बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"


नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या तपोभूमी नाशिक या पुस्तकाखेरीज अन्य सक्षम उपाय तो कोणता? मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत वाचले.
 या प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात सुमारे २०४ पानांच्या या पुस्तकात सहजसोप्या भाषेत,ओघवत्या भाषेत वर सांगितलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. पुस्तक माहितीवर आधारित असले तरी अन्य माहितीच्या पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक रटाळ कंटाळवाणे झालेले नाही.तर वाचकांची नाशिकच्या बाबतचे जाणून  घेण्याबाबतची भुक  काहीप्रमाणात वाढवणारे,आणि या वाढलेल्या भुकेची तितक्याच ताकदीने पुर्तता करणारे झाले आहे. पुस्तक वाचतांना कुठेही  कंटाळा येणार नाही,याबाबत लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचतान सहजतेने लक्षात येते‌.पुस्तकात पहिल्या परिच्छेदात सांगितलेल्या प्रश्नांची प्रकरणनिहाय माहिती देण्यात आलेली आहे.आपण पुस्तकाचे लेखक रमेश पडवळ सर यांना त्यांच्या मटा हेरीटेज वॉकमुळे ओळखतो‌.मटा हेरीटेज ,वॉकच्या वेळी दिसणारे त्यांचे व्यक्तीमत्तातील गुणवैशिष्टे,अभ्याक त्यांचा,या पुस्तक लेखनात सुद्धा जाणवतो.
सदर पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली संदर्भसुची त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी घेतलेले कष्ट दाखवून देते‌.सध्याचा इंटरनेटच्या काळात एखाद्या परीसराविषयी माहिती सहजतेने उपलब्ध असताना तीच कॉपी पेस्ट न करता संदर्भग्रंथ
अभ्यासून पुस्तक लिहल्यातून त्यांची पत्रकारीता किती उच्च दर्ज्याची आहे,हे समजते‌ महाराष्ट्र टाइम्स सारख्या नामांकित वर्तमानपत्रात विविध जबाबदाऱ्या सांभळत त्यांनी सदर लेखन केले आहे ‌,जे खरोखरीच कौतूकास्पद आहे.समर्थ रामदास स्वामी यांची"दिसामंजी काहीतरी लिहावे,शहाणे करुन सोडावे सकल जन " ही उक्ती रमेश पडवळ सरांनी सार्थ केल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.
आपणास ज्या प्रदेशात राहतो, तेथील माहिती असणे,हे चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख आहे ‌.त्यामुळे किमान नाशिककरांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"


स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना गेल्या काळातील चालू घडामोडींचा अभ्यास चटकन होण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा घटक म्हणजे इयर बुक.वर्षभर वर्तमानपत्रांची टिपणे काढून सुद्धा अनावधानाने टिपणातून सुटलेला मुद्दा विषय यांची उजळणी करण्याचा कामात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही इयर बुक खुपचं उपयुक्त ठरतात. वर्षभरातील महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने, ती वाचून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचतो‌.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीं खेरीज पत्रकारांना एखाद्या मुद्द्यावर लेखन करताना संदर्भ म्हणून ही इयर बुक महत्त्वाची ठरतात.इंग्रजीत या प्रकारची अनेक इयर बुक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत.मात्र त्यांचा वापर करण्यासाठी इंग्रजीवर हुकुमत असणे आवश्यक आहे. आज २०२४साली  देखील अनेक व्यक्ती अस्या आहेत की,,ज्यांची इंग्रजीवर फारशी हुकूमत नाही ‌एम‌.पी.एस.सी. ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील पत्रकार अस्या प्रकारचा मोठा वर्ग यात समाविष्ट  होतो‌. हा वर्ग सदर माहिती इंग्रजीत असल्याने या इयर बुक पासून दूर आहे ‌परीणामी बुद्धीमत्ता असून देखील योग्य अभ्यास साहित्याचा अभावी ते स्पर्धेत मागे पडतात.एम.पी एस.सी खेरीज केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची मराठी भाषेत तयारी करणारे विद्यार्थी देखील यात समाविष्ट होवू शकतात,यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ईयर बुक ही संकल्पना मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.नेमकी हीच बाब हेरून गेली ११वर्ष लोकसत्ता वर्षवेध या नावाने इयर बुक काढत आहे.लोकसत्ता तर्फे २०२३या वर्षातील इयर बुक अर्थात वर्षवेध मी नुकतेच वाचले.
लोकसत्ता या दैनिकामार्फत प्रकाशित या वार्षिकात आपणास गेल्या २०२३या वर्षातील घटना या विविध प्रकरणांद्वारे सविस्तर अभ्यासता येतात. लोकसत्ता वर्षवेध मध्ये घटनांचे राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, , असे प्रदेशानुसार ,तसेच क्रिडा, आर्थिक राजकीय, सामाजिक,चर्चेतील व्यक्ती असे विषयानूसार वर्गीकरण केले आहे.ज्यामुळे या घटना अभ्यासणे सोईचे जाते. या वार्षिकात फक्त दिनांक आणि त्या दिवशीची घटना असे दिलेले नसुन, काही लेख देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.ज्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचा मोठा फायदा होतो‌ मी वर्षवेधचा सुरवातीपासूनचा वाचक आहे‌.सुरवातीच्या काही अंकामध्ये  लेख समाविष्ट नव्हते‌.मात्र गेल्या काही वर्षात प्रसिद्ध होत असणाऱ्या वर्षवेधमध्ये लेख समाविष्ट करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे,ज्यामुळे अंकाचे उपयोगिता मुल्य खुपचं वाढले आहे.वर्षवेधमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांचा वेगळा विभाग यावेळी नाहीये‌.तर अंकात विखुरलेल्या स्वरुपात लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत‌.लेख ज्या विषयावरील आहे‌.त्या विषयक घटना सांगितल्यानंतर लेख यावेळी प्रसिद्ध करण्यात आला आहे.यापुर्वी लेखांचा स्वतंत्र विभाग असे घटनांची तारखेनुसार माहिती देणारा एक विभाग आणि लेखांची माहिती देणारा दुसरा विभाग असे लोकसत्ता वर्षवेधचे स्वरूप असे जे यावेळी मोठ्या प्रमाणात बदलण्यात आले आहे.
     लोकसत्ताच्या संपादकीयामधून मांडण्यात येणाऱ्या राजकीय मतांमुळे लोकसत्ता अनेकांचा नावडता पेपर आहे,मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी माहिती तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींची सविस्तर माहिती हवी असल्यास मराठीमध्ये लोकसत्ता शिवाय दुसरा पर्याय नाही,हे देखील तितकेच खरे आहे.त्यामुळे लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या या इयर बुकचे वाचन त्यांची राजकीय मते क्षणभर बाजूला ठेवून स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त म्हणून केल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे अवघड नाही‌.फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींनी नाही तर देशाचे जवाबदार नागरीक होण्यासाठी देखील लोकसत्ता वर्षवेध वाचायलाच हवा.



शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

आपली राजकीय समज प्रगल्भ करणारे पुस्तक,"हिंदूत्व,बंधूत्व आणि नरेंद्र मोदी"

सध्या आपल्या भारतात लोकसभा निवडणूकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक गरम होत आहे.हा मजकुर लिहण्यापर्यत देशात आचारसंहिता लागू नसली तरी ती कधीही लागू शकते.कदाचित आपण हा मजकुर वाचेपर्यंत ती लागू झालेली असू शकते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर तर राजकीय वातावरण अधिकच रंगेल.अस्या या  काळात २१०देशांच्या या जगात, जगातील सर्वात मोठी असलेल्या लोकशाहीतील जवाबदार नागरीक म्हणून आपणास राजकीय पक्षांची पुर्ण समज असणे अत्यावश्यक ठरते.सत्ताधिकारी पक्षातर्फे करण्यात आलेली विकासकामे आपणास प्रत्यक्ष दिसत असली तरी, त्या पक्षाची विचारधारा काय आहे?याची आपणास माहिती मिळाल्यास आपण अधिक जागरुकपणे मतदान करु शकतो‌.मात्र या काळात माध्यमे पेड न्युज अधिकाधिक दाखवत असल्याने त्यातून योग्य ती माहिती मिळेलच ,यांची काही श्वास्वती नाही, त्यामुळे या काळात या विषयी लिहलेल्या पुस्तकाचच आपणास आधार घ्यावा लागतो‌, आणि आपली ही गरज पुर्ण होते,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लिहलेले आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित "हिंदूत्व, बंधुत्व , नरेंद्र मोदी हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावानाच्या मदतीने वाचले.
      पंतप्रधान मोदींचा ग्रोधा ते पंतप्रधान विकास मानायचा? मोदींचे हिंदुत्व खरचं भारतीयांचं परिवर्तित झालंय का? मोदी मॉडेल आणि भागवत मॉडेल यातील सुक्ष्म संघर्ष
कोणता? हिंदूत्ववादी मोदींचा ओठी परदेशातच गांधी आणि बुद्धाचे नाव जास्त वेळा का असते? मोदींचे परराष्ट्र धोरण पंडित नेहरूंच्या वारस्यातच समृध्द झाले आहे का? संघाचे हिंदूत्व सर्वमान्य आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूत्व आणि संघाचे हिंदुत्व एकच आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील विचारांची लढाई म्हणजे नक्की काय? लोकशाहीतील एक महत्त्वाचे तत्त्व असलेल्या 'बंधुता'  याविषयीची सद्य स्थिती काय आहे?मुळात "बंधुता " म्हणजे काय ? अस्या अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे सदर पुस्तक होय.
176पानाच्या या पुस्तकात 3भाग आहेत. पहिला भाग म्हणजे हिंदुत्व.या भागात 4 प्रकरणे असून यात पुस्तकांची ओळख तसेच संघाचे हिंदूत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूत्व यातील फरक आणि या दोन्हींचे डॉ.आंबेडकर यांच्या विचारधारेशी असणारे नाते.यावर प्रकाश टाकला आहे.या भागात या संकल्पनांचे टीकात्मक विश्लेषण केलेले आढळते.दुसरा भाग म्हणजे बंधूत्व.बंधुत्व या भागात ही संकल्पना मुळात काय आहे?तिचे स्वरुप आणि आवश्यकता,तसेच ती कशी लागू होते?कोणाला ती लागू होते? जगभरात तिची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होते?याबाबत तीन प्रकरणात सांगण्यात आले आहे.पुस्तकाचा तिसरा भाग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या लेखांचा आहे.11प्रकरणाच्या या भागात सरसंघचालक मोहन भागवत आणि  नरेंद्र मोदी यांच्या हिंदूत्वातील फरक, पंतप्रधान मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर मागितलेली मते,संघाला काहीसे अप्रिय असणाऱ्या महात्मा गांधी यांचा आपल्या परदेशातील दौर्यादरम्यान सातत्याने उल्लेख का करतात, तसेच परदेशी नेत्यांना आपले पुज्यनीय हेडगावकर,गोवळकर श्री गुरुजी यांच्या समाधीच्या ठिकाणी न नेता महात्मा गांधींच्या समाधीस्थळीच का नेतात? या वरुन पंतप्रधान मोदी कशी भारताची प्रतिमा जपतात? या सारख्या मुद्यावर चर्चा केली आहे.
आपण कोणत्याही विचारसरणीचे असो आपल्याला विरोधी विचारसरणी माहिती असणे समाजात आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी आवश्यक असते.तसेच आपल्या विचारसरणीची इत्यंभुत माहिती असणे विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आवश्यक आहे.त्यामुळे आपण कोणत्याही विचारसरणीचे असो,आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

माझे वाचन (भाग २ )

          
आपल्या पाल्याने वाचन करावे यामध्ये पालकांची काय भूमिका असते ?  हे आपण मागच्या भागात बघितले   या भागात आपण एखाद्याला ठराविक विषयावरची पुस्तके वाचायला कसे काय आवडू शकते ? यावर बोलूया . एखाद्यास ठराविक विषयाची पुस्तके आवडण्यात  त्याच्या सभोवातालच्या व्यक्ती कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचतात तसेच पुस्तक वाचनास सुरवात करताना त्यास कोणत्या प्रकराची पुस्तके वाचायला मिळाली ? याचा मोठा प्रभाव असतो या खेरीज व्यक्तीच्या शैक्षणिक आणि व्यावसाईक गरजेचा देखील मोठा प्रभाव असतो ? जर एखाद्यास आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर विशिष्ट विषयाची पुस्तके वाचणे क्रमप्राप्त झाले तर आयुष्याच्या पुढील टप्यावर त्या विषयाची पुस्तके वाचायची गरज नसली तरी एखादा व्यक्ती त्याच विषयाची पुस्तके वाचू शकतो 

 माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी शाळेत असताना माझ्या शाळेच्या ग्रंथपाल असणाऱ्या मॅडम आम्हाला सातत्याने सांगत असत , अरे तुम्ही विविध विषयाची माहिती देणारी पुस्तके वाचायला हवी विविध साहित्यकृती वाचायचे हे तुमचे वय नाही .तुम्ही साहित्यकृती नंतरच्या आयुष्यात वाचू शकता सध्या तुम्ही विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचून स्वतःचे सामान्यज्ञान वाढवले पाहिजे.  त्या आम्हाला जी पुस्तके निवडण्यास देत त्यातही विविध प्रकारची माहिती देणारीच पुस्तके असे. विविध प्रकारच्या साहित्यकृती त्यामुळे मी बऱ्याच उशिरा वाचल्या पुढे मीस्पर्धा परीक्षेच्या तयारीच्यादरम्यान पुन्हा एकदा मी माहिती देणारी पुस्तके वाचायला सुरवात केली त्यामुळे माझ्यामध्ये माहितीची पुस्तके वाचायची  आवड निर्माण झाली . जे तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटवरील माझे वाचन या फोटो अल्बम किंवा याच ब्लॉगवर मी ज्या पुस्तकांची ओळख करून देतो त्याचे अवलोकन केल्यास  सहज लक्षात सुद्धा येईल 

माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार सांगतोय मी ज्या प्रकारचे वाचन करतो तेच वाचन उत्तम असे समजणे चुकीचे आहे. जर कोणी साहित्यकृतीचे वाचन करत असेल तर ते  देखील योग्यच ठरेल. वाचनाचा कोणताच प्रकार योग्य किंवा अयोग्य नाहीये . वाचनाच्या प्रत्येक जातकुळीचे काही फायदे आहेत, तसेच तोटे आहेत.आता फक्त तोटे बघत, एखाद्या वाचनाच्या प्रकारास अयोग्य ठरवणे, पुर्णतः चूकीचे आहे.आता मी प्रामुख्याने ज्या प्रकारची पुस्तके

वाचतो, त्यामुळे मला विविध विषयांचे ज्ञान होत असले तरी, भाषाशैली,शद्बांचे भांडार याबाबत मी काहीसा मागे पडतो,हे नाकारण्यात काही अर्थ नाही.माझ्याउलट जर एखादा जण साहित्यकृती वाचत असेल तर, भलेही त्यांचे ज्ञान कमी असेल, मात्र तो शद्ब साठ्याबाबत प्रचंड  श्रीमंत असेल ,हे सुद्धा नाकारण्यात अर्थ नाही.आता विविध प्रकारचे ज्ञान,की विपूल प्रकारचा शद्बसाठा यापैकी कश्याला महत्व देयचे?आणि कश्याला नाही,? हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून आहे.त्याबाबत काहीही सांगणे सहजशक्य नाही. कोणत्याही प्रकारचे असले तरी चालेल मात्र ती व्यक्ती वाचन करत आहे का? याला महत्त्व देयला पाहिजे असे मला वाटते कारण अखेर वाचाल तर वाचाल!

या लेखाचा पहिला भाग वाचायचा असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा 


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blog-post_22.html


माझे वाचन .... (भाग १ )

                   
 कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने  फोन  करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले.. विविध उपाय केले तरी त्याचा मुलगा काही केल्या वाचतच नव्हता . आपल्या मुलाने चांगले वाचनवीर व्हावे अशी इच्छा माझ्या मित्राची इच्छा होती मात्र त्याचा मुलगा काही केल्या ती पूर्ण करत नव्हता अखेरचा उपाय म्हणून तो माझ्याकडे आला होता तसा बघायला गेलो तर माझ्या मित्राने उपस्थित केलेला हा फक्त त्याचा एकटाच प्रश्न नाहीये .आजकाल अनेकांना या प्रश्नाने ग्रासलंय त्या अर्थी हा प्रश्न सामाजिक झाला आहे त्यामुळे हा प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याच्या अगोदर त्याचे निराकारण करण्याच्या प्रयत्न केल्यास उत्तम या वचनानुसार हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे सदर लेखन आहे 
               तर मित्रानो मुलांच्या वाचनाची सुरवात होते ती पालकांपासून . पालक जर वाचणारे असतील तर मुले सुद्धा वाचायला लागतात हा सर्व साधारण इतिहास आहे  बाल  मानसशास्त्रज्ञांच्या विचार करता  , ते नेहमी, मुले नेहमी मोठ्याच्या सांगण्यातून नव्हे तर कृतीतून शिकतात . मोठी जी कृती करतात तशीच कृती त्यांना करायची असते . असे सांगतात त्या न्यायाने जर आई वडील जर वाचणारे असतील मुले  सुद्धा वाचायला शिकतात त्यांना वेगळे सांगावे लागत नाही.  माझे आई आणि वडील दोघेही उत्तम वाचक होते त्यांच्या वाचनाचा संस्कार माझ्यावरझाला आणि मी वाचायला लागालो ते इतके कि माझ्या काही मित्रांनी मला जिवंत खराखुरा सखाराम गटणे असे  म्हणायला देखील लागले असो याच वाचनातून मी लिहायला लागलो ज्याचा अविष्कार आपण बघतच आहात असो मी प्रामुख्याने कोणती पुस्तके वाचतो ? तीच पुस्तके का वाचतो ? अन्य प्रकारची पुस्तके का वाचत नाही यावर मी याच लेखाच्या दुसऱ्या भागात बोलले असो 
                  आपण बाल  मानसशास्त्रज्ञांच्या विचार आपण जरा बाजूला ठेवूया क्षणभर,  आपल्या मराठीतच अनेक म्हणी वाक्यप्रचार  आहेत जे मुलांमध्ये एखादी गोष्ट विकसित करण्यामध्ये त्यांच्या पालकांची मोठी भूमिका असल्याचे दाखवूंन देतात जसे "खाण तशी माती " , आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार .?  वगैरे  आता आई वडीलच फारसे वाचवणारे नसतील तर मुलांनी वाचले पाहिजे हा हट्ट धरण्यात काही अर्थ नाही जर पालकांनाच 
वाचायला वेळ नसेल तर मुलांना देखील वाचायला वेळा नसणार हे उघड उघड गुपित आहे त्यामुळे आजकालची मुले वाचता नाहीत अशी आरोड करणाऱ्या व्यक्ती किती वाचतात हे बघायला हवे या ठिकाणी कोणत्या भाषेत वाचतात ?कोणत्या प्रकारचे साहित्य वाचतात ?हा मुडदा फारशामहत्त्वाच्या नाही तर व्यक्तीने वाचायला हवे हा आहे ?  आता पुस्तक वाचायला सुरवात केल्यावर एखाद्या विषयात कशी काय गोडी निर्माण होते यावर मी याच लेखाच्या दुसऱ्या भागात बोलेल . तो पर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र !

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

एका महत्त्वाच्या मात्र दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष वेधून घेणारे पुस्तक, "ऑटीझम

पुर्वीच्या तूलनेत सध्याचा काळातआपल्या भारतात अनेक विकारांबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करण्यात येत असले, तरी काही विकार अजुन देखील समाज प्रबोधनाच्या बाबतीत बरेच मागे आहेत.या विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या लाखोत असली तरी त्याबाबत फारसे बोलले जात नाही.समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या चित्रपटातच नव्हे, तर वैद्यकीय स्तरावर सुद्धा त्याबाबत व्यापक चर्चा होत नाही.परीणामी या धोक्याची जाणीवच जन सामन्यांना होत नाही, ऑटीझम हा असाच फारसा चर्चिला न जाणारा विकार . सुमारे २टक्के (अचूकपणे सांगायचे झाल्यास दर ५४पैकी १) इतक्या लोकांना होणारा एक गंभीर स्वरुपाचा विकार.ज्या अभागी जणांना हा विकार होतो त्या व्यक्तींचेच नव्हे तर त्यांचे कुटुंबियांचे भावविश्व पुर्णतः नष्ट करणारा हा विकार. आपल्या मराठीचा विचार करता या विषयी जवळपास काहीच लिहलेले आढळत नाही..त्यातही जे काही आढळते,त्यात शास्त्रीय माहितीचा अभावच दिसतो..मात्र ही पोकळी भरुन येते, ती मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी झटणाऱ्या अच्यूत गोडबोले यांच्या "ऑटीझम या पुस्तकामुळे. स्वतःच्या मुलाला ऑटीझम झाल्यामुळे त्यातील दाहकता जवळुन अनुभवलेल्या अच्यूत गोडबोले यांनी आपल्याला जो त्रास  सहन करायला लागला तसा त्रास अन्य व्यक्तींना होवू नये, यासाठी लिहलेले हे पुस्तक आपणास या विकाराबाबत आपणास सखोलतेने माहिती देते.जे मी नाशिकमधील आघाडीची सांस्कृतिक संस्था सावानाच्या सहकार्याने नुकतेच वाचले.
       सुमारे पावणे दोनशे पानांच्या या पुस्तकात ८प्रकरणाद्वारे अच्युत गोडबोले यांनी या विकारांची, हा विकार ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची यामुळे काय होरपळ होते‌? तसेच स्वतः च्या मुलाला असणाऱ्या या विकारामुळे त्यांना कसे कष्ट सहन करावे लागले ?या विषयीची माहिती दिली आहे. या विकाराविषयीच्या माहितीत, मुळात हा विकार काय आहे? वैद्यकीय परिभाषेत यांचे वर्गीकरण कसे करतात? हा विकार का होतो? कोणकोणत्या प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना हा विकार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे, ती कितपत  खरी असू शकते? सांस्कृतिक विश्वात ,या ऑटीझम विकारांचे चित्रण करण्यात आलेले आहे? हे संकट भविष्यात असे अक्राळविक्राळ स्वरुप धारण करु शकते? ऑटीझमवर कोणते आणि कस्या प्रकारचे उपचार केले जातात?हा विकार वयाच्या विविध टप्प्यांवर कोणती वळणे घेतो?अन्य मानसिक विकारापेक्षा हा विकार कसा वेगळा आहे? याबाबत कोणते गैरसमज आहेत? या गैरसमजाची वास्तविक स्थिती काय आहे ?ऑटीझमची सुरवातीची लक्षणे काय? ती वयाच्या कोणत्या टप्प्यावर दिसून येतात?भारतात आणि जगात ऑटीझमबाबत काय स्थिती आहे? ऑटीझमचे शिकार झालेल्या व्यक्ती कस्या प्रकारे वर्तन करतात,? कुटुंबियांनी आपल्या पाल्यास हा विकार आहे,हे कसे ओळखावे? ऑटीझमबाबत कोणत्या संस्था, व्यक्ती मदत करतात?
याविषयी सांगितले आहे.
लेखनाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनासारखीच सहजसोपी चटकन समजणारी आहे या सारखीच शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकात आढळणारा मराठी परीभाषेचा वापर अच्युत गोडबोले यांचा या पुस्तकात देखील टाळला आहे. अच्युत गोडबोले यांनी समाजात रूढ झालेले मुळातील इंग्रजी शद्ब आपल्या लेखनात तसेच ठेवले आहेत, ज्यामुळे विषय चटकन समजतो.
    आपण स्वतः एखाद्या समस्येने ग्रस्त नसलो भविष्यात देखील ग्रासणार नसू तरी देखील समाजातील दुःखाबाबत माहिती असणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण समजले जाते.त्यामुळे आपल्या निरोगी मानसिकतेसाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

सकारात्मक पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण, "पोलादी माणसं, नाशिक जिल्हा भाग १"

 

सध्याचा काळात सातत्याने पत्रकारिता  नकारात्मकतेचा प्रचार प्रसार करते,आरोप करण्यात येतो. आजच्या माध्यमातील बातम्या बघितल्यस त्यात सातत्याने खुन,दरोडा , गुन्हेगारी, बलात्कार,आदी विषयक बातम्या दिसत असल्याने हा आरोप खरा आहे,असे पटायला लागते.मात्र सर्वच माध्यमे तसीच आहेत, असे सर्वसाम्यनीकरण करणे अयोग्य आहे. जरी संख्येने कमी असले तरी काही पत्रकार सकारात्मक पत्रकारीता करत समाजात आपले एक चांगले स्थान निर्माण करत आहेत.ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी हे अस्या मोजक्या पत्रकारांपैकीच एक. समाजात आदर्श घ्यावा अस्या उद्योगपतींचे कार्य ते जिल्हावार पुस्तक रुपाने प्रसिद्ध करत आहेत.त्यांची  सोलापूर, हिंगोली,बीड, अकोला वाशीम,अहमदनगर अस्या वीस जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणारी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.याच मालिकेतील नाशिक जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणाऱ्या २भागांच्या  पुस्तकांपैकी पहिल्या भागाचे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत  वाचले.

२८०पानाच्या या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या,२५ उद्योगपतींची आणि एका समाजहिताय संघटनात्मक धडपडीची अर्थात श्री गुरुजी रूग्णालयाची माहिती देण्यात आली आहे.यात सांगितलेले सर्व उद्योगपती पहिल्या पिढीचे उद्योगपती आहेत.घरी औद्योगिक क्षेत्राची काहीही पार्श्वभूमी नसताना, ज्यांनी उद्योगक्षेत्रात मोठे यश संपादन केले,अस्या उद्योगपतींची यात माहिती देण्यात आलेली आहे. यात ज्यांची यशोगाथा सांगण्यात आलेली आहे,त्या सर्व उद्योगपतीं जन्मभूमी नाशिक नाहीये.मात्र अन्य जिल्ह्यांत जन्म घेवून सुद्धा ज्यांनी आपली कर्मभूमी नाशिक मानली अस्या उद्योगपतींची यात ओळख करुन देण्यात आलेली आहे.या पुस्तकात आदर्श घ्यावा अस्या व्यक्तींची निवड करताना फक्त औद्योगिक उत्पादन करणाऱ्या उद्योजकांचीच ओळख करून देण्यात आलेली नाही,तर शेती क्षेत्रातील उद्योजकांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे.आपल्या महाराष्ट्रातत्यातही नाशिकमध्ये उद्योजक होण्यासाठी पुरक वातावरण नाही,असी ओरड सातत्याने करते,त्याला सडेतोड उत्तर आपणास या पुस्तकातून मिळते. आयमा आणि निमा या उद्योजकांचा संघटनेच्या राजकारणात कधीही चर्चेत न येणारी मात्र जगभरात आपले नाव पोहोचणाऱ्या व्यक्तीमत्तवांची ओळख आपणास या पुस्तकातून आपणास होते. 
        या पुस्तकातून आपणास कष्ट केले तर तर पाठिसी काहीही पाठबळ नसले तरी यश मिळतेच हा महत्त्वाचा संदेश मिळतो. यात ज्यांची यशोगाथा सांगण्यात आलेली आहे,त्यातील एखादा दुसरा अपवाद वगळता सर्व उद्योजक मराठी भाषिक आहेत.मराठी माणूस हा फक्त नोकरीच्या मागे धावतो, स्वतःत कितीही कुवत असली तरी उद्योगात उतरत नाही,या रुढ विश्वासाला हे पुस्तक तडा देते.सदर पुस्तकात उद्योजकाचा वाटचालीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर, उद्योजकाची संपर्क माहिती, आणि आवड आणि काही कौटुंबिक माहिती वेगळ्या स्वरुपात देण्यात आलेली असल्यामुळे आपणास वाटले तर त्यांना संपर्क देखील साधू शकतो‌.
    आपल्या मराठीत आदर्श व्यक्तीमत्वांची माहिती देणारी अनेक पुस्तके सध्या आहेत. मात्र या पुस्तकात सांगितलेली बहूसंख्य व्यक्तिमत्वे ही सामाजिक क्षेत्रातील आहेत.त्यांच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास आपल्या सामाजिक जाणिवांच्या कक्षा रूंदवतात. मात्र आपल्यातील उद्योगशीलतेचा विकास करण्यात ती बरीच कमी पडतात सध्याचा काळात उद्योगशीलतेला आलेले महत्व लक्षात घेता, ज्या समाजात उद्योगशीलता आहे,तोच समाज प्रगती करु शकणार आहे.आणि या कसोटीवर हे पुस्तक पुर्णतः खरे ठरते,म्हणून आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

प्रत्येक पत्रकारांच्या संग्रही असावे असे पुस्तक.., "नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य"

आपल्याकडे माध्यमांच्या अर्थकारणाच्या बाजू सांगताना, या चार क्षेत्राच्या बातम्यांना नेहमीच प्रेक्षकवर्ग मिळतो. सातत्याने प्रेक्षकवर्ग असल्याने,  जाहिरातीदार नेहमीच या क्षेत्राची बातमी देणाऱ्या माध्यमांकडे जाहिराती देतात.जाहिराती या माध्यमांचा अर्थकारणाचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने, माध्यमे या क्षैत्राची बातमी देण्यास प्राधान्य देतात,असे सांगितले जाते.त्यातील एक म्हणजे राजकारण (अन्य तीन म्हणजे क्रिकेट, सिनेमा, क्राइम {याला यांच्या  सुरवातीच्या अक्षरावरून "थ्री सी वन पी" असे म्हणतात}).तर या राजकारणाचा ठळक आविष्कार म्हणजे खासदार .त्यामुळे कोणत्याही पत्रकारास पत्रकारीता करायची झाल्यास आपल्या क्षेत्रातील विद्यमान खासदार आणि माजी खासदारांची किमान माहिती असणे आवश्यक ठरते.याची माहिती सहजतेने मिळत नसल्याने, कोणत्याही पत्रकारास  सुरवातीच्या काळात अनेक कष्ट घ्यावे लागतात. मात्र नाशिक परिसरातील पत्रकारांची यातुन मोठ्या प्रमाणात सुटका झाली आहे.याला कारण ठरले आहे, डांग सेवा मंडळाच्या अभोणा येथील महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ .प्रा.प्रदीप देशपांडे यांनी या संदर्भात लिहलेले आणि जळगावच्या प्रशांत पब्लिकेशन या प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक. सुमारे ३६०पानांच्या या पुस्तकात, १९५२ ते २०१८ पर्यंतच्या नाशिक जिल्ह्यातील खासदारांची माहिती देण्यात आली आहे.सध्या जरी २०२४ साल सुरू असले तरी पुस्तक २०१८साली लिहले गेलेले असल्याने, तो पर्यतचीच माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.मी जे नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था, सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्या सहकार्याने वाचले‌
       पुस्तकाचे लेखन 25वर्ष राज्यशास्त्राचे अध्ययन करणाऱ्या, अनुभवी प्राध्यापकाने केलेले असल्याने, पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे. पुस्तकात नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघ ,2009 पुर्वीचा मालेगाव मतदारसंघ तर 2009साली मतदारसंघाचे पुनर्गठन झाल्यानंतर अस्तित्वात  आलेल्या दिंडोरी मतदार संघ ,तसेच सध्या धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण,(सटाणा) आणि मालेगाव जिल्ह्याचा विचार करुन धुळे मतदार संघातील खासदारांची ओळख करून देण्यात आली आहे. धूळे लोकसभा मतदारसंघातील खासदारांची ओळख करून देताना त्यात बागलाण आणि मालेगाव तालूक्याचा समावेश झाल्यानंतरच्या काळातील खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे.बागलाण आणि मालेगाव तालूक्याचा समावेश नसतानाच्या काळातील खासदारांची ओळख करून देण्यात आलेली नाही, हे आपण पुस्तक वाचण्याचा आधी माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे.
     पुस्तक दोन भागात विभागले असून पहिल्या भागात जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, भौगोलिक या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागात प्रकरणनिहाय प्रत्येक खासदारांची ओळख करुन देण्यात आलेली आहे.प्रत्येक खासदारावर एक, एक प्रकरण आहे. अनेकांना खासदार म्हटले की फक्त लोकसभेचे खासदार आठवतात.मात्र सदर पुस्तकात लोकसभेबरोबर जिल्हाशी या न त्या कारणाने संबंध आलेल्या राज्यसभा खासदारांची देखील ओळख करून देण्यात आली आहे.तसेच संसदेचे सदस्य नसलेल्या मात्र भारतीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेल्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे.
     या पुस्तकात खासदारांची ओळख करुन देताना सुरवातीलाच त्यांचे संपूर्ण नाव अन्य कौंटुबिक माहिती, संपर्क पत्ता, आणि त्यांनी भुषवलेली विविध पदे यांची तक्ता स्वरुपात माहिती देवून या तक्त्यापुढे त्यांचा राजकीय प्रवास सांगितला आहे.राजकीय प्रवास सांगताना ही माहिती सहजसोप्या सर्वसामान्य जनतेला चटकन समजेल,अस्या स्वरुपात सांगितली आहे उगीचच पांडित्य दाखवण्याची सवय अनेक लेखकांना असते,मात्र याचा लवलेश देखील या पुस्तकात आढळतो नाही.
       पुस्तक जरी पत्रकारांना अधिक उपयोगी पडत असले तरी, सध्याचे लोकसभा निवडणूकीचे वातावरण बघता आपण ज्या पदासाठी व्यक्तीला निवडून देणार आहोत,त्या पदावर आतापर्यंत कोणकोणत्या व्यक्ती, येवून गेल्या?, या व्यक्तींची सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी  काय ,होती ?  त्यांनी  आपल्या परिसरात काय सुधारणा केल्या?याची माहिती मिळाल्यास आपणास लोकसभा निवडणूकीत योग्य खासदार पाठवणे सोपे होईल, म्हणून पत्रकार नसलेल्या व्यक्तीने देखील सदर पुस्तक वाचायलाच हवे.

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...