शनिवार, १६ मे, २०२०

कश्यासाठी वाचनासाठी

 

कालचीच गोष्ट आहे, मी सहजच टीव्हीवर सर्फिंग करत असताना लोकसभा टीव्ही या वाहिनीवर एक साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिसला , अन मनात विचार आला, टीव्हीसारख्या ताकदवान माध्यमांचा साहित्यप्रसार अश्या गोष्टीसाठी वापर फक्त सरकारी मालकीच्या वाहिन्यांनीच का करावा ? नाही म्हणायला  नेटवर्क 18लोकमत या वाहिनीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी दर रविवारी साहित्यीकांचा मुलाखतीचा कार्यक्रम लागत असे . (त्यावेळी या वाहिनीचे नाव आय बी एन लोकमत होते ) मात्र सध्या तो कार्यक्रम बंद आहे   त्यामुळे माझ्या

माहितीत लोकसभा टीव्हीवरील सदर कार्यक्रम वगळता , पुस्तके आणि साहित्यिकांचा बाबत दुसरा कार्यक्रम नाही . जर असेल तो या पोस्टच्या खाली सांगावा ?  त्याचप्रमाणे डीडी नॅशनलवर 'किताबनामा हा कार्यक्रम प्रकशित होत असे मात्र ते देखील सरकारी मालकीचेच ठरते ना  .

                                     विविध वृत्तपत्रातून आणि काही  नियतकालिकांमधून  नवीन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती येते .मराठीतील तुरळक अशी फक्त याचसाठी प्रकाशित होणारी काही नियतकालिके मला माहिती आहेत . आणि अशी नियतकालिके मला नाशिकमध्ये दिसत नाही . पुण्यामध्ये काही प्रमाणात

दिसतात . मात्र प्रिंट माध्यमांपेक्षा अधिक बलशाली असणाऱ्या  इलेट्रीक चॅनेलवर मात्र या बाबाबत अनास्थाच जास्त दिसतेय . कोणतेही माध्यम हे आर्थिक बाजूच्या विचार करूनच चालवले जात असले तरी कोणत्याही टीव्ही चॅनेलला यात रस वाटू नये ? हे आपले दुर्दैव नाही का ?

                 नाही म्हणायला चित्र फारच वाईट नाही , फेसबुक , व्हाट्सअप आधी समाजमाध्यांव्दारे पुस्तकांबाबत चर्चा केली जाते . स्टोरी टेल , प्रतिलिपी सारखी अँप यासाठी आहेत .  मात्र याला काही प्रमाणात मर्यादा आहेत . इलेट्रीक वाहिन्यांसारखी याला सहजता नाही . त्यामुळे या सर्व माध्यमांमुळे जरी काही प्रमाणात पुस्तकांचा परिचय होत असला तरी  इलेट्रीक वाहिन्यांचे  अपयश लपत नाही . काही म्हणतील

सरकारी वाहिन्यांवरील का होईना पुस्तकाविषयी कार्यक्रम आहेना ? मला  त्यांना विचारायचे आहे ? या सरकारी चॅनेलची दर्शक संख्या किती ? किती जण त्या वाहिन्या बघतात .? मराठी दिन, जागतिक पुस्तक दिन अश्या

मोजक्या दिवशी पुस्तकांविषयी बोलता , जर इलेट्रीक चॅनेलवर कायस्वरूपी पुस्तकाविषयी कार्यक्रम झाल्यास सोन्याहून पिवळे ठरेल हेच खरे ! ते करण्याची सुबुद्धी लवकरात लवकर इलेट्रीक माध्यांना  येवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो , नमस्कार .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...