बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

एका महत्त्वाच्या मात्र दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष वेधून घेणारे पुस्तक, "ऑटीझम

पुर्वीच्या तूलनेत सध्याचा काळातआपल्या भारतात अनेक विकारांबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करण्यात येत असले, तरी काही विकार अजुन देखील समाज प्रबोधनाच्या बाबतीत बरेच मागे आहेत.या विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या लाखोत असली तरी त्याबाबत फारसे बोलले जात नाही.समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या चित्रपटातच नव्हे, तर वैद्यकीय स्तरावर सुद्धा त्याबाबत व्यापक चर्चा होत नाही.परीणामी या धोक्याची जाणीवच जन सामन्यांना होत नाही, ऑटीझम हा असाच फारसा चर्चिला न जाणारा विकार . सुमारे २टक्के (अचूकपणे सांगायचे झाल्यास दर ५४पैकी १) इतक्या लोकांना होणारा एक गंभीर स्वरुपाचा विकार.ज्या अभागी जणांना हा विकार होतो त्या व्यक्तींचेच नव्हे तर त्यांचे कुटुंबियांचे भावविश्व पुर्णतः नष्ट करणारा हा विकार. आपल्या मराठीचा विचार करता या विषयी जवळपास काहीच लिहलेले आढळत नाही..त्यातही जे काही आढळते,त्यात शास्त्रीय माहितीचा अभावच दिसतो..मात्र ही पोकळी भरुन येते, ती मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी झटणाऱ्या अच्यूत गोडबोले यांच्या "ऑटीझम या पुस्तकामुळे. स्वतःच्या मुलाला ऑटीझम झाल्यामुळे त्यातील दाहकता जवळुन अनुभवलेल्या अच्यूत गोडबोले यांनी आपल्याला जो त्रास  सहन करायला लागला तसा त्रास अन्य व्यक्तींना होवू नये, यासाठी लिहलेले हे पुस्तक आपणास या विकाराबाबत आपणास सखोलतेने माहिती देते.जे मी नाशिकमधील आघाडीची सांस्कृतिक संस्था सावानाच्या सहकार्याने नुकतेच वाचले.
       सुमारे पावणे दोनशे पानांच्या या पुस्तकात ८प्रकरणाद्वारे अच्युत गोडबोले यांनी या विकारांची, हा विकार ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची यामुळे काय होरपळ होते‌? तसेच स्वतः च्या मुलाला असणाऱ्या या विकारामुळे त्यांना कसे कष्ट सहन करावे लागले ?या विषयीची माहिती दिली आहे. या विकाराविषयीच्या माहितीत, मुळात हा विकार काय आहे? वैद्यकीय परिभाषेत यांचे वर्गीकरण कसे करतात? हा विकार का होतो? कोणकोणत्या प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना हा विकार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे, ती कितपत  खरी असू शकते? सांस्कृतिक विश्वात ,या ऑटीझम विकारांचे चित्रण करण्यात आलेले आहे? हे संकट भविष्यात असे अक्राळविक्राळ स्वरुप धारण करु शकते? ऑटीझमवर कोणते आणि कस्या प्रकारचे उपचार केले जातात?हा विकार वयाच्या विविध टप्प्यांवर कोणती वळणे घेतो?अन्य मानसिक विकारापेक्षा हा विकार कसा वेगळा आहे? याबाबत कोणते गैरसमज आहेत? या गैरसमजाची वास्तविक स्थिती काय आहे ?ऑटीझमची सुरवातीची लक्षणे काय? ती वयाच्या कोणत्या टप्प्यावर दिसून येतात?भारतात आणि जगात ऑटीझमबाबत काय स्थिती आहे? ऑटीझमचे शिकार झालेल्या व्यक्ती कस्या प्रकारे वर्तन करतात,? कुटुंबियांनी आपल्या पाल्यास हा विकार आहे,हे कसे ओळखावे? ऑटीझमबाबत कोणत्या संस्था, व्यक्ती मदत करतात?
याविषयी सांगितले आहे.
लेखनाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनासारखीच सहजसोपी चटकन समजणारी आहे या सारखीच शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकात आढळणारा मराठी परीभाषेचा वापर अच्युत गोडबोले यांचा या पुस्तकात देखील टाळला आहे. अच्युत गोडबोले यांनी समाजात रूढ झालेले मुळातील इंग्रजी शद्ब आपल्या लेखनात तसेच ठेवले आहेत, ज्यामुळे विषय चटकन समजतो.
    आपण स्वतः एखाद्या समस्येने ग्रस्त नसलो भविष्यात देखील ग्रासणार नसू तरी देखील समाजातील दुःखाबाबत माहिती असणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण समजले जाते.त्यामुळे आपल्या निरोगी मानसिकतेसाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...