या ४०२पानाच्या पुस्तकात इतिहास, संकल्पना, आर्टिफिशयल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग १ आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग२, ए.आय.चा भविष्यवेध आणि मशिन लर्निंग (सखोल विवेचन ) या सहा प्रकरणाद्वारे लेखकाने लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.शेवटचे मशिन लर्निग (सखोल विवेचन) हे प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकरणाची भाषा आठवी, नववी पास विद्यार्थ्याला समजेल या प्रकारची आहे.शेवटच्या प्रकरणाची भाषा काहिसी कठिण आहे.या शेवटच्या प्रकरणात अनेक तांत्रीक संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत.३५पानाच्या या शेवटच्या प्रकरणात तांत्रीक संकल्पना असल्याने या प्रकरणाची भाषा कठिण झाली आहे. अच्युत गोडबोले यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्यांना तांत्रिक विषयात शिरायचे नाही.त्यांनी तो भाग नाही वाचला तरी चालेल असे सांगितले आहेच.
सहावे प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकरणे उप प्रकरणात विभागली आहेत.इतिहास या पहिल्या प्रकरणात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स या आणि रोबॉटिक्स याचा इतिहासात समजते. संकल्पना या दुसऱ्या प्रकरणात अच्युत गोडबोले यांनी, ए.आय.मशिन लर्निंग,डीप लर्निंग,एक्स्पर्ट सिस्टीम, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, ए आय, चॅटबॉक्स, चॅटजीपिटी, सेल्फ डायव्हिंग कार्स आणि ऑटोनॉमस वाहन यांची ओळख आपल्याला करुन दिली आहे. आर्टिफिशयल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग १आणि २ या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणात आपणास ए.आय चा उपयोग कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये, फायनान्समध्ये, अकाउंटमध्ये कस्टमर केअर सर्विसमध्ये, मार्केटरिसर्चमध्ये, रिटेलमध्ये, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये, आरोग्य सेवेत, शिक्षणात, वकिलांसाठी, शेतीमध्ये, मासेमारीमध्ये, पर्यटनामध्ये, विविध कलांमध्ये, संगीतात, पत्रकारितेमध्ये, लीडरशिपमध्ये, अंतराळ संशोधनात,प्रिंटिंगमध्ये स्मार्टफोनमध्ये कोणत्या प्रकारे होऊ शकतो? तसेच भारतीय उद्योजकांनी आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा वापर कोणत्या प्रकारे करावा, याविषयी अच्युत गोडबोले यांनी चर्चा केली आहे.सर्वसामन्यांचा ज्यांना तंत्रज्ञानाची विशेष ओळख नाही अस्या व्यक्तींसाठी शेवटच्या अस्या पाचव्या ए.आय.चा भविष्यवेध या प्रकरणात ए.आय आणि उद्याच जग , नोकऱ्या, आणि युनीव्हर्सल बेसिक इनकम या मुद्द्यांवर प्रकाश पाडला आहे.
सध्या ए.आय हा उत्तम करीयर पर्याय म्हणून समोर येत आहे. ज्यांना ए.आय.या क्षेत्रात करियर करायचे आहे.त्यांनी माझ्यामते या पुस्तकाचे वाचन करताना प्रकरण क्रमांक २,६,३,४,५,१ या प्रमाणे वाचन करावे.त्यांनी पहिले प्रकरण नाही वाचले तरी चालेल. ज्यांना फारसे तांत्रीक ज्ञान नाही.त्यांना शेवटचे प्रकरण मोठ्या प्रमाणात त्रासदायक वाटू शकते.असो.
कोणतेही तंत्रज्ञान वापरताना, त्यामागचे विज्ञान समजणे आवश्यक नसले तरी ते समजल्यास तंत्रज्ञान वापरताना होणारा आनंद शब्दात मांडता येणे अशक्यच.तरी त्या आनंदाची अनुभुती घेण्यासाठी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा