तीन भागात विभागलेल्या या पुस्तकात 25 प्रकरणातून कोणत्याही खेळाडुला खेळात यशस्वी होण्यासाठी कोणत्या मानसशास्त्रीय बाबी आवश्यक आहेत? त्या खेळाडूने कोणत्या प्रकारे विकसित कराव्यात? तसेच मुळात खेळाडूला यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी मानसशास्त्रीय बाबींची गरज असते का? सर्व खेळासाठी सारख्याच बाबींची सारख्याच प्रमाणात गरज असते की या बाबी खेळानूसार बदलतात? जर बदलत असतील तर सर्वच बाबी बदलतात की खेळ कोणताही असो काही बाबी समान असतात का ?, योगशास्त्रातील काही आसने प्राणायामचा आणि खेळाडूला खेळताना उपयोगी पडणाऱ्या बाबींचा काही सहसंबंध असतो का? असल्यास त्याचा खेळाचायशस्वितेवर कसा परिणाम होवू शकतो? आपली मनस्थिती उत्तम राहण्यासाठी खेळाडूने काय करायला हवे ?काय टाळायला हवे ? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाचे वाचन केल्यामुळे मिळतात.
मुळात इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचे मी वाचले तो मराठी अनुवाद होता. अनुवादीत पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे मुळ इंग्रजी पुस्तकाचे ,शद्बश: भाषांतर न करता मुळ पुस्तकातील आशय मराठीत आणला गेला आहे. त्यामुळे पुस्तक खुप रंजक झाले आहे. पुस्तक कुठेही कृत्रिम मराठीत लिहिले असे वाटत नाही. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेची काहीही वेगळी असली तरी अनुवादीत पुस्तकात मराठीचा ओघवतापता जपल्याचे पुस्तक वाचताना आपणास सातत्याने दिसते.प्रत्येक प्रकरणानंतर त्या प्रकरणात सांगितलेल्या बाबींची उजळणी संक्षिप्त स्वरुपात चौकटीच्या मध्ये केल्याने संबंधीत प्रकरणात काय सांगितले आहे,हे चटकन समजते. उजळणी ही चौकटीत केली असल्याने पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे.
या सुमारे 227 पानांच्या पुस्तकात पहिल्या भागात असणाऱ्या पहिल्या 16प्रकरणात सुमारे 90 पानात आपणास विविध मानसशास्त्रीय संकल्पना लेखकाने समजावून सांगितल्या आहेत. तर दुसऱ्या भागात असणाऱ्या पुढील तीन प्रकरणात या बाबींचे प्रत्यक्ष आचरण कसे करावे ?ते करताना काय करावे ,काय करू नये? हे तपशीलवार सांगितले आहेच.सुमारे 60 पाने लेखकाने या साठी खर्ची पाडली आहेत.तर शेवटच्या तिसऱ्या भागात असणाऱ्या सुमारे 80ते 85पानात प्रत्येक खेळानूरूप ही तत्वे कशी आचरणात आणावीत याबाबत लेखकाने आपणास माहिती दिली आहे.पुस्तकाच्या मलपृष्ठावर सांगितलेल्या प्रमाणे हे पुस्तक जरी खेळाडूंना समोर ठेवून लिहले गेले असले तरी यात सांगितलेला अनेक बाबी खेळाडू नसलेल्या सर्वसामान्यांना व्यक्तींनाही रोजच्या आयुष्यात जगतान उपयोगी पडणारे आहे,तरी माझे आपणास सांगणे आहे की आपण खेळाडू असा अथवा नसा सर्वसामान्य नागरीक असले तरी किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा