रविवार, २९ जानेवारी, २०२३

इंडो चायनाची सफर घडवणारे अप्रतिम पुस्तक अपूर्वरंग

 

आपल्या मराठीतील आमची काशी प्रवाशाची हकीगत या १९  व्य शतकाच्या पुस्कापासून प्रवास वर्णनाची मोठी पंरपरा आहे . जगातील विविवध प्रदेशाची माहिती मराठी भाषिक व्यक्तींनी प्रवास करून  मराठीत आणली आहे त्यामुळे ज्यांनी  काही कारणाने  त्या प्रदेशात प्रवास केलेला नाही .अश्या व्यक्तींना देखील त्या प्रदेशातलं प्रवास करण्याची अनुभूती मिळते आपल्या मराठीत अंशी अनेक प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू आशयाचे काही प्रसिद्ध प्रवास वर्णने प्रसिद्ध असलेल्या लेखकांपैकी एक. त्यांनी जगभरातील अनेक पदेशनानं भेट देत त्या ठिकाणचे आपले अनुभव पुस्तकरूपाने  शब्दबद्ध केले आहेत त्यांच्या आशयाचे एका पुस्तकांपैकी एक ज्यात  त्यांनी इंडॉ चायना भागातील अनुभव मांडलेलं आहेत असे पुस्तक अर्थात अपूर्वरंग भाग २ मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या सहकार्याने वाचले 

सुमारे ३५० पाणी असलेल्या या पुस्तकात त्यांनी  भारतातील अंदमान निकोबार बेटांसह म्यानमार , कंबोडिया , थायलंड व्हिएतनाम . मलेशियाया पाच देशांची सफर घडवली आहे  पुस्तकाची भाषा अत्यंत सहजसोपी असून वर्णातम्क असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे झालेलं नाही मात्र या पुस्तकासाठी वापरलेली पाने फारशी उत्तम नाहीत पुस्तक सार्वजनिक वाचनालयाचे आहे हे मान्य केले तरी पुस्तक प्रसिद्ध होऊन फारशी वर्षे झालेली नाहीत असे असून देखील त्यांची पाने बरीच पिवळी पडलेली मला दिसली तसेच पुस्तकात चित्रे सुद्धा फारशी नाहीत मात्र चित्रांसाठी तुलनेने चांगला कागद वापरला आहे हीच ती समाधानाची बाब त्यामुळे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते त्यावर विशेष मेहनत घेयला पाहिजे होती असो 

 पुस्तकाची सुरवात त्यांच्या पास्पोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी त्या पुण्यातील कार्यालयात गेले असता त्यांना आलेल्या अनुभवांपासून होते त्यांनतर लेखिका आपणास घेऊन जाते अंदमान निकोबार बेटांवर तेथील पोर्ट ब्लेयरचे सेल्युलर जेल , तसेच अन्य  बेटांवर  ,यावेळी लेखिका त्यानाच फिरताना आलेले अनुभव कथन करते 
यामध्ये तेथील खाद्य संस्कृती , तेथील विविध पर्यटनस्थले , तेथील समाजजीवन , लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याने विविध समाज घटक कोणत्या प्रकारे विमानप्रवास करतात विमान प्रवास्यांबाबतचे बदलते विश्व पर्यटकांविषयीचा स्थानिकांचा दृष्टिकोन आपल्या भारतीयांची पर्यटनविषयीची आस्था  याविषयी भाष्य करते आणि पहिले प्रकरण संपते दुसऱ्या प्रकरणात लेखिकेने त्यांचे म्यानमार मधील अनुभव सांगितले आहे त्या ठिकाणी त्यांनी मंडाले ,रंगून आदी ठिकाणी भेटी दिल्या . त्या ठिकणाशी असणारे भारताचे नटे त्यांनी आपल्या लेखांत हळुवारपणे मांडले आहे भारतीय संस्कृतीचा म्यानमारच्या संस्कृतीशी असणारा संपर्क , तेथील खाद्यप्रकार ,तेथील बौद्ध धर्माचा प्रभाव असणारी जीवनशैली आदी गोष्टींबाबबत लेखकेने भाष्य केले आहे संस्कृतीचे धागेदोरे स्पष्ट करताना त्यांनी भारतीय नांवे आणि म्यानमारची नवे यांची तुलना केली आहे
         तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारांत व्हिएतनाम आणि कंबोडियाविषयी बोलताना त्यांनी येथीलअंतर्गत यादवी कम्युनिष्ट राजवटीत तेथील जनतेने भोगलेले त्रास हाल अपेष्टा , अमेरिकेच्या युध्दमुळे त्यांच्यावर झालेले अत्याचार त्यांच्या एकमेकांत गुंफलेला इतिहास तेथिल वाहतूक व्यवस्था तेथील संस्कृतीवर भारतीयांसह चीनचा असलेलेआ प्रभाव तेथिल जतनतेने स्वीकारलेल्या चिनी रूढी पंरपरा , तेथील समाजजीवनवर असणारा बौद्ध धर्माचा
प्रभाव , तेथील जनतेची भारतीयांशी असणारी नाळ तेथिल बौद्ध पॅगोडे ,देऊळ यांपाचव्या ची सफर लेखिका घडवते पाचव्या आणि सहाव्या प्रकरणात थायलंड आणि मलेशियाचे सफर घडवताना लेखिकेने थायलंडमधील कुप्रसिद्ध वेश्याव्यवसाय आणि मलेशियातील इस्लामी प्रभाव यावर आपली मते मांडत तेथील फिरण्याचा  अनुभव स्पष् केला आहे  या दोन्ही प्रवाश्यात त्यांनी तेथील वाहतूक व्यवस्था तेथील इऐतहासिक वास्तु धार्मिक महवताच्या वास्तु भौगोलिक कर्मातीच्या वस्तूंची सफर लेखिकेने घडवली आहे 

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

अथांग मनाचा थांग घेणारे मनकल्लोळ

 १७व्या शतकात समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्र्लोकात एखादे कार्य यशस्वी होण्यसासाठी मन करावे  प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या सारख्या  श्र्लोकाद्वारे  मनाचे  मानवी आयुष्यतील महत्व स्पष्ट केले आहेच  आहे सध्याच्या स्पर्धेच्या काळात याचे महत्व अधिकच वाढलेले आहे. त्यामुळे मन अप्रसन्न का होते ? मन अप्रसन्न झाले हे ओळ्खह्ण्याची लक्षणे कोणती ? हे सर्वांनां माहिती असणे अत्यावश्यक झाले आहे .त्यामुळे अनेक विषयावर अत्यंत सोप्या मराठी भाषेत माहितीपूर्ण लेखन करणारे अच्युत गोडबोले यांनी नीलांबरी जोशी  यांची सहलेखक म्हणून मदत घेऊन  मानसिक आजार या  संकल्पनेवर  लिहलेले मनकल्लोळ हे पुस्तक अत्यंत महत्व्वाचे ठरते.  या पुस्तकाच्या  पहिल्या भागाचे वाचन करण्याचे सौभाग्य मला सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या मदतीने मिळाले दोन भागात प्रकशित या पुस्तकाच्या पहिल्या भागात  विविध मानसोपचार पद्धती , विविध प्रकारचे मानसिक आजाराची माहिती ,आजारांवर आजार होण्यामागची कारणे ,त्यावर कोणत्या प्रकरचे उपचार करण्यात येतात ? मानसिक आजाराच्या वर्गीकरणात हा आजार कोणत्या उपप्रकारात अंतर्भूत करण्यात आला आहे  आजारावर   या आधी आलेल्या जगभरातील चित्रपटाच्या माहितीसह देण्यात आलेली  आहे .       पुस्तकाचा विषय तांत्रिक असला तरी अच्युत गोडबोले यांच्या अन्य   पुस्तकासारखीच या पुस्तकाची भाषा देखील सहजसोपी आहे . या पुस्तकात देखील त्यांच्या अन्य शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकासारखीच तांत्रिक संकल्पना या मुळातीडिसॉर्डर्सचील इंग्रजी भाषेतच ठेवली आहेत विनाकारण मूळच्या इंग्रजी संकल्पाचे मराठीत भाषांतरणं करण्याचा मोह त्यांनी यावेळी देखील टाळलेला आहे जे खोरोखऱच अभिनंदनास्पद आहे . ३५७
पानाच्या या पुस्तकात १० प्रकरणातुन हि माहिती देण्यात  आली आहे ज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणात अनुक्रमे मानसिक आजाराबतचा इतिहास , मानसिक आजाराचे वर्गीकरण तसेच विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे मानसिक उपचार पद्धतीची माहिती देताना मानसिक आजारांच्या उपचाराच्यावेळी औषधाची भूमिका किती महत्त्वाची आहे ? समुपदेशनाचा  उपचार करताना कसा उपयोग होतो ? समुपदेशनाचे फॅमिली काऊन्सलिंग , बिवेहेर थेरपी असे प्रकार कसे पडतात ? त्याचा उपयोग कसा होतो /योगा आणि अन्य उपचार पद्धती याची रोग बरे करण्यातील भूमिका सायको फार्मास्युटिकल औषधांचे प्रकार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे . तर पहिल्या प्रकारात मनोविकारणाचा इतिहास सांगताना सायकॉलॉजिस्ट, सायकिऑस्ट्रीस्ट यांच्यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे तिसऱ्या प्रकरणापासून दहाव्या प्रकरणात मनोविकाराची  विविध प्रकारचे वर्गीकरण करून देण्यात आली आहे तिसऱ्या प्रकणात डिसोसिएटिव्ह डिसॉर्डर्सची तर चौथ्या प्रकरणात
सेक्शुअल डिसॉर्डर्सची पाचव्या प्रकरणात पॅराफिलियाज आणि जेंडर आयडेंटी डिसॉर्डर्सची माहिती देण्यात आली आहे सहाव्या सातव्या आणि आठव्या प्रकरणात अनुक्रमे इटिंग डिसॉर्डर्सची , सॉमटो फॉर्म डिसॉर्डर्सची आणि सबटन्स युज डिसॉर्डर्सची माहिती देण्यात आलेली आहे आठव्या प्रकरणात व्यसनाधीनतेवर भाष्य करण्यात आले आहे शेवटच्या दोन प्रकरणात एन्झायटी डिसॉर्डर्सची आणि भयगंडाची माहिती देण्यावर लेखकांचा भर आहे

  तुम्ही मानसशात्रज्ञांचे विद्यार्थी असा अथवा नसा . तुमच्या परिचयात कोणी मानसिक रुग्ण असो अथवा नसो  प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे असे झाले आहे मी तर पुस्तक वाचले मग तुम्ही कधी घेताय पुस्तक वाचायला 

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

लासलगावची बखर -


जगातील प्रत्येक शहराला इतिहास असतो . मात्र फारच कमी शहरांचा इतिहासाची पद्धतशीरपणे नोंद ठेवली जाते पाश्चात्य देशापेक्षा आपल्या भारतात तर हे प्रमाण खूपच ढासळते . मात्र सध्या या चित्रात सकारत्मक बदल होत आहे  पूर्वी  लिहल्या गेलेला अनेक शहरांच्या इतिहास त्या शहरातील महत्वाच्या व्यक्ती ता शहरातील महत्वाच्या संस्था त्यांच्या इतिहास याच्या जाणीपूर्वक नोंदी ठेवण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने होत आहे या नव्या  मोहिमेत फक्त महानगरांचाच इतिहास लिहला जात नाहीय्ये तर अगदी तालुक्यस्तरवरील किंवा एखद्या तालुक्याचे मुख्यालय नसणाऱ्या मात्र त्या तालुक्यतातील महत्त्वाची बाजरपेठ असणाऱ्या गावांचा देखील समावेश होत आहे याच मालिकेतील एक गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यतील लासलगाव . कांद्याचा उत्पनासाठी सर्व जगभरात प्रसिद्ध असलेल्या या लासलगावच्या इतिहासाला पुस्तकात शब्दबद्ध केले आहे लासलगावचेच रहिवाशी असणाऱ्या संजय बिरार यांनी.  लासलगावची बखर असे नाव असलेले आणि  पुणे आणि नाशिक येथे आपले कार्यालय असणाऱ्या वैशाली प्रकाशनतर्फे प्रकाशित हे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील जेष्ठ समाजसेवक डॉ संदीप भानोसे यांच्या वैयक्तिक संग्रहातून त्यांच्याकडून  मागून घेऊन वाचले    

 सुमारे २०० पानाच्या या पुस्तकात विविध अस्या ३२ प्रकारांतून लासलगावचा भूगोल , गावाची स्थापना कधी झाली ? गावातील विविध शासकीय संस्था , धार्मिक स्थळे , गावाचे नाव जगभरात उंचावणाऱ्या व्यक्ती , गावाचा राजकीय  पटगावातील सुधारणेचे विविध टप्पे , गावातील विविध सुधारणेत मोलाचे योगदान देणाऱ्या यक्ती , गावातील करमणुकीच्या साधनांचा विकास , यांच्या आढावा नाशिक जिल्ह्यासाठी एक विशेष प्रकरण घेऊन करण्यात आला आहे पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत रंजक आहेजुन्या काळात गावांना असे अस्या वेशीचे चित्र पुस्तकाकडे 

आपल्याला खेचून घेते पुस्तकाचे मलपृष्ठ देखील आकर्षक अश्या रक्तवर्णी लाल आणि सोनेरी रंगात आहे जे अत्यंत आकर्षक दिसते  पुस्तकाची भाषा अत्यंत सहज सोपी चटकन समजणारी आहे  . गावाविषयीमाहिती देतांना वर्णनात्मक माहितीवर अधिक भर दिला आहे संख्यातांक माहितीचा भडीमार कऱण्यात आलेला नाही मात्र संखात्मक माहितीकडे अगदीच दुर्लक्ष केले आहे असेही नाही मात्र त्याचे प्रमाण कमी अगदीच गरज लागेल तिथेच सांख्यतम्क माहिती दिल्याने पुस्तक बोजड क्लीष्ट समजण्यास अवघड झालेले नाही तर पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे  पुस्तक वाचायला घेतल्यावर तेवूच नये असे वाटावे अश्या प्रकारे खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे पुस्तक माहितीपूर्ण असून देखील सदर  पुस्तक परिपूर्ण नसून निव्वळ  विषयांची तोंडओळख करून देणारे आहे अशा प्राजंळ दावा लेखकाने आपल्या मनोगतातून केला आहे पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ यांची प्रस्तावना असून प्रस्तवा
वनेत
 त्यांनी संजय  बिरार  यांच्या उभा धाडसाचे उपक्रम कौतुक केले असून अधिकाधिक व्यक्तींनी अशा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आहे 

   आपल्याला अनेकदा दुसऱ्या देशाची मोठ्या प्रमाणत माहिती असते मात्र पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमणे आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील व्यक्तीचीच आपणास पुरेशी माहिती नसते   जे कदापि भूषणावह नाही आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येकाने किमान नाशिक जिल्ह्यातील त्यातही या ना त्या कारणाने निफाड तालुक्याशी संपर्क असणाऱ्या व्यक्तीने तर हे पुस्तक वाचलेच पाहिजेमग कधी वाचायला घेत आहेत हे पुस्तक 

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

ब्लॉकचेन या तंत्रज्ञाचा संपूर्ण आढावा घेणारे पुस्तक "साखळीचे स्वातंत्र्य

         


  सध्याचे जग वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञांचे आहे पूर्वी कधीही ऐकले  देखील नव्हते ,  अशी यंत्रें  आपण सध्या सहजतेने वापरतो ते तंत्रज्ञानामुळे अशी यंत्रें हाताळता येणे खूपच सोपे केल्यामुळे . पूर्वी विज्ञान कथांमधे एखादी संकल्पना मांडल्यावर ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी लागत असे आज हा कालावधी काही महिन्यावर आलेला आहे . हे तंत्रज्ञान वापरण्यासासाठी त्यामागच्या संकल्पना संपूर्णपणे माहिती असणे अत्यावश्यक नाही  किंबहुना या संकप्लनाबाबत पूर्णतःअज्ञानी असलो तरी चालते आता इंटरनेट कसे कार्य करते ? आपण एखादा शब्द इंटरनेटवर शोधण्यस्साठी टाईप केला तर गुगलच्या अमेरिकेसह जगभरात असंणाऱ्या सर्वरबाबत काय घडामोडी घडतात हे माहिती नसले तरी आपण इंटरनेट सहजतेने वापरू शकतोच मा ? मात्र तंत्रज्ञानमुळे वापराने सोपे झालेले यंत्र कसे कार्य करते ? आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञाबाबत जगात काय नवीन संशोधन सुरु आहे ? त्यामुळे कोणते बदल संभवतात ? आदींची माहिती मिळाल्यास तंत्रज्ञाचा फायदा करून घेताना होणारा आंनद उत्तम ठरेल ना ? आपल्या सुदैवाने मराठीत असा आनंद देणारी अनेक पुस्तके आहेत आणि दिवसागणिक त्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे या प्रकारच्या मराठीतील पुस्तकांचा मुकुटमणी म्हणता येईल असे "साखळीचे स्वातंत्र्य "हे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या मदतीने वाचले . 

        अनेक नवनवीन विषयांवरची मुळात मराठीत प्रसिद्ध करणारे आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करणाऱ्या घोटी (तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक )येथील मधुश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात सध्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या बिटकॉइन , वेब ३. 0 , क्रिप्टो करन्सी , मेटाव्हर्स  आदी घटकांच्या मुळाशी असलेल्या ब्लॉक चेन या तंत्रज्ञाची ओळख करून देण्यात आली आहे दैनिक लोकसत्तामध्ये सन २०२० मध्ये दर गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ब्लॉकचेन विषयक लेखांचा संग्रह म्हणजे  सदर पुस्तक .
सन  २०१७पासून ब्लॉकचेन या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गौरव सूर्यवंशी यांनी हे पुस्तकाचे लेखन केले आहे . ८ भागात आणि ५६ प्रकरणांत सदर पुस्तक विभागले आहे  पुस्तक तांत्रिक विषयाची माहिती देणारे असले तरी पुस्तकाची भाषा सहजसोपी ठेवण्याकडे लेखकाचा प्रयत्न असल्याचे वारंवार दिसून येत आहे . याच प्रकाशनच्या द फ्री प्रेस या अनुवादित पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत  र्हस्व आणि दीर्घच्या चुका मोठ्या प्रमाणत आढळल्या होत्या मात्र या पुस्तकात सदर प्रकार टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचा दिसून येत आहे या पुस्तकात सखोलपणे दोन्ही बाजू सोप्या भाषेत समजावूनसांगण्यात आल्या आहे ज्यामध्ये अर्थशसहस्त्र , समाजशास्त्र , आणि कॉम्पुटरविषयक विविध संकल्पनाचा समावेश आहे 
            या ८भागाच्या पुस्तकात पहिल्या भागात ३ प्रकरणाद्वारे  ब्लॉकचेनचा परिचय करून देण्यात आला असून दुसऱ्या भागात ३ प्रकरणात पैशाचा इतिहास सांगण्यात आला आहे . तिसऱ्या भागात दोन प्रकरणें असून यामध्ये बँकिंग आणि बिटकोंविषयी सांगण्यात आले आहे चोथ्या भागात ४ प्रकारांतून सायरफंक चळवळी बाबत माहिती देण्यात आलेली आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञानीतील विविध संकल्पनासहा प्रकरणात पाचव्या भागात स्पष्ट करून सांगितल्या आहेत . सहाव्या भागात बिटकॉइन हि संकल्पना १२ प्रकारातून समजावून सांगण्यात आली आहे ८ प्रकरणात विभागलेल्या सातव्या भागात बिटकॉन सोडून ब्लॉक चेनचा उपयोग कोणत्या प्रकारे होतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे . आठव्या आणि शेवटच्या भागात १८ प्रकारात ब्लॉकचेन तंत्रज्ञानयामुळे कोणत्या प्रकारचा सकारात्मक बदल होव शकतो याचा अवलंब बिटकॉइन सोडून अन्य कोणत्या प्रकारे याआधी मोठ्या प्रमाणत यशस्वीपणे करण्यात आला
आहे  २५० हुन थोडेशी अधिक पाने असलेल्या या पुस्तकांत सर्वत्र सूत्रबद्धता आढळते . एका प्रकरणातून दुसरे प्रकरण उलगडत जाते जी गोष्टी प्रकरणाची तीच गोष्ट भागांची त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही आपण काय वाचत आहोत ?असा प्रश्न पडत नाही सर्व गोष्टी सहजतेने समजत जातात . त्यामुळे तांत्रिक विषयाचे असून देखील पुस्तक कंटाळवाणे रटाळ होत नाही मग वाचणार ना हे पुस्तक ,साखळीचे स्वातंत्र्य 

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...