बुधवार, ३१ मे, २०२३

समर्थ रामदास स्वामी यांचे कांदबरी स्वरुपात चरीत्र सांगणारे पुस्तक "दास डोंगरी रहातो"

 


एखादी समजण्यास अवघड बोजड विषय जर गोष्टीवेल्हाळ स्वरुपात सांगितल्यास सहजतेने समजतो. गोष्टीवेल्हाळ स्वरुपात कथन  केल्यामुळे त्यातील अनेक महत्तवाचे दुवे निसटत असले, तरी ज्यास संबंधित विषयाची काहीच माहिती नाही, अस्या व्यक्तींना संबंधित घटकाची किमानपक्षी तोंडओळख तरी या प्रकारामुळे होते.आपल्या मराठीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुजला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरीत्र सांगणारी नेताजी ही कांदबरी, पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारीत पानिपत ही कांदबरी , रणजित देसाइ यांनी पेशव्यांच्या जिवनावर लिहलेली स्वामी ही कांदबरी असो अथवा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँ .जयंत नारळीकर यांनी लिहलेल्या विविध विज्ञान कथा याच वर्गवारीत मोडतात.याच वर्गवारीत मोडणारे आणि सुप्रसिद्ध पुस्तक म्हणजे ,'दास डोंगरी रहतो", हे पुस्तक . मराठीतील सिद्धहस्त लेखक गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात 'गोनिदा' यांनी लिहलेले हे पुस्तक समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत आपणास माहिती देते. जे मी नुकतेच नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्तवाची संस्था असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक (सा.वा.ना.) च्या सहकार्याने वाचले.

        सुमारे तीनशे पानांच्या या पुस्तकात  सर्व पुस्तकात भाषा  संवादी ठेवली असल्याने, पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. गोनिदांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरील सर्व प्रसंग

अत्यंत कुशलतेने गुंफले आहेत. जे वाचताना वाचकास पुस्तकात गुंतवून ठेवतात.पुस्तकाची भाषा अत्यंत प्रवाही असुन संपूर्ण पुस्तकात तो प्रवाह कायम ठेवला आहे. पुस्तक वाचताना ते कुठेही रेंगाळलेले वाटत नाही.

        पुस्तकाची सुरवात होते ती, समर्थ रामदास स्वामी यांच्या विवाहातून पलायन करुन नाशिककडे प्रस्थान करण्याचा प्रसंगाने . त्यांचे टाकळी (नाशिक )येथील वास्तव्याचे कथन करायला सुमारे 75पाने लेखकाने व्यापली आहेत. जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील ठोसरांचा दुसरा मुलगा नारायण या काहीस्या वात्य खोडकर तसेच अत्यंत जिज्ञासू मुलाचे अत्यंत प्रग्लभ समाजाला दिशा देणाऱ्या समर्थ रामदास स्वामीमध्ये कसे रूपांतर होते. या काळात त्यांना सुरवातीला अनुभव लेखकाने त्यांचा टाकळी वास्तव्यात रेखाटले आहेत.शेवटची सुमारे 50 पाने. आणि समर्थाचे सज्जनगडावरील कार्यं आणि सध्याचा काळात काहीसा वादग्रस्त मुद्दा ठरलेले  समर्थांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट  याविषयी आपणास माहिती देतात.

पुस्तकाच्या साधरणतः मध्यापासून पुस्तकाच्या कथनाने वेग पकडला असल्याचे जाणवते. पुस्तकाच्या या भागात समर्थ रामदास स्वामी यांचे  सज्जन गडावरील कार्य आणि दासबोधाची  निर्मिती  या बाबत आपणास माहिती देते समर्थ रामदास वामी त्यांचे पटशिष्य कल्याण याना आश्रमाची व्यवस्था कशी लावण्यता यावी याविषयी मार्गदर्शन करतात आणि पुस्तक संपते

     लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे यात सांगितलेल्या बाबीना लौकिक अर्थाने पूर्णपणे चरित्र म्हणता येणार नाही कथानकाला सोईस्कर व्हावे यासाठी यात काही बदल करण्यात आले आहेत मात्र पुस्तक वाचनाने समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत काही माहिती नसलेल्या व्यक्तीस समर्थ रामदास यांचे कार्यपरिचय होण्यास नक्कीच मदत होते ज्यांना समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र माहिती आहे त्यांना समर्थांचे चरित्र कश्या प्रकारे खुलवता येते हे पुस्तक वाचनाने समजते . मग वाचणार ना पुस्तक

बुधवार, २४ मे, २०२३

टाटायन ...प्रवास एका सामाजभान असलेल्या उद्योग घराण्याचा

       

   टाटा, आपल्या रोजच्या जगण्यातील अनेक उत्पादनाचे निर्माते . निव्वळ उत्पादनाचे निर्माते म्हणूनच टाटांची ओळख पुरेसी नाही. उत्तम उत्पादनाची विश्वासाह्यर्ता असणारा आणि त्याचवेळी सामाजिक भान असणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.स्वातंत्र्यपुर्व काळापासून अवाह्यत सुरु असणारा 150हुन अधिक वर्षाचा गौरवशाली इतिहास असणारा उद्योगसमुह म्हणजे टाटा उद्योगसमुह .आपल्या भारतात लोह पोलाद उद्योग, जलविद्युत प्रकल्प, विमान वाहतूक सेवा अस्या अनेक उद्योगाची पायाभरणी करणारा उद्योग समुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.या टाटासमुहाची सविस्तर माहिती हवी असल्यास आपणास ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहलेले "टाटायन", या पुस्तकाशिवाय  अन्य उत्तम तो पर्याय तो कोणता?  गिरीश कुबेर यांची भारतीय राजकारणाविषयीची मते अनेकांना आवडत नसली तरी ते क्षणभर बाजूला सारून  हे पुस्तक वाचल्यास टाटा समुहाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.मी सुद्धा हे पुस्तक नुकतेच वाचले.

                सुमारे साडेचारशे पानाच्या या पुस्तकात २३ प्रकारांतून लेखकानं टाटा उदयॊगसमूहाचा वटवृक्ष कश्या पद्धतीने फोफावला हे सांगितले आहे पुस्तकाची  पहिल्या प्रकरणात  मराठी मनुष्याची पैसे मिळवण्याच्या बाबतच्या अनास्थेवर लेखकाने तीव्र नापसंती नोंदवत तो हे पुस्तक लिहायला का प्रवृत्त झाला ? हे सांगितले आहे थोडक्यात यास पण जरी संपत्तीनिमितीतील सात्त्विकता असे नाव असले तरी ती ती एका अर्थाने प्रस्तावनाचं आहे 
पुस्तकाच्या  दुसऱ्या प्रकरणापासून पुस्तकाला खऱ्या अर्थाने सुरवात होते दुसऱ्या प्रकरणात टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक नुसरेवान टाटा यांच्या जन्मापासून त्यांच्यात वेगळा मार्ग निवडण्याची इच्छा कशी निर्माण झाली याविषयी सांगितले आहे पुढच्या काही प्रकरणात टाटा यांच्या अफू आणि कापसाच्या निर्यातीतून लोह पोलाद उदयॊगात कसा प्रवेश झाला ?  याविषयी माहिती मिळते पुस्तकाचे सामान तीन भाग केले असता पहिल्या भागाच्या अखेरीस आणि दुसऱ्या भागाच्या सुरवातीस टाटा यांनी उभारलेल्या टाटा मोमेरिबयलंस कॅन्सर हॉस्पिटलास सारख्या स्वयंसेवी
संस्थांची निर्मिती कशी आणि कोणत्या स्थितीत झाली याविषयी लेखकाने आपणास माहिती दिली आहे पुस्तकाच्या अखेरच्या तिसऱ्या भागातील बराच मोठा भाग रतन टाटा यांच्याविषयी चर्चा करतो ज्यामध्ये त्यांनी टाटा उद्योगात कोणकोणत्या जवाबदाऱ्या स्वीकारल्या ज्या जवाबदाऱ्या स्वीकारल्या त्या कश्या प्रकारे पार पाडल्या .? उद्योगसमूहातील आपल्या विरोधकांच्या कारवायांचा कश्या प्रकारे बिमोड केला ? टाटा उदयोगातील कंपन्यांमध्ये टाटा परिवाराचे महत्व कसे वाढवले नॅनो या कर बाजरपेठेत दाखल कारण्यासासाठी काय कष्ट केले ? टाटाउद्योगसमूहाला आंतराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळण्यासाठी काय उपाययोजना केल्या आदी विषयी माहिती मिळते पुस्तकाच्या दुसऱ्या भागात टाटा यांनी जलविदुत क्षेत्र सौंदर्य प्रशसने निर्मिती तसेच टेल्को आदी कंपन्यांची निर्मिती कशी केली जे आर डी टाटांनी टाटा एरलाईन्सची सुरवात कशी केली याविषयी माहिती मिळते टाटा हॊटेल व्यवसायात कसे उतरले याची देखील माहिती या मध्ये मिळते अखेरच्या तिसऱ्या भागातील शेवटच्या प्रकरणात टाटा उद्योहसमूहात असणाऱ्या विविध कंपन्याची थोडक्यात ओळख लेखाने करून दिली आहे तर त्यांच्या आधीच्या शेवटून दुसऱ्या प्रकरणात टाटा उदयोगसमूह भविष्यात कोणत्या वाटेवरून जाऊ शकतो
यावर भाष्य केले आहे 
      आपल्या भारतात भविष्य निर्वाह निधीची सुरवात टाटांनी केली  कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱयांच्या कल्याणसासाठीकंपनीने काहीतरी केले पाहिजे हे जाणीव सर्वप्रथम टाटा यांना होती अश्या अनेक  बाबी या पुस्तकामुळे मला समजल्या हार्ड बाउंड असेलेले हे पुस्तक मुखपृष्ठामुळे अत्यंत रंजक झाले आहे आहे पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर निळ्या रंगातीलटाटाच्या बोधचिन्हांखेरीज अन्य काही नसल्याने पुस्तक पाहता क्षणीच हातात घेतल्याखेरीज राहवत नाही आपल्या भारतीयांसाठी टाटा म्हणजे सचोटीच्या विश्वासाच्या पायावरची उद्यमशीलता ज्याच्या प्रत्यय पुस्तक वाचताना सातत्याने येतो पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे त्यामुळे हे पुस्तक निव्वळ टाटा घराण्याची माहिती कोणत्या टाटाने काय केल काय केले नाही कोणत्या ताटाशी सरकार कसे वागले याची निवव्वळ कंटाळवाणी माहिती वाटत नाही ज्यामुळे वाचताना नवीन काहीतरी माहिती मिळायचे भावना हमखास होते मग वाचणार हे पुस्तक 

शुक्रवार, १९ मे, २०२३

अर्थशास्त्रातील गुंतागुंत सहजतेने मांडणारे पुस्तक अर्थात

एखाद्या विषयात प्रचंड गुंतागुंत असली,  तरी तो विषय रंजकतेने मांडल्यास विषय समजून घेणाऱयांवर या गुंतागुंतीचा काहीही परिणाम नाही, त्यांना संबंधित विषय सहजतेनं समजतो  मराठी साहित्य विश्वात ज्येष्ठ साहित्यिक  पु. ल . देशपांडे यांनी अजरामर केलेल्या चितळे मास्तर आणि हरितात्या ही अवघड विषय सोपा करणारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली तर वावगे वाटायला नको हरितात्यानी इतिहास कश्या प्रकारे शिकवला तर रंजकता येते ज्यामुळे तो विषय सहजतेने समजतो हे आपल्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले . चितळे मास्तरांनी लहान मुलांना विद्याभ्यासाची सवय कशी लावावी हे दाखवून दिले . आता साहित्यविश्वात अजरामर झालेल्या या व्यक्ती प्रत्यक्षात  अस्तित्वात होत्या का ? कि हि फक्त कल्पना होते हे पु. ल देशपांडेचंच जाणो . सध्याच्या वर्तमानात अशी विषयातील क्लिष्टता दूर करून मराठीत वाचकांना विषय रंजकतेने समजवणारा लेखक कोणता ? याची माहिती घेतल्यास एक नाव चटकन समोर येते ते म्हणजे अच्युत गोडबोले .नुकतेच त्यांनी अर्थशास्त्रातील क्लिष्टता दूर करण्यासाठी लिहलेले "अर्थात हे पुस्तक मी वाचले 

          अर्थशास्त्र अवघड वाटण्याचे कारण म्हणजे त्याचे विविध सिद्धांत आणि त्याची परिभाषा . मात्र सदर पुस्तकात अर्थशात्रातील विविध सिद्धांत स्पष्ट करताना अनेक उदाहरणे दिलेलीअसल्याने सिद्धांत सहजतेने समजतो त्यातील अवघडपणा सहजतेने समजतो. या पुस्तकात निव्वळ अर्थशात्रातील सिद्धांताच्या मागून सिद्धांत दिलेले नाहीत तर हे सिद्धांत मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांची माहिती देखील अत्यंत रंजकतेने दिली आहे त्यामुळे अन्य अर्थशात्रताविषयक पुस्र्के जशी कंटाळवाणी वाटतात तसे या पुस्तकाबाबत वाटत नाही परिभाषेतबाबत या पुस्तकात विशेष काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना समजते पुस्तक मराठीत आहे ना ? मग रोजच्या व्यवहारामध्ये वापरण्यात न येणाऱ्या संस्कृतचा पराभवा जाणवणाऱ्या अवघड परिभाषा या पुस्तकात जाणिवपूर्वक टाळलेली दिसतात  पुस्तकात व्यवहारात रुळलेल्या इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरलेल्या आहेत रोजच्या वापरण्यात येणारे शब्द यांचा वापर केल्याने सिद्धांत चटकन समजतात मराठीत  एखादा विषय समजून घेताना येणारा पारिभाषिक संज्ञांचा अडथळा यावेळी येत नाही 

        पुस्तक आठ प्रकरणात विभागले असून पहिल्या प्रकरणात अर्थशास्त्राची पार्श्वभूमी स्पष्ट करताना अर्थशात्र म्हणजे काय ? त्याचे किती आणि कोणते उपप्रकार पडतात ? आदी प्रशांबाबत उहापोह करण्यात आला आहे . तर शेवटच्या आठव्या प्रकरणात अर्थव्यवस्थेत अर्थशास्त्रात आता जाणवणाऱ्या समस्येबाबत, प्रश्नाबाबत  भाष्य केले आहे पुस्तकाच्या दुसऱ्या ते सातव्या प्रकरणात विविध अर्थशास्त्रीय सिद्धांतआणि महागाई , परकीय चलन , जीडीपी सारख्या संकल्पना आणि मार्क्स केन्स सारख्या अर्थशात्रज्ञांची माहिती देण्यात आलेली आहे भांडवलशली साम्यवाद  ,बँकिंग सिस्टीम यांची सुरवात कशी झाली /प्राचीन युगातील अर्थशाश्त्रज्ञाच्या अर्थशास्त्राबाबत कोणत्या संकल्पना होत्या प्राचीन काळातील भारतीय आणि ग्रीकांचे अर्थशास्त्रीय ज्ञान काय होते याविषयी आपणास या पुस्तकात अत्यंत रंजक माहिती मिळते हार्ड बाउंड कव्हर असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत रंजक आहे ज्यामध्ये एका बाजूला श्रीमती तर दुसऱ्या बाजूला गरीबीचे चित्र रेखाटले आहे ज्यामध्ये एका हातातून दुसऱ्या हातात नाणी बाहेर जाताना दिसतात निळ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर असणारे हे चित्र बघून कोणालाही पुस्तक हातात घ्यावेशे वाटते मग वाचणार ना तुम्ही हे पुस्तक 

गुरुवार, १८ मे, २०२३

मानसोपचारावर इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक सायको थेरपीज !

;           
   समर्थ रामदास स्वामी यांनी " मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"  या सारख्या अभांगातून कोणत्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी मनाची निरोगी अवस्था; का आवश्यक असते हे सांगितले आहे मन हा अवयव अतिशय चंचल आहे हे ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेतून सांगितले आहेच तर अश्या चंचल मात्र कोणतेही कार्य यशस्वीतेसासाठी आवश्यक असणाऱ्या मनाला; काही आजार जडला तर त्या मनावर उपचार करणे आलेच सध्या हे मानसोपचार करणे पूर्वीच्या तुलनेत सहजसोपे आणि कमी कलंकित असले तरी हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता मानवाच्या अस्तित्वापासूनच सुरू झालेल्या या मानसिक उपचारांच्या; अघोरी म्हणता येतील अश्या कृती कार्यक्रमांना ; पूर्वी मानसिक रोग्यांना सामोरे जावे लागले आहे आता मानसोपचार पद्धती मोठ्या प्रमाणत विकसित झाली असली उपचार पद्धतीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असले तरी हे मानसोपचार या पातळीपर्यंत येण्यासासाठी अनेक मानसोपचार तज्ज्ञांचे यासाठी अथक श्रम कारणीभूत राहिले आहेत . हे श्रम काय होते ?; मानसोपचार तज्ज्ञांनी कोणत्या प्रकारे हि उपचार पद्धती विकसित केली सध्या या उपचार पद्धतीचे स्वरूप काय आहे ? या सर्व प्रक्रियेत मानसिक रोग्यांना कोणकोणत्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले ? पूर्वीच्या काळातील मनोरूग्णालये कशी होती या विषयी आपणास माहिती करून घेयची असल्यास आपणास मराठीत विविध विषयांवर माहितीपूर्ण तरी सह्ससोप्या भाषेत सुमारे ४५ पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी आसावरी निफाडकर यांच्या मदतीने लिहलेल्या ;सायको थेरपीज या पुस्तकांखेरीज अनु पर्याय तो कोणता असणार ; मी नुकतेच नाशिकमधील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या मदतीने सदर पुस्तक वाचले 
       सायकॉलॉजी सायकास्टीटी ; आणि सायको थेरपीज बहुदा आपण एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून वापरतो मात्र या तिन्ही शब्दांना वेगळा अर्थ आहे हे शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द नाहीत या सारख्या असंख्य बाबी या साडेतीनशे पानाच्या पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत पुस्तक दोन भागात विभागले आहे .पहिल्या भागात 2 मुख्य प्रकरणे आहेत. ही दोन प्रकरणे ; 3ते,4उपप्रकरणात विभागली आहेत. दूसऱ्या भागात 3प्रकरणे आहेत. पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात पुर्विची मनोरूग्णालये कसी होती? मानसिक आरोग्याविषयी पुर्वीच्या समजूती कस्या होत्या,यावर भाष्य करण्यात आले आहे. हा अपवाद वगळता पुस्तकात सर्वत्र मानसोपचार पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण कसे होते हे स्पष्ट करत एका एका भागानुसार या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.पहिल्या भागाच्या दुसऱ्या प्रकरणात मानसोपचाराच्या विविध पद्धतीची माहिती करुन देण्यात आली आहे.  तर पुस्तकाचा दुसरा भाग मानसोपचारमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सिबिटी आणि रिइबिटी या पद्धतीची संपुर्ण माहिती देतो .सुमारे साडेतीनशे पानांच्या पुस्तकातील पावणेदोनशे पानामध्ये सिबिटी आणि आरइबिटी याविषयी; माहिती देण्यात आली आहे. पानांच्या संख्येवरून ही माहिती किती सखोलपणे देण्यात आली आहे, हे समजू शकते. पहिल्या
भागाच्या दुसऱ्या प्रकरणात ; आठ विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली असून यामध्ये किचकट माहिती न देता ती पद्धती शोधणाऱ्या  संशोधकाची माहिती तसेच थोडक्यात उपचार पद्धतीची ओळख करुन देण्यात आली आहे. उपचार पद्धतीची ओळख करुन देतान काही ठिकाणी नाट्यमयता देखील वापरण्यात आल्याने पुस्तक सहजतेने समजते. पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात युरोपातील मनोरुग्णालयाचा विकास कसा झाला.? युरोपीय जगतात मानसिक रोगाबाबत काय काय समजूती होत्या.?मध्ययुगात मानसिक रोग्यांना बरे
करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला याविषयी सांगण्यात आले आहे. यातील काही पद्धती प्रचंड अमानुष होत्या, ज्यांचे वर्णन ऐकतानाच अंगावर काटा येवू शकतो
        मी अच्युत गोडबोले यांचे मानसशास्त्राविषयीचे वाचलेले हे दुसरे पुस्तक .मी या आधी  अच्युत गोडबोले यांचे; मानसशास्त्राविषयीचे; पुस्तक म्हणजे मनकल्लोळ .ज्यामध्ये विविध मानसिक आजारांची ओळख करुन देण्यात आली होती.तर आता वाचलेल्या या; पुस्तकात मानसिक आजरांविषयीच्या उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली आहे.दोन्ही पुस्तके सहजसोप्या पद्धतीने लिहलेली असल्याने ज्यांची मानसशास्त्राविषयक काहिही पार्श्वभूमी नाही अस्या लोकांना सुद्धा सहजतेने समजतात मग वाचणार ही पुस्तके

रविवार, ७ मे, २०२३

मानवाच्या मूलभूत गरजेवर सविस्तर माहिती देणारे पुस्तक "संवाद "

   

हिंदू मान्यतेनुसार या पृथ्वीवर मानवाखेरीज विविध प्रकारचे ८४ लाख  वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जीवन जगत आहेत या ८४ लाख प्राण्यमध्ये मानवाचे ते वेगळे वैशिष्ट म्हणजे अन्य प्राण्यांपेक्षा अत्यंत विकसित झालेले स्वरयंत्र . या स्वरयंत्राच्या मदतीने मानवप्राणी विविध भाषा बोलू शकतो दुसऱ्या व्यक्तीशी अन्य प्राणी दुसऱ्या प्राणाशी ज्या प्रमाणे संवाद साधतात त्या पेक्षा प्रगव असा  संवाद साधू शकतो भाषेपासून सुरु झालेली संवादाची हि प्रक्रिया आता फेसबुक सारख्या  समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आहे या  प्रक्रियेच्या आतापर्यंतच्या टप्यात मनुष्याच्या संवाद साधण्याच्या प्रकियेत मोठ्या प्रमाणात बदल झाले जसे अश्यामुगीन मनुष्याने काढलेली चित्रे  कबुतरे निरोप्यापोस्ट  टेलिग्राफ , टेलिफोन वर्तमानपत्रे ,मोबाईल ,इंटरनेट आदी मात्र या वाटचालीला मोठा कालखंड  जाऊ द्यावा  लागला हे बदलपरिकथेप्रमाणे चुटकीसरशी झालेले नाहीत तसेच हे बदल एखाद्या एका व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसमूहाने केले नाहीत या विकासासाठी अनेक व्यक्तीचे योगदान आहे मनुष्याच्या संवादाच्या विकासाच्या या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वच व्यक्तींची नोंदही आपल्याकडे नाही अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तीचे परिश्रम या साठी लागलेले आहे मानवाच्या या वाटचालीचा इतिहास मोठा रंजक आहे हा रंजक इतिहास आपल्या मराठीत आणला आहे मराठीत विविध ज्ञान शाखांची माहिती पुस्तकांद्वारे करून देणारे ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या संव्वाद या सुमारे पावणे सहाशे पानाच्या पुस्तकातून आपल्याला हे इतिहास मुळासकट समजतो नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्था सावर्जनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले  

             सुमारे पावणेसहाशे पानांच्या या पुस्तकात १५ प्रकरणातून लेखकाने मानवी समूहात भाषेचा उगम कशा झाला ? पूर्वी संदेशवहनाच्या कोणत्या पद्धती वापरल्या जात असत ? पोस्ट या संकल्पनेचा उदय कशा झाल्या पोस्ट या संकल्पनेत वेळोवेळी कसे बदल झाले ? तार यंत्रणेचा विकास कश्या प्रकारे झाला त्या साठी अमेरिका आणि युरोपातील व्यक्तींनी काय हालअपेष्टा सोसल्या . तार यंत्रणेचा शोध लागल्यावर त्याचा विस्तार

करण्यासाठी मानवाने काय काय गोष्टी केल्या ? टेलिफोन आणि मोबाईलचा शोध कसा लागला ? सध्या संदेश जनसामान्यात पोहोचण्यात म्हह्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्तमानपत्राचा विकास कश्या प्रकारे होत गेला ? वर्तनमानपत्राच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकार आणि वृत्तसंस्थेचा विकास कसा कसा होत गेला इंटरनेटचे कार्य मुळातून कसे चालते ? त्याचा शोध कोणत्या कारणाने लागला  ? फेसबुक सारख्या समाज  माध्यमांचे कार्य कसे चालते आदी विषयांची अत्यंत सविस्तर माहिती देण्यात आली आहे सुमारे पावणे सहाशे पानाच्या या पुस्तकात दोन कॉलमचा वापर करत अन्य नेहमीच्या पुस्तकांपेक्षा काहीसा कमी फॉन्ट वापरत माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे आपण समजू शकतो या पुस्तकात किती माहिती देण्यात आली आहे पुत नसून अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखेच याही पुस्तकाची भाषा सहज सोपी आहे त्यामुळे पुस्तक
रंजक झाले आहे अच्युत गोडबोले यांची पुस्तके वाचणाऱ्यास मोठया प्रमाणात ज्ञसमृद्ध करतात संवाद हे पुस्तक देखील यास अपवाद नाहीये     

      कोणत्याही मनुष्याची मूलभूत म्हणता येईल अशी गरज  संवादाची आहे त्यामुळे अनेकदा अट्टल गुन्हेगारांना  तुरुंगात अन्य कैद्यांपेक्षा वेगळे ठेवतात ज्यामूळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊन असे कैदी पुढे तुरुंग प्रशासनास सहकार्य करतात काही मानववंश शास्त्रज्ञांच्या मते एखाद्या मुनष्यास जर जास्त काळ एकांतात ठेवले तर संबंधित व्यक्ती मनोरुग्य होनाची दाट शक्यता आहे  तत्यामुळे या संवादाची कुळकथा सांगणारे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे असे मला वाटते मग वाचणार ना हे पुस्तक 

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...