शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

टेल फ्रॉम द सिक्रेट अन

   

 आपल्या मराठीत अन्य भाषेतून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांचा मोठा साठा आहे फक्त भारतीय भाषेतीलच नव्हे तर इंगजी जर्मन आदी विविध भाषेत लिहली गेलेली पुस्तकेही मराठीत अनुवादित झालेली आपणास दिसते या मराठीत असणाऱ्या अनुवादामुळे ज्यांना मुळातून ती भाषा अवगत नाही त्यांना देखील या साहित्याचा आस्वाद लुटता येतो . कोणी कितीही जागतिकीकरमुळे सर्वत्र सामानात आल्याचे म्हणो साहित्यातून स्थानिक संकसृतीचे दर्शन होतेच आणि ते लिखाण मुळात दुसऱ्या महायुद्धच्या काळातील असो तर मग विचारायलाच नको 

       तर नाशिकमधील महत्वाचे साहित्यिक केंद्र असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सहकार्यामुळे मला असाच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जर्मनीचा आंनद लुटता आला . त्याचे असे झाले कि आपल्या डायरीमुळे जगभरात ओळखल्या जणाऱ्याअन फ्रँक यांच्या अप्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद मी वाचला मी त्यांच्या डायरीविषयी बोलतं नाहीये हे लक्षात घ्या . त्यांची डायरी जगप्रसिद्ध आहेच दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन ज्यू लोकांना ज्या नरकयातना भोगायला लागल्या त्यांचे मन हेलावून टाकणारे वर्णन या मध्ये करण्यात आले आहे मात्र त्यांच्या या लिखाणा शिवाय त्यांनी काही अन्यलेखन सुद्धा केले ज्यामध्ये काही कथा एक अशंतः लिहलेली कादंबरी यांच्या समावेश होतो या अन फ्रँक यांच्या अप्रसिद्ध लेखनाचा समावेश लेखनाचा सामावेश या पुस्तकात कऱण्यात आला आहे 
        साकेत प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात टेल फ्रॉम द सिक्रेटअन या  या सुमारे पावणेदोनशे पानाच्या याअनुवादित  पुस्तकात ४२ प्रकरणमध्ये हे सारे साहित्य आहे . यामध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या डायरीत केलेले लेखन समाविष्ट करण्यात आले आहे ज्यामध्ये त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या डायरीशी मिळतेजुळते काही प्रसंग सांगण्यात आले आहेत त्यांनी लिहलेल्या काही कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत शेवटची तीन प्रकरणे त्याच्या पूर्ण न झालेल्या कादंबरीशी संबंधित लेखन आहे हे सर्व लेखन मार्च १९४३ ते मे १९४४ या कालावधीतील असून पुस्तकात सदर पुस्तकात हे तारखेनुसार लावण्यात आले आहे या दुसऱ्या डायरीच्या काही  लेखनावर अन  फ्रॅंक यांनी तारीख न लिहल्याने या पुस्तकात देखील त्या लेखनावर तारीख टाकण्यात आलेली आंही मात्र असे तारीख नसलेले लेखन पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे सदर कथा लिहल्या तेव्हा अन फ्रॅंक या कुमारवयीन होत्या मात्र एखाद्या प्रौढाला लाजवेल इतक्या ताकदीचे लेखन त्यांनी त्यांच्या कथा लेखनातआणि कादंबरीच्या काही भागात केलेले आढळते  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांना ज्या मरणयातना भोगायला लागल्या त्याचे हृदयद्रावक वर्णन या
कादंबरीच्या मार्फत अन फ्रँक यांनी केलेले आपणस दिसते मी मूळ पुस्तक वाचलेले नाही मात्र अनुवादित पुस्तक वाचलेले आहे मात्र मराठीतील भांषांतर कुठेही कृत्रिम आहे असे वाटत  नाही मुळातील मराठीतील पुस्तक वाचत आहोत असे भांषातरण शिवप्रिया सुर्वे यांनी केले आहे पुस्तकाचे मुखपृष्ठ अन फ्रँक यांच्या छयाचित्राने सजलेले असून निळ्याशार रंगसंगतीतीत मुखपृष्ठ आपले लक्ष पुस्तकाकडे वेधून घेते डायरी ऑफ अन फ्रॅंक यामध्ये अनेक हृदयद्रावक घटना आहेत मात्र त्यांचेच लेखन असलेल्या या पुस्तकात त्याचा लवलेशही आढळत नाही तर एका सशक्त लेखिकेचे लेखनवाचन वाचत आहोत असा भास होतो माझ्यामते प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे मग वाचणार ना हे पुस्तक 
   जाताजाता : मी बाल विभागाचा आणि प्रौढ विभागाचा एकत्रित विचार केला असता   सावानाचा २००० पासून सभासद आहे . सध्या  टेबलावर जी पुस्तके मांडून ठेवण्यात येतात ती आम्हा तरुणाईचा भावविश्वासी जुळणारी असतात पूर्वी ज्या विषयांची पुस्तके सावानात दिसत नसे अश्या अनेक आधुनिक विषयांशी संबंधित पुस्तके सध्या टेबलावर दिसतात त्याबद्दल संबंधित यंत्रणेचे मनःपूर्वक धन्यवाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...