बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

वस्तुस्थिती माहित होण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, "शोध नेहरु गांधी पर्वाचा,"

       नेहरु गांधी घराणे, भारताच्या राजकारणाचा पटलावर सातत्याने चर्चेत असणारे एक राजकीय घराणे .पुर्वी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले हे घराणे सध्या त्यांनी त्याचा कार्यकाळात केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींमुळे चर्चेत
असते. ‌व्हाटसप युनिव्हर्सिटीच्या सध्याचा काळात त्यांच्याविषयी अनेक बाबी पुर्वी दडवून ठेवलेला इतिहास या नावाखाली चवीने चघळत पुढे पाठवल्या जातात. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील, तसेच भारताच्या  स्वातंत्र्य लढ्यातील एक मोठा टप्पा त्यांनी व्यापलेला असल्याने त्यातील सत्यता बघणे आवश्यक ठरते. त्यासाठी  त्यांचे वस्तूनिष्ठ चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. ही गरज पुर्ण करते ज्येष्ठ पत्रकार 'सुरेश भटेवरा' यांनी लिहिलेले "शोध गांधी नेहरु पर्वाचा",  हे पुस्तक. विविध वर्तमानपत्रात संपादकीय विभागात वरिष्ठ पदावर काम केलेल्या, आणि दिल्लीतील राजकारण त्यातही काँग्रेसचे राजकारण जवळून बघितलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या लेखनीतून उतरलेले हे पुस्तक  गांधी नेहरु घराण्याविषयी आपल्या अनेक धारणा कस्या चूकीच्या आहेत, हे सोदाहरण स्पष्ट करते.नाशिकमधील नामवंत सांस्कृतिक संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्या मदतीने नुकतेच हे पुस्तक वाचले.
                        साडेसातशे पानांच्या या पुस्तकात नेहरु गांधी घराण्याचा मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी,  राजीव आणि सोनिया गांधी राहुल, प्रियंका आणि वरुण गांधी या पाच पिढ्यांची माहिती 47प्रकरणातून देण्यात आलेली आहे. या माहितीमध्ये त्यांचा वैयक्तिक तसेच राजकीय जिवनाविषयी सांगण्यात आले आहे. सध्या व्हाटसप युनिव्हर्सिटीत ज्या प्रकारचा इतिहास सांगितला जातो ,त्यांचा लवलेशही या पुस्तकात करण्यात आलेला नाही.तो खरा किंवा खोटा आहे,याबाबत पुस्तकात काहीही भाष्य करण्याचे लेखकाने टाळलेले आहे. नेहरु गांधी घराण्याचा जो  इतिहास मी मांडला आहे त्यावरुन तूम्ही योग्य तो बोध घ्यावा असी लेखकाची भुमिका आहे.जी लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीलाच 'मी पुस्तक का लिहले या शीर्षकाखाली स्पष्ट केली आहे.या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितलेल्या बाबींवरच पुस्तक आधारल्याचे आपणास पुस्तक वाचतानाच पदोपदी जाणवते.
        ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर यांची प्रास्ताविक असलेल्या या पुस्तकात प्रास्तावनेत हे पुस्तक का महत्तवाचे आहे,हे सांगण्यात येवून नेहरु गांधी परिवाराच्या राजकारणाचे चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक समजण्यासाठी खुप मदत होते.पुस्तकात गांधी आणि नेहरु गांधी घराण्यांतील लोकांच्या सार्वजनिक जिवनाविषयी, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाविषयी मोठ्या प्रमाणात भाष्य करण्यात आले आहे.
           भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा प्रगतीचा आढावा घेयचा असल्यास नेहरु गांधी घराण्याचा, इतिहास समजावून घेणे?  त्यांची प्रगतीविषयक  मते तसेच  त्यांची विकसीत भारताची संकल्पना समजावून घेणे,का महत्त्वाची आहे?, त्यांना टाळून भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल समजावून घेणे कसे अवघड आहे,याबाबतची माहिती आपणास या पुस्तकातून मिळते‌ पंतप्रधान लाल बहादूर  शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी काँग्रेसच्या अंतर्गतराजकरणातील बळी म्हणून कस्या पंतप्रधानपदावर निवडल्या गेल्या.1991नंतर 1998पर्यत राजकारणात अलिप्त राहणाऱ्या सोनिया गांधींना कोणत्या कारणासाठी राजकरणात उतरावे लागले. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणात असलेली सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील छूपे युद्ध, नेहरु गांधी परीवाराचा घटक असून देखील वरुण गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना तिलांजली देत भाजपाशी संधान बांधण्याची वस्तूस्थिती,राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे प्रेमप्रकरण, राहुल गांधी यांनी 2003,घ्या सुमारास मुंबईत खासगी क्षेत्रात केलेली नोकरी, काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी राहुल गांधी यांनी त्यांचा सुरवातीच्या राजकीय जीवनात केलेले विविध प्रयोग, संजय गांधी,आणि राजीव  गांधी यांच्या व्यक्तीमत्तातील फरक, संजय गांधींच्या विविध कार्याविषयीची इंदिरा गांधींची मते,
काँग्रेसच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेली कामराज योजना, काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या 11महिन्याचा कार्यकाळात 1958,साली इंदिरा गांधी यांनी केलेले बदल, तसेच काँग्रेस पक्षावर सातत्याने ज्या घटनेचा संदर्भ देत आरोप करण्यात येतो त्या, केरळमधील साम्यवादी पक्षाचे सरकार बरखास्त करण्यामागची वस्तूस्थिती अस्या अनेक बाबींबाबत हे पुस्तक आपणास माहिती देते                 
  सुमारे 55 इंग्रजी आणि हिंदी पुस्तकाचा तसेच काही   संकेतस्थळाचा संदर्भ घेवून लिहिण्यात आलेल्या या पुस्तकात मोठ्या प्रमाणात समतोल साधत नेहरु गांधी घराण्याचा झुकते माप न देण्याचा प्रयत्न  केल्याचे दिसूनयेते.आणिबाणी, तसेच ऑपरेशन ब्लू स्टार हा कारणीभूत ठरलेल्या काँग्रस आणि अकाली दल यांच्यातील राजकारण, बोफोर्स घोटाळा, शहाबानो प्रकरण अस्घया  काहीस्या वादग्रस्त  घटनांचे मोठ्या प्रमाणात समतोल पद्धतीने लेखन केल्याचे आपणास पुस्तक वाचनात दिसून येते.
     तूम्ही कोणत्याही विचारसरणीचे असला तरी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर वाटचालीत मोठे योगदान असलेल्या नेहरु गांधी घराण्याची वस्तूस्थिती आपणास माहिती असणे भारताचा जागरूक नागरिक म्हणून आपणास माहिती असणे आवश्यक आहे.म्हणून तूम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे.

अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५ 
९४२३५१५४०० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...