गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

माझे आवडते लेखक (माझे वाचन भाग4)

मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर माझे आवडते लेखक आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि मराठी  ज्ञान भाषा व्हावी यासाठी झटणारे आणि मराठीत विविध विषयांवर माहितीपुर्ण असी 55पुस्तके लिहणारे अच्युत गोडबोले.  
     हो मला गिरीश कुबेर आवडतात‌. आपल्या मराठी संत वाड़मयातील सुप्रसिद्ध वचन 'उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकून द्यावे,' हे वचन  मी अंगीकारत गिरीश कुबेर यांची देशांतर्गत मते बाजूला सारत त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ आणि पश्चिमी आशियाविषयीचा अभ्यास यामुळे मला गिरीश कुबेर आवडतात‌.अच्युत गोडबोले यांच्याविषयी एका वाक्यात बोलायचे झाल्यास, मला ज्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात.त्याच प्रकारची पुस्तके अच्युत गोडबोले लिहीत असल्याने ते माझ्या आवडत्या दोन लेखकांपैकी एक झाले आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाला विविध कांगोरे असतात. व्यक्तीचा एखादा पैलू आपल्याला आवडत नसला, तरी त्यावरुन व्यक्तीला न्यायालयातील पिंजऱ्यात उभे करणे सर्वथा अयोग्यच.हे आपण गिरीश कुबेर यांच्या उदाहरणावरून सहजतेने समजावून घेवू शकतो.गिरीश कुबेर यांच्या देशांतर्गत मतांवरून आपण त्यांचे लेखनच वाचणार नाही,असे ठरवले तर, आपण पश्चिम आशियातील राजकारण, त्यांच्या अर्थकारण आणि त्याचा भारतीयांवर
होणारा परीणाम या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयाची सहजसोप्या मराठीत माहिती मिळण्यापासून निश्चितच मुकु,असे मला वाटते. माझ्या मते गिरीश कूबेर यांची देशांतर्गत मते मिळमिळीत म्हणून आपण दूर सारायला हवीत आणि अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारण यांना उत्तमाची ते घ्यावे असे म्हणत जवळ करायला हवे.
मी आतापर्यत गिरीश कुबेर यांची, एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे,अधर्म युद्ध, तेल नावाचं वर्तमान,
पुतीन,टाटायन, युद्ध जीवांचं  या सारखी अनेक पुस्तके वाचली आहेत. मी गिरीश कुबेर यांच्या वाचलेल्या पुस्तकातून मला ज्ञानचा मोठा खजिनाच गवसला .मला नव्याने मिळालेल्या माहितीत,त्यांचा राजकीय विचारधारणेचा लवलेश देखील दिसून आला नाही.गिरीश कुबेर ज्या विषयांवर पुस्तके लिहतात,त्या विषयांवर मराठीत अत्यंत सकस लिहणारे एका बोटाच्या पेरावर मोजता येतील इतकेच लोक लिहीतात, त्यामुळे ज्यांना मराठीत नविन काही माहितीवर्धक वाचायचे आहे‌.त्यांनी गिरीश कुबेर यांची देशांतर्गत राजकारणाविषयीची मते काहीसी बाजूला सारत त्याचे हे लिखाण वाचायलाच हवे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
      अच्युत गोडबोले यांच्या विषयी बोलायचे झाल्यास, मराठीला ज्ञानभाषा करण्यसाठी झटणारा खचितच दुसरा कोणी असेल.एकमेकांशी दुरान्वये देखील काहीच संबंध नसलेल्या शाखांवर , विषयांवर सहजसोप्या चटकन समजणाऱ्या मराठी भाषेत ज्ञानवर्धक तब्बल 55 पुस्तके अच्युत गोडबोले यांनी लिहली आहेत.सध्याचा काळात एखादी भाषा किती जूनी आहे,ती किती लोकांची मातृभाषा आहे,यावर एखाद्या भाषेचे भवितव्य ठरणार नसून, या भाषेत किती ज्ञाननिर्मिती होते यावरच भाषेचे भविष्य ठरणार आहे.त्यामुळे या स्पर्धेत मराठी मागे पडु नये यासाठी झटणारे व्यक्तीमत्व म्हणून आपण अच्युत गोडबोले यांच्याकडे बघू शकतो. 
मला माझ्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्ती, अनुभवयास आलेले प्रसंग यामुळे कथा कांदबरी काव्यसंग्रह,नाटक या सारख्या ललित साहित्यापेक्षा माहितीपर पुस्तकांची आवड निर्माण. झाली आहे‌.अच्युत गोडेबोले यांची ग्रंथनिर्मिती याच क्षेत्रातील असल्याने आपसुकच तारा जूळल्या आणि अच्युत गोडबोलै हे माझे आवडते लेखक झाले.ही आतापर्यत त्यांची नॅनोदय, आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स, मनकल्लोळ भाग 1अणि 2, ऑटीझम, सायको थेरपीज,अर्थात, इन्फोटेक, इंडस्ट्री 4.0, कियमागार, असी सुमारे 12पुस्तके वाचली आहेत सर्वच पुस्तके तांत्रीक विषयाची असून देखील अत्यंत सहजसोप्या मराठी भाषेत लिहली गेली आहेत. इतर ठिकाणी आढळणारा मराठी तांत्रीक भाषेचा बोजडपणा त्यांचा लेखनात कुठेही आढळत नाही. व्यवहार रूळलेले इंग्रजी शद्बच वापरत त्यांनी संकल्पना समजवण्यावर अधिक भर दिल्याचे त्यांचे लेखन वाचताना जाणवते.मराठी संज्ञा वापरत लेखन अवघड करण्यापेक्षा प्रसंगी इंग्रजी परीभाषिक शद्ब वापरण संकल्पना समजण्यावर त्यांनी भर दिल्याने त्यांचे लेखन चटकन समजते. हे त्यांचे गुणवैशिष्ट त्यांना विविध शास्त्राविषयी लिहिणाऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळे करते आणि माझे आवडते लेखक करते.
   व्यक्तीने सातत्याने वाचन करायला सुरवात केल्यावर व्यक्तीमध्ये एका विशिष्ट प्रकारचे वाचन करण्याची आवड निर्माण होते.या विशिष्ट प्रकारच्या वाचनातून आवडत्या लेखकाविषयी वाचकाच्या कल्पना तयार होतात. कोणताच लेखक किंवा लेखन प्रकार वाईट नसतोच. मात्र त्यासाठी वाचन करायला सुरवात करायला हवी...मग करताय ना वाचायला सुरवात ..बाकीच्या आवडीचा लेखनप्रकार आणि लेखक या गोष्टी होवूनच जातात ...

माझे वाचन याचा  तिसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

माझे वाचन याचा दुसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

माझे वाचन याचा पाहिला भाग वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...