गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

देशासमोरील प्रशांचा वेध घेणारे पुस्तक द फ्री व्हाईस

 गेल्या काही वर्षात कोणत्या विषयाची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत /याचा आढावा घेतल्यास सध्या रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या समस्येबाबत उहापोह करणारी , सध्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या पुस्तकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली दिसत आहे इंग्रजी, हिंदी या भाषांमध्ये  या प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध होत असली तरी त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी म्हणजे जेमतेम सहा महिने ते वर्षभरात प्रसिद्ध होतअसल्याने मराठी भाषिक वाचकांना देखील जगाशी नाळ जोडणे सहजशक्य होते त्या बद्दल या प्रकारची पुस्तके प्रसिद्ध करण्याबाबत भाषांतरणं प्रसिद्ध करण्यासारखी कायदेशीर आणि अन्य तांत्रिक मदत करणाऱ्या सर्वांचे आणि पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन 

  तर याच मालिकेतील एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे न्यू  दिल्ली टेव्हीव्हीजन असे पूर्ण नाव असलेल्या मात्र एन डी टी व्ही या संक्षिप्त नावानेच प्रसिद्ध असलेल्या वृत्तवाहिनी समूहाच्या  एन डी  टीव्ही इंडिया या हिंदी भाषिक वृत्तवाहिनीचे आता आतापर्यंत प्रमुख संपादक असणारे रवीश कुमार यांनी लिहलेले  फ्री व्हाईस हे पुस्तक . सदर पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या सह्कार्यने वाचले        

 सदर पुस्तकाचे मराठीत वितरणाचे हक्क अत्यंत माहितीपूर्ण आणि नवनवीन विषयावर पुस्तके काढणारे प्रकाशन म्हणून ओळख असणारे घोटी (तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ) येथील मधुश्री प्रकाशकाकडे आहेत .मूळ पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर जेमेतेम सहा महिन्यात त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे हे विशेष/ज्येष्ठ

पत्रकार सुनील तांबे यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाची भाषा अत्यन्त प्रवाही सहज समजणारी आहे फक्त पुस्तकात मुद्रणदोष मोठ्या प्रमाणत आहेत मी वाचलेल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत "ऱ्य' आणि  "र्य ' या बाबतच्या अनेक चुका आढळतात कदचित पुढील आवृत्तीत हा दोष काढून टाकण्यात आला असेल     

   एकाचवेळी लोकांच्या तिरस्काराचा आणि प्रेमाचा अनुभव घेणारे ज्येष्ठ पत्रकार म्हणून रवीश कुमार ओळखले जातात /पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे पत्रकार म्हणून अनेक जण त्यांच्यावर पक्षपातीचा आरोप करत त्यांच्यावर टीका करतात त्याचवेळी ते त्यांच्या टीव्हीवरील आणि आता युट्युब चॅनेलवरील व्हिडिओतून आवाज उठवणाऱ्या विषयांमुळे ते अनेकांचे आवडते आदर्श आहेत . तर अश्या व्यक्तीने लिहलेल्या या पुस्तकात प्रकरणातून त्यांनी सध्या लोकशाहीला भेडसावणाऱ्या विविध समस्येवर आपले व्यक्त केले आहे त्यामद्ये कुठेही विद्यमान सरकारवर प्रत्यक्षरित्या टीका करण्यात आलेली आंही किंवा विद्यमान सरकारच्या कार्यकाळात लोकशाही मुळ्ये घसरली अशा उल्लेख नाहीये किंवा पूवीच्या सरकार सरकारच्या कार्यकलालत या गोष्टी होत्या अशी तुलना देखील आहे १८४ पानाच्या या पुस्तकात पहिल्या प्रअभिव्यक्तीची आवश्यकता यात सांगितली आहे करणात जस्टीस लोया यांच्या मृत्यूचा हवाला देत सध्या लॉग आपले मत उघडपणे समाजमाध्यमानवर मांडण्यास कचरतात असे सांगितले आहे जे निकोप लोकसष्टीसाठी अयोग्य असल्याचे सांगितले दुसऱ्या प्रकरणांत फेक न्यूज याबाबत भाष्य केले आहे फेक न्यूज कश्या प्रकारे प्रसारित केल्या जातात /त्याचा समाजमनावर कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो ? फेक न्यूजच्या विरोधात जगभरात कश्या प्रकारे लस्पस्ष्ट केले ढाई लढली जात आहे हे त्यांनी काही उदाहरणासह स्पष्ट केले आहे  तिसऱ्या प्रकरणांत पत्रकारांवरील हल्ल्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे झुंडीच्या मानसशास्त्रात आणि तयामुळे सध्याच्या लोकशाहीला कोणत्या प्रकारे धोका आहे यावर चौथ्या प्रकरणात भाष्य केले आहे लोकशाहीतील नागरिकांचे अधिकारयामध्ये पाचव्या तर वृत्तवाहिनीवरील ज्योतिषांचा सुळसुळाट यावर सहाच्या 

प्रकरणात सांगण्यात आले आहे सातव्या प्रकरणात प्रेम या मानसशात्राचा विचार करता अत्यंत सकारात्मक भावना म्हणून ओळखळल्या जाणाऱ्या मानवी आयुष्यतील प्रेम या बाबत भाष्य करण्यात आले आहे . भारतीयांचा प्रेम व्यक्त करण्याचा बाबतचा संकुचित दृष्टिकोन आणि लोकांच्या प्रेमाबाबचा अत्यंतअरुंद दृष्टिकोन आणि त्यामुळे समाजात निर्माण होणारे प्रश्न याबाबत कथन करण्यात आले आहे आठव्या प्रकरणात सर्वोच्च न्यायलायच्या एका निकालाचा हवाला देत लोकांच्या खासगीपणविषयीच्या विविध पैलूंबाबतची चर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे शेवटच्या  आणि व्या प्रकरणात भारतीय लोकांच्या स्वातंत्र्यदिनविषयीच्या समजुतींवर भाष्य केले आहे    

      जगात प्रत्येकात काही चांगल्या बाबी असतात काही नकारत्मक बाबी असतात तस्यां त्या रवीश कुमार त्यांच्यात देखील आहेत.  मात्र समर्थ रामदास स्वामी यांच्या "उत्तमाची ते घ्यावे , मिळमळीत ते टाकुनी द्यावे " या उक्तीनुसार रवीश कुमार यांच्यातील उत्तम ते घेण्यासाठी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचावेच .किमान एकदा तरी डोळ्याखालून घालण्यासारखे हे पुस्तक नक्कीच आहे मग कधी वाचायला घेताय हे पुस्तक 

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

टेल फ्रॉम द सिक्रेट अन

   

 आपल्या मराठीत अन्य भाषेतून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांचा मोठा साठा आहे फक्त भारतीय भाषेतीलच नव्हे तर इंगजी जर्मन आदी विविध भाषेत लिहली गेलेली पुस्तकेही मराठीत अनुवादित झालेली आपणास दिसते या मराठीत असणाऱ्या अनुवादामुळे ज्यांना मुळातून ती भाषा अवगत नाही त्यांना देखील या साहित्याचा आस्वाद लुटता येतो . कोणी कितीही जागतिकीकरमुळे सर्वत्र सामानात आल्याचे म्हणो साहित्यातून स्थानिक संकसृतीचे दर्शन होतेच आणि ते लिखाण मुळात दुसऱ्या महायुद्धच्या काळातील असो तर मग विचारायलाच नको 

       तर नाशिकमधील महत्वाचे साहित्यिक केंद्र असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सहकार्यामुळे मला असाच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जर्मनीचा आंनद लुटता आला . त्याचे असे झाले कि आपल्या डायरीमुळे जगभरात ओळखल्या जणाऱ्याअन फ्रँक यांच्या अप्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद मी वाचला मी त्यांच्या डायरीविषयी बोलतं नाहीये हे लक्षात घ्या . त्यांची डायरी जगप्रसिद्ध आहेच दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन ज्यू लोकांना ज्या नरकयातना भोगायला लागल्या त्यांचे मन हेलावून टाकणारे वर्णन या मध्ये करण्यात आले आहे मात्र त्यांच्या या लिखाणा शिवाय त्यांनी काही अन्यलेखन सुद्धा केले ज्यामध्ये काही कथा एक अशंतः लिहलेली कादंबरी यांच्या समावेश होतो या अन फ्रँक यांच्या अप्रसिद्ध लेखनाचा समावेश लेखनाचा सामावेश या पुस्तकात कऱण्यात आला आहे 
        साकेत प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात टेल फ्रॉम द सिक्रेटअन या  या सुमारे पावणेदोनशे पानाच्या याअनुवादित  पुस्तकात ४२ प्रकरणमध्ये हे सारे साहित्य आहे . यामध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या डायरीत केलेले लेखन समाविष्ट करण्यात आले आहे ज्यामध्ये त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या डायरीशी मिळतेजुळते काही प्रसंग सांगण्यात आले आहेत त्यांनी लिहलेल्या काही कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत शेवटची तीन प्रकरणे त्याच्या पूर्ण न झालेल्या कादंबरीशी संबंधित लेखन आहे हे सर्व लेखन मार्च १९४३ ते मे १९४४ या कालावधीतील असून पुस्तकात सदर पुस्तकात हे तारखेनुसार लावण्यात आले आहे या दुसऱ्या डायरीच्या काही  लेखनावर अन  फ्रॅंक यांनी तारीख न लिहल्याने या पुस्तकात देखील त्या लेखनावर तारीख टाकण्यात आलेली आंही मात्र असे तारीख नसलेले लेखन पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे सदर कथा लिहल्या तेव्हा अन फ्रॅंक या कुमारवयीन होत्या मात्र एखाद्या प्रौढाला लाजवेल इतक्या ताकदीचे लेखन त्यांनी त्यांच्या कथा लेखनातआणि कादंबरीच्या काही भागात केलेले आढळते  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांना ज्या मरणयातना भोगायला लागल्या त्याचे हृदयद्रावक वर्णन या
कादंबरीच्या मार्फत अन फ्रँक यांनी केलेले आपणस दिसते मी मूळ पुस्तक वाचलेले नाही मात्र अनुवादित पुस्तक वाचलेले आहे मात्र मराठीतील भांषांतर कुठेही कृत्रिम आहे असे वाटत  नाही मुळातील मराठीतील पुस्तक वाचत आहोत असे भांषातरण शिवप्रिया सुर्वे यांनी केले आहे पुस्तकाचे मुखपृष्ठ अन फ्रँक यांच्या छयाचित्राने सजलेले असून निळ्याशार रंगसंगतीतीत मुखपृष्ठ आपले लक्ष पुस्तकाकडे वेधून घेते डायरी ऑफ अन फ्रॅंक यामध्ये अनेक हृदयद्रावक घटना आहेत मात्र त्यांचेच लेखन असलेल्या या पुस्तकात त्याचा लवलेशही आढळत नाही तर एका सशक्त लेखिकेचे लेखनवाचन वाचत आहोत असा भास होतो माझ्यामते प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे मग वाचणार ना हे पुस्तक 
   जाताजाता : मी बाल विभागाचा आणि प्रौढ विभागाचा एकत्रित विचार केला असता   सावानाचा २००० पासून सभासद आहे . सध्या  टेबलावर जी पुस्तके मांडून ठेवण्यात येतात ती आम्हा तरुणाईचा भावविश्वासी जुळणारी असतात पूर्वी ज्या विषयांची पुस्तके सावानात दिसत नसे अश्या अनेक आधुनिक विषयांशी संबंधित पुस्तके सध्या टेबलावर दिसतात त्याबद्दल संबंधित यंत्रणेचे मनःपूर्वक धन्यवाद 

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

देवदूतांची काळी बाजू दाखवणारे पुस्तक, अशीही एक झुंज .........

 


सर्वसाधारपणे वैद्यकीय  व्यवसायाला एका  परोपकारी नजरेतून बघितले जाते . लोकांची आयुष्ये वाचवणारा व्यवसाय म्हणून, यास  अन्य व्यवसायाच्या तुलनेत  एक प्रतिष्ठा आहे. औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जगभरात अनेक ठिकाणी देवदूतासमान मानण्यात येतेमात्र अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय देशातील औषध निर्मिती कंपन्याचा नफाखोरीने या  लोककल्याणकारी  व्यवसायाला एका बाजूने काळवंडले आहेया काळ्या बाजूची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक  समाज या संस्थेच्या नाशिक येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांत प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ मृदुला बेळे यांनी ;लिहलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक म्हणजे अशीही एक झुंजजे मी . महाराष्ट्रातील जुन्या वाचनालयांची यादी केल्यास क्रमांक दोनचे जुने वाचनालय असणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या वाचनालयात नुकतेच वाचले . आपल्या मराठीत याविषयावरची पुस्तके फारच कमी आहेत अश्या अत्यंत मोजक्या संख्येने असलेल्या पुस्तकांचा मुकुटमणी म्हणून याकडे बघता येऊ शकते .,औषधनिर्मिती क्षेत्रातील नफेखोरीवर भाष्य करणारे इंग्रजी पुस्तक म्हणजे रोझ अँड कंपनी . रोझ अँड कंपनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद झाला असला तरी ते मूळचे इंगजी पुस्तक आहे तेथील मूळ संदर्भ पश्चिमी युरोपीय प्रदेशातील आहेत हे आपण लक्षत घेयला हवे . तर अशीही एक झुंज हे मूळचे मराठीतील पुस्तक आहेत त्र्याचे संदर्भ अस्सल भारतीय आहेत हे आपण लक्षात घेयला हवे

        या पुस्तकात सिप्ला या भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनीने प्रामुख्याने आफ्रिका खंडातील नागरिकांसाठी लढलेली झुंज सांगण्यात आली आहे अमेरिका आणि पश्चिमी युरोपातील औषध निर्मिती कंपन्या पेटंटचा बागुलबुवा करत गोर गरीब आफ्रिकी जनतेलात्यांच्यासासाठी जीवनवश्यक असलेल्या एड्सविरोधी औषधे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असताना महाग दराने विकली . अमेरिका आणि पश्चिमी युरोप या खंडातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याविरोधात महात्मा  गांधींचा आदर्श घेऊन औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिप्ला या औषधनिर्मिती कंपनीने ( हि कंपनी एका पारशी व्यक्तीची आहे . भारतात अल्पसंख्यांक असून त्याचा कोणताही बागुलबुवा करता , विशेष सवलतींची मागणी करता देशाच्या प्रगतीत सातत्याने भरीव योगदान देणारे समाज म्हणजे पारशी समाजबांधव होय ) दिलेली झुंज या पुस्तकात सांगण्यात आलेली आहे भारतीय औषध निर्मिती क्षेत्रात मोठे भरीव योगदान देणारी सरकारला अनेक चांगल्या सुधारणा करायला भाग पडणारी , भारतातील सर्व औषध निर्मिती कंपन्यांची व्रजमूठ होण्यसासाठी प्रयत्न करणारी औषध निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून आज आपण सिप्ला यान कंपनीस ओळखतो या कंपनीने आफ्रिका खंडातील सर्वात मोठ्या समस्येपैकी एक असणाऱ्या एड्स च्या रुग्णांना मदतीचा हात देत त्यांना स्वस्त्तात औषधे पुरवण्यासाठी मोठा कायदेशीरलढा दिला त्याची कहाणी या पुस्तकात सांगण्यात आली आहे , सिप्ला या कंपनीने ज्यांच्या विरोधार्त लढा दिला ते आर्थिक ताकदीचा विचार करता सिप्लाच्या तुलनेत अतिशय मोठे होते जगातील सर्वात प्रबळ देश असलेल्या अमेरिकेच्या सत्ताकारकांच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या . जे मानत आणले तर आपल्यला अनुकूल होईल अशी व्यक्ती सहजतेने अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसवू शकले असते  जे आपल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर त्यांना हवा तास निर्णय सहज न्यायालयाकडून आणू शकत होते सिप्ला हि भारतीय कंपनी होती जिची आर्थिक ताकद मर्यादित होती तिला राजकीय पाठबळ खूपच कमी होते सिप्ला भारतीय कंपनी असून ती ज्यांच्यासाठी लढत होती ते आफ्रिकी देश होते .ज्यांना भारताविरोधात भडकावणे सहज शक्य होते अश्या विषम स्थितीत असणारा लढा सिप्ला या भारतीय औषध निर्मिती कंपनीने जिंकला ज्याची कहाणी या पुस्र्तकात सांगण्यात आली आहे

      या पुस्तकात या लढ्यातील सर्व घटना तारीखवार सुस्पष्ट करण्यात आली आहे पुस्तकाची सुरवात आफ्रिकेमध्ये एड्सचे संकट कसे सुरु झाले .? अमेरिकी आणि पश्चिमी युरोपीय प्रदेशातील औषध निर्मिती कंपन्यांनी पेटंटचा मुद्दा उपस्थित करत त्यांचे कसे  शोषण केले ? औषध पेटंट विषयक प्रक्रिया काय असते ? जगभरात ती कशी राबवली जाते  ? १९७० चा भारताचा औषध पेटंट कायद्याचा भारताला कसा प्रकारे फायदा झाला ? त्यामुळे भारतीय औषध निर्मिती क्षेत्र कसे  विस्तारले / ? या कायद्यातील तरतुदींचा सिप्लाला आपल्य खऱ्या अर्थाने मानवतावादी लढ्यात कसा फायदा झाला ? सध्या भारतात लागू असणारा २००५ चा भारतीय औषध निर्मिती पेटंट कायद्यामुळे आता

अशी गोष्ट लढणे कसे अवघड आहे ? औषध निर्मितीची प्रक्रिया काय असते ? तिच्या विविध टप्यावर कोण कोणती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यास किती खर्च येतो या खर्च्याचा मुद्दा उपस्थित करत औषध निर्मिती कंपन्या ग्राहकांकडून कोणत्या प्रकारे लूट करतात  याबाबतची माहिती आपणस या २०० पाणी पुस्तकात मिळते . पुस्तकाची भाषा खूपच सोपी आहे त्यामुळे हे पुस्तक सहजतेने समजते पुस्तक तांत्रिक गोष्टीची माहिती देणारे असून देखील वाचनीय आहे सर्वांनी हे पुस्तक वाचावेच असे मला वाटते ? मग वाचणार हे पुस्तक

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...