सोमवार, २२ जानेवारी, २०२४

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक इंडस्ट्री 4.0

       

  आताच काळात आपले सर्व जीवन  तंत्रज्ञानाशिवाय चालणे अशक्यच आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही उठल्यापासून झोपेपर्यंत आपले सर्व जीवन हे तंत्रज्ञानाने व्यापून राहिलेले आहे . ऑफिसमधील काम असो किंवा ऑफिस सुटल्यावर आपण घरी येण्यासाठी वापरत असलेली साधने असो हि सर्व तंत्रज्ञानाचीच किमया असो जास्त दूर कश्याला जायचे आता तुम्ही हा जो मजकूर वाचत आहात ती पण तंत्रज्ञानाचीच किमया . जगात कोणतीही  गोष्ट कायमस्वरूपी नसते असे म्हणतात मात्र या गोष्टीला एक अपवाद आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास हो तंत्रज्ञाचा विकास पूर्वीपण होत होता आताही होत आहे आणि भविष्यलत देखील होता असेल भले त्याची गती कमी जास्त असेल मात्र तंत्रज्ञाचा विकास याला मरण नाही त्या अर्थाने तो अमर आहे 
             आता अश्या तंत्रज्ञाचा वापर करताना या गोष्टी कश्या प्रकारे कार्यान्वित होतात ? हे कळलेच पाहिजे हि अट  नसली तरी आपण जी गोष्ट वापरत आहे त्या गोष्टीमागचा कार्यकारण भाव समजल्यास सोन्याहून पिवळे म्हणतात ते हेच असे सहजतेने म्हणता येते
          इंग्रजीत या बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती देणारी अनेक पुस्तके सध्या आहेत आणि दिवसोंदिवस त्यात भरच पडत आहे मात्र कोणतीही गोष्ट आपल्या मातृभाषेत समजल्यास अधिक सहजतेने समजते एखाद्या  गोष्टीची किमान तोंडओळख मातृभाषेत  झाल्यास त्या गोष्टीचे अधिकचे सखोल ज्ञान आपण दुसऱ्या भाषेत सहजतेने घेऊ शकतो .असे जागतिक संशोधन आहे  मात्र कोणतीही गोष्टीचे सखोल अध्ययन करण्यासाठी मुळात ती गोष्ट समजणे आवश्यक असते आपल्या दुर्दैवाने मोठी साहित्यिक परंपरा असलेली पंरपरा असलेली आपली मराठी याबाबत बरीच मागे आहे सध्याच्या तंत्रज्ञांचा काळात एखाद्या भाषेत किती वर्षाची साहित्य पंरंपरा आहे यावरून भाषा टिकणारी नाही तर त्या भाषेत किती ज्ञान निर्मिती होते का,?  ती भाषा ज्ञान भाषा होणार का? यावरून हे टिकणार आहे आणि मराठीचा हा कलंक पुसण्याचे काम आपल्या मराठीत अच्युत गोडबोले सातत्याने करत असतात त्यांचा याच धडपडीचे प्रतीक ज्याला मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक म्हणता येईल असे इंडस्ट्री 4.0 हर पुस्तक मी नुकतेच 
 नाशिकमधील सर्वात जुनी सांस्कृतिक संघटना सावानाच्या सहकार्याने वाचले 
      सध्या कोणी काही म्हणो एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी पुस्तके नेहमीच उपयोगी पडतात स्वतःच्या नोटस काढण्यासाठी एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी व्हिडीओ पेक्षा पुस्तके नेहमीच उपयोगी पडतात . व्हडिओमुळे एखादी गोष्ट समजते असे वाटते मात्र कालांतराने तो गोष्ट तितक्याच सहजतेने विसरले जाण्याची शक्यता देखील
मोठी असते या उलट पुस्तकामुळे एखादी गोष्ट समजावून घेतल्यास ती गोष्ट लवकर विसरत नाही त्यामुळे पुस्तकांना मरण नाही त्यातही अत्यंत वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञाच्या मुळातील संकल्पना समजण्यास तर आपणास पुस्तकाचाच आधार घ्यावा लागणार आणि इंड्रस्टी 4.0  हे पुस्तक या कसोटीवर पूर्णतः खरे ठरते सुमारे ३६० पानाच्या या पुस्तकात ६ भागातून आपणास या अतिशय नव्या असणाऱ्या तंत्रज्ञाची आपणास आपल्याला समजले अश्या सोप्या मराठीत लेखकाने ओळख करून दिली आहे 
 मराठीत असणाऱ्या तंत्रज्ञ विषयक पुस्तकांची एक समस्या असेलेली मराठी परिभाषेचा अतिशय जास्त प्रमाणात वापर आणि रूढ झालेल्या इंग्रजी शब्दाचा खूपच तुरळक वापर हि समस्या अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखी याही पुस्तकात आढळत नाही रूढ झालेल्या इंग्रजी संकल्पनाच त्यांनी पुस्तकात वापरलेल्या असल्याने या बदलत्या तंत्रज्ञाची मूलभूत माहिती घेऊन वाटल्यास अधिकची माहिती आपण इंग्रजीत सहजतेने घेऊ शकतो 
या पुस्तकांतच्या पहिल्या भागात  4.0 हि संकल्पना समजावून सांगितली आहे या भागात औद्योगिक विकास कसा झाला याचा आढावा घेत हि संकल्पना समजवून सांगितली आहे दुसऱ्या भागात सध्या विशेष चर्चेत असलेली आर्टिफिशियल इंटेलिजियन्स हि संकल्पना ४ प्रकरणातून स्पष्ट केली आहे या भागाच्या पहिल्या प्रकरणात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स म्हणजे काय हे सांगितले आहे दुसऱ्या प्रकरणात रोबोटिक्स हि संकल्पना तर तिसऱ्या प्रकरणात एक्स्पर्ट सिस्टीम आणि नॅचरल प्रोसेसिंग विषयी महती देण्यात अली आहे मशिन लर्निग आणि चाटबॉक्स विषयीची माहिती अनुक्रमे पुढच्या दोन प्रकरणातून आपणस मिळते तिसऱ्या भागात आपणास बिग डेटा हि संकल्पना आपणस माहिती होते चवथ्या भागात इंटरनेट ऑफ थिंग्स . ऑर्ग्यूमेंट रियालिटी आणि क्लाउड कॉम्पयटिंगविषयीची माहिती आपणस तीन प्रकरणातून मिळते पाचव्या आणि सहाव्या प्रकारांत आपणस ३ डी प्रिटिंग ब्लॉकचेन,५ जी आणि भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती मिळते 
   लेखात सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी पुस्तकाला मरण नाही आणि गोष्ट जर तंत्रज्ञांविषयी असेल तर विचारायलाच नको मग वाचणार ना हे पुस्तक 

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

जगाचे वर्तमान मोठ्या प्रमाणात बदलवणाऱ्या घटनेचा सविस्तर वृत्तान्त "शोध दहशतवादाचा "

सप्टेंबर 11सन 2001 ही फक्त अन्य तारखेसारखी तारीख नाही.वर्तमानात आपण ज्या समस्या अनुभवतोय.त्यातील अनेक घटनांचा मार्ग बदलण्याची घटना या तारखेस झाली. न्युर्याक येथील ट्वीन टॉवरवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची घटना म्हणून आता या प्रसंगाला आपण ओळखतो‌.या प्रसंगावर आतापर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिहून झाले आहे. मात्र ते सारे इंग्रजीत लिहलेले आढळते.काही प्रमाणात अन्य भारतीय भाषेत या बाबत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आढळते. मात्र या लेखनाच्या मुळाशी गेल्यास मुळातील इंग्रजी लेखनाचा तो अनुवादच असल्याचे आपणास दिसते‌. या घटनेविषयी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या वृत्तपत्रातील बातम्या,अमेरीकन प्रशासनाचा याबाबतचा अहवाल यांचा अभ्यास करत थेट इंग्रजी सोडून अन्य भारतीय भाषेत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आपणास सहजतेने दिसून येत नाही. आपल्या मराठीमध्ये मात्र ही उणीव भरून निघाली.आणि याला निमित्त ठरले आहे अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले "शोध दहशतवादाचा" हे पुस्तक .शोध दहशतवादाचा या पुस्तकाचे लेखन केले आहे, ज्येष्ठ पत्रकार के. पुरुषोत्तम महाले यांनी .
    महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्तसंपादक या संपादकीय विभागांतील महत्तवाच्या पदांवर अनेक वर्ष कार्य करणाऱ्या पुरषोत्तम महाले यांना आपण पत्रकार म्हणूनच नव्हे तर अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शक म्हणून देखील आपण ओळखतो. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांनी आजवर त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यांनी याच मार्गदर्शनाच्या हेतूने सदर पुस्तकाचे टिपण तयार केले होते.जे त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पुतण्याच्या पाठपुराव्यामुळे पुस्तक स्वरुपात प्रकाशित झाले ते म्हणजे हे पुस्तक.जे मी नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था सावाना (सार्वजनिक वाचनालय नाशिक)घ्या सहकार्याने नूकतेच वाचले.
    सुमारे 200पानाचे हे पुस्तक 13विविध प्रकरणातून आपणास 9/11याची सविस्तर माहिती आपणास  देते यासाठी लेखकाने आपल्या अमेरिका दौऱ्यात विविध वर्तमानपत्राच्या बातम्या, प्रकाशित लेख आणि आणि काही मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांच्याकडुन मिळालेली माहिती यांचा वापर करत लेखन केले आहे. अन्य इंग्रजी पुस्तकाचा वापर करुन पुस्तक लिहण्यापेक्षा मुळातील संदर्भाचा वापर करत पुस्तक लिहले असल्याने अधिक माहितीपुर्ण झाले आहे.तसेच संदर्भाचा अन्य लेखकाने चुकीचा अर्थ लावून त्याचे पुस्तक लिहले असल्यास संदर्भात होणारी गल्लत देखील या पुस्तकामुळे टळली आहे.13 प्रकरणातील पहिले तीन प्रकरणे घटना कशी घडली,?या हल्ल्यामागे ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा संशय अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना कस्या प्रकारे आला?त्यांचा सुरवातीच्या तपास कसा झाला याविषयी माहिती देतात .शेवटचे प्रकरण सायबर दहशतवाद याविषयी आपणास माहिती देते तर शेवटून दुसरे प्रकरण आपल्या भारतीय तपास यंत्रणांनी या तपास मोहिमेद्वारे काय अर्थबोध घ्यावा या विषयावर आहे.या खेरीज अन्य प्रकरणे या हल्ल्यामागे मानसिकता आणि हा तपास कसा वेग पकडत गेला याविषयी आपणास माहिती देतात.
     9/11ही घटना घडुन अनेक वर्ष उलटून गेली आहेत.आता या घटनेविषयी कश्याला वाचायचे?असा विचार तूमच्या मनात येत असेल तर ते चूकीचे आहे.आज 2024साली आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचे मुळ आपणास या घटनेत सापडते.अमेरीका पाकिस्तान संबंध आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम, अमेरिकेची मोठ्या प्रमाणात सुधारलेली सुरक्षा यंत्रणा,अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेवरून अमेरिकेत खेळले गेलेले अंतर्गत राजकारण,या राजकारणाचा जगावर झालेला परिणाम,इस्लामी जगताचा मोठ्या प्रमाणात सुरु झालेला अभ्यास , अन्य दहशतवादी गटांवर या दहशतवादी घटनेचा पडलेला प्रभाव, अफगाणिस्तान देशातील समाजकारण पुर्णतः ढवळुन निघणे या सारख्या अनेक घडामोडींचा मुळातून अभ्यास करायचा झाल्यास आपणास 9/11या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे,आणि या अभ्यासासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे,मग वाचणार ना हे पुस्तक.!

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

ग्रामीण जीवनाची अनुभुती देणारे पुस्तक "दिसामाजी"

   कोव्हिड 19च्या साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेकांनी या अनाहुतपणे मिळालेल्या या सुट्टीचा वेगवेगळा वापर केल्याचे आपणास आठवत असेलच. बहुसंख्य लोकांनी विविध आरोग्य विषयक उपचार करत यामध्ये स्वतः ला कोरोनापासून दूर ठेवले काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करत अनेक नवीन कला शिकून घेतल्या. काही जणांनी त्यांची करू करु असे म्हणत अनेक दिवस करायची राहुन गेलेली कामे या काळात केली. तर मुळचे कवी असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत भरवीरकर यांनी या सुट्टीचा वापर करत, समर्थ रामदास स्वामी यांची "दिसामजी काहीतरी लिहावे" ही शिकवण अंगी बाणवत ,  लेखन केले.कोणतेही लेखन जर पुस्तकरूपाने  प्रसिद्ध झाले तर ते चिरतरूण होते,हे माहिती असल्याने पुढे त्यांनी त्यांचे पुस्तक केले.ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित "दिसामजी" हेच ते पुस्तक. जे मी नुकतेच वाचले.
    प्रशांत भरवीरकर यांचे सुरुवातीचे आयुष्य निफाड तालुक्यात गेले असल्याने, या लेखनाला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी आहे.  सदर पुस्तकात ललितपर असे 45लेख आहेत. लेखांची भाषा आत्मपर आहे. सहज ओघवती असल्याने लेख कुठेही कंटाळवाणे झालेले नाहीत ‌. लेखक मुळात कवी असल्याने साहित्याची मुळात असलेली जाण लेखातून सहजतेने उमटताना दिसते‌.सर्वच लेख आटोपशीर फाफटपसारा न मांडणारे झाले आहेत. त्यामुळे पुस्तक अत्यंत वाचणीय झाले आहेत.एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर कधी संपते ते समजतच नाही.सुमारे 200 पानांच्या  या पुस्तकात शेवटपर्यत आपली वाचनाबाबतची उत्सुकता कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झाल्याचे पुस्तक वाचून झाल्यानंतर आपणास वाटावे असे हे पुस्तक आहे 
      पुस्तकांची रचना देखील उत्तम आहे.पुस्तक नेहमीच्या आकारातील नसुन काहीसे कॉफी टेबल्स बुक जसी रूंद असते तसे आहे..पुस्तकाचे मुखपृष्ठ आपली नजर पुस्तकाकडे वेधण्यात यशस्वी होते. ग्रामीण संस्कृती किती महान आहे हे आपणास पुस्तकाचे मुखपृष्ठ बघूनच समजते.पुस्तकाच्या अंतरंगात चित्रे जवळपास नसली तरी छपाईचा  फाँट उत्तम असल्याने पुस्तक वाचताना फक्त अक्षरेच आहेत,हे बघून कंटाळवाणे वाटत नाही.दिवसभर काम करुन दिवसांच्या अखेरीस रात्री शांत झोप लागावी,या हेतूने काही रम्य वाचायाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी वारंवार वाचावे असे पुस्तक म्हणजे ,"दिसामाजी" हे पुस्तक होय असे मला वाटते‌.सहजसोपे अनुभव देखील किती रंजक पद्धतीने मांडता येवू शकतात ,हे आपणास या पुस्तकवाचनातून समजते‌ .समर्थ रामदास स्वामी यांच्या दिसामाजी काहीतरी ते लिहावे या उपदेशाची आठवण हे पुस्तक वाचताना होते‌‌.  सध्या अनेक ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या भाषेची भेळ असलेली मिंग्लिश भाषेत लिहलेले आढळते .दिसामंजी या पुस्तकात या भाषेचा लवलेष देखील आढळतो नाही. पूर्णतः मराठी भाषेत सदर पुस्तक लिहलेले आहे.मात्र मराठीत लिहलेले आहे,म्हणजे ग्रंथप्रामाण्य मानत बोजड समजण्यासाठी अवघड अस्या शद्बांचा वापर केला असेल असे समजण्याचे काही कारण नाही.पुर्ण मराठी शद्ब वापरले तरी सहजसोपे कोणत्या पद्धतीने लिहीता येते हे सदर पुस्तक वाचल्यावर आपणास समजते‌.
पुस्तकात 45 लेख असले तरी त्यांची एक सुंदरशी गुंफून लेखकाने केलेली आढळते.प्रत्येक लेख एक स्वतंत्र्य असला तरी एक लेख वाचून झाल्यानंतर दुसरा लेख आपण पुर्णतः वेगळेच काहीतरी वाचत आहोत असे वाटत नाही तर एखाद्या फुलांच्या एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीत जावे इतकी सहजता लेखकाने आपल्या लेखनात साकारली आहे 
मग वाचणार ना हे पुस्तक.

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...