मुलाखत जरी प्रकरणात देता सलग देण्यात असली तरी पुस्तकामध्ये मधून मधून विविध जूनी चित्रे असल्याने पुस्तक कंटाळवाणे होत नाही 
                                अनुवादित पुस्तकाची भाषा प्रवाही असल्याने पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही. अनुवादकाने या आधी गुरुदत्त यांच्याविषयीचा दोन पुस्तकांचा अनुवाद केलेला असल्याने असेल कदाचित पुस्तकात जिवंतपणा जाणवतो . पुस्तक अनुवादित असले तरी मुळ पुस्तकाचा पोत बदलल्याने आपसुकच
 मुळ इंग्रजी पुस्तक वाचण्याची इच्छा होते. अनुवादीत पुस्तकाची प्रथम आवृत्ती जूलै 2015 ला येते तर द्वितीय आवृत्ती आँक्टोबर 2015मध्ये म्हणजे अगदी मोजक्या दिवसांमध्ये येते, यावरुन पुस्तक किती अप्रतीम आहे, याचा आपणास अंदाज येतो .तर मग वाचणार ना हे अप्रतीम पुस्तक या लाँकडाउनच्या काळात


 

       

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

वाचावीच अशी कांदबरी : महाश्वेता

 

कोड........  मिलॅलीन  नामक एका अंतस्रावाच्या कमतरतेमुळे होणारी व्याधी . शरीराच्या त्वचेच्या रंग या मध्ये बदलतो . या खेरीज माणसामध्ये कोणतेही बदल या मध्ये होत नाही . मात्र हे झाले व्यक्तीच्या शारीरिक बदलांविषयी . मात्र आपल्या भारतासारख्या रुढीप्रिय देशामध्ये संबंधित देशामध्ये त्या व्यक्तीचे मनोविश्व या मध्ये अक्षरशः ढवळून निघते . सध्या सन 2020 मध्ये या मध्ये काहीसा बदल झालेला असला तरी सन 1960 च्या सुमारास हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते . आणि  जर व्यक्ती जर महिला असेल तर विचारयलाच नको ,   लग्न झालेल्या महिलांना तर याचीच झळ मोठ्या प्रमाणत बसते

.      कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या  महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता .                                                            

  सुमारे 300 पानांमधून उलगडणारी ही कांदबरी मी नुकतीच वाचली .तीस प्रकराणातून सुधा या स्त्रीची उलगडणारी कथा प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच ही कांदबरी .    कांदबरीच्या सुरवातीला प्रास्ताविकेत कोड या व्याधीविषयी काही चर्चा केलेली आहे .  याज्यामुळे आपणास कोड या विषयीची शास्त्रीय माहिती मिळते . सुमारे पंधरा पाने ही चर्चा करण्यात आली आहे .

           सदर कादंबरीची सुरवात होते कोल्हापूर येथील एका पिढीजात  काहीं गावांची  इमानदारी असलेल्या देशपांडे या घराण्याच्या सुखी संसंसारापासून . वृत्तीने बंडखोर असलेल्या आणि घराण्याचा पारंपरिक बडेजावपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिणारा माधव हा या कांदबरीचा नायक . आणि त्यांची पत्नी म्हणजे सुधा जीला लग्नानंतर दोन वर्षाने कोडाची सुरवात होते . आणि आपल्या कांदबरीची सुरवात होते . पारंपरिक धार्मिक

वृत्तीच्या देशपांडे घराण्यात यामुळे प्रचंड वादळ उठते . परिणामी आपली वेगळी वाट चोखाळू इच्छिणारा माधव आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करतो . तो परत आपल्या पत्नीचा स्वीकार करतो का हे   बघण्यासाठी महाश्वेता ही कादंबरी वाचावयासच हवी . मग वाचता ना ही कांदबरी ?

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

ओळख एका डॉनच्या जडणघडणीची -

 दाऊद इब्राहिम कासकर ....... . मुंबईच्या पोलिस दलातील आचरणाने धार्मिक वृत्तीचा असलेल्या  कॉन्स्टेबल  इब्राहिम कासकर याचा मुलगा  अर्थात भारताला हवा असणारा डॉन दाऊद इब्राहिम . या दाऊदविषयी इंग्रजी भाषेत बरेच काही लिहून आलेले आहे . मात्र मराठी मुलखात जन्मलेल्या या डॉन विषयी मराठीत तसे कमीच लिहून आलेले आपणास दिसते .त्यातही मुळातील इंग्रजी भाषेतील  मजकुराचा मराठीत केलेला अनुवादाचं अधिक . याच अनुवादित मजकुराच्या मालिकेतील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ज्यावर आधारित बॉलीवूडमध्ये शूट आऊट लोखंडवाला हा चित्रपट तयार आला ते पुस्तक अर्थात डोंगरी ते दुबई . मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले . ओघवती सहज सोप्या मराठीत अनुवादित झालेले हे पुस्तक  त्याच्या भाषाशैलीमुळे पाहिल्या बरोबरच मनाचा ठाव घेते

              अनुवादकाचे मनोगत , अनुवादित पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाचे हितगुज अशी इतर अनुवादित पुस्तकात दिसणारी आणि मूळच्या पुस्तकात नसणारी वाढीव पाने या पुस्तकामध्ये नाहीत हे या पुस्तकाचे वैशिष्टच म्हणता येईल . हे पुस्तक  दोन भागात विभागले असून दोन्ही भागात विविध प्रकरणाच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर मुंबईत गुन्हेगारीची सुरवात कशी झाली हे सांगत दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी विश्वाचा आढावा घेण्यात आला आहे .  ज्यामध्ये सदर पुस्तकाच्या एका प्रकरणात  या पुस्तकाच्या लेखकाने घेतलेली दाऊद इब्राहिमची मुलाखत समाविष्ट केलेली आहे . तसेच दाऊद इब्राहिम च्या गुन्हेगारी कारकिर्दीत त्याचे सहकारी अथवा प्रतिस्पर्धी असलेल्या छोटा राजन, अबू सालेम, अरुण गवळी   आदी गुन्हेगारीच्या कारकिर्दीवर  देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकच्या सुरवातीला मुंबईतील टोळीयुद्ध कसे सुरु  झाले ? करीमलाला , वरदराजन , हाजी मस्तान आदींचा उदय  कसा  झाला त्याच बरोबर मुंबईतील टोळीयुधद यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

     दाऊदच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जो या पुस्तकाच्या मूळ विषय आहेया बाबत बोलायचे झाल्यास, दाऊदच्या उद्य कशा आणि कोणत्या प्रकारे झाला ? त्याचा पहिला गुन्हा कोणत्या प्रकारे झाला ?दाऊदला मुंबईतील एका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी काट्याने काटा काढणे या म्हणीचा आधार घेत मुंबईतील संघटित गुन्हेगारी मोडण्यासाठी त्याचा कश्या प्रकारे वापर केला ? त्याचे पहिले अयशस्वी प्रेम आणि दुसऱ्या मुलीवरचे यशस्वी प्रेम याबाबरोबरच   दाऊदने कोणत्या स्थितीत मुंबईतून पहिल्यांदा दुबईला पलायन केले ? दुबईतून

कराचीला कोणत्या स्थितीत गेला ? अमेरिकेवरील हल्ल्यानंतर , ओसामा बिन लादेनच्या मृत्यनंतर त्याने कराची कशी सोडली ? नंतर पुन्हा कराचीला कसा आला ?   पुस्तकाचा शेवटी सदर पुस्तक निर्मितीसाठी लागलेल्या संदर्भाचा उल्लेल्ख करण्यात आलेला आहे .

            एकंदरीत पुस्तक आपल्या गुन्हेगारी  विश्वाच्या ज्ञानात  मोठ्या प्रमाणात भर घालते . गुन्हेगारीच्या विश्वात जाण्यासाठी नव्हे तर त्यापासून कसे वाचावे ? याचे मार्गदर्शन होण्यासाठी हे पुस्तक वाचावेच . मित्रानो गुन्हेगारीचे  विश्व हे एकमार्गी आहे . यात फक्त जाण्याचा  मार्ग आहे . एकदा या विश्वात शिरल्यावर कितीही इच्छा असली तरी मागे फिरता येत नाही . मराठीत अनेक व्यक्तींची चरित्रे आहेत मात्र हि आयुष्यात कोणत्या प्रकारे चालावे हे सांगतात . मात्र आयुष्य कोणत्या प्रकारे नसावे ? हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावेच .

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची -

  "वाचाल  तर वाचाल, ' "एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्तीकिंवा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे ,प्रसंगी अखंडित वाचित जावे ,शहाणे करून सोडावे जना" अशी आपणास वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी वचने आपणास ज्ञात आहेतच . मात्र अनेकजण आपल्या  दैनंदिन अश्या व्यस्त वेळापत्रकामुळे इच्छा  असूनदेखील आपली वाचनाची भूक भागवू शकत नाही, अश्या लोंकाना सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात मिळणारी सुट्टी देखील कोणत्या पर्वणीसारखीच भासणार ना ? मी देखील या पर्वणीचा सदुपयोग साधत माझे गेल्या कित्येक दिवसापासून शांततेत वाचेल म्हणून  काहीसे दूर ठेवलेले ज्येष्ठ  पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या " पुतीन - महासतेच्या इतिहासाचे अस्वस्थ  वतर्मान " या पुस्तकाचे वाचन केले .   या पुस्तकावर या  आधी बरेच  काही लिहून आले आहे .न्यूज18लोकमत  (त्या वेळेचे आयबीएन लोकमत ) या वृत्तवाहिनीवर त्यांच्या रविवारी होणाऱ्या  पुस्तकविषयक कार्यक्रमात याचा उल्लेख करण्यात आला होता , हे आपल्यापैकी अनेकांना स्मरत असेलच . या सर्व बाबींचा विचार करता मी काहिस्या उशिरानेच सदर पुस्तक वाचावयास घेतले .

                जगातील एके काळच्या असणाऱ्या 2 महासत्तेपैकी एक असणाऱ्या   रशियाचा इसवीसनाच्या 9व्या

शतकापासून सद्यस्थितीपर्यंत  आढावा यात घेण्यात आलेला आहे .ज्यामध्ये सुमारे एक तृतीयांश भागात  हा रशियाचा  9व्या शतकापासून सध्याचे  राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पर्यतचा आढावा घेण्यात आला आहे .तर अन्य भागात पुस्तकाच्या नावात असणाऱ्या पुतीन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे .  पुस्तकाची भाषा गिरीश कुबेर यांच्या इतर पुस्तकांसारखीच सोपी आणि रंजक असल्याने पुस्तक इतर पुस्तकांसारखेच खिळवूनठेवते . रशियाच्या झेंड्याच्या रंगामध्ये विचारमग्न अवस्थेतील पुतीन यांची प्रतिमा पुस्तक आपल्याकडे अक्षरशः खेचून घेते

पुस्तकाची प्रस्तावना ही श्री गिरीश कुबेर यांनीच लिहलेली असून त्यामध्ये त्यांनी सदर विषयावर पुस्तक का लिहले ? हे सांगताना त्यांचा लेखनप्रवास कोणत्या वळणाने झाला ? या प्रवासात त्यांना कोणा कोणाची साथ मिळाली याबाबत सांगितले आहे ? पुस्तकाची रचना एकूण 16प्रकरणात केलेली आहे . पहिल्या चार प्रकरणात पुतीन सत्तासिहासनावर आरूढ होण्यापर्यंतचा रशियाचा इतिहास सांगितला आहे . पुढील दोन प्रकरणात पुतीन यांच्या वैयक्तिक इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे . अंतिम दोन प्रकरणात त्यांच्या समस्त वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच रशियाची पुनः एकदा  महासता बनण्यामागची मानसिकता विशद केली आहे . अन्य प्रकरणामध्ये पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून आणि केलेल्या कृतीमधून घेतलेला आहे . मात्र या प्रकारांमध्ये त्याचे चित्रण काहीश्या नकारत्मकतेने केल्याचे मला वाटते .

राजहंस प्रकाशन सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे . पुस्तकाची रचना नेहमीच्या कागदाच्या  कव्हरमध्ये केलेली आहे . जर त्याची रचना हार्ड बाउंड मध्ये केलेली असली तर पूस्तक अधिक आकर्षक झाले असते , असो .

       आपल्या मराठीत अश्या विषयांवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लेखक लेखन करतात , त्या पार्श्वभूमीवर गिरीश कुबेर यांचे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी डोळ्यासमोरून घातलेच पाहिजे . मला माहिती आहे , कुबेरांची ते लोकसताच्या संपादकीयातून मांडत असणारी मते काही जणांना आवडत नाहीत , मात्र कुबेरांच्या त्या मताच्या मागमूसदेखील या पुस्तकातून आढळत नाही . त्यामुळे ज्यांना जागतिक इतिहास आणि त्याचे वर्तमानातील परिणाम याचा मराठीमध्ये अभ्यासयाचा आहे ,अश्या व्यक्तींनी त्यांची संपादकीयेतून येणारी मते क्षणभर बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायलाच हवे

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...