शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

कथा सोन्याचा व्यवसायाची

 

आपल्याकडे गुरु पुष्पामृत योग, दसरा,लग्न आदी प्रसंगी सोने खरेदीची प्रथा आहे. काही लोक दागिन्यांसाठी तर काही लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतातमात्र या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींचे जीवन कसे असते ? सोन्याचे दागिने तयार करणारे  सुवर्णकार आणि सोने विकणारे सराफ यांचा खेरीज अन्य कोणते घटक या व्यवहाराशी संबंधित असतात . त्यांचे जीवन कसे असते ? सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघावे की दागिने करण्याचा एक धातू म्हणून बघावे ? सोने कसे खरेदी करावे?,  ज्यामुळे ते मोडताना घट येणार नाही सध्याची या व्यवसायाची परिस्थिती कशी आहे ? सोन्याच्या व्यवसायातील  सध्याच्या  अडचणी काय आहेत . दागिने कसे तयार करतात . सोन्यातील भेसळ कशी ओळखावीसोन्याविषयी  कोणते विविध कायदे होते आणि सध्या आहेत ? सराफ आणि सुवर्णकारांनी आपल्या उद्योगाच्या रक्षणासाठी आंदोलने केली का ? त्याची फलनिश्चिती काय झाली ? आदी अनेक प्रश्नाची सहजसोप्या ओघवत्या  मराठी भाषेत माहिती देणारी अत्यंत मोजकी पुस्तके मराठीत आहेत . आणि या मोजक्या पुस्तकांमध्ये नाशिकच्या सोमवार पेठेतील सराफ श्री सुनील शिरवाडकर यांनी लिहलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या " सोन्याचा संगतीत " या पुस्तकाच्या समावेश करावाच लागेल .

            मराठीतील एक श्रेष्ठ लेखक , विनायक पाटील यांची प्रस्तावना लाभलेल्या या  150 पानाच्या  पुस्तकात लेखकाने 31 प्रकरणातून त्याचे स्वतःचे व्यवसायातील अनुभव आणि  व्यवसायाविषयक माहिती सांगितली आहेच त्याखेरीज सध्याच्या नोकऱ्या जाण्याचा काळात चरितार्थ चालवण्यासाठी काय करावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे . त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्रतील महत्तवाचे शहर असलेल्या  नाशिक शहरातील सराफ 

बाजाराचा इतिहास, त्याचा पुढील आव्हाने समस्या, सोन्या इतकाच मौल्यवान धातू असणाऱ्या चांदीचा  व्यवसाय कसा चालतो ,?  महाराष्ट्राखेरीज गुजरात राज्यातील  राजकोट आणि कर्नाटक  आणि  महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात  अर्थात कोल्हापूर आणि  बेळगाव जिल्ह्यात सोन्याचा आणि  चांदीचा व्यवसाय कशा चालतो याचीही माहिती आपणास या पुस्तकातून मिळते  

हे पुस्तक निवळ माहिती देणारे पुस्तक  नसून सुमारे 40 वर्ष लेखकाने  स्वतः सोन्याचा व्यवसायात विविध पदावर काम केल्याने आणि त्याचा योग्य त्या ठिकाणी यथोचित वापर केल्याने पुस्तक सुरवातीपासून शेवटाकडे अधिकाधिक रंजक होत जाते . लेखकाने पिढीजात व्यवसायात कसा  प्रवेश केला ?   व्यवसायात स्थिरस्थावर

होण्यासाठी लेखकाने कोणकोणत्या खस्त्या खाल्या ? वेळोवेळी मिळणाऱ्या अनुभवातून लेखक कशा पद्धतीने शिकत गेला लेखकाने या पिढीजात व्यवसायाखेरीज अन्यत्र काही चरितार्थासाठी काही केलेलं का ? नाशिकचे विश्व सन 1929पासून  कशे कशे आधुनिक बनत गेले ? याबाबत देखील माहिती यात मिळते

मी नुकतेच हे पुस्तक वाचले . पुस्तक उत्तम आहे . सध्याचा काळात पुस्तकाच्या  किमती गगनाला भिडलेल्या असताना फक्त 200 रुपयातील हे पुस्तक संग्रही आसवेच असे आहे मग कधी घेताय हे पुस्तक वाचायला

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...