रविवार, २९ डिसेंबर, २०२४

प्राचीन युगातील महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक, 'मुस्लिमपुर्व महाराष्ट्र'


आपल्या महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डामार्फत विविध इयत्तांमध्ये  कोणता इतिहास शिकवला जातो एक नजर टाकली तर एक गोष्ट आपणास चटकन आढळून येते ती म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडील भागातील इतिहासाचे अधिकचे प्रमाण. उतर भारताचा इतिहास शिकवताना देखील मध्ययुगीन इतिहास अधिक प्रमाणात असतो.त्यामुळे आपण जिथे रहातो त्या महाराष्ट्राचा त्यातही प्राचीन युगाबाबत आपणे काहीसे अनभिज्ञ राहतो. याबाबत माहिती करुन घेण्यासाठी शालेय पुस्तकाच्या बाहेरच्या पुस्तकांचा आपणास आधार घ्यावा लागतो. या अवांतर पुस्तकांमधील महत्त्वाची माहितीपुर्ण पुस्तके म्हणून दैनिक केसरीचे १९३० ते १९४० या दरम्यान ८वर्षे संपादक असलेल्या वासुदेव कृष्ण भावे यांनी लिहलेल्या महाराष्ट्राचा इतिहासावरील पुस्तकांचा समावेश करावाच लागेल. भावे यांनी मुस्लिम आक्रमणपुर्व कालखंडातील महाराष्ट्रावर दोन खंडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळच्या महाराष्ट्रावर आणि पेशवेकालीन महाराष्ट्रावर प्रत्येकी एका खंडात  पुस्तके लिहली आहेत‌. त्यातील पेशवेकालीन महाराष्ट्रावरील पुस्तक आणि मुस्लिम आक्रमकांच्या आधीच्या महाराष्ट्रावरील पुस्तके  मी नुकतेच वाचली.त्यापैकी पेशवे कालीन महाराष्ट्रावर मी काहीच दिवसापुर्वी लिहले होते ज्याना ते वाचायचे असेल त्यांनी लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे.मी या लेखात बोलणार आहे.मुस्लिम आक्रमकांच्या आधीच्या महाराष्ट्रावर लिहलेल्या दोन पुस्तकांविषयी .
वरद प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात मुसलमानपुर्व महाराष्ट्र या पुस्तकाचे दोन खंड एकत्रीतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जे एकमेकांनतर छापण्यात आले असुन दोघांना स्वतंत्र्यपणे १पासुन पृष्ठ क्रमांक देण्यात आलेला आहे. एकाच विषयाची दोन पुस्तके एकाच बायडिंगमध्ये एकमेकांनंतर त्याचे पृष्ठ क्रमांक न बदलता छापण्यासारखे या पुस्तकाचे स्वरुप आहे असो.
या पुस्तकात महाराष्ट्रातील सातवहन, राष्ट्रकुट शिलाहार , बदामीचे चालूक्य,कल्याणचे चालूक्य, वाकाटक, यादव राजघराणे तसेच गोव्यातील कदंब राजघराणे, यांचा राजनैतिक इतिहास तसेच त्यावेळचे सामाजिक जिवन,त्यांची राज करण्याची पद्धत महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती, त्याकाळात झालेली देवालयांची लेण्याची, शिला मंदिरांची लेण्याची निर्मिती या काळात झालेले ज्ञानवर्धन आणि ज्ञान प्रसार, या काळात असणारे काही ग्रंथकार आणि त्यांचे वाङ्मय, या काळात लोकांकडे असणारी कला कौशल्य आणि लोक उपभोगत असणारा सुखसोई, या काळात झालेला मराठीचा विकास, तसेच या काळातील धर्म आणि पंथ कोणते होते या काळात समाज नियंत्रणाचे कोणते माध्यम वापरले जायचे? या काळात महाराष्ट्र बाहेर कोण कोणती राज्य होती, या काळात भारतातील सर्वसाधारण राज्यव्यवस्था कशी होती महाराष्ट्राबाहेर कोणते राज्य होती याचे यांची माहिती मिळते. दोन्ही खंड एकत्र करून छापलेल्या या सुमारे साडेचारशे पानांचा पुस्तकात 30 प्रकरणाद्वारे लेखकाने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे

प्राचीन महाराष्ट्रातील राजघराण्यांचची माहिती सांगताना लेखकाने सनावळीच्या ऐवजी, व्यक्तिमत्वाची ओळख, त्यांनी कोणत्या पद्धतीने राज्याची प्रशासनाची व्यवस्था लावली त्यांचे अन्य राज्यांशी कसे संबंध होते? त्यांनी
राज्य विस्तार कोणत्या पद्धतीने केला त्यांच्या राज्य कोणत्या पद्धतीने संपुष्टात आले एक राजघराणे नष्ट झाल्यावर त्याची जागा दुसऱ्या राजघराण्याने कसी घेतली? राजघराण्यांनी अन्य राज घराण्यांना कोणती  मदत केली. त्यांच्या समाजाविषयीचे दृष्टिकोन त्यांनी उभारलेल्या किंवा उभरण्यास मोठ्या प्रमाणात मदत केलेल्या विविध लेण्या शिवमंदिरे यांची माहिती दिली आहे. अर्थात या पुस्तकात काही सनावळ्या आहेतच. मात्र पुस्तकात वर्णनात्मक लेखन जास्त प्रमाणात आहे.सनावळ्या या त्या आपणास पुस्तकाच्या पहिल्या भागातच मुख्यत आढळतात. पुस्तकाचा दुसरा भागात पहिल्या भागाच्या तुलनेत सनावळींची संख्या खूपच कमी आहे
पुस्तकाचा दुसऱ्या भागात तत्कालीन समाजाचे वर्णन करत असताना लेखकाने त्यावेळी उभारण्यात आलेल्या , लेण्या शीला मंदिर यांची माहिती  दिली आहे. याच भागात लेखकाने जैन धर्मिय आणि बौद्ध धर्मीयांचा प्रभाव या काळात कोणत्या प्रमाणात होता?  महाराष्ट्रात जैन धर्मीयांपेक्षा बौद्ध धर्मीयांची  संख्या जास्त का आहे ? यावर देखील प्रकाश टाकला आहे
पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण असून ज्याला  आपल्या महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास जाणून घ्यायचा आहे त्याने हे पुस्तक किमान एकदा तरी वाचणे आवश्यक आहे.



 पेशवेकालीन महाराष्ट्र या पुस्तकाची मी करुन दिलेली ओळख वाचण्यासाठी पुढिल लिंकवर क्लिक करा.

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/12/blog-post_20.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...