शुक्रवार, २२ जुलै, २०२२

उत्कृष्ट वाचन म्हणजे ?

 

दिसामंजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे शहाणे करून सोडावे सकल जन  असे  श्री समर्थ रामदास स्वामी  यांचे वचन आहे . माणसाने नेहमी ज्ञानप्राप्तीच्या साधनेत तरी असावे, किंवा दुसऱ्या व्यक्तीना ज्ञान देण्याच्या कार्यात मग्न असावे . अशा या वचनाचा अर्थ आहे               

         आता ज्ञानप्राप्ति वाचनाने होत असली तरी या वाचनाचे विविध प्रकार आहेत. कोणी साहित्यकृती वाचून ज्ञानप्राप्ति करेल तर कोणी विविध प्रकारची पुस्तके मासिके आणि रोजची वर्तमानपञे वाचून आपली ज्ञानसाधना करेल .आता रोजची विस पंचवीस वर्तमानपञे विविध मासिके वाचणे म्हणजे वाचन समजायचे का हा वादाचा मुद्दा होइल काहींचा मते चांगल्या साहित्यकृतीचे वाचन म्हणजेच वाचन होय. मासिके वर्तमानपञे कितीही वाचली तरी ते वाचन नव्हे, असो .हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवूया क्षणभर .

                              चांगल्या वाचनाची व्याख्या काय समजायची  जर पुस्तकांचे वाचन म्हणजेच वाचन असे समजले तर कोणत्या पूस्तकांचा वाचनाला अग्रक्रम देयचा साहित्यकृती असणारऱ्या पुस्तकांना ज्यामुळे 

भाषावैभव वाढते, की भले भाषा वैभवात कमी असणाऱ्या माञ एखाद्या विषयातील माहिती असणाऱ्या पुस्तकांना अधिक महत्व देयचे?   माझ्या स्वता:चा अनुभवा नुसार मला हे व्यक्ती सापेक्ष वाटते कारण मला स्वत: ला दोन व्यक्तीनी ज्याची टेबले एकमेकास लागून आहेत .अश्या व्यक्तीपैकी एकाने, "अजिंक्य तुझे वाचन फारच कमी आहे ते तुझा भाषेतून जाणवते असे म्हटले होते तर दुसऱ्या व्यक्तीने अजिंक्य तुझे वाचन खुप आहे तुझ्या ज्ञानातून ते जाणवते असे म्हटले होते .अर्थात दोन्ही व्यक्तीनी वेगळ्या प्रसंगी ते म्हटल्याने त्यांची जुगलबंदी काही रंगली नाही असो या विषयी तुम्हाला काय वाटते

                                                  माञ सखोल तसेच विस्तृत वाचन कशाला म्हणायचे हा मुद्दा आहेच ना ? एखाद्या विषयासंबधी उपलब्ध सर्व असे वाचले की ,समजायचे का ? सदर व्यक्तीचे वाचन परिपुर्ण आहे . अश्या व्यक्तीचे वाचन , मुंबईतील उंच अश्या स्काय स्कँपर  ज्यात अत्यंत कमी जागेत जास्तीत जास्त लोक राहत असतात, त्यासारखे आहे असे मला वाटते. जर या ईमारतीला  लागणारी जागा म्हणजे एखादा विषय आहे त्या इमारतीची उंची म्हणजे त्याचे त्या विषयातील ज्ञान आहे असे समजल्यास. सदर मुद्दा अधिक चांगल्या पध्दतीने

समजेल.  असे वाचन चांगले  ? की  बंगलोर पँटन( बंगलोर मध्ये उंच इमारती नाहीत शहरात छोट्या इमारती खुप आहेत त्यामुळे शहर लांबट झाले आहे)  चांगला ज्यात भले विषयातील ज्ञानाची खोली कमी असेल , माञ अधिक विषयाचे ज्ञान असेल तर  अश्या माणसाचे ज्ञान परिपुर्ण मानायचे का ?

         वाचनाची व्याख्या काय ?आणि समृद्ध  वाचनाचे आपले निष्कर्ष काय ? जाता जाता एक आठवण करुन देतो आचार्य विनोबा भावे यांनी वाचनाविषयी मांडलेले मत हे पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी मराठीत अजरामर केलेल्या सखाराम( आणि दुसरा सखाराम म्हणजे तेंदुलकरांचा सखाराम अर्थात सखाराम बांइडर आहे ) म्हणजेच गटण्यांचा सखाराम विषयी आहे त्यामुळे वाचन चांगले की वाईट हा मुद्दाच नाहीये तर वाचना विषयीचा अन्य मुद्द्याना स्पर्श करण्याचा माझा प्रयत्न आहे. या विषयी खुप काही बोलण्यासारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...