आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली पायद्वारे सतत पोहणे सुरू असते.बदकांच्या पायांची हालचाल होत असल्याने वरवर शांत वाटणारे पाणी सतत वेगाने धुसमळत असते. मात्र वरून बघताना आपणास ते पाणी शांत भासते,आत चालणाऱ्या वादळाची आपल्याला कल्पना देखील येत नाही.
कोणत्याही सुप्रसिद्ध माणसाचे व्यक्तीमत्व देखील काहीसे असेच असते. ज्या कारणासाठी तो प्रसिद्ध झाला, त्या पातळीपर्यत पोहोचण्यासाठी त्याने घेतलेले सर्वच्या सर्व कष्ट बाहेर येतीलच असे नाही. लोकांनी गरज नसता केलेले मात्र तरी देखील हसत हसत सहन केलेले अपमान, मेहनत लोकांपर्यत पोहचलेलेच असे नाही. एखाद्या यशस्वी व्यक्तीमत्वाचा आपण सत्कार करत असू तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भलेही हास्य दिसत असले तरी त्या हसऱ्या चेहऱ्यामागची भावना या स्थितीपर्यत पोहचण्यासाठी केलेले कष्ठ आठवून मनातल्या मनात रडत सुद्धा असू शकते.
याच हसऱ्या दु:खामगाची वेदनेची कारुण्यातेची आपल्याशी भेट होते, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि भा.द.खेर लिखित 'हसरे दु:ख या पुस्तकात.नाशिकमधील सर्वात जून वाचनालय असलेल्या सावाना, अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या सौजन्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले. या पुस्तकात थोर विनोदवीर चार्ली चाप्लिन यांचे कांदबरी स्वरुपात चरीत्र सांगण्यात आले आहे. स्वामी या कांदबरीतून जसे माधवराव पेशव्यांचे, नेताजी मधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कथास्वरुपातील चरीत्र आपणासमोर उभे करण्यात येते.अगदी त्याचप्रमाणे भा.द.खेर यांनी आपल्यासमोर चार्लि चाप्लिन याचे चरीत्र उभे केले आहे.
या पुस्तकाच्या ५१४ पानातून ३२ प्रकरणाद्वारे,लेखकाने सविस्तरपणे रंजकभाषेत चार्ली चाप्लिन यांचे चरीत्र रेखाटले आहे.पुस्तकाचे पहिले प्रकरण चार्लि चाप्लिनचे रंगभुमीवर पाऊल कसे पडते? याविषयी सांगते. या प्रकरणात चार्लि चाप्लिनची आई,जी व्यावसायिक गायिका आहे, जी गाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा कमवते अस्या लिली हार्ले हीच्या गाण्याचा कारकिर्दीचा शेवट कसा वेदनादायी होतो. गाण्याचा कारकिर्दीचा दुर्देवी शेवट झाल्याने ती चरीतार्थ भागवण्यासाठी अन्य छोटो मोठे व्यवसाय कसे करते,त्याचा बाल चार्ली चाप्लिनवर कसा परीणाम होतो, हे पहिल्या प्रकरणात सांगण्यात आले आहे. पहिल्या प्रकरणात सांगितलेल्या बाबीच आधिक सविस्तरपणे साधरणत: एक तृतीयांश पुस्तकात सांगितल्या आहेत.या बाबी सांगताना चार्लिची आईच्या पुर्वायुष्यातील व्यक्तींचा उल्लेख करत गाडी हळूचपणे भुतकाळात नेली आहे.
पुस्तकाचा साधरणत: पहिला एक तृतीयांश भाग वाचून झाल्यावर लेखकाने संपुर्ण फोकस चार्लि चाप्लिनवर केला आहे. यामध्ये त्याचा व्यवासायिक नट, दिग्दर्शक म्हणून प्रवेश, त्याला मिळणारे यश, आपल्या भावडांशी असणारे त्याचे प्रेमळ संबंध, त्याला यशाकडे वाटचाल करताना अचानक आलेले अपयश आपल्या आयुष्यातील पुर्वानुभव आठवत त्याने त्यावर केलेली मात याबी पुस्तकाच्या सुमारे ३३ टक्के ते ६६टक्के या भागात सांगितल्या आहेत.
, शेवटचा एक तृतीयांश भाग अपयशातून बाहेर पडत चार्लि चाप्लिन याने यशची चव पुन्हा एकदा कशी चाखली? त्याचा मृत्यू कोणत्या स्थितीत झाला? मृत्यूच्या वेळी त्याची कोणती इच्छा होती,याविषयी सांगण्यात आले आहे चार्ली चॅप्लिनचा मृत्यूची घोषणा डॉक्टर करतात आणि पुस्तक संपते.
आपल्याला यशस्वी माणसाचे यशस्वीपण दिसते.मात्र त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट केलेली मेहनत दिसत नाही ते दाखवण्याचे काम हे पुस्तक करते यशस्वी होणाऱ्या माणसांनी अनेक गोष्टीचा विरह सहन केलेला असतो. तो आपल्याला या पुस्तकातून दिसतो. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्याप्रमाणे 'जगी सर्व सुखी असा कोण आहे रे, विचारी मना तूच शोधूनी पाहे, हे वचन आपणास पुस्तक वाचल्यानंतर किती खरे आहे, हे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा