तरुणपणी अत्यंत यशस्वी असलेल्या मात्र म्हातरपणात सर्वकाही मुलांकडे सोपवल्याने कफल्लक झालेल्या एका नटाची कथा या नाटकात सांगण्यात आल्याचे आपणास माहिती असेलच. माझ्यामते या नाटकाचे थोडक्यात वर्णन करायचे असल्यास गुरुदत्त या दिग्दर्शित केलेल्या प्यासा या चित्रपटातील 'जाने वो कैसै लोग थे,जिनको प्यार को प्यार मिला, जब हमने कलीयां मांगी काटांका हार मिला' हे गाणे योग्य
ठरेल.दोन्ही ठिकाणी त्यांचा अपेक्षाभंगच दिसतो. तो देखील आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून तसेच दोन्ही वेळेस आधार मिळतो तो, रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीकडून.
ठरेल.दोन्ही ठिकाणी त्यांचा अपेक्षाभंगच दिसतो. तो देखील आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून तसेच दोन्ही वेळेस आधार मिळतो तो, रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीकडून.
नटसम्राट या नाटकामध्ये आणि प्यासा आपणास मानवी जीवनातील सत्यस्थिती दाखवून देते.जग मानवी नात्यापेक्षा पैश्याला अधिक महत्त्व देते.पैसा असेल तर जग मानदेते.पैसा नसेल तर आपले म्हणवणारे देखील परके कसे होतात.तसेच जगात सर्वत्र वाइटच लोक आहेत असे नव्हे तर जगात कमी प्रमाणात का होईना,चांगल्या व्यक्ती देखील आहेत,हा संदेश आपणास नटसम्राट आणि प्यासामधून मिळतो.एका अर्थाने एकच कथा यात दोन वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.हे दोघे कलातित सत्यच मांडतात हे तितकेच खरे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा