महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्तसंपादक या संपादकीय विभागांतील महत्तवाच्या पदांवर अनेक वर्ष कार्य करणाऱ्या पुरषोत्तम महाले यांना आपण पत्रकार म्हणूनच नव्हे तर अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शक म्हणून देखील आपण ओळखतो. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांनी आजवर त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यांनी याच मार्गदर्शनाच्या हेतूने सदर पुस्तकाचे टिपण तयार केले होते.जे त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पुतण्याच्या पाठपुराव्यामुळे पुस्तक स्वरुपात प्रकाशित झाले ते म्हणजे हे पुस्तक.जे मी नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था सावाना (सार्वजनिक वाचनालय नाशिक)घ्या सहकार्याने नूकतेच वाचले.
सुमारे 200पानाचे हे पुस्तक 13विविध प्रकरणातून आपणास 9/11याची सविस्तर माहिती आपणास देते यासाठी लेखकाने आपल्या अमेरिका दौऱ्यात विविध वर्तमानपत्राच्या बातम्या, प्रकाशित लेख आणि आणि काही मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांच्याकडुन मिळालेली माहिती यांचा वापर करत लेखन केले आहे. अन्य इंग्रजी पुस्तकाचा वापर करुन पुस्तक लिहण्यापेक्षा मुळातील संदर्भाचा वापर करत पुस्तक लिहले असल्याने अधिक माहितीपुर्ण झाले आहे.तसेच संदर्भाचा अन्य लेखकाने चुकीचा अर्थ लावून त्याचे पुस्तक लिहले असल्यास संदर्भात होणारी गल्लत देखील या पुस्तकामुळे टळली आहे.13 प्रकरणातील पहिले तीन प्रकरणे घटना कशी घडली,?या हल्ल्यामागे ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा संशय अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना कस्या प्रकारे आला?त्यांचा सुरवातीच्या तपास कसा झाला याविषयी माहिती देतात .शेवटचे प्रकरण सायबर दहशतवाद याविषयी आपणास माहिती देते तर शेवटून दुसरे प्रकरण आपल्या भारतीय तपास यंत्रणांनी या तपास मोहिमेद्वारे काय अर्थबोध घ्यावा या विषयावर आहे.या खेरीज अन्य प्रकरणे या हल्ल्यामागे मानसिकता आणि हा तपास कसा वेग पकडत गेला याविषयी आपणास माहिती देतात.
9/11ही घटना घडुन अनेक वर्ष उलटून गेली आहेत.आता या घटनेविषयी कश्याला वाचायचे?असा विचार तूमच्या मनात येत असेल तर ते चूकीचे आहे.आज 2024साली आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचे मुळ आपणास या घटनेत सापडते.अमेरीका पाकिस्तान संबंध आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम, अमेरिकेची मोठ्या प्रमाणात सुधारलेली सुरक्षा यंत्रणा,अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेवरून अमेरिकेत खेळले गेलेले अंतर्गत राजकारण,या राजकारणाचा जगावर झालेला परिणाम,इस्लामी जगताचा मोठ्या प्रमाणात सुरु झालेला अभ्यास , अन्य दहशतवादी गटांवर या दहशतवादी घटनेचा पडलेला प्रभाव, अफगाणिस्तान देशातील समाजकारण पुर्णतः ढवळुन निघणे या सारख्या अनेक घडामोडींचा मुळातून अभ्यास करायचा झाल्यास आपणास 9/11या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे,आणि या अभ्यासासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे,मग वाचणार ना हे पुस्तक.!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा