बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)

मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्रश्न विचारला की मीच त्याला प्रतीप्रश्न विचारतो तूला कोणती पुस्तके वाचायला आवडतात,?कथासंग्रह, कादबरी, काव्यसंग्रह, नाटके, माहितीपर की ना.सी फडके यानी मराठीत मोठ्या प्रमाणात आणलेला निबंंध हा प्रकार? माझ्या या प्रश्नावर जर समोरच्या व्यक्तीने त्याचा आवडता प्रकार सांगितला आणि त्याविषयी माझ्याकडे माहीती असेल तर मी त्याला पुस्तक सुचवतो.
मात्र ज्यांचे वाचन मुळातच कमी आहे अशी व्यक्ती माझ्या प्रश्नाने गडबडते. ती म्हणते माझे असे काही ठरलेले नाहीये.मग मला त्याला सांगावे लागते,समोर येईल ते वाच.सतत वाचले की तूला समजेल तूला काय वाचायला
आवडते.एकदा प्रकार समजला की पुन्हा माझ्याकडे ये.मी तूला पुस्तके सुचवतो.

मी आतापर्यत जी पुस्तके वाचली आहेत, त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार  किंवा पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या  आहेत त्यानुसार सांगतोय वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आवडीच्या विषयावरची पुस्तके सुरवातीच्या काळात मिळणे आवश्यक ठरते‌.जर त्यावेळी कंटाळा येणारी पुस्तके मिळाली तर वाचनाची नावडच निर्माण होणे शक्य आहे. आता एखाद्या विषयात आवड किंवा नावड निर्माण होण्यामागची कारणे मानसशास्त्रज्ञच जाणो,आणि मी काही मानसशास्त्र नसल्याने ते सोडून देउया.
मी माझे वाचन  या मालिकेच्या आधीच्या भागात सांंगितले आहे.त्याप्रमाणे माझे वाचन कॉमिक्सने सुरू झाले.मी अगदी सातवी आठवीपर्यत बालसाहित्य वाचत असे. राधेय,ययाती, स्वामी,या सारख्या कांदबरी मी त्यामुळे
बऱ्याच उशिरा वाचल्या, खूप मोठा काळ बालसाहित्य वाचल्याने मला ते चटकन समजत गेले.वाचलेले समजतयं हे बघून मी अजून अजून वाचायला लागलो.परिणाम तूमच्या समोर आहे.आता सर्वांनीच खुप वेळ बालसाहित्यच
वाचले पाहिजे असे नाही.तूम्हाला जर प्रौंढाच्या कांदबरी समजत असतील तर बालसाहित्य न वाचता तूम्ही थेट तेच वाचू शकतात.शेवटी वाचलेले मनाला भावणे,आणि त्यातून आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कारण वाचलेले भावले तर तूम्हालाच तूमचा वाचनाचा सुर गवसेल आणि मग मला जसे लोक विचारतात काय वाचू ते तसे कोणाला विचारावे लागणार नाही.उलट लोकच तूम्हाला वाचण्याविषयी प्रश्न विचालतील माझ्यासारखे.मात्र त्यासाठी आपल्याला काय आवडते हा सुर सापडणे आवश्यकच.मग शोधणार ना सुर आपला वाचण्याचा

माझे वाचन या लेखमालिकेचा चवथा भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


माझे वाचन या लेखमालिकेचा तिसरा  भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 



माझे वाचन या लेखमालिकेचा दुसरा भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


माझे वाचन याचा पाहिला भाग वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'

रात्री प्रवास करताना, मानवी वस्तीपासून दुर, जिथे लाईटची अडचण नाहीये,अस्या ठिकाणी आपण प्रवासादरम्यान थांबलो आणि वर आकाशात बघीतले तर आपणास असंख्य तारे ग्रह,उपग्रह दिसतात. आपल्या मनुष्याला याचे पार अश्मयुगापासून आकर्षण. मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षात मनुष्याचे याविषयीचे गुढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याला कारणामुळे होते या काळात झालेली प्रगती.  जगातील सर्वात श्रीमंत असणारा एलोंड मास यांच्या स्पेस एक्स या कंपनीत मार्फत काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली अवकाश पर्यटन हे या प्रगतीचेच सध्याचे स्वरूप किंवा भारताचे आदित्य एलवन मिशन असो तर गणयान मिशन असो ही सुद्धा याचेच काही उदाहरणे. हा प्रवास कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि आपल्याला ही माहिती करून घ्यायची असेल तर मराठी ज्ञानभाषा हवी यासाठी मराठीमध्ये अनेक विषयांवर माहितीपूर्ण तरी रंजक भाषेत पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ट्रॅव्हल हे पुस्तक आपणास उपयोगी ठरते मी काही दिवसापूर्वीच हे पुस्तक वाचले. 

या पुस्तकात ३२३ पानातून १२ प्रकरणाद्धारे पृथ्वीचे वातावरण नक्की कुठे संपते,आणि अंतराळ सुरु होते? ज्या रॉकेटमधून आपण अंतराळात जातो त्याची मुळातील रचना काय असते? या रॉकेटचा विकास कोणत्या प्रकारे झाला. आपल्या भारताची इस्रो असेल किंवा जगात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या नासा सारख्या किंवा युरोपीय युनियनची युरोपीय स्पेस एजन्सी असो या सारख्या स्पेस एजन्सीची सुरवात कोणत्या प्रकारे झाली? अमेरिका
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध

असलेल्या अपोलो मोहिमेची सुरवात कशी झाली? त्यात काय घडले? आपला भारत जे बांधायचा प्रयत्न करतोय ते अवकाश स्थानक म्हणजे काय ? अवकाश स्थानकाशीवाय अन्य कोणत्या घटकाद्वारे खगोलशास्त्राचा पृथ्वीबाहेर राहुन अभ्यास केला जातो?, या रंजक वाटणाऱ्या अवकाश संशोधन क्षेत्रात प्राणहानी करणाऱ्या घटना घडल्या आहेत का?घडल्या असल्यास त्या कोणत्या प्रकारे घडल्या, त्यात काय नुकसान झाले ? आपल्या भारताच्या अभिमानाची संस्था असलेल्या इस्रोची स्थापना कशी झाली ? अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे भारतीय कोण आहेत?, अवकाश संशोधन क्षेत्राची भविष्यातील वाटचाल कसी असेल,? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत.

पुस्तकाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखीच सहजसोपी समजणारी आहे.विषयाची गरज
नसली तरी सलग शब्द वाचण्यास कंटाळा येऊ शकतो हे लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चित्रे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही‌.

खगोलशास्त्रासारखा काहीसा किचकट वाटणारा विषय सुद्धा किती रंजकतेने मांडता येतो. तसेच खगोलशास्त्रातल्या अवघड संकल्पना जसे की क्वांटम मेकॅनिक्स, नॉन युक्लीड जॉमेट्री, वर्म होल, डार्क एनर्जी, डार्क मॅटर,  स्टिंग्युलेरिटी  या संकल्पना म्हणजेच खगोलशास्त्र नव्हे तर सर्वसामान्यांना रंजक वाटेल अश्या अनेक संकल्पना खगोलशास्त्रात आहेत. या संकल्पना वाचून सर्वसामान्यांना खगोलशास्त्रात इंटरेस्ट वाटू शकतो. यातून ते मी वरती सांगितल्या त्या संकल्पना सुद्धा माहिती करून घेऊ शकतात हे मला या पुस्तकातून पुन्हा एकदा समजले. 

   तसं बघायला गेलं तर मी तिसरी चौथी  पासून समाजात खगोलशास्त्राचा प्रचार प्रसार करणाऱ्या खगोल मंडळ या संस्थेत सक्रिय होतो. त्यामुळे या पुस्तकात असणारी बरीच माहिती मला आधीच माहिती होती. मात्र ती किती रंजकतेने मांडता येते हे मला अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकातून समजले. ज्यांना खगोलशास्त्राची काहीच माहिती नाही किंवा ज्यांना आपल्या मराठी किती सहजतेने माहिती देता येऊ शकते हे जाणून घ्यायचे आहे ते सुद्धा हे पुस्तक वाचू शकतात

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

भारतीयांना आपल्या प्राचीन वैभवशाली वारस्याची जाणीव करून देणारे पुस्तक 'सहा सोनेरी पाने'

मानसशास्त्रात व्यक्ती स्वतःच्या विषयी जो काही विचार करते, त्यानुसार तिचे व्यक्तिमत्त्व घडते, असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जर व्यक्तीने स्वतः विषयी नकारात्मकच विचार केला तर व्यक्तीचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यक्तीमध्ये काही कारण नसताना स्वतः कमीपणा घेऊन दुसऱ्याला, त्याची त्या प्रकारची योग्यता नसताना देखील, मोठेपणा देतो. “मी कायमच हरण्यासाठीच जन्म झालेला आहे. मी पूर्वी कधीही जिंकलो नव्हतो; भविष्यात देखील जिंकू शकणार नाही” असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. व्यक्तीला कायम त्याची चूकच सांगितल्या, त्याच्या चांगल्या बाबींची जाणीवच त्याला करून दिली नाही तर व्यक्तीमध्ये या प्रकारची मानसिक विकृती निर्माण होते, असे या सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वायुष्यातील सकारात्मक बाबी सांगाव्या लागतात.

कोणताही समाज हा व्यक्तींचा समूहच असतो. जर एखाद्या व्यक्तीसमूहातील बहुसंख्य व्यक्तींना असे न्यूनगंडाने ग्रासले तर तो समाज एकत्रितपणे नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळी या लेखाच्या सुरुवातीला व्यक्तीबाबत सांगितले तसेच या समाजाबाबत करावे लागते. या समाजाच्या सकारात्मक बाबी त्याला समजावून सांगाव्या लागतात. त्या समाजाच्या वैभवशाली घटना, प्रसंग, त्या समाजाने मिळवलेले विजयाचे स्मरण त्या समाजाला करून द्यावे लागते.

इतिहासाचे विविध टप्पे असतात. या विविध टप्प्यांपैकी एखाद्या टप्प्यावर प्रत्येक समाजाने कधीतरी यशाची चव चाखली असते; कधी अपयशाचा सामना केलेला आढळतो. आपल्या भारताचा विचार करता प्राचीन कालखंडात मोडणारा संपूर्ण भाग तसेच मध्ययुगात मोडणाऱ्या कालखंडाचा सुरुवातीचा कालखंड हा भारताचा विजयाचा, अभिमानाचा कालखंड समजला तर वावगे ठरणार नाही. या वैभवशाली कालखंडात गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य, आपल्या महाराष्ट्राचा विचार करता सातवाहन कालखंड याचा यात समावेश करता येईल. तर
मध्ययुगाच्या कालखंडातील एकूण भागांपैकी सुरुवातीच्या ४५ ते ५५ टक्क्यांच्या नंतरचा कालखंड भारतासाठी निराशाजनक म्हणता येईल असा आहे. आपल्या कडे ज्याबाबत सातत्याने काहीसा संताप व्यक्त केला जातो तो पश्चिमी आणि मध्य आशियातून होणाऱ्या धार्मिक आक्रमणांचा हाच तो निराशाजनक कालखंड.

ब्रिटिश राजवटीत त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने मध्ययुगीन इतिहासकालखंडातील शेवटचा ५० टक्के भागच शिकवण्यात आला, जो काहीसा निराशाजनक आहे. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यामुळे समाजावर काहीसे नैराश्य आले. याला उत्तर काय? याचा विचार जेव्हा समाजाचे हित बघणाऱ्या व्यक्ती करू लागल्या त्यावेळी भारताच्या वैभवशाली इतिहासाची—अर्थात प्राचीन कालखंडातील आणि मध्ययुगाच्या सुरुवातीचा कालखंडातील—माहिती देण्याची गरज लक्षात आली. आणि त्यानुसार समाजाचे हित इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्य करायला सुरुवात केली. या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावेच लागते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. त्यांनी *सहा सोनेरी पाने* हा ग्रंथ लिहून भारताचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणण्याचे काम केले. हा ऐतिहासिक ग्रंथ मी नुकताच वाचला.

पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा (यूपीएससीची परीक्षा म्हणून ओळखली जाणारी परीक्षा मुळात यूपीएससीकडून ज्या विविध प्रकारच्या १७ परीक्षा घेतल्या जातात त्यापैकी एक; मात्र इतर १६ परीक्षांबाबत पुरेशी माहिती नसल्याने “यूपीएससीकडून तेवढीच परीक्षा घेतली जाते” असे समजून) अभ्यास करताना जो इतिहास अभ्यासाला होता तो किती एकांगी होता हे मला या पुस्तकातून समजले.

इतिहासाचे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले तर प्रागैतिहासिक काळ (Prehistory), आद्यऐतिहासिक काळ (Proto-History), प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ असे वर्गीकरण करण्यात येते. प्रागैतिहासिक काळात (Prehistory) माणसाला लेखनकला अवगत नव्हती; तर आद्यऐतिहासिक काळात
(Proto-History) मानवाला लेखनकला माहिती होती, मात्र त्यावेळी काय लिहिले आहे हे आपल्याला आज माहिती नाही असे समजण्यात येते. भारताचा विचार करता सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड हा आद्यऐतिहासिक (Proto-History) काळात समजला जातो. *सहा सोनेरी पाने* या पुस्तकात आद्यऐतिहासिक काळाचा ओझरता उल्लेख सुरुवातीच्या प्रकरणात करत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला थेट इ.स.पूर्व ५ व्या शतकाच्या सुरुवातीस घेऊन जातात.

या पुस्तकात भारताच्या कोणत्या वैभवशाली घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, या विषयी यापूर्वी हजार वेळा सांगण्यात आल्याने त्याची पुनरावृत्ती करत नाही. तर लेखाच्या पाचव्या परिच्छेदालाच मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो. तर भारतीयांनी प्राचीन काळी त्यांच्यावर होणारे आक्रमण किती शूरपणे परतवून लावले? युरोपीय सत्तांनी स्वतःच्या पराभवाचादेखील विजयच झाला असे खोटे कसे सांगितले? प्राचीन भारतातील समाजजीवन आणि प्रशासन कोणत्या प्रकारचे होते? भारत पूर्वीपासूनच यूरोपीय सत्तांना कोणत्या प्रकारे खुणवत होता? याविषयी माहिती मला या पुस्तकातून मिळाली.

भारत आता महासत्ता होतोय असे नाही; तर भारत पूर्वी देखील महासत्ता होता. मात्र काही कारणाने आपण ते पद गमावले, इतकेच. ते का गमावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वगुरू झाल्यावर इतिहासात झालेल्या चुका टाळण्यासाठी त्या माहिती असाव्यात—ज्यामुळे त्या टाळण्यासाठी काय करता येईल हे वाचकास समजले—आणि आपण वेळीच सावध होऊन कोणत्या प्रकारे त्या चुका टाळू शकतो हे समजण्यासाठी प्रत्येकाने, तो कोणत्याही विचारधारेला मानणारा असो, हे पुस्तक वाचायला हवे असे मला वाटते.


समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'

मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ...