सोमवार, २० एप्रिल, २०२६

जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )

पुस्तकाच्या विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत आहेत. हे बदल पुस्तकाच्या स्वरूपात जसे प्रिंटेड पुस्तक, इ बुक आणि ऑडिओ बुक या सर्वच प्रकारात होत आहेत त्यामुळे पुस्तकाचे वितरण साठवणूक यात देखील मोठया प्रमाणात  बदल होत आहे. या बदलामुळे सध्या आहे त्या प्रकारे प्रकाशकाचे स्थान राहिला का अशा प्रश्न देखील काही प्रमाणात उपस्थित होत आहे. प्रिंटेड पुस्तकाच्या बाबत लेखकाला मेंदू म्हटल्यास ज्याला हृदय म्हणावे लागेल असा घटक म्हणजे प्रकाशक असतो.एकवेळ मेंदू काम करेनासा झाला तरी व्यक्ती कोमात  जाऊन जिवंत राहू शकतो.  मात्र हृदयचे तसे नसते.  हृदयाचा खेळ संपला कि मानवाचा मृत्यू होतो आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मनुष्याच्या मृत्यू म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे असे समजते . हे समजून घेतल्यास पुस्तकाच्या बाबत प्रकाशक किती महत्वाचा असतो हे अंजुटे आणि सध्या पुस्तकाच्या क्षेत्रात होणारे बदल या प्रकाशकलालाच बाहेरचा रस्ता दाखवत आहेत यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे 

तर पुस्तकांच्या क्षेत्रातील हृदयाला अर्थात प्रकाशकला धडकी भरवणारा घटकाचे नाव आहे पुस्तक ऑन डिमांड ज्यात पुस्तक आधी छापले जात नाही, तर जेव्हा कोणी ऑर्डर देतो तेव्हाच ते छापले जाते.पुस्तकाचा मजकूर (PDF/फाईल) डिजिटल स्वरूपात ठेवला जातो जेव्हा ग्राहक ऑर्डर करतो तेव्हा ते पुस्तक प्रिंट करून बाइंड करून पाठवले जाते . पारंपरिक पद्धतीत   पुस्तके आधी छापावी लागतात तर पुस्तक व डिमांड मध्ये फक्त 1 कॉपी ऑर्डर आली तरी छापली जाते. यामुळे काय फायदा होतॊ याचा विचार केला तर स्टॉक ठेवण्याची गरज नाहीअर्थात  गोदाम लागत नाही खर्च कमी होतो न विकल्या गेलेल्या पुस्तकामुळे होणाऱ्या नुकसानाचा धोका कमी होतो तसेच लवकर प्रकाशन शक्य होते .नवीन लेखक (self-publishing), शाळा/
कॉलेज नोट्सकमी मागणी असलेली पुस्तके जर्नल, प्लॅनर, वर्कबुक आदींसाठी हि पद्धत सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जाते आपल्या मराठीत सध्या या प्रकारची पुस्तके कमी आहेत मात्र नाहीतच असे म्हणणे चुकीचे ठरेल हे नक्की 

अर्थात जगात बदल हे होतच असतात या जगात कोणतीच गोष्ट चिरकाल टिकणारी नाही  यात फक्त एकाच गोष्टचा  अपवाद आहे तो म्हणजे स्वतः बदलाचा तो कधीही थांबत नाही नेहमीच घडत असतोपुस्तकाच्या विश्वाला देखील हा नियम लागू होतो हेच पुस्तक व डिमांड यातून दिसून येत आहे असे म्हणता येईल 

याचा दुसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

 https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/02/2.html


याचा पहिला  भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर  क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/02/blog-post_22.html


जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )

पुस्तकाच्या विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत आहेत. हे बदल पुस्तकाच्या स्वरूपात जसे प्रिंटेड पुस्तक, इ बुक आणि ऑडिओ बुक या सर...