सायकॉलॉजी सायकास्टीटी ; आणि सायको थेरपीज बहुदा आपण एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून वापरतो मात्र या तिन्ही शब्दांना वेगळा अर्थ आहे हे शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द नाहीत या सारख्या असंख्य बाबी या साडेतीनशे पानाच्या पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत पुस्तक दोन भागात विभागले आहे .पहिल्या भागात 2 मुख्य प्रकरणे आहेत. ही दोन प्रकरणे ; 3ते,4उपप्रकरणात विभागली आहेत. दूसऱ्या भागात 3प्रकरणे आहेत. पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात पुर्विची मनोरूग्णालये कसी होती? मानसिक आरोग्याविषयी पुर्वीच्या समजूती कस्या होत्या,यावर भाष्य करण्यात आले आहे. हा अपवाद वगळता पुस्तकात सर्वत्र मानसोपचार पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण कसे होते हे स्पष्ट करत एका एका भागानुसार या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.पहिल्या भागाच्या दुसऱ्या प्रकरणात मानसोपचाराच्या विविध पद्धतीची माहिती करुन देण्यात आली आहे. तर पुस्तकाचा दुसरा भाग मानसोपचारमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सिबिटी आणि रिइबिटी या पद्धतीची संपुर्ण माहिती देतो .सुमारे साडेतीनशे पानांच्या पुस्तकातील पावणेदोनशे पानामध्ये सिबिटी आणि आरइबिटी याविषयी; माहिती देण्यात आली आहे. पानांच्या संख्येवरून ही माहिती किती सखोलपणे देण्यात आली आहे, हे समजू शकते. पहिल्या
भागाच्या दुसऱ्या प्रकरणात ; आठ विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली असून यामध्ये किचकट माहिती न देता ती पद्धती शोधणाऱ्या संशोधकाची माहिती तसेच थोडक्यात उपचार पद्धतीची ओळख करुन देण्यात आली आहे. उपचार पद्धतीची ओळख करुन देतान काही ठिकाणी नाट्यमयता देखील वापरण्यात आल्याने पुस्तक सहजतेने समजते. पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात युरोपातील मनोरुग्णालयाचा विकास कसा झाला.? युरोपीय जगतात मानसिक रोगाबाबत काय काय समजूती होत्या.?मध्ययुगात मानसिक रोग्यांना बरे करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला याविषयी सांगण्यात आले आहे. यातील काही पद्धती प्रचंड अमानुष होत्या, ज्यांचे वर्णन ऐकतानाच अंगावर काटा येवू शकतो

मी अच्युत गोडबोले यांचे मानसशास्त्राविषयीचे वाचलेले हे दुसरे पुस्तक .मी या आधी अच्युत गोडबोले यांचे; मानसशास्त्राविषयीचे; पुस्तक म्हणजे मनकल्लोळ .ज्यामध्ये विविध मानसिक आजारांची ओळख करुन देण्यात आली होती.तर आता वाचलेल्या या; पुस्तकात मानसिक आजरांविषयीच्या उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली आहे.दोन्ही पुस्तके सहजसोप्या पद्धतीने लिहलेली असल्याने ज्यांची मानसशास्त्राविषयक काहिही पार्श्वभूमी नाही अस्या लोकांना सुद्धा सहजतेने समजतात मग वाचणार ही पुस्तके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा