आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव जवळ आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील, मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी . गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अनेक माध्यमात आणि अनेक भाषेत लेखन प्रसिद्ध झाले आहे मात्र तरीदेखील लोक त्यांच्या मृत्यूस ६० वर्षे झाली तरी अजूनही लिहीत आहेत . यातच त्यांचे थोरपण दिसून येते त्यांचा या अकाली जाण्याविषयीच लिहलेले एक पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्ख्या असेलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशियक यांच्य सहकार्याने वाचले . 'व्यस्त ओढीचा त्रिकोण या प्रतीक प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि कृ, दा. परांजपे लिखित या सुमारे १५० पानी पुस्तकात १० प्रकरणाद्वारे या दुर्दवी घटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे यातील पहिल्या ५ प्रकरणात गुरुदत्त यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द कॊणत्या प्रकारे बहरात गेली. याचा सविस्तर आढावा घेण्यात अली या आढाव्यात त्यांची वहिदा रेहमान यांच्याशी कोणत्या प्रकारे ओळख झाली हे सांगण्यात आले आहे तर शेवटच्या पाच प्रकरणात मोठ्या प्रमाणात वहिदा रेहमान यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात तणावाचे प्रसंग येऊ लागले त्याला गीता दत्त आणि गुरुदत्त वहिदा रेहमान यांच्या जवळपासच्या व्यक्तीमुळे कसे प्रकारे खतपाणी मिळाले याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे पुस्तकाचे शीर्षक असलेल्या विषयाबाबत अर्थात गुरुदत्त गीता दत्तआणि वहिदा रहेमान यांच्यातील वादाबाबात भाष्य करताना लेखकांनी पुस्तकाची ६० %जागा व्यापली आहेतर ४० % जागा गुरुदत्त यांचा एकूण चित्रपट सृष्टीतील प्रवाश्यावर भाष्य करणारी आहे
पिवळ्या रंगाचे मुखपृष्ठअसलेल्या या पुस्तकावर असलेले गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रहमान याचे कृष्णधवल फोटो आपले लक्ष चटकन वेधून घेतात, आणि ज्यांना या विषयाचे थोडीतरी पार्श्वभूमी असलेल्या ,माझ्यासारख्या अनेकाना वाचायला प्रवृत्त करताच .या पुस्तकात शेवटच्या पाच प्रकरणात गुरुदत्त यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्याद्वारे गुरुदत्त आणि वहिदा रहेमान हे एकत्र येत आहे असा गैरसमज गीता दत्त यांच्यात कसा बळकावला तो दूर कारण्यासासाठी गुरुदत्त यांनी काय काय प्रयत्न केले याविषयी माहिती देण्यात आला आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर आणि सुरवातीच्या प्रास्ताविकेत कादंबरी असा उललके असला तरी हे पुस्तक कोणत्याच प्रकारे कादंबरी असे वाटत नाही तर अत्यंत सोप्या भाषेत अनेक तांत्रिक गोष्टीला बगल देत ज्यांना या विषयाची काहीच माहिती नाही सध्या सर्वसामान्य व्यक्तींना या विषयाची माहिती देणारे
पुस्तक म्हणून या कडे बघावे लागेल मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतले तेव्हा हा कादंबरी हा उल्लेख वाचला तेव्हा मला गो . नि . दांडेकर यांनी लिहलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दास डोंगरी राहतो ' या गोष्टीवेल्हाळ चरित्रासारखे हे पुस्तक असेल असे वाटले होते मात्र हे पुस्तक त्या प्रकारचे बिलकुल नाही गोष्टीवेल्हाळ पणा या पुस्तकात मला औषधाला अगदी १ % देखील आढळला नाही या पुस्तकात संपूर्णपणे गुरुदत्तचा उल्लेख एकेरी तो गुरुदत्त या प्रमाणे केलेला असला तरी त्यामुळे हे पुस्तक कादंबरी प्रकारात मोडता येऊ शकत नाही सुरवातीलाच्या एक दोन प्रकारात आपणस लेखन कादंबरीप्रमाणे काहीसे वाटते मात्र त्यानंतरच्या प्रकारांमध्ये हे पुस्तक पूर्णतः माहितीप्रधान लेखाचे स्वरूप घेतेआपणास या घटनेची संपूर्ण माहिती असली तरी हि माहिती किती सहजतेने सांगता येऊ शकते या साठी किना ज्यांना या विषयी काहीही माहिती नाही त्यांना या विषयाची टॉड ओळख होण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकादफा तरी हे पुस्तक वाचायलाच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा