शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्रतिक्रियांमध्ये एकाने  मला विचारले होते की, अजिक्य  कोणती पद्धत वापरून पुस्तके निवडतो . म्हणजे तू माहितीवर पुस्तके मोठ्या संख्येने वाचतो. हे माहिती आहे मात्र विविध विषयावरची माहिती देणारीं पुस्तक असताना,  एखादे  पुस्तक वाचायचे किंवा एखादे पुस्तक वाचायचे नाही हे तू कोणते निकष वापरून ठरवतो हे मला जाणून घेयला आवडेल. तर माझे आजचे लेखन याच प्रश्नाच्या उत्तरासाठी 

तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४  मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते  लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश  कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी

नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत गोडबोले यांची २० हुन अधिक आणि गिरीश कुबेर यांची जवळपास सर्वच मराठी पुस्तके कितीतरी वेळा वाचली आहेत 

मी जी पुस्तके वाचनासाठी निवडतो.त्यातील दुसरा निकषाविषयी अर्थात  विषयाविषयी  झाल्यास मी इयत्ता चवथीपासून मार्ताहीत खगोलशात्राचा मराठी भाषेत प्रचारप्रसार करणार्याखगल मंडळाशी निगडित  असल्याने असेल मला नॅचरल सायन्स विषयी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली आहे त्यामुळे मी जी पुस्तके वाचण्यासाठी निवडतो त्यामध्ये इतिहास किंवा त्यासारख्या विषयांची माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या ऐवजी नॅचरल सायन्सविषयी माहिती देणारी पुस्तके अधिक वाचतो मी अच्युत गोडबोले आणि गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या शिवाय मी जी माहिती देणारी पुस्तके वाचतो त्यांची यादी तुम्ही बघितल्यास तुम्हाला हा मुदा अधिक उत्तमरीत्या समजेल 

        नॅचरल सायन्स सोडून मला आवडणारा दुसरा विषय म्हणजे भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीतीत्यामुळे त्या विषयवार लिहलेली पुस्तके सुद्धा मी वाचनासाठी निवडतो.माझ्यामध्ये ही  आवड निर्माण होण्याचे कारण म्हणजे मी केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास.मी यूपीएससीच्या सिव्हिल सर्विस एक्समचा भाया करताना पहिला ऑप्शनल विषय म्हणून भूगोल हा विषय निवडला होता तर दुसराऑप्शनल विषय म्हणून मी

पोलिटिकल सायन्स हा विषय निवडला होता . या दुसऱ्या ऑप्शनल चा अभ्यास करताना माझी भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीती या विषयात आवड निर्माण झाली या आवडीतूनच माझी वाचनाची आवड विकसित होत गेली                      

 अर्थात मी फक्त या दोनच विषयाची पुस्तके वाचतो असे नाही. माझ्या माहिती देणाऱ्या पुस्तकाचे वाचन करण्याच्या वाडीस कोणताही विषय वर्ज नाही फक्त या दोन विषयाचे प्रमाण अन्य विषयापेक्षा काहीसे जास्त असते इतकेच तसेच मी फक्त माहितीपर पुस्तकेच वाचतो असे नाही.तर मी सर्व प्रकारची पुस्तके वाचतो फक्त त्यात माहिती देणाऱ्या पुस्तकाचाचे प्रमाण काहीसे जास्त असते इतकेच आता मी माहितीपर पुस्तकेच का जास्त वाचतो याविषयी सुद्धा माझे वाचनच्या दुसऱ्या भागात सविस्तर लिहले आहे त्यामुळे त्याविषयी सुद्धा इथे जास्त लिहीत नाही 

मी जे वाचन करतो ते परिपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा  नाही.  .किंबहुना माझे वाचन अत्यंत  त्रोटक विस्कळीत काहीच विषयवार आधारित  आहे असे म्हणले  तरी वावगे ठरणार नाही माझ्यामध्ये ज्या प्रकारे वाचनाची सवय विकसित झाली त्याचा प्रकट अविष्कार म्हणजे माझी ववाचनाची आवड आणि या आवडीतून दिसत असणारी माझी पुस्तक निवडीची पद्धत मी निवडलेली पुस्तके. (हा विकास कसा होतो याविषयी मी

तिसऱ्या भागात लिहले आहे सबब या विषयी देखील मी द्विरुक्ती टाळतो ) अन्य लोकांचा देखील प्रवास याच पद्धतीने होईल असे नाही  मात्र  हा प्रवास होण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. मग करणार ना वाचन 


माझे वाचन या मालिकेतील सातवा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/01/blog-post_87.html

माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/search/label/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3

माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'

मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ...