अविनाश भिडे यांनी त्यांच्या सुमारे पाच ते सहा महिन्याचा जपानच्या वास्तव्यात जपानची जी कार्यसंस्कृती अनुभवली त्याचे शब्दरूप म्हणजे मी वाचलेले हे पुस्तक होय. व्यवसायाने इंजिनियर आणि एका मेकॅनिकल कंपनीत उच्चपदस्थ असलेले, अविनाश भिडे हे भारतात कार्यरत असणाऱ्या, आपल्या कंपनीत बसवण्यात येणाऱ्या, एका यंत्राचे तांत्रीक प्रशिक्षण घेण्यासाठी, क्योटो मशिन कंपनीत गेले होते.त्यावेळी त्यांनी जपानची कार्यसंस्कृती जवळून अनुभवली. आपण अनुभवलेली जपानची संस्कृती त्यांना इतरांनी देखील अनुभवावी,असे वाटले.त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले.तेच हे सुमारे २००पानांचे पुस्तक. या पुस्तकाचे प्रकाशन सुकृत प्रकाशन करण्यात आलेले आहे.
सुमारे २०० पानाच्या या पुस्तकात ५७ विविध प्रकरणातून लेखकाने आपले वैयक्तिक अनुभव मांडले आहेत. या पुस्तकातून आपणास जपानी लोकांची आपल्या कार्याप्रती असलेली आत्मियता, त्यांची देशाप्रती असणारी निष्ठा, देशाचे अतिप्रगत तंत्रज्ञान, तेथील सामाजिक समरसता, परदेशी लोकांप्रती विशेषत: भारतीयांबाबत असणारी आपुलकी अस्या विविध गोष्टीची माहिती मिळते.प्रत्येक प्रकरणाच्या सुरवातीला या प्रकरणात काय वाचायला मिळणार हे पानाच्या एका बाजूला वेगळ्या रंगसंगतीत दिले आहे,त्यामुळे प्रत्येक प्रकरण सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.तसेच प्रत्येक प्रकरण जास्त लांबण न लावता आटोपशीर पद्धथतीने लिहलेले असल्याने अत्यंत वाचणीय झाले आहे,जे सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा खुप सोपी सहजतेने समजणारी आहे.
जपानची कार्यसंस्कृतीविषयी बोलताना लेखकाने त्यांची झिरो डिफेटेव्ह पद्धत,त्यांचे वेळेचे नियोजन, कायझेन पद्धत, टिम स्पिरीट,कोणत्याही गोष्टीचे सुक्ष्म नियोजन,इतरांचा साहनभुतीपुर्वक विचार करण्याची वृत्ती, क्वालिटी सर्कल ही संकल्पना वाडवडीलांच्या कर्तुत्वावर टिमकी वाजवण्यापेक्षा स्वकर्तृत्वाला जपानला देण्यात आलेले महत्व आपणास सांगितले आहे. जपानी लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयी बघायचे झाल्यास पुस्तकाचे वाचन केल्याने आपणास जपानची खाद्यसंस्कृती, तेथील लोकांची परिसर स्वच्छतेबाबतची खोलवर रुजलेली जाणिव, आपल्या वारकरीसारखी तेथील दिंडीची परंपरा, तेथील पोलीसी व्यवस्था,लोकांंची दुसऱ्यास मदत करण्याबाबतचा सहजभाव, वाहतूकीचे नियम पाळण्याचा त्यांची सहजवृत्ती,आदिंविषयी माहिती मिळते.तर त्यांचा बुलेट ट्रेन,डायव्हरविरहीत ट्रेन ,टोकियो टॉवर यांच्यविषयी वाचल्याने आपणास जपानचे तंत्रज्ञानातील हुकूमत समजून येते. तर लेखकाने आपल्या कामाच्या ठिकाणी, राहण्याचा ठिकाणी बरोबर असलेल्या लोकांबरोबर केलेल्या चर्चेतून आपणास जपानी लोकांचा भारताविषयीचा स्नेह,तसेच जपानी लोकांचा देशाभिमान, याविषयी माहिती मिळते..
आपण स्वत: जपानला गेले असल्यास आपले अनुभव ताडून बघण्यासाठी आणि न गेल्यास भारतात राहुन देखील जपान अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा