शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

सायबर क्षेत्रातील आपला वावर सरंक्षित होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक

            सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरनेट . माझ्या लहानपणी शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा विषय निबंधासाठी असे आता त्यांची जागा  इंटरनेट शाप[ कि वरदान  हा विषय घेतो कि काय असे वाटावे इतपर्यंत आपले आयुष्य इंटरनेटशी जोडले गेले आहे .  कोव्हीड १९ च्या साथरोगानंतर सुरु झालेल्या न्यू नॉर्मल या जीवन पध्द्तीची तर इंटरनेटशिवाय कल्पना करणे देखील अवघड   आपण फक्त सोशल मीडियासाठीच इंटरनेट वापरतो असे नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात एकमेकांना पैसे देण्यासाठी सुद्धा आपण फोन पे गूगल पे सारख्या माध्यमांचा वापर करतो . जी मुख्यतः इंटरनेटवरच कार्यरत राहतात .आजकाल फक्त प्रौढ जनताच नव्हे तर लहान मुले मुली सुद्धा इंटरनेट लीलया हाताळतात . या लहान मुला मुलींना इंटरनेटमधील चांगल्याच बाबी प्रामुख्याने लक्षात असतात मात्र या इंटरनेटच्या वापरातील धोके अनेकदा त्यांना माहिती नसतात या इंटरनेटच्या जगतात फसवणूक झाल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते तसेच अनेकदा आयुष्याचे कधीही भरून न येणारे नुकसान देखील होते इंटरनेट हे दुधारी अस्त्र आहे जसे ते लोक कल्याणकारी कामासासाठी वापरता येते तसेच त्याच्या वापर दुसऱ्याच्या विनाशासाठी देखील करता येऊ शकतो . हि जाणीव अनेकदा त्यांच्याकडे नसते परिणामी आपले मोठे नुकसान होते बहुतेक वेळा असे नुकसान झाल्यावरच आपण असे वागायला नको होते असे समजते मात्र तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो . मात्र सुरवातीला जर काळजी घेणे नेहमीच नंतरच्या उपाययोजनेपेक्षा उत्तम असते या तत्त्वानुसार त्यातील धोके समल्यास ऊत्तम असते . मात्र सध्याच्या माहितीच्या महापुराच्या स्फोटात योग्य ती माहिती मिळणे काहीसे कठीण झाले आहे मिळालेली माहिती योग्य आहे कि अयोग्य आहे असा प्रश्न निर्माण होण्याचा सध्याचा काळ आहे त्यामुळे आपल्यास अचूक माहिती मिळण्यासाठी पुस्तकांची गरज आहे किंबहुना ती अधिकच हि वाढली आहे हेच लक्षात घेत मी रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अतुल कहाते यांनी लिहलेले " इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी " हे पुस्तक नुकतेच वाचले 
      लेखक अतुल कहाते यांच्या आयटी क्षेत्रात मोठा अनुभव जाते त्यांनी विविध आयटी कंपन्यांमध्ये विविध पदावर कार्य केले आहे. तसेच अनेक नामांकित कॉलेज आणि संस्थांमध्ये कॉम्पुटरविषयक विषय शिकवले आहेत तसेच
वृत्तपत्रीय लिखाणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे अश्या अनुभव संपन्न  व्यक्तीने लिहिल्यामुळे पुस्तक उत्तमच झाले आहे  पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी आहे त्यामुळे किमान मराठी येणाऱ्या माणसाला देखील विषय चटकन समजतो . ज्यास विषयाची कघीच माहिती नाही त्यास विषयाची माहिती देताना विषयातील काठिण्य पातळी कमीत कमी ठेवून विषयाचे ज्ञान देणे आवश्यक असते असे ज्ञान दिले तर आणि तरच त्यास ते समजते याची पूर्ण जाणीव लेखकास असल्याचे त्याच्या लेखनातून सर्प-स्पष्ट होते  विषय समजण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या देखील काढण्यात आल्या आहेत ज्यामुळे विषय समजायला मदतच होते फक्त लेखी मजकूर सतत वाचायला वाचकाला कंटाळवाणे होते लेखी मजकूराबरोबर चित्र असल्यास वाचक लेखात गुंतून राहू शकतो तसेच एखादी गोष्ट संकल्पना समजायला जर हजारो शब्द लागत असतील तर तीच गोष्ट एखाद दुसऱ्या चित्रांद्वारे सहजतेने समजू शकते याचे उत्कृष भान लेखकाला असल्याचे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते 
आपणास या पुस्तकाद्वारे इंटरनेट धोकादायक कसे ठरू शकते ? इंटरनेटचे अर्थकारण कसे चालते ? जंक किंवा स्पॅम ईमेल म्हणजे काय ? जंक किंवा स्पॅम ईमेलमुळे कसे नुकसान होऊ शकते ?इंटरनेटवरील विविध पासवर्ड कसे सुरक्षित ठेवायचे इंटरनेटवर फोटो आणि व्हिडीओ टाकताना काय काळजी घेयची ? इंटरनेट सुरक्षितपणे कसे
वापरायचे ? इंटरनेटवरकोणतेही व्यवहार करताना काय काळजी घेयची ?इंटरनेटवर आर्थिक व्यवहार कसे होतात ? स्मार्टफोन वापरताना काय काळजी घेयची ? ऑनलाईन जगात आपला कशा छळ होऊ शकतो ? ऑनलाईन खंडणी कशी मागितली जाते ऑनलाईन अपहरण कसे होते ? सोशल मीडिया ब्लॉगिंग करताना काय काळजी घ्यावी ? तसेच आपली कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन जगात फसवणूक झाल्यास काय करावे ? काय टाळावे ?  या माहितीसह घटक सॉफ्टवेवर विषयी तसेच सॉफ्टवेवर पायरसी बाबत माहिती मिळते या पुस्तकात मजकुराच्या अनुषंगाने काही वेबसाईटची देखील माहिती देण्यात आलेली आहे वाचक आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी अधिकची माहिती माहिती घेऊ शकतो . सुमारे पवणेदोनशे पानांच्या या पुस्तकात देण्यात आलेली माहिती आपल्याला खूप उपयोगी पडणारी आहे आणि लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवर कितीही माहिती असली तरी विश्वासार्हायतेबाबत पुस्तकांना मरण नाही तर वाचणार ना पुस्तक 
अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५ 
९४२३५१५४००








गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

अति तिथे माती किती खरे समजण्यासाठी वाचावे असे पुस्तक The evil eye of Chess


   
                           आपल्याकडे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे ,"अति सर्वत्र वर्जयते" ,अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.रोजच्या जीवनात आपण याचा अनुभव सुद्धा घेत असतो. आपल्या रोजच्या जगण्यात सर्वच क्षेत्राला हे तत्व लागू  होते. अगदी बुद्धिबळ सारख्या खेळात सुद्धा हे तत्व लागू होते.चमकलात ना ? हो बुद्धीबळ सारख्या खेळात देखील अति तिथे माती हे तत्व लागू होते. ते कसे लागू होते,हे समजण्यासाठी आपण आशिया खंडातील पहिले बुद्धीबळविषयक ऍप आणि संकेतस्थळ तयार करणाऱ्या श्री . विनायक वाडीले यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक " The evil eye of Chess" जे मी नुकतेच वाचले.

                               या पुस्तकात आठ अस्या जगविख्यात बुद्धीबळपटुंची ओळख करून देण्यात आली आहे की, ज्यात बुद्धीबळाविषयक मोठी गुणवत्ता अगदी ठासून भरली होती. मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे तत्व त्यांनी आचरणात आणल्यामुळे त्यांचा अंत फारच हृदयदायक झाला,एकाला आयुष्याचा शेवटची काही वर्षे मनोरुग्णालयात काढावी लागली,तर एका बुद्वीबळपटूला आयुष्याचा अखेरच्या टप्प्यात रस्त्यावर

भीक मागावी लागली. गोष्ट चांगली असो किंवा वाईट तिच्या आहारी जाणे नेहमीच मनुष्याचा घात करणारे असते, हा संदेश हे पुस्तक आपणास देते‌.

                  सुमारे ५५पानाच्या या पुस्तकात आपणास ज्या ८बुद्वीबळपटुंविषयी लेखक आपणास माहिती देतो,त्यामध्ये बॉबी फिशर, मिखाईल ताल, पॉल मोर्फी, विल्हेम स्टाइनिट्ज़, ,अकीबा रूबीनस्टेन,अलेक्जेंडर अलेखीन,कार्लोस टोरे रेपेटो   सारखे जगविख्यात बुद्धीबळ खेळाडू आहेत. ज्यांना जून्या बुद्धीबळपटुंची माहिती आहे,त्यांना या सर्व बुद्धीबळपटुंची खेळ किती उत्कृष्ट पद्धतीचा होता हे सर्व माहिती असेलच,ज्यांना या खेळाडुंना खेळ माहिती नाही,ते इंटरनेटवर याविषयी सहजतेने माहिती घेवू शकतात.सर्वोत्तम अस्या वर्गवारीत मोडणाऱ्या या सर्व खेळाडुंचा अंत फारच दूर्दैवी झाला याला कारणीभूत ठरले ते एक निमित्य, ते म्हणजे खेळात किती झोकुन देयचे? वैयक्तिक आयुष्यात खेळ कुठे थांबवायचा, आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य व्यतीत करायचे या बाबत त्यांची झालेली गल्लत. या चूकीची शिक्षा त्यांनी स्वतः.च्या आयुष्याचे मातेरे करत भोगली. आपण रोजच्या

जगण्यात खेळात नाही पण इतर क्षेत्रात असी चूक टाळण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या वाक्प्रचारानुसार मोठी गुणवत्ता असून देखील ती वाया गेलेल्या या बुद्धीबळपटुंच्या चरित्रातून अति तिथे माती या म्हणीचा अनुभव घेण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे, मग वाचणार ना हे पुस्तक?

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400

      

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

परग्रहवासीची अदभुत कहाणी,..प्रेषित...

 पृथ्वीखेरीज अन्यत्र कुठे जीवसृष्टी आहे का? याबाबत मोठी उत्सुकता राहिलेली आहे.परग्रहवासीयांना बघीतले असल्याचे दावेही वारंवार करण्यात येतात.काही दिवसांपूर्वी मेस्किको या देशांमध्ये परग्रहवासीयांची दोन प्रेते सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. उडत्या तबकड्यामधून परग्रहवासी आपल्या  पृथ्वीवर वारंवार  येत असल्याचे सातत्याने  सांगितले जाते.परग्रहवासी या विषयावर हॉलीवूडमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील  चित्रपट  येवून गेले आहेत. इंग्रजी आणि मराठीत यावर मोठ्या प्रमाणात लिहले गेले आहे, जे मुख्यतः माहितीपर आहे. इंग्रजीमध्ये हा विषय साहित्याचा कलाने सुद्धा लिहिला गेला आहे.मात्र आपल्या मराठीचा विचार करता साहित्याचा अंगाने तूरळकच लिहले गेलेले आहे. मराठीत जे काही तूरळकच साहित्याचा अंगाने लिहले आहे,त्यातील एक प्रमुख पुस्तक म्हणजे, डॉ.जयंत नारळीकर यांनी लिहलेली प्रेषित ही मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित कांदबरी. जी मी नुकतीच वाचली.
     सूमारे सव्वाशे पानांची ही लघू कांदबरी विविध प्रकरणांमध्ये विभागली गेली आहे. या कादंबरीत एका प्रगत जीवसृष्टीतील एक मुलगा एका अपघातामुळे एकटाच आपल्या पृथ्वीवर येतो ,त्यांचे संगोपन भारतात केले जाते‌.ही प्रगत जीवसृष्टी त्यांचा तारा मृत्यूपंथाला लागला असल्याने इतर ठिकाणी जगण्याचा आधार शोधत असते. अपघातामुळे पृथ्वीवरआलेला हा मुलगा त्याचा मुळ ग्रहातील लोकांशी संवाद साधू शकतो का? त्याला संवाद  साधण्यासाठी पृथ्वीवरील  लोकांची मदत होते का? पृथ्वीवरील लोकांना तो आपला नाही,तर परग्रहवासी आहे? हे समजते का? जर समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असते? या सारख्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
     पुस्तकाचे लेखन करताना डॉ.जयंत नारळीकरांनी भाषा अत्यंत प्रवाही केली आहे.त्यामुळे विविध वैज्ञानिक संकल्पना सहजतेने समजतात. विज्ञानातील क्लिष्टपणा त्यांनी मोठ्या खुबीने टाळलायं. डॉ.जयंत नारळीकरांचे हे दूसरे पुस्तक मात्र हा नवखापणा त्यांचा लेखनात दिसत नाही. . जर समजा परग्रहवासी सापडले तर ते आपल्या पृथ्वीवरील व्यक्तींशी कसे वागतील? हे सांगता येणे अवघड आहे. ते प्रगत असतील तर आपल्याला प्रगत होण्यासाठी मदत करतील की, आपल्या पृथ्वीवर ज्याप्रमाणे प्रगत युरोपीय राष्ट्रांनी रेड अमेरीकन लोकांना त्रास देवून जवळपास नष्ट केले तसे आपणास नष्ट करतील  याबाबत काहीच सांगता येत नाही.त्या पार्श्वभूमीवर पुस्तकाचे
नाव विशेष महत्त्वाचे ठरते‌ तसे बघायला गेले तर, "प्रेषित" यांचा अर्थ खरेतर देवाचांदूत या अर्थाने घेतला जातो. प्रेषित हा लोकांचे कल्याण करतो.तेच नाव त्यांनी आपल्या पुस्तकाला दिले आहे. त्यामुळे कांदबरीत वर्णन केलेला परग्रहवासी खरोखरच प्रेषित होतो का,? हे समजण्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे.

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400





अतिशय रंजक भाषेत विश्वाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक A brief history of Time


       आपल्या रामायण आणि महाभारत अस्या पौराणिक मालिकांमध्ये अनेकदा "मे समय हुं!" असे म्हटले गेल्याचे आपण बघितले असेलच. तर समय किंवा ज्याला आपल्या मराठीत वेळ म्हणतात, ही संकल्पना आपल्याला मुळातून समजावून घेयची असेल तर, आपण वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे, जेष्ठ खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी मुळातील इंग्रजी भाषेत लिहिलेले, मात्र ज्याच्या मराठी भाषेत देखील अनुवाद झाला आहे, असे  "A brief history of Time". या पुस्तकाचा मराठीत  अनुवाद झाला असला तरी मुळातील पुस्तक वाचण्याचा आनंद काही औरच. तो आनंद मिळवण्यासाठी मी नुकतेच मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचले.

 अत्यंत सोप्या इंग्रजी  भाषेत हे पुस्तक लिहिले आहे.तसेच या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे.तीची मांडणी देखील रंजकतेने करण्यात आली आहे. त्यामुळे ज्याला खगोलभौतिकी या विषयाचे फारसे ज्ञान नाही,असी व्यक्ती देखील हे पुस्तक वाचून खगोलभौतिकी या विषयात बऱ्यापैकी पारंगत होवू शकते.शिवाय आधीच सांगितलेल्या प्रमाणे यांची भाषा देखील सोपी आहे.त्यामुळे ज्यांना

खगोलभौतिकी शास्त्रचा अभ्यास करायचा आहे , मात्र सध्या त्यांची या विषयाची पाटी पुर्णतः कोरी आहे, अस्याव्यक्तींनी खगोलभौतिकी या विषयाचा अभ्यासाचा श्रीगणेशा या पुस्तकाद्वारे करणे सर्वोत्तम राहिल. मुलभूत ते मध्यम प्रगत स्वरूपाचे ज्ञान ते यातून मिळवू शकतील.

    खगोलभौतिकी शास्त्रचा  विचार करता वेळ म्हणजे काय ?वेळ कधी अस्तित्वात आला ?तो अस्तित्वात येण्याचा आधी काय होते? आपण ज्या विश्वात राहतोय,ते विश्व कधी अस्तित्वात आले? या विश्वाचा विस्तार किती मोठा आहे? विश्वाच्या विस्ताराचा बाहेर काय आहे? मुळात हे विश्व कसे अस्तिवात आले? विश्वाच्या अस्तित्वाचा आधी काय होते?विश्वाचा कधी मृत्यू होवू शकतो का? असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाच्या वाचन केल्यास सहजतेने मिळतात.

    मुलीची शालेय फी भरण्यासाठी पैसे नसल्याने ते मिळावेत, या हेतूने लिहलेले हे पुस्तक आपणास खगोलभौतिकी या विषयाची मोठ्या प्रमाणात माहिती देते. पुस्तकाचे लेखक स्टिफन हॉकिंग हे  त्यांनी  विश्व जन्म या संकल्पनेवर केलेल्या संशोधनासह ज्या शारिरीक विकलांगतेवर मात करत त्यांनी खगोलशास्त्रात संशोधन केले, त्यामुळे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या पुस्तकात कोठेही मोठेपणाचा हेका पुढे केल्याचे दिसत


नाही.भौतिकशास्त्र जाणण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्याला तस्याच उत्सुक शिक्षकाने दिलेले ज्ञान म्हणजे सदर पुस्तक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे पुस्तक ज्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे असी व्यक्ती देखील समजू शकते असे आहे,तर मग वाचणार ना हे पुस्तक?

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.

      

सध्या आपल्या भारतात सर्वत्र नारी शक्ती विधेयकाबाबात चर्चा सुरु आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी  एका स्तंभात अर्थात विधीमंडळात त्यामुळे महिला वर्गाचा सहभाग त्यामुळे नक्कीच वाढेल. आज असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये महिलावर्ग पुरुषांना खांद्याला खांदा लावून सक्षमतेने काम करत नसेल. अगदी एखाद्या माणसाचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार विधीचा देखील अपवाद याला नाहीये‌. उत्तर प्रदेश सारख्या अजूनही जाती भेद उच्च निच्चता मोठ्या प्रमाणात पाळले जाणाऱ्या राज्यातील इलाहाबाद या शहरात देखील आपणास हे कार्य करणारी एक महिला कार्यरत आहे. हे मला समजले ते मी पुर्वी  वाचलेले असुन देखील सध्या पुन्हा एकदा  वाचत असलेल्या एका पुस्तकामुळे . "गार्गी जिवंत आहे", हे त्यांचे नाव. .राजहंस प्रकाशनातर्फेप्रकाशित या पुस्तकामुळे मला ही माहिती समजली.
    हे पुस्तक प्रसिद्ध होवून बराच काळ लोटला आहे, त्या अर्थी हे पुस्तक जून्या या वर्गवारीत मोडते.माझे देखील हे पुस्तक पहिल्यांदा वाचले त्यास कैक वर्षे लोटले, मात्र स्वतः कडे असून देखील या बाबत लिहले नव्हते, जे आता लिहित आहे. देर से आये मगर दूरूस आये, हे हिंदी भाषेतील तत्व आचरण्यात आले, असे समजूया.
     तसे बघायला गेले तर जेमतेम सव्वाशे पानांचे हे पुस्तक ,आपल्या अनेक समजुतींना मोडीत काढते. पुस्तकाच्या विषय मांडणीत लेखिकेने फारसी पाने खर्ची पाडलेली नाही. विषयाच्या प्रास्ताविकात फारसे न लिहता लेखिका थेट
विषयाला स्पर्श करते, लेखिकेने विषयाचे प्रास्तविक फारसे मोठे केले नसले तरी, विषय  सहजतेने समजेल अस्या पद्धतीने मांडणी केली आहे.जेमतेम सहा सात पानात आपणास विषय पुर्णतः समजतो.सहा ते सात पानानंतर लेखिका थेट आपल्यास गुलाबोचे चरीत्र सांगायला सुरुवात करते. गुलाबो ही सुमारे 85 वर्षीय महिला या पुस्तकाची नायिका संपूर्ण पुस्तक तिच्या भोवतालीच फिरते.जी गेल्या पंचाहत्तर इलाहाबादच्या मनकर्णिका घाटावर प्रेतांना दाहसंस्कार करण्याचे काम करत आहे. वयाच्या सातव्या वर्षी लग्न झालेल्या गुलाबोला वयाच्या दहाव्या वर्षी अपत्यप्राप्ती होते आणि वयाच्या अकराव्या वर्षी तिच्या पतीचे निधन होते. पतिनिधनानंतर ती  वडीलांच्या  प्रेतांवर दाह संस्कार करण्याचा व्यवसायात येते,तीची कहाणी म्हणजे सदर पुस्तक होय.एका अर्थाने हे गुलाबोचे चरीत्रच.
 आपल्या महाराष्ट्रात स्मशानजोगी नावाचा एक समाजघटक गावापासून  दुर असणाऱ्या स्मशानात राहतो. आणि स्मशानात क्रियाक्रम करायला येणाऱ्या लोकांच्या मदतीने आपला चरितार्थ चालवतो,या समाजाची लग्ने देखील स्मशनात होतात.गावातील लोकांच्या अंतिम प्रवास सुकर करणे हे या समाजघटकाचे काम.हे काम बहुतांशी वेळा पुरुषवर्गच करतो.महिला अन्य ठिकाणी मोलमजूरी करते. आपल्या महाराष्ट्राला समाजसुधारणेची मोठी परंपरा असल्याने,आता हा समाज मुख्यधारेत सहभागी होत आहे. मात्र आता आतापर्यंत समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे? हे त्यास उघडपणे
विचारले जाणाऱ्या, उत्तर प्रदेशात असे कार्य करणारी महिला म्हणजे गुलाबो .आणि त्यामुळेच महत्त्वाची ठरते,तिचे हे चरीत्र. 
 आपण अनेकदा महिला सबलीकरणाचा गोष्टी बोलतो.त्याबाबतच भाष्य करणारे हे पुस्तक आपण त्यामुळे वाचायला हवे आपण

अजिंक्य तरटे 
9552599495
9423515400

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...