बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

वस्तुस्थिती माहित होण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, "शोध नेहरु गांधी पर्वाचा,"

       नेहरु गांधी घराणे, भारताच्या राजकारणाचा पटलावर सातत्याने चर्चेत असणारे एक राजकीय घराणे .पुर्वी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले हे घराणे सध्या त्यांनी त्याचा कार्यकाळात केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींमुळे चर्चेत
असते. ‌व्हाटसप युनिव्हर्सिटीच्या सध्याचा काळात त्यांच्याविषयी अनेक बाबी पुर्वी दडवून ठेवलेला इतिहास या नावाखाली चवीने चघळत पुढे पाठवल्या जातात. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील, तसेच भारताच्या  स्वातंत्र्य लढ्यातील एक मोठा टप्पा त्यांनी व्यापलेला असल्याने त्यातील सत्यता बघणे आवश्यक ठरते. त्यासाठी  त्यांचे वस्तूनिष्ठ चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. ही गरज पुर्ण करते ज्येष्ठ पत्रकार 'सुरेश भटेवरा' यांनी लिहिलेले "शोध गांधी नेहरु पर्वाचा",  हे पुस्तक. विविध वर्तमानपत्रात संपादकीय विभागात वरिष्ठ पदावर काम केलेल्या, आणि दिल्लीतील राजकारण त्यातही काँग्रेसचे राजकारण जवळून बघितलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या लेखनीतून उतरलेले हे पुस्तक  गांधी नेहरु घराण्याविषयी आपल्या अनेक धारणा कस्या चूकीच्या आहेत, हे सोदाहरण स्पष्ट करते.नाशिकमधील नामवंत सांस्कृतिक संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्या मदतीने नुकतेच हे पुस्तक वाचले.
                        साडेसातशे पानांच्या या पुस्तकात नेहरु गांधी घराण्याचा मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी,  राजीव आणि सोनिया गांधी राहुल, प्रियंका आणि वरुण गांधी या पाच पिढ्यांची माहिती 47प्रकरणातून देण्यात आलेली आहे. या माहितीमध्ये त्यांचा वैयक्तिक तसेच राजकीय जिवनाविषयी सांगण्यात आले आहे. सध्या व्हाटसप युनिव्हर्सिटीत ज्या प्रकारचा इतिहास सांगितला जातो ,त्यांचा लवलेशही या पुस्तकात करण्यात आलेला नाही.तो खरा किंवा खोटा आहे,याबाबत पुस्तकात काहीही भाष्य करण्याचे लेखकाने टाळलेले आहे. नेहरु गांधी घराण्याचा जो  इतिहास मी मांडला आहे त्यावरुन तूम्ही योग्य तो बोध घ्यावा असी लेखकाची भुमिका आहे.जी लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीलाच 'मी पुस्तक का लिहले या शीर्षकाखाली स्पष्ट केली आहे.या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितलेल्या बाबींवरच पुस्तक आधारल्याचे आपणास पुस्तक वाचतानाच पदोपदी जाणवते.
        ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर यांची प्रास्ताविक असलेल्या या पुस्तकात प्रास्तावनेत हे पुस्तक का महत्तवाचे आहे,हे सांगण्यात येवून नेहरु गांधी परिवाराच्या राजकारणाचे चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक समजण्यासाठी खुप मदत होते.पुस्तकात गांधी आणि नेहरु गांधी घराण्यांतील लोकांच्या सार्वजनिक जिवनाविषयी, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाविषयी मोठ्या प्रमाणात भाष्य करण्यात आले आहे.
           भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा प्रगतीचा आढावा घेयचा असल्यास नेहरु गांधी घराण्याचा, इतिहास समजावून घेणे?  त्यांची प्रगतीविषयक  मते तसेच  त्यांची विकसीत भारताची संकल्पना समजावून घेणे,का महत्त्वाची आहे?, त्यांना टाळून भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल समजावून घेणे कसे अवघड आहे,याबाबतची माहिती आपणास या पुस्तकातून मिळते‌ पंतप्रधान लाल बहादूर  शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी काँग्रेसच्या अंतर्गतराजकरणातील बळी म्हणून कस्या पंतप्रधानपदावर निवडल्या गेल्या.1991नंतर 1998पर्यत राजकारणात अलिप्त राहणाऱ्या सोनिया गांधींना कोणत्या कारणासाठी राजकरणात उतरावे लागले. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणात असलेली सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील छूपे युद्ध, नेहरु गांधी परीवाराचा घटक असून देखील वरुण गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना तिलांजली देत भाजपाशी संधान बांधण्याची वस्तूस्थिती,राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे प्रेमप्रकरण, राहुल गांधी यांनी 2003,घ्या सुमारास मुंबईत खासगी क्षेत्रात केलेली नोकरी, काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी राहुल गांधी यांनी त्यांचा सुरवातीच्या राजकीय जीवनात केलेले विविध प्रयोग, संजय गांधी,आणि राजीव  गांधी यांच्या व्यक्तीमत्तातील फरक, संजय गांधींच्या विविध कार्याविषयीची इंदिरा गांधींची मते,
काँग्रेसच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेली कामराज योजना, काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या 11महिन्याचा कार्यकाळात 1958,साली इंदिरा गांधी यांनी केलेले बदल, तसेच काँग्रेस पक्षावर सातत्याने ज्या घटनेचा संदर्भ देत आरोप करण्यात येतो त्या, केरळमधील साम्यवादी पक्षाचे सरकार बरखास्त करण्यामागची वस्तूस्थिती अस्या अनेक बाबींबाबत हे पुस्तक आपणास माहिती देते                 
  सुमारे 55 इंग्रजी आणि हिंदी पुस्तकाचा तसेच काही   संकेतस्थळाचा संदर्भ घेवून लिहिण्यात आलेल्या या पुस्तकात मोठ्या प्रमाणात समतोल साधत नेहरु गांधी घराण्याचा झुकते माप न देण्याचा प्रयत्न  केल्याचे दिसूनयेते.आणिबाणी, तसेच ऑपरेशन ब्लू स्टार हा कारणीभूत ठरलेल्या काँग्रस आणि अकाली दल यांच्यातील राजकारण, बोफोर्स घोटाळा, शहाबानो प्रकरण अस्घया  काहीस्या वादग्रस्त  घटनांचे मोठ्या प्रमाणात समतोल पद्धतीने लेखन केल्याचे आपणास पुस्तक वाचनात दिसून येते.
     तूम्ही कोणत्याही विचारसरणीचे असला तरी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर वाटचालीत मोठे योगदान असलेल्या नेहरु गांधी घराण्याची वस्तूस्थिती आपणास माहिती असणे भारताचा जागरूक नागरिक म्हणून आपणास माहिती असणे आवश्यक आहे.म्हणून तूम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे.

अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५ 
९४२३५१५४०० 

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल

     
   सध्या आपल्या भारतात अनेक थोर पुरुषांचे भारताच्या प्रगतीतील वाटचालीतील योगदान काय ?याबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असणारे नेते देखील दुर्दैवाने सुटलेले नाहीत.या अश्या नेत्यांबाबत विद्यमान नेते आपल्या स्वार्थासाठी काहीही दावे करत असल्याने मुळातून  वस्तूस्थिती समजण्यासाठी  त्यांचे आत्मचरित्र,चरित्र स्वतः वाचून परिस्थिती समजावून घेणे अत्यावश्यक ठरते‌
       आपल्या दुर्देवाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि सुरवातीच्या उभारणीत मोठे योगदान असलेले सरदार वल्लभभाई पटेल देखील या चक्रातून सुटलेले नाहीत. सरदार पटेल यांच्या बाबत तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा आणि महात्मा गांधींच्या मनात काय मते होती? सरदार पटेल स्वतंत्र  भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर काश्मीर आणि अन्य समस्या कोणत्या स्थितीत असत्या ?याबाबत सातत्याने सांगण्यात येते. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या बाबत विद्यमान राजकीय नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विविध दावे प्रतिदावे यांच्यात त्यांचा स्वार्थ लपला असल्याने ते वस्तूस्थिती दर्शक नाही, असे सहजतेने समजते.सरदार वल्लभभाई पटेल हे देशातील महत्त्वाचे नेते असल्याने त्यांच्याबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे ‌.याबाबत लेखाचा सुरवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचे चरित्र वाचणे अत्यावश्यक आहे. नेमकी हीच बाब हेरून मी त्यांचे चरित्र नुकतेच वाचले. 
    पुण्याचा विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि पंकज पाटील तसेच संदिप तापकीर लिखित या चरित्रात वेगवेगळ्या 30प्रकरणाद्वारे आणि 8परिशिष्टाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे चरित्र उलगडण्यात आले आहे.ज्यामध्ये त्यांचे राजकीय जीवनातील प्रवेशा अगोदरचे सार्वजनिक जीवन ,त्यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवेश ,त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची विविध विषयांवरची मते भुमिका, विविध मान्यवरांची सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी मते, त्यांचा व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे, वर्तमानात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत  त्यांनी केलेले सुतोवाच , त्यांची दुर्मिळ  छायाचित्रे, त्यांचा जीवनपट संक्षिप्त स्वरुपात आदींबाबत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
        पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली संदर्भसुची लेखकाने पुस्तक निर्मितीसाठी किती कष्ट घेतले हे स्पष्टकरते‌.या संदर्भ सुचित सुमारे 80 ते 90संदर्भ ग्रथांची नावे देण्यात आलेली आहे  लेखकाने पुस्तकांखेरीज काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून लोकांच्या मुलाखती घेवून पुस्तक तयार केले आहे.ज्याची यादी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे सुमारे 376 पानांच्या या पुस्तकात सर्वच पाने माहितीने भरलेली आहे.पुस्तकाची भाषा देखील ओघवती आणि सहजसुलभ आहे.त्यामुळे चरित्र वाचताना कंटाळवाणे होत नाही, आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट ,त्यांनी उपसले कष्ट सहजतेने समजतात.
   सुमारे 376पानाच्या या पुस्तकात सुरवातीची मोजकी पाने वगळता अन्य सर्व पुस्तकात त्यांचे राजकीय जीवन सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आले आहे. 30 प्रकरणापैकी सुरवातीची सात प्रकरणे त्यांचा राजकीय प्रवेशाच्या आधीच्या सार्वजनिक जिवनाविषयी ,त्यांचा शालेय जीवनाविषयी तसेच त्यांचा वैयक्तिक आयुष्याविषयी आपणास माहिती देतात. पानांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास ,376पानांच्या या पुस्तकात सुरवातीची 40,ते 45 पाने लेखकाने यासाठी खर्ची घातली आहेत. त्यानंतरची सर्व पाने लेखकाने त्यांच्या राजकीय जीवनाविषयी सांगितले आहे. त्यांचे घटना समितीतील कार्य ,देशाच्या घटना समितीविषयीची त्यांची मते, 1942पासुन देशातील बदललेल्या राजकीय सत्ता समिकरणाविषयीची त्यांची भुमिका, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील संबंध, दूसऱ्या
महायुद्धातील काँग्रेसची भुमिका, मुस्लिम लीगची कटकारस्थाने, देशाची फाळणी, संस्थानिकांचे विलीनीकरण ,देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून कार्य करताना भेडसावणाऱ्या समस्या ,यातना भारतीय प्रशासन सेवेची निर्मिती ,दिल्ली दंगल आणि महात्मा गांधी यांची हत्या यावर लेखकाने सविस्तर भाष्य केले आहे.जवळपास निम्मे पुस्तक या घटनांबाबत आपणास माहिती देते‌
लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सध्याचा राजकारणाचा दलदलीत मुळ स्थिती समजण्यासाठी  सरदार पटेल यांचे हे चरित्र वाचायलाच हवे.मग वाचणार ना पुस्तक.

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

प्रत्येक खेळाडूने वाचायलाच हवे असे पुस्तक, "विजयाचे मानसशास्त्र*

 
 सध्या आपल्याकडे खेळाला करीयर म्हणून स्वीकारणारे अनेक जण दिसतात. या खेळाडूंना त्यांच्या करीयरमध्ये यशस्वी  होण्यामागे मानसशास्त्र हे खूप महत्तवाची भुमिका बजावते. मानसशास्त्रातील अनेक बाबी खेळताना वापरल्याने त्यांचा खेळाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावतो ,ज्याचे परिणामस्वरूप म्हणून या बाबींचा अभ्यास असणारे हे खेळाडू अनेक स्पर्धा सहज खिश्यात घालतात. खेळणे हेच त्यांचे करीयर असल्याने अंतिमतः या यशाचा फायदा त्यांचे खेळातील करीयर यशस्वी होण्यात होतो. मात्र अनेकदा खेळाडूंना सोडा, त्यांचा प्रशिक्षकांना देखील या बाबी माहिती नसतात, किंवा माहिती  असल्यास देखील या बाबी फक्त  वरिष्ठ स्तरावरील खेळाडुंनाच उपयोगी  पडतात. प्राथमिक स्तरावरील खेळाडूंना  या बाबी अनावश्यक  आहे  असा त्यांचा गैरसमज असतो परीणामी खेळाडू त्यांचा सर्वोत्तम  खेळ करु शकत नाहीत. खेळाडूंचे असे नुकसान होवू नये ,म्हणून महाविद्यालयीन स्तरावर आणि नोकरीच्या सुरवातीच्या काळात उत्कृष्ट  पद्धतीने  नेमबाज हा क्रीडा प्रकार खेळणारे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ कै. भिष्मराज बाम सरांनी लिहलेले "विजयाचे मानसशास्त्र" हे पुस्तक प्रत्येक खेळाडूने स्वतः हुन वाचायलाच हवे.मी स्वतः हे पुस्तक नुकतेच वाचले.
तीन भागात विभागलेल्या या पुस्तकात 25 प्रकरणातून कोणत्याही खेळाडुला खेळात यशस्वी होण्यासाठी कोणत्या मानसशास्त्रीय बाबी आवश्यक आहेत? त्या खेळाडूने कोणत्या प्रकारे विकसित कराव्यात? तसेच मुळात खेळाडूला यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी मानसशास्त्रीय बाबींची गरज असते का? सर्व खेळासाठी सारख्याच बाबींची सारख्याच प्रमाणात गरज असते की या बाबी खेळानूसार बदलतात? जर बदलत असतील तर सर्वच बाबी बदलतात की खेळ कोणताही असो काही बाबी समान असतात का ?, योगशास्त्रातील काही आसने प्राणायामचा आणि खेळाडूला खेळताना उपयोगी पडणाऱ्या बाबींचा काही सहसंबंध असतो का?  असल्यास त्याचा खेळाचा
यशस्वितेवर कसा परिणाम होवू शकतो? आपली मनस्थिती उत्तम राहण्यासाठी खेळाडूने काय करायला हवे ?काय टाळायला हवे ? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाचे वाचन केल्यामुळे मिळतात.
मुळात इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचे मी वाचले तो मराठी अनुवाद होता. अनुवादीत पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे मुळ इंग्रजी पुस्तकाचे ,शद्बश: भाषांतर न करता मुळ पुस्तकातील आशय मराठीत आणला गेला आहे. त्यामुळे पुस्तक  खुप रंजक झाले आहे. पुस्तक कुठेही कृत्रिम मराठीत लिहिले असे वाटत नाही. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेची काहीही वेगळी असली तरी अनुवादीत पुस्तकात मराठीचा ओघवतापता जपल्याचे पुस्तक वाचताना आपणास सातत्याने दिसते.प्रत्येक प्रकरणानंतर त्या प्रकरणात सांगितलेल्या बाबींची उजळणी संक्षिप्त स्वरुपात चौकटीच्या मध्ये केल्याने संबंधीत प्रकरणात काय सांगितले आहे,हे चटकन समजते. उजळणी ही चौकटीत केली असल्याने पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे. 
या सुमारे 227 पानांच्या पुस्तकात पहिल्या  भागात असणाऱ्या पहिल्या 16प्रकरणात सुमारे 90 पानात आपणास विविध मानसशास्त्रीय संकल्पना लेखकाने समजावून सांगितल्या आहेत. तर दुसऱ्या भागात असणाऱ्या पुढील तीन प्रकरणात या बाबींचे  प्रत्यक्ष आचरण कसे करावे ?ते करताना काय करावे ,काय करू नये? हे तपशीलवार
सांगितले आहेच.सुमारे 60 पाने लेखकाने या साठी खर्ची पाडली आहेत.तर शेवटच्या तिसऱ्या भागात असणाऱ्या सुमारे 80ते 85पानात  प्रत्येक खेळानूरूप ही तत्वे कशी आचरणात आणावीत याबाबत लेखकाने आपणास माहिती दिली आहे.पुस्तकाच्या मलपृष्ठावर सांगितलेल्या प्रमाणे हे पुस्तक जरी खेळाडूंना समोर ठेवून लिहले गेले असले तरी यात सांगितलेला अनेक बाबी खेळाडू नसलेल्या सर्वसामान्यांना व्यक्तींनाही रोजच्या आयुष्यात जगतान उपयोगी पडणारे आहे,तरी माझे आपणास सांगणे आहे की आपण खेळाडू असा अथवा नसा सर्वसामान्य नागरीक असले तरी किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे.

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

नक्षलवाद्यांची सविस्तर माहिती देणारे पुस्तक :नक्षलनामा

         

    सध्या आपल्या देशातील नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेल्या असला तरी, एकेकाळी या नक्षलवाद्याने देशातील सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली होती. नक्षलवाद्यांकडून पोलीस प्रशासन, मुलकी प्रशासन (जिल्हाधिकारी, तहसीलदार  उपजिल्हाधिकारी या यंत्रणेस मुलकी प्रशासन म्हणतात)आणि स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हत्या करणे , ही रोजचीच बाब झाली होती. वृत्तपत्रांचे मथळे सातत्याने या नक्षलवादाने केलेल्या क्रूर क्रमाने भरलेले आढळत. देशासमोरच्या अंतर्गत प्रश्नाचा विचार करता, सर्वात महत्त्वाचा अंतर्गत प्रश्न म्हणून नक्षलवादाचा उल्लेख सातत्याने केला जात असे. देशाचा सुजाण नागरीक म्हणून आता काहीस्या थंडावलेल्या या प्रश्नांची आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या पुर्वेकडील भागाला असणाऱ्या प्रदेशात असणाऱ्या या समस्येबाबत मराठीत तशी मोजकीच पुस्तके लिहली गेली आहेत. त्यातही जी पुस्तके लिहली गेली आहेत त्यापैकी बहुसंख्य अन्य स्त्रोताचा संदर्भ घेवून लिहिलेली आहेत. लेखकाने प्रत्यक्ष त्या प्रदेशात फिरून नक्षलवादी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून मिळालेल्या माहितीनुसार लिहिलेली पुस्तके अजूनच तुरळक.. अन्य स्त्रोतावर विसंबून पुस्तके लिहल्यामुळे अनेकदा त्यात काही विसंगती दिसतात.त्यामुळे मुळातून संशोधन करुन प्रदेश भेटीतून मिळालेल्या पुस्तकांची मजा काही औरच .आणि आपणास ही मजा लूटता येते ज्येष्ठ पत्रकार के. प्रकाश कोळवणकर यांनी लिहिलेल्या नक्षलनामा या पुस्तकामुळे.
          पुस्तकाचे लेखक प्रकाश कोळवणकर हे विद्यार्थी दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते.ते दैनिक सकाळमध्ये 10 वर्ष उपसंपादक होते या काळात त्यांनी विविध राज्यांतील निवडकीचे वार्तांकन केले.सकाळमध्ये त्यांनी लिहिलेल्या अनेक वृत्तमालिका गाजल्या . दैनिक सकाळपूर्वी त्यांनी दैनिक तरुण भारत आणि साप्ताहिक विवेकमध्येही त्यांनी काम केले होते.तसेच त्यांचे लेखन साप्ताहिक सोबत,लोकप्रभा आणिमहाराष्ट्र टाइस्म,नवशक्ती लोकसत्ता आदि दैनिकांत त्यांनी लेखन केले आहे.या सर्व अनुभवांचे ज्ञानांचे प्रतिबिंब सदर पुस्तकात उमटलेले दिसते.
     या सुमारे 159पानांच्या या पुस्तकात नक्षलवाद आणि आदिवासी जीवन ,सरकारचे अपयश आणि नक्षलवादाचा प्रभाव, नक्षलवाद रोखण्यासाठी करावयाचा उपाययोजनेतील विविध विसंगती, नक्षलवाद्यांचे अंतिम उद्दिष्ट आणि त्यात आदिवासींचे स्थान, विविध नक्षलवादी संघटनांची माहिती, कम्युनिस्ट पक्षाची असणारे नक्षलवाद्यांचे संबंध, मराठी साहित्यात नक्षलवादाविषयीचा उल्लेख  पश्चिम बंगाल आणि तेलंगणा सारख्या राज्यातील साहित्यिकांची नक्षलवादाबाबतची भुमिका,नक्षलवादाचा सुरवात
कशी झाली.?नक्षलवाद्यांची सुरवात ज्या ठिकाणी  झाली तेथील वर्तमान स्थिती यांसारख्या अनेक मुद्यांबाबत आपणास माहिती देते. ते देखील अत्यंत ओघवत्या शैलीत . त्यामुळे नक्षलवादासारख्या कठीण कंटाळवाणा विषयावरील पुस्तक असून देखील विषय आपणास चटकन समजतो. पुस्तक कंटाळवाणे होते नाही.पुस्तकात वापरलेला फाँट देखील डोळ्यांना सुखावणारा आहे 
आता जरी नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात असला तरी जो समाज आपला भुतकाळ विसरतो त्या समाजाचा भविष्यकाळ धूसरं होतो असे वचन आहे.त्या वचनानूसार आपला भुतकाळ सांगणारे पुस्तक आपण वाचायलाच हवे.

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...