गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

अति तिथे माती किती खरे समजण्यासाठी वाचावे असे पुस्तक The evil eye of Chess


   
                           आपल्याकडे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे ,"अति सर्वत्र वर्जयते" ,अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.रोजच्या जीवनात आपण याचा अनुभव सुद्धा घेत असतो. आपल्या रोजच्या जगण्यात सर्वच क्षेत्राला हे तत्व लागू  होते. अगदी बुद्धिबळ सारख्या खेळात सुद्धा हे तत्व लागू होते.चमकलात ना ? हो बुद्धीबळ सारख्या खेळात देखील अति तिथे माती हे तत्व लागू होते. ते कसे लागू होते,हे समजण्यासाठी आपण आशिया खंडातील पहिले बुद्धीबळविषयक ऍप आणि संकेतस्थळ तयार करणाऱ्या श्री . विनायक वाडीले यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक " The evil eye of Chess" जे मी नुकतेच वाचले.

                               या पुस्तकात आठ अस्या जगविख्यात बुद्धीबळपटुंची ओळख करून देण्यात आली आहे की, ज्यात बुद्धीबळाविषयक मोठी गुणवत्ता अगदी ठासून भरली होती. मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे तत्व त्यांनी आचरणात आणल्यामुळे त्यांचा अंत फारच हृदयदायक झाला,एकाला आयुष्याचा शेवटची काही वर्षे मनोरुग्णालयात काढावी लागली,तर एका बुद्वीबळपटूला आयुष्याचा अखेरच्या टप्प्यात रस्त्यावर

भीक मागावी लागली. गोष्ट चांगली असो किंवा वाईट तिच्या आहारी जाणे नेहमीच मनुष्याचा घात करणारे असते, हा संदेश हे पुस्तक आपणास देते‌.

                  सुमारे ५५पानाच्या या पुस्तकात आपणास ज्या ८बुद्वीबळपटुंविषयी लेखक आपणास माहिती देतो,त्यामध्ये बॉबी फिशर, मिखाईल ताल, पॉल मोर्फी, विल्हेम स्टाइनिट्ज़, ,अकीबा रूबीनस्टेन,अलेक्जेंडर अलेखीन,कार्लोस टोरे रेपेटो   सारखे जगविख्यात बुद्धीबळ खेळाडू आहेत. ज्यांना जून्या बुद्धीबळपटुंची माहिती आहे,त्यांना या सर्व बुद्धीबळपटुंची खेळ किती उत्कृष्ट पद्धतीचा होता हे सर्व माहिती असेलच,ज्यांना या खेळाडुंना खेळ माहिती नाही,ते इंटरनेटवर याविषयी सहजतेने माहिती घेवू शकतात.सर्वोत्तम अस्या वर्गवारीत मोडणाऱ्या या सर्व खेळाडुंचा अंत फारच दूर्दैवी झाला याला कारणीभूत ठरले ते एक निमित्य, ते म्हणजे खेळात किती झोकुन देयचे? वैयक्तिक आयुष्यात खेळ कुठे थांबवायचा, आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य व्यतीत करायचे या बाबत त्यांची झालेली गल्लत. या चूकीची शिक्षा त्यांनी स्वतः.च्या आयुष्याचे मातेरे करत भोगली. आपण रोजच्या

जगण्यात खेळात नाही पण इतर क्षेत्रात असी चूक टाळण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या वाक्प्रचारानुसार मोठी गुणवत्ता असून देखील ती वाया गेलेल्या या बुद्धीबळपटुंच्या चरित्रातून अति तिथे माती या म्हणीचा अनुभव घेण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे, मग वाचणार ना हे पुस्तक?

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...