सर्वसाधारपणे वैद्यकीय व्यवसायाला एका परोपकारी नजरेतून बघितले जाते . लोकांची आयुष्ये वाचवणारा व्यवसाय म्हणून, यास अन्य व्यवसायाच्या तुलनेत एक प्रतिष्ठा आहे. औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जगभरात अनेक ठिकाणी देवदूतासमान मानण्यात येते . मात्र अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय देशातील औषध निर्मिती कंपन्याचा नफाखोरीने या लोककल्याणकारी व्यवसायाला एका बाजूने काळवंडले आहे . या काळ्या बाजूची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या नाशिक येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांत प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ मृदुला बेळे यांनी ;लिहलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक म्हणजे अशीही एक झुंज. जे मी . महाराष्ट्रातील जुन्या वाचनालयांची यादी केल्यास क्रमांक दोनचे जुने वाचनालय असणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या वाचनालयात नुकतेच वाचले . आपल्या मराठीत याविषयावरची पुस्तके फारच कमी आहेत अश्या अत्यंत मोजक्या संख्येने असलेल्या पुस्तकांचा मुकुटमणी म्हणून याकडे बघता येऊ शकते .,औषधनिर्मिती क्षेत्रातील नफेखोरीवर भाष्य करणारे इंग्रजी पुस्तक म्हणजे रोझ अँड कंपनी . रोझ अँड कंपनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद झाला असला तरी ते मूळचे इंगजी पुस्तक आहे तेथील मूळ संदर्भ पश्चिमी युरोपीय प्रदेशातील आहेत हे आपण लक्षत घेयला हवे . तर अशीही एक झुंज हे मूळचे मराठीतील पुस्तक आहेत त्र्याचे संदर्भ अस्सल भारतीय आहेत हे आपण लक्षात घेयला हवे
या पुस्तकात या लढ्यातील सर्व घटना तारीखवार सुस्पष्ट करण्यात आली आहे पुस्तकाची सुरवात आफ्रिकेमध्ये एड्सचे संकट कसे सुरु झाले .? अमेरिकी आणि पश्चिमी युरोपीय प्रदेशातील औषध निर्मिती कंपन्यांनी पेटंटचा मुद्दा उपस्थित करत त्यांचे कसे शोषण केले ? औषध पेटंट विषयक प्रक्रिया काय असते ? जगभरात ती कशी राबवली जाते ? १९७० चा भारताचा औषध पेटंट कायद्याचा भारताला कसा प्रकारे फायदा झाला ? त्यामुळे भारतीय औषध निर्मिती क्षेत्र कसे विस्तारले / ? या कायद्यातील तरतुदींचा सिप्लाला आपल्य खऱ्या अर्थाने मानवतावादी लढ्यात कसा फायदा झाला ? सध्या भारतात लागू असणारा २००५ चा भारतीय औषध निर्मिती पेटंट कायद्यामुळे आता
अशी गोष्ट लढणे कसे अवघड आहे ? औषध निर्मितीची प्रक्रिया काय असते ? तिच्या विविध टप्यावर कोण कोणती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यास किती खर्च येतो या खर्च्याचा मुद्दा उपस्थित करत औषध निर्मिती कंपन्या ग्राहकांकडून कोणत्या प्रकारे लूट करतात याबाबतची माहिती आपणस या २०० पाणी पुस्तकात मिळते . पुस्तकाची भाषा खूपच सोपी आहे त्यामुळे हे पुस्तक सहजतेने समजते पुस्तक तांत्रिक गोष्टीची माहिती देणारे असून देखील वाचनीय आहे सर्वांनी हे पुस्तक वाचावेच असे मला वाटते ? मग वाचणार हे पुस्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा