लेखाचे विषय

गुरुवार, ७ मे, २०२६

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची शितू असो किंवा डॉ सुमती देशपांडे यांनी लिहलेली सुप्रसिद्ध अशी महाश्वेता ही त्यांची प्रमुख उदाहरणे त्यापैकी महाश्वेता या कादंबरीवर आधारित मालिका खूपच गाजली होती.  याच मालिकेत समाविष्ट होऊ शकेल मात्र तिच्यावर  चित्रपट किंवा मालिका निघालेली नाही अशी कादंबरी म्हणजे अण्णा भाऊ साठे लिखित फकिरा. लौकिक अर्थाने फारसे शिक्षण नसले तरी अंगभूत प्रतिभा, जगताना आलेले अनुभव यातून किती उत्कृष्ट कलाकृती जन्माला येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'फकिरा ही  कादंबरी जी मी नुकतीच वाचली जी वाचताना आपल्याला एका योध्याची संघर्षाची कथा वाचत आहोत हे पदोपदी जाणवते 

फकिरा ही मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेली आणि सामाजिक आशयाने समृद्ध अशी कादंबरी आहे  आजपासून ६५ वर्षांपूर्वी १९५९ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालाय. 
या कादंबरीची कथा ब्रिटिशकालीन ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडते. जी प्रामुख्याने सध्याच्या कराड सातारा बेळगाव या परिसराच्या पार्शवभूमीवर आधारित आहे ‘ समाजातील धाडसी, स्वाभिमानी आणिअन्यायाविरुद्ध लढणारा फकिरा कादंबरीचा नायक आहे,जो वयाने  तरुण आणि जातीने फकिरा मातंग आहे. 
 समाजातील खालच्या स्तरातील लोकांवर होणारे अत्याचार, जातीय भेदभाव आणि सत्ताधाऱ्यांची दडपशाही याविरोधात तो आवाज उठवतो. गावातील गरीब आणि वंचित लोकांचे दुःख पाहून त्याच्या मनात बंडाची ठिणगी पेटते. आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तो संघर्षाचा मार्ग स्वीकारतो.त्याचीच ही कथा 'फकिरा' 

फकिराचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे कऱण्यात अण्णा भाऊ साठे यशस्वी ठरलेत.   तो केवळ शूर योद्धाच नसून संवेदनशील आणि लोकांप्रती कर्तव्यभावना असलेला नेता आहे. दुष्काळ, उपासमार आणि अन्यायाने त्रस्त
झालेल्या लोकांसाठी तो ब्रिटिश सत्तेविरोधात उभा राहतो. गरिबांसाठी धान्य मिळविण्याच्या उद्देशाने तो सरकारी खजिन्यावर धाड टाकतो. त्यामुळे तो सत्ताधाऱ्यांच्या नजरेत गुन्हेगार ठरतो; मात्र सामान्य जनतेसाठी तो नायक बनतो. हे आहे कादंबरीचे कथासूत्र. 

फकिरा ही केवळ एका व्यक्तीची कथा नसून शोषित समाजाच्या संघर्षाची गाथा आहे. अण्णा भाऊ साठे यांनी ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर करून कथेला वास्तवतेची ताकद दिली आहे. कादंबरीतून स्वातंत्र्य, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश दिला जातो. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे हे साहित्य आजही तितकेच महत्त्वपूर्ण वाटते.
फकिरा त्याच्या कार्यात खरच यशस्वी होतो का ,की सरकार विऱोधोई कृत्ये केले म्हणून  होते ? अटक झालेली असेल तर त्याच्या मृत्यू कोठडीतच होतो कि त्याची सुटका होत ? जर सुटका होत असेल तर कशी होते या सारख्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यसाठी आपण हि कादंबरी अवश्य वाचावी कादंबरी फार मोठी नसल्याने सहज आठवडा पंधरवड्यात पूर्ण होते मग वाचणार ना फकिरा 

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या महाश्वेता कादंबरीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...