सुमारे २५० पानाच्या या दिवाळी अंकात वाहतूक या संकल्पनेच्या मोठ्या प्रमाणात आढावा घेण्यात आला आहे. ज्यामध्ये माणसांनी प्रवास करायला कधी आणि का सुरवात केली ? माणसांनी कोणत्या मार्गानी प्रवास केला ? या दरम्यान त्यांना विश्रांती घेयची असल्यास काय सोयी सुविधा होत्या ? त्या कोणी निर्माण केल्या होत्या ? त्या सुविधांविषयी त्या वेळच्या नागरिकांनी काय लिहले आहेत ? नागरिकांनी या साठी कोणती साधने वापरली ? वाहतूक भूगोल या भूगोलाच्या उपशाखेतील शास्त्रज्ञांनी वरील प्रश्नाची उत्तरे कोणत्या प्रकारे शोधली ? जगभरात प्रवाश्याची साधने कोणती होती ? या काळात जगभरातील कोणी कोणी आपल्या भारताला भेट दिली ? त्यांनी त्यासाठी येताना आणि जाताना कोणती साधने वापरली ?त्यावेळी त्यांना कोणते अनुभव आले वरील प्रश्नाच्या उत्तरातून त्यावेळच्या समाजजीवनाविषयी काय काय माहिती मिळते ? या सारख्या असंख्य प्रश्नाची उत्तरे आपणास या दिवाळी अंकांच्या वाचनाने मिळतात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यातमहत्वाचे योगदान असलेल्या सुरतेची स्वारी तसेच दक्षिणेची स्वारी कोणत्या प्रकारे राबवण्यात आली ? पर्यटनाच्या निमित्ताने अनेक लेण्यांना भेट देतो ? पूर्वीच्या काळी प्रवासाच्या दरम्यान या लेण्यांना काय महत्त्व होते ? महाराष्ट्रातच लेण्या मोठ्या संख्येनं का आढळतात ? पूर्वीच्या काळी डोंगर दऱ्यातून लोक कोणत्या प्रकारे प्रवास करत असे ? त्यावेळच्या प्रशासनकडून कोणत्या प्रकारे याची निगा राखण्यात येत असे ? त्यासाठी काही करप्रणाली होती का ? व्यक्तीच्या प्रवाश्यामुळे काही गावांना महत्व आले होते का ? त्याच्या सुबत्तेचे कारण कोणते होते ? लोकांनी जल प्रवाशाची सुरवात कोणत्या प्रकारे केली ? पूर्वी नागरिक कोणत्या मार्गावर जल प्रवास करत होते ? तेर प्रवास कोणत्या कालावधीत करत असे ? जगातील सर्वच
लोक सारख्याच पद्धतीने प्रवास करत होते का ? जल प्रवाश्यामुळे जगाच्या भूगोलात काही बदल झाला का ? झाला असल्यास कोणता बदल झाला ? तो कोणी आणि कोणत्या पद्धतीने केला ? आपल्या भारतातील व्यक्ती प्रवाश्यासाठी जगात कुठे कुठे जात असत ? त्या ठिकाणी जाऊन ते काय करत असत ? शास्त्रज्ञांनी या विषयीची माहिती कोणत्या प्रकारे मिळवली त्याविषयीची रंजक माहिती देखील दिवाळी अंकाच्या वाचनाने आपणास समजते .
लोक सारख्याच पद्धतीने प्रवास करत होते का ? जल प्रवाश्यामुळे जगाच्या भूगोलात काही बदल झाला का ? झाला असल्यास कोणता बदल झाला ? तो कोणी आणि कोणत्या पद्धतीने केला ? आपल्या भारतातील व्यक्ती प्रवाश्यासाठी जगात कुठे कुठे जात असत ? त्या ठिकाणी जाऊन ते काय करत असत ? शास्त्रज्ञांनी या विषयीची माहिती कोणत्या प्रकारे मिळवली त्याविषयीची रंजक माहिती देखील दिवाळी अंकाच्या वाचनाने आपणास समजते .
प्रवासववर्णन या वाहतुकीच्या मुळाशी असलेल्या घटकाला, तसेच आपल्या मराठीत खूपच कमी बोलल्या जाणणाऱ्या हवाई वाहतूक आणि अंतराळ प्रवास या घटकांना देखील या अंकात स्थान देण्यात आले आहे. हवाई वाहतुकीचे नियमन कोणत्या प्रकारे केले जाते? विमान वाहतूक आणि हेलीकॅप्टर वाहतूक यामध्ये काय फरक आहे ? याविषयीची माहिती या अंकात देण्यात आली आहे.
दिवाळी अंकावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्ती अनेकदा आपल्या मराठीत सध्या फक्त जाहिराती छापून पैसे मिळावे या हेतून दिवाळी अंक छापले जातात. दिवाळी अंकात साहित्यविषयक मजकूर कमी आणि जाहिरातीच जास्त असल्याचा आक्षेप घेतात .मात्र या अंकात त्याचा लवलेश देखील जाणवत नाही. सुमारे अडीचशे पानाच्या अंकात फक्त एकच जाहिरात देण्यात आलेली आढळते ती देखील मधल्या पानावर आहे . कव्हर पेजेसवर नाही हे आपण लक्षात घेयला हवे . जाहिरात ना घेता दिवाळी अंक काढता येतो तो लोकप्रिय देखील करता येतो हे 'भवताल 'आपणास दाखवून देतो . ज्यांना खरोखरीच काही उत्तम वाचायचे आहे त्यांना भवताल हा एक उत्तम पर्याय आहे . मग वाचणार ना ' भवताल '
मागील वर्षांचा अर्थात २०२४ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
२०२३ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
२०२२ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा