आपल्या मराठीत विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच या साहित्यात समाजातील सर्व जातीच्या व्यवसायाच्या ,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत,गरीब ,मध्यमवर्गीय असा सर्व स्तरातील व्यक्तींच्या जीवनाचे खुबीने चित्रण केलेले आढळते. साहित्याचा वैवध्येतेची परंपरा मराठी साहित्यात खुप वर्षापासून आढळते. या वैभवशाली साहित्यातील एक घटक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिसलेला हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह .नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या पुस्तक संग्राहलायतून मी हे पुस्तक. मी नुकतेच वाचले.
सुमारे ८ते १० पानी असलेल्या १२कथा या कथा संग्राहात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक कथेचे सुत्र ग्रामीण जीवनात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आले आहे. कथेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेचा वापर देखील खुबीने केल्याचा दिसून येते.प्रत्येक कथा उलगडताना पार्श्वभुमीवर जास्त चर्चा लेखकाने केलेली नाही.अत्यंत हळुवारपणे मात्र न रेंगाळता सुरवातीच्या अर्ध्या ते एक पानात लेखकाने पात्र परिचय आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे.
पहिल्या कथेचे शिर्षक 'देवा सटवा महार' हे आहे.या कथेत अज्ञानामुळे आणि गरिबीमुळे एक महार समाजबांधव कसा नागवला जातो,त्याने बघितलेल्या स्वप्नाचा कसा चकाचूर होतो,हे १०पानांत लेखकाने मांडलयं वडार समाजबांधवांचे दैन्य दु:ख आपणास ९पानाच्या 'वडारवाडीच्या वस्तीत',या दुसऱ्या कथेतून समोर येतेय. पडकं खोपट या कथेतून काही कारणाने गुन्हेगारीच्या चक्रात अडकलेल्या दोन कुटुंबप्रधान व्यक्तीमुळे कुटुंबाची कसी वाताहात हे समजते.ही या पुस्तकातील तिसरी कथा आहे. काळ्या तोंडाची आणि एकटा या अनुक्रम चौथ्या पाचव्या कथेतून प्राण्याचा भावना कथेतून डोकावतात.या दोन्ही कथांचे नायक आणि नायीका हे कुत्रे आहेत.पोकळी असे शिर्षक असलेल्या सहाव्या कथेतून काही कारणाने नोकरी न मिळाल्याने आणि व्यवसाय देखील करु न शकलेल्या प्रेमभंग झालेल्या माधव कुलकर्णी याचे व्यक्तीचित्र लेखक आपणासमोर उभे करतो.
सातव्या कथेत श्याम नावाच्या आईवडील नसलेल्या आणि मोठ्या विवाहीत बहीणीच्या आधाराने लहान कुटुंबियांना सांभाळणाऱ्या श्याम नावाच्या प्रेमप्रकरणात अयशस्वी ठरलेल्या, आणि आपले दुःख कोणाला तरी सांगण्यासाठी आसुसलेल्या व्यक्तिरेखेसी लेखक आपली भेट करवून देतो.या कथेचे शिर्षक वसाण आहे.विपरीत घडले नाही या आठव्या कथेत एका जोगीण आणि तीला मदत करणाऱ्या विठ्ठलाचे भावविश्व आपणास दिसते. हस्ताचा पाऊस या कथेत आपणास गाढव आणि मालक यातील सबंध लेखक उलगडून सांगतो .हस्ताचा पाऊस ही या कथासंग्रहातील नववी कथा आहे.याच कथेवरून कथासंग्रहाचे नाव हस्ताचा पाऊस हे घेतले आहे.मायलेकाचा मळा या दहाव्या कथेत गावात एकेकाळी कुलकर्णीपद भुसवणाऱ्या मात्र घरातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर ते सोडून शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या मात्र त्यावेळीच गावातील सावकरांकडून त्रास सहन करणाऱ्या मायलेकाची गोष्ट लेखक आपल्यापुढे सादर करतो. शेवटून दुसऱ्या असलेल्या ११व्या कथेत सुद्धा सांदीपान आणि त्याची आई येशा या मायलेकांची गोष्ट आहे.हे दोघे महार बांधव आहेत परिस्थितीने पिचलेले आहे.तर कथा संग्रहातील शेवटची बारावी कथा पती असताना प्रचंड श्रीमंती बघितलेल्या मात्र पती निधनानंतर गरीबीत जिवन जगणाऱ्या विधवा पत्नींची आणि तिच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे
पुस्तकाच्या कथा सहजसोप्या चटकन समजणाऱ्या, आणि छोट्या आहेत.तसेच त्यामुळे मनोरंजन देखील उत्तम होते .तरी किमान एकदा तरी त्या वाचल्याच पाहिजे असे माझे मत आहे.