बुधवार, ४ मार्च, २०२६

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'


मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दया पवार लिखित 'बलुतं' हे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र मी नुकतेवच वाचले. समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं' असे त्याचे एका वाक्यात वर्णन करता येईल आपल्याच समाजातील एका घटकाचे आयुष्य किती त्रासदायक आणि कष्टकरी होते याचे मन सुन्न करणारे वर्णन सुमारे २०० पानी पुस्तकात आहे.समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतेचे काम करून सुद्धा समाज आपल्यातील एकाला कोणत्या प्रकारे हीन वागणूक देत होता हे या पुस्तकाच्या वाचनातून मला पुन्हा एकदा समजले. 
मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना किबे थेटरमध्ये 'तुरुंग देश' हा माहितीपट बघितला होता.त्यावेळी पडद्यावर बघितलेली दाहकता मी या पुस्तकातून पुन्हा एकदा अनुभवली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 'हीच आमुची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हे का आवश्यक आहे हे या आतमचरित्रामुळे मला समजले. शून्यातून विश्व निर्माण करणारा लेखक म्हणजे दया पवार असं सांगत
दलित समाजात जगताना येणाऱ्या अडचणी आपल्यासमोर मांडत त्यावेळच्या त्याकाळच्या लेखकाच्या आयुष्यात घेऊन जाणार पुस्तक असे देखील आपण या पुस्तकबाबाबत म्हणू शकतो.  
या पुस्तकात दया पवार यांनी एका सत्कारप्रसंगी अनेक चित्रपट मालिकांमध्ये दाखवत त्या प्रमाणे स्वतःच्याच आत्मा शरीराच्या बाहेर पडून बोलतो त्या प्रकराची पार्श्वभूमी . वापरात हे लेखन केले आहे समाजातील तथाकथित उच्चवर्णीयांकडून त्यांना देण्यात आलेला त्रास त्यांची झालेली अवहेलना याविषयी त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. मात्र पुस्तकात कुठेही टीकेचा सूर नाहीबलुतं हे मराठीतील पहिल दलित आत्मचरित्र मानल जात. या पुस्तकान मराठी साहित्यविश्वात दलित साहित्यप्रवाहाची सुरुवात केली. पुस्तकाने दलित समाजाच्या अनुभवांना साहित्यिक मान्यता दिली आणि त्यांच्या आवाजाला प्रतिष्ठा प्राप्त झाली  
. पपूर्वीच्या ग्रामीण जीवनात बलुतं गावातील इतर समाज घटकाची जसे की मराठा,ब्राह्मण  यासाठी काम करत आणि त्याबद्दल
त्यांना जे दिलं जात होतं याबद्दल या व्यक्तींना जे दिले आजच्या असे त्याला बलुतं असे म्हणत अशी विविध माहिती मला पुस्तकवाचनाच्या निमित्ताने झाली . स्वतःची काहीही चूक नसताना बरच काळ समाजातील एका घटकला  विनाकारण अपमानाला कसे सामोरे जावे लागत होते,हे समजून घेण्यसाठी प्रत्येकाने किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्...