लेखाचे विषय

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

उत्कृष्ट वाचन म्हणजे ?

 

दिसामंजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे शहाणे करून सोडावे सकल जन  असे  श्री समर्थ रामदास स्वामी  यांचे वचन आहे . माणसाने नेहमी ज्ञानप्राप्तीच्या साधनेत तरी असावे, किंवा दुसऱ्या व्यक्तीना ज्ञान देण्याच्या कार्यात मग्न असावे . अशा या वचनाचा अर्थ आहे               

         आता ज्ञानप्राप्ति वाचनाने होत असली तरी या वाचनाचे विविध प्रकार आहेत. कोणी साहित्यकृती वाचून ज्ञानप्राप्ति करेल तर कोणी विविध प्रकारची पुस्तके मासिके आणि रोजची वर्तमानपञे वाचून आपली ज्ञानसाधना करेल .आता रोजची विस पंचवीस वर्तमानपञे विविध मासिके वाचणे म्हणजे वाचन समजायचे का हा वादाचा मुद्दा होइल काहींचा मते चांगल्या साहित्यकृतीचे वाचन म्हणजेच वाचन होय. मासिके वर्तमानपञे कितीही वाचली तरी ते वाचन नव्हे, असो .हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवूया क्षणभर .

                              चांगल्या वाचनाची व्याख्या काय समजायची  जर पुस्तकांचे वाचन म्हणजेच वाचन असे समजले तर कोणत्या पूस्तकांचा वाचनाला अग्रक्रम देयचा साहित्यकृती असणारऱ्या पुस्तकांना ज्यामुळे 

भाषावैभव वाढते, की भले भाषा वैभवात कमी असणाऱ्या माञ एखाद्या विषयातील माहिती असणाऱ्या पुस्तकांना अधिक महत्व देयचे?   माझ्या स्वता:चा अनुभवा नुसार मला हे व्यक्ती सापेक्ष वाटते कारण मला स्वत: ला दोन व्यक्तीनी ज्याची टेबले एकमेकास लागून आहेत .अश्या व्यक्तीपैकी एकाने, "अजिंक्य तुझे वाचन फारच कमी आहे ते तुझा भाषेतून जाणवते असे म्हटले होते तर दुसऱ्या व्यक्तीने अजिंक्य तुझे वाचन खुप आहे तुझ्या ज्ञानातून ते जाणवते असे म्हटले होते .अर्थात दोन्ही व्यक्तीनी वेगळ्या प्रसंगी ते म्हटल्याने त्यांची जुगलबंदी काही रंगली नाही असो या विषयी तुम्हाला काय वाटते

                                                  माञ सखोल तसेच विस्तृत वाचन कशाला म्हणायचे हा मुद्दा आहेच ना ? एखाद्या विषयासंबधी उपलब्ध सर्व असे वाचले की ,समजायचे का ? सदर व्यक्तीचे वाचन परिपुर्ण आहे . अश्या व्यक्तीचे वाचन , मुंबईतील उंच अश्या स्काय स्कँपर  ज्यात अत्यंत कमी जागेत जास्तीत जास्त लोक राहत असतात, त्यासारखे आहे असे मला वाटते. जर या ईमारतीला  लागणारी जागा म्हणजे एखादा विषय आहे त्या इमारतीची उंची म्हणजे त्याचे त्या विषयातील ज्ञान आहे असे समजल्यास. सदर मुद्दा अधिक चांगल्या पध्दतीने

समजेल.  असे वाचन चांगले  ? की  बंगलोर पँटन( बंगलोर मध्ये उंच इमारती नाहीत शहरात छोट्या इमारती खुप आहेत त्यामुळे शहर लांबट झाले आहे)  चांगला ज्यात भले विषयातील ज्ञानाची खोली कमी असेल , माञ अधिक विषयाचे ज्ञान असेल तर  अश्या माणसाचे ज्ञान परिपुर्ण मानायचे का ?

         वाचनाची व्याख्या काय ?आणि समृद्ध  वाचनाचे आपले निष्कर्ष काय ? जाता जाता एक आठवण करुन देतो आचार्य विनोबा भावे यांनी वाचनाविषयी मांडलेले मत हे पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी मराठीत अजरामर केलेल्या सखाराम( आणि दुसरा सखाराम म्हणजे तेंदुलकरांचा सखाराम अर्थात सखाराम बांइडर आहे ) म्हणजेच गटण्यांचा सखाराम विषयी आहे त्यामुळे वाचन चांगले की वाईट हा मुद्दाच नाहीये तर वाचना विषयीचा अन्य मुद्द्याना स्पर्श करण्याचा माझा प्रयत्न आहे. या विषयी खुप काही बोलण्यासारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

वाचनाचे नव्या जगातील स्थान


 आज घरी टिव्ही बघत असताना एका बुक रिडर ची जाहीरात बघीतली आणी मनात विचार आला की वाचन ही संकल्पना किती बदलली आहे पुर्वी वाचन म्हटले की फक्त छापील मजकुर डोळ्यासमोर येत असे आता पुस्तक वाचन म्हणजे ईलेक्ट्रीक उपकरणाचा वापर करत केलेले वाचनच   समोर येते        

     पुस्तक ही संकल्पना पण सध्याचा काळात  किती बदलली आहे पुर्वी पुस्तके वाचली जायची आता पुस्तके वाचली जात नाही तर पुस्तके ऐकली जातात त्याला अॉडीयो बुक म्हणतात  श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दिसांमंजी काही तरी लिहावे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असे दासबोधात लिहले आहे. त्या काळात फक्त कागदावरची  पुस्तके होती  आणि तिही हाताने लिहलेली होती. छापलेली नसत. तरी त्यांनी वाचनाचे महत्व ओळखले होते                 

  छापलेली पुस्तके हातळण्यापेक्षा बुक हातळणे खुप सोईचे होते माझ्या स्वता:च्या मोबाईल मध्ये सुध्दा 8 बुक आहेत  .ऑडियो बुक ची तर गोष्ट वेगळी ती एकदा  डाउनलोड केली की झाले तुम्ही ज्या उपकरणात ते डाउनलोड केले (त्याला ब्ल्युटुथ असली तर तर सोने पे सूहाणा  आणी तुयच्याकडे कानाच्या मागे ब्ल्युटुथ च्या मार्फत डेटा हस्तांतरण करणारे उपकरण असले की दुधात साखर  दोघांच्या संपर्क झाला की  एका बाजुला गाडी

चालवत असताना सुध्दा  या उपकरणाच्या  साह्याने मोबाईलवर बोलता येते अश्या पध्दतीने मोबाईल वर बोलले तर मानेच्या विविध कसरती करता मोबाईल वर बोलता येते आणि सध्या च्या काळात नाशकात तरी मानेच्या कसरती करत मोबाईलवर बोलले तरच पकडले जाते आणि पकडली जाते. ती चोरी अशे आपल्याकडे म्हटले जात असल्याने नाशकात हा कायदेभंग चालू शकतो ,असे माझे मत अहे मी माञ हे करत नाही याची नोंद घ्यावी )

     तंञज्ञानामुळे  ज्याप्रकारे पुर्वी घराघरात म्हणत त्याच धर्तीवर बोलायचे झाल्यास मोबाईल मोबाईल मध्ये वाचनालये आली आहेत ते पुस्तकांचे जतन करा ती फाटणार नाहीत वाळवी लागणार नाहीना त्यांना याची चिंता करत बसा त्यांचे तेल पाणी अश्या घटकांपासून रक्षण करा

               सगळ्या कटकटी संपल्या ना या मुळे जर वाचनालयात  आपणास पाहीजे असणाऱ्या पुस्तकाच्या मर्यादित प्रती असल्या की ते  वाट बघत बसा या सगळ्या  कटकटीला सुट्टी आले मनात करा पुस्तक डाउनलोड (त्यातही मँकडोनाल्ड सारख्या काही वेळ फुकट वाय फाय देणार्या गोष्टीच्या जवळ  गेले तर इंटरनेटचे पैसै पण लागत नाही ) वाचून झाले की करा डिलीट कोण ते सांभाळयाचे कष्ट घेणार त्याला कव्हर वगैरे घालत वेळ वाया घालवणार ? सगळे कसे सुटसुटीत आणी छापील पुस्तके जाणार म्हणून रडण्याचे काही कारण नाही कारण मराठीतील एक ज्येष्ठ कवी  केशवसुत यांनी जून्या गोष्टीचा त्याग करण्यास त्यांचा कवीतेत सांगीतले आहेच  त्यांनीच सांगीतले आहे जुने ल्गू द्या मरणा लागूनी जाळूनि अथवा पुरुनी टाका  या ठिकाणी छापील पुस्तके म्हणजे त्या जून्या गोष्टी तरी जूने ते सोने या प्रमाणे छापील पुस्तकाबाबत अश्रु ढाळणे संयूक्तिक नाही असे माझे प्रामाणीक मत आहे  तरी काही अनंत फंदिचे वंशज धोपटमार्गाचा अवलंबन करण्याचा सल्ला विचारात घेउन बदल स्विकारणार नाहीत याची मला जाणीव आहेच बघू कोण जिंकते ? या विषयावर खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

         तूम्ही  एका बाजुला दूसरे काम करत असताना सूध्दा पुस्तकाचा आस्वाद घेवू शकता आणि या प्रकारासाठी पण बुक प्रमाणे फारशी जागा लागत नाही. मी जेमतेम दिड जीबी जागेत किमान  साडे चारशे पानाचे  पुस्तक घेउन  फिरु शकतो ते पण माझ्या मोबाईल फोन मध्ये .

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

कथा सोन्याचा व्यवसायाची

 

आपल्याकडे गुरु पुष्पामृत योग, दसरा,लग्न आदी प्रसंगी सोने खरेदीची प्रथा आहे. काही लोक दागिन्यांसाठी तर काही लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतातमात्र या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींचे जीवन कसे असते ? सोन्याचे दागिने तयार करणारे  सुवर्णकार आणि सोने विकणारे सराफ यांचा खेरीज अन्य कोणते घटक या व्यवहाराशी संबंधित असतात . त्यांचे जीवन कसे असते ? सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघावे की दागिने करण्याचा एक धातू म्हणून बघावे ? सोने कसे खरेदी करावे?,  ज्यामुळे ते मोडताना घट येणार नाही सध्याची या व्यवसायाची परिस्थिती कशी आहे ? सोन्याच्या व्यवसायातील  सध्याच्या  अडचणी काय आहेत . दागिने कसे तयार करतात . सोन्यातील भेसळ कशी ओळखावीसोन्याविषयी  कोणते विविध कायदे होते आणि सध्या आहेत ? सराफ आणि सुवर्णकारांनी आपल्या उद्योगाच्या रक्षणासाठी आंदोलने केली का ? त्याची फलनिश्चिती काय झाली ? आदी अनेक प्रश्नाची सहजसोप्या ओघवत्या  मराठी भाषेत माहिती देणारी अत्यंत मोजकी पुस्तके मराठीत आहेत . आणि या मोजक्या पुस्तकांमध्ये नाशिकच्या सोमवार पेठेतील सराफ श्री सुनील शिरवाडकर यांनी लिहलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या " सोन्याचा संगतीत " या पुस्तकाच्या समावेश करावाच लागेल .

            मराठीतील एक श्रेष्ठ लेखक , विनायक पाटील यांची प्रस्तावना लाभलेल्या या  150 पानाच्या  पुस्तकात लेखकाने 31 प्रकरणातून त्याचे स्वतःचे व्यवसायातील अनुभव आणि  व्यवसायाविषयक माहिती सांगितली आहेच त्याखेरीज सध्याच्या नोकऱ्या जाण्याचा काळात चरितार्थ चालवण्यासाठी काय करावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे . त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्रतील महत्तवाचे शहर असलेल्या  नाशिक शहरातील सराफ 

बाजाराचा इतिहास, त्याचा पुढील आव्हाने समस्या, सोन्या इतकाच मौल्यवान धातू असणाऱ्या चांदीचा  व्यवसाय कसा चालतो ,?  महाराष्ट्राखेरीज गुजरात राज्यातील  राजकोट आणि कर्नाटक  आणि  महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात  अर्थात कोल्हापूर आणि  बेळगाव जिल्ह्यात सोन्याचा आणि  चांदीचा व्यवसाय कशा चालतो याचीही माहिती आपणास या पुस्तकातून मिळते  

हे पुस्तक निवळ माहिती देणारे पुस्तक  नसून सुमारे 40 वर्ष लेखकाने  स्वतः सोन्याचा व्यवसायात विविध पदावर काम केल्याने आणि त्याचा योग्य त्या ठिकाणी यथोचित वापर केल्याने पुस्तक सुरवातीपासून शेवटाकडे अधिकाधिक रंजक होत जाते . लेखकाने पिढीजात व्यवसायात कसा  प्रवेश केला ?   व्यवसायात स्थिरस्थावर

होण्यासाठी लेखकाने कोणकोणत्या खस्त्या खाल्या ? वेळोवेळी मिळणाऱ्या अनुभवातून लेखक कशा पद्धतीने शिकत गेला लेखकाने या पिढीजात व्यवसायाखेरीज अन्यत्र काही चरितार्थासाठी काही केलेलं का ? नाशिकचे विश्व सन 1929पासून  कशे कशे आधुनिक बनत गेले ? याबाबत देखील माहिती यात मिळते

मी नुकतेच हे पुस्तक वाचले . पुस्तक उत्तम आहे . सध्याचा काळात पुस्तकाच्या  किमती गगनाला भिडलेल्या असताना फक्त 200 रुपयातील हे पुस्तक संग्रही आसवेच असे आहे मग कधी घेताय हे पुस्तक वाचायला

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...