संदर्भ सुची आणि व्यक्तीनाम सुची तसेच सुरवातीच्या प्रास्ताविकाची नावे वगळता ५६९ पानांच्या या पुस्तकात आपणास, प्राचीन भारताच विज्ञानाचे योगदान,प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ, युरोपाती प्रबोधनाच्या सुरवातीच्या काळातील शास्त्रज्ञ,चौथी मिती (फोर्थ डायमेशन) न्यूक्लिअर सायन्स,क्वांटम मेकॅनिक्स,आईन्स्टाईनची जनरल थेअरी, आईन्स्टाईन ची स्पेशल थेअरी ऑन रेलेटिव्हीटी, रेडिओलॉजी रेडिओ ऍक्टिव्हिटी यांचे संशोधन कसे झाले?, बिग बँग थेअरी आणि स्टेडी युनिव्हर्स थेअरी, स्टिंग थेअरी, क्वार्स पार्टिकल्स, पृथ्वीचा जन्म,आणि आतापर्यतची वाटचाल, पृथ्वीची अंतर्गत रचना, पृथ्वीची सर्वसाधरण माहिती, वेगनरची थेअरी,भुकंप,ज्वालामुखी,रसायनशास्त्राचा विकास कोणत्या प्रकारे झाला? ऑर्गनिक केमिस्टीचा विकास, रसायनशास्त्रातील महत्तवाचे शास्त्रज्ञ, त्यांनी काय संशोधन केले कसे केले? बायोलॉजीमधील संशोधनाचे विविध टप्पे, व्हायरस, बॅक्टेरिया,डार्विनचा उत्क्रांतीविषयक सिद्धांत आणि त्याची आतापर्यतची वाटचाल,अनुवंशिकता,डीएनए,जेनेटिक कोड,ह्युमन जिनोम कोड,डबल हेलिक्स आदि विविध विषयांवर सखोल माहिती मिळते.
अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनाप्रमाणे याही पुस्तकाची भाषा सर्वसाधरण शिक्षण झालेल्या व्यक्तीला देखील समजेल असीच आहे.पुस्तकात योग्य त्या ठिकाणी आकृत्या, उदाहरणांचा वापर करण्यात आला आहे,त्यामुळे विषय चटकन समजतो. पुस्तकाच्या शेवटी व्यक्तीनाम सुची देण्यात आली आहे.ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव पुस्तकात कोणकोणत्या पानावर आले आहे,याची यादी देण्यात आलेली आहे.सच पुस्तकाच्या सुरवातील अनुक्रमणिका देखील सविस्तर देण्यात आली आहे ज्यामुळे आपणाष एखादा संदर्भ हवा असेल तर चटकन सापडतो.या पुस्तकात सर्वसामान्य व्यक्तीला प्रत्येक विषयाची किमान ओळख व्हावी,याची काळजी घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.या पुस्तकात विषयाचे बारीकसारिक सविस्तर तपशील फारच कमी देण्यात आले आहेत.या पुस्तकातून विषयाची तोंड ओळख करुन घेवून विषयाचा सविस्तर अभ्यासासाठी दुसरे पुस्तक वाचणे योग्य ठरेल.
कोणतीही नविन गोष्ट व्यक्तीला त्याचा मातृभाषेत शिकवल्यास, सहजगत्या समजते. कोणत्याही गोष्टीच्या मुलभुत संकल्पना मातृभाषेत समजावून घेवून, त्या गोष्टीचे सविस्तर ज्ञान दुसऱ्या भाषेत घेतल्यास अधिक उत्तम असे शिक्षणतज्ञ वारंवार सांगत असतातच.त्यामुळे नैसर्गिक शास्त्रांचा संकल्पना समजावून घेण्यासाठी किमान एकदा आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा