शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

खरे खुरे आत्मचरीत्र .... स्मृतिचित्रे

    आपल्या मराठीत आत्मचरित्रांची मोठी परंपरा आहे. मात्र बहुसंख्य आत्मचरित्रात स्वत:चे दोष मान्य करा सोडाच,आपल्यात मुळात नसणारे चांगले गुण स्वत:ला चिकटवलेले दिसतात.फारच कमी आत्मचरित्रात आपले खरे आयुष्य रेखाटलेले स्पटपणे जाणवते.संख्येने मोजके असलेल्या या आत्मचरित्रात ठळकपणे आपले लक्ष्य वेधून घेते, लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र ' स्मृतिचित्रे'. कोणतेही भाषिक पांडित्य न दाखवता सहजसोप्या मराठीत सुद्धा किती सकस लिहता येते, हे बघायचे असल्यास या आत्मचरित्राखेरीज दुसरे पुस्तक मराठीत सापडणे, काहीसे अवघडच म्हणता येईल.आपण आपलेच आत्मचरित्र तर वाचत नाही ना, असे वाटावे इतका सत्यपणा या ५९१ पानांच्या पुस्तकात पदोपदी जाणवतो. जगात कोणीही सुपर ह्युमन म्हणून जन्माला येत नाहीत.आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या अडचणी आपणास अनुभवायला येतात,त्याच प्रकारच्या अडचणी अनुभव मोठमोठ्या व्यक्तींना देखील येतात. मात्र या अडचणीतून मार्ग काढताना त्यांनी वेगळे मार्ग अवलंबल्यामुळे किंवा अनुभवातून आपल्यापेक्षा अधिक चांगला अनुभव गाठीसी धरल्यामुळे त्या व्यक्ती महान होतात, हे आपणास या पुस्तकाच्या वाचनातून समजते. लग्नानंतर अक्षर ओळख झालेली ओळख झालेली स्त्री किती उत्तम साहित्यीक, परिचारीका होवू शकते,हे अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे.
     आचार्य अत्रे यांनी लक्ष्मीबाई टिळक यांना 'साहित्यलक्ष्मी' ही उपमा दिली होती,ती कशी खरी होती,हे आपल्याला या पुस्तकातून समजते‌ ९१ प्रकरणातून कोणतेही रूढ अर्थाचे शिक्षण न घेता, कठीण परिस्थितीशी लढा देवून आपले व्यक्तीमत्व दुसऱ्यांना आदर्शवत वाटेल,असे कोणत्या पद्धतीने घडवू शकते,हे या पुस्तकातून आपल्यास समजते. 
लक्ष्मीबाई टिळकांच्या आयुष्यातील बराच मोठा भाग नाशिकला गेला.नाशिक माझी जन्मभुमी असल्याने मी सुद्धा नाशिकला बराच काळ राहिलो आहे.तरी सुद्धा नाशिकचे नवे दर्शन मला या पुस्तकाच्या वाचनाने झाले.लक्ष्मीबाईंच्या वेळचे नाशिक अनुभवणे माझ्यासाठी सुद्धा वेगळाच आनंद देणारा अनुभव होता.
लक्ष्मीबाईंनी या पुस्तकाचे लेखन करताना फक्त स्वत:चे अनुभवच सांगितले आहे,असे नाहीये‌. तर १८६० ते १९२० या दरम्यानचे आपल्या महाराष्ट्राचे बदलते  सांस्कृतिक जीवन सुद्धा लेखनातून उलगडले आहेत.एका अर्थाने हा महाराष्ट्राचा त्यावेळचा चालता बोलता इतिहास आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधरणत: लग्नानंतरचे भावविश्व त्यांनी यात मांडलेले आहे अर्थात थेट लग्नापासूनच सुरवात केली असे नसून लग्नासाठी स्थळ बघण्यापासूनचे आपले अनुभव यात सांगितले आहेत.
मी पुण्यात काही निमित्ताने मंडईतून बाजीराव रोडने पायी सारस बागेकडे जात असताना, केळकर संग्राहलयाजवळ एके ठिकाणी फुटपाथावर 'स्मृतिचित्रे' विकताना दिसले, आणि मी लगेच विकत घेतले.जसे झटकन विकत घेतले.तितक्याच झटकन वाचून देखील टाकले. त्यामुळे मला एक उत्तम पुस्तक वाचल्याचा अनुभव आला.तसा तो तूम्हाला येण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...