आपल्याकडे पाकिस्तानचे नाव निघाल्याबरोबर सर्वसाधारतः वैरभावना जागृत होते आता काश्मीरमध्ये दहशदवादी कारवाया होत नसल्या तरी, या आधी काश्मीर मुद्यावरून झालेली तीन युद्धे बघता, ती बरोबरच म्हणता येईल . मात्र ही युद्धे तेथील राजकारणी आणि लष्करशाहीने भारतावर लादलेली होती तेथील जनसामान्यांनी भारताबरोबर केलेली युद्धे नव्हती ती. राजशात्राचा विचार करता, सर्वसामान्य जनता आणि शासनकर्ते या दोन्ही एकमेकांना पूरक मात्र एकमेकांपासून पूर्णतः वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे त्यांची सरमिसळ करत शासनकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची मते एकच आहेत असे समजणे चुकीचे आहे, एकेकाळी एकाच देशाचा भाग असलेल्या आणि आपल्या भारतात काही वर्षापर्यत दहशतवादी कारवाया करणाऱ्या आपल्या शेजारी देशाची मोठ्या प्रमाणात माहिती असणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते आपणस माध्यमात येणाऱ्या बातम्यांद्वारे तेथील शासनकर्त्यांची मते समजतात मात्र सर्वसामान्य जनतेची मते समजत नाहीत त्यामुळे आपले पाकिस्तानविषयक मते अपुऱ्या माहितीवर आधारित असतात , असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही मग पाकिस्तानविषयक अचूक मत होण्यसासाठी आपनास सर्वसामान्य जनतेचे मत विचारत घेणे क्रमप्राप्त ठरते
कोणत्याही दोन व्यक्तींचा समाजाचा परस्पर संबंध आल्यास त्या समाजाची अचूक माहिती मिळते आता आपल्या भारतीयांचा आणि पाकिस्तानी समाजाचा थेट संपर्क येणे अवघड पाकिस्तानचा व्हिसा मिळणे भारतीयांसाठी अत्यंत अवघड आहे मग काय करायचे? तर जे भारतीय पाकिस्तानला भेट देऊन आले आहेत त्यांचे पाकिस्तानमधील अनुभवांवर आधारित लेखन वाचायचे आणि त्यांचा अनुभवविश्वाशी आपले अनुभ ताडून घेयचे आणि पाकिस्तानबाबत आपली समज अधिक विकसित करायची, या दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रक्रियेतआपल्यास मोठ्या प्रमाणात मदत करते ते पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि मनीषा टिकेकर लिखित 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान' हे पुस्तक जे मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठी सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने वाचले
१९९९ साली अमेरिकेच्या फोर्ड फाऊंडेशनतर्फे एशिया फेलोज प्रोग्रॅम जाहीर झाला या प्रोग्राममध्ये आशियाई देशातील नागरिकांना दुसऱ्या आशियाई देशात जावूं तेथील समाजजीववनाचा अभ्यास करता येणार होता याच कार्यक्रमांनातर्गत लेखिकेला सहा महिने पाकिस्तानात जाऊन तेथील समाजजीवन जवळून बघण्याची संधी मिळाली या दरम्यान लेखिकेला जे अनुभव आले ते म्हणजे सदर २४७ पानाचे हे पुस्तक होय पुस्तक प्रास्ताविक, पाकिस्तान सांस्कृतिक वीण, पाकिस्तान राजकारणाचा बाज, पाकिस्तान सामाजिक पैलू या चार भागात विभागले आहे सहजा प्रास्ताविकला पुस्तकाचा भाग समजत नाही याही पुस्तकात तसे केलेले नाही मात्र एकूण पुस्तकाच्या पानाचा विचार करता जवळपास १० टक्के भाग (२३ पाने ) हि प्रास्ताविकात व्यापली गेली असल्याने मी याचा स्वतंत्र्य भाग केला आहे प्रत्येक भाग २ ते ७ प्रकरणात विभागाला आहे .
प्रास्ताविकात लेखिकेला पाकिस्तानचा व्हिसा मिळण्यासाठी काय अडचणी आल्या / त्या कोणत्या प्रकारे सोडवण्यात आल्या .त्यासाठी लेखिकेला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची कोणत्या प्रकारे मदत झाली तसेच व्हिसा मिळवतना वाया गेलेला वेळ फोर्डने कसा माफ केला ? याविषयी सांगितले आहे
पहिल्या पाकिस्तान सांस्कृतिक वीण या भागात लेखकेने तिच्या पाकिस्तानमधील वास्तव्यात तिने भेट दिलेल्या इस्लामबाबाद, लाहोर पेशावर कराची, तक्षशिला, रावळपिंडी या शहरांविषयी सांगितले आहे यात फक्त मी येथे या व्यक्तींना भेटले असे सांगितले नसून शहर कसे आहे शहराची ओळख देखील यामध्ये करून देण्यात आलेली आहे प्रत्येक शहराला इतिहासाचा वारसा असतो सांस्कृतिक ओळख असते लेखिकेने आपल्याला तिच्या लेखनात इस्लामबाबाद लाहोर पेशावर कराची तक्षशिला रावळपिंडी येथील ओळख करून देताना याचा आधार घेतल्याचे आपणस समजते प्रास्ताविक वगळून असलेल्या पुस्तकाचा विचार करता, जवळपास निम्मे पुस्तक या भागाने व्यापले आहे.
दुसऱ्या भागात अर्थात पाकिस्तान राजकारणाचा बाज या भागात पाकिस्तानमधील लोकशाहीविषयी आणि लष्कराच्या सहभागविवषयी दोन प्रकरणाद्वारे सांगितले आहे , हा भाग पुस्तकातील सुमारे ५० पाने व्यापतो
तिसऱ्या भागात सुमारे ४० पानांद्वारे लेखिकेने पाकिस्तानी समाजसांस्कृतिक विश्व आणि सर्वसामान्य पाकिस्तानी व्यक्तीला भारताविषयि काय वाटते याविषयी ३ प्रकरणाद्वारे सांगितले आहे
लेखात सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानविषयी तेथील समाज जीवांविषयी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा