रात्री प्रवास करताना, मानवी वस्तीपासून दुर, जिथे लाईटची अडचण नाहीये,अस्या ठिकाणी आपण प्रवासादरम्यान थांबलो आणि वर आकाशात बघीतले तर आपणास असंख्य तारे ग्रह,उपग्रह दिसतात. आपल्या मनुष्याला याचे पार अश्मयुगापासून आकर्षण. मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षात मनुष्याचे याविषयीचे गुढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याला कारणामुळे होते या काळात झालेली प्रगती. जगातील सर्वात श्रीमंत असणारा एलोंड मास यांच्या स्पेस एक्स या कंपनीत मार्फत काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली अवकाश पर्यटन हे या प्रगतीचेच सध्याचे स्वरूप किंवा भारताचे आदित्य एलवन मिशन असो तर गणयान मिशन असो ही सुद्धा याचेच काही उदाहरणे. हा प्रवास कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि आपल्याला ही माहिती करून घ्यायची असेल तर मराठी ज्ञानभाषा हवी यासाठी मराठीमध्ये अनेक विषयांवर माहितीपूर्ण तरी रंजक भाषेत पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ट्रॅव्हल हे पुस्तक आपणास उपयोगी ठरते मी काही दिवसापूर्वीच हे पुस्तक वाचले.
या पुस्तकात ३२३ पानातून १२ प्रकरणाद्धारे पृथ्वीचे वातावरण नक्की कुठे संपते,आणि अंतराळ सुरु होते? ज्या रॉकेटमधून आपण अंतराळात जातो त्याची मुळातील रचना काय असते? या रॉकेटचा विकास कोणत्या प्रकारे झाला. आपल्या भारताची इस्रो असेल किंवा जगात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या नासा सारख्या किंवा युरोपीय युनियनची युरोपीय स्पेस एजन्सी असो या सारख्या स्पेस एजन्सीची सुरवात कोणत्या प्रकारे झाली? अमेरिका
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध
असलेल्या अपोलो मोहिमेची सुरवात कशी झाली? त्यात काय घडले? आपला भारत जे बांधायचा प्रयत्न करतोय ते अवकाश स्थानक म्हणजे काय ? अवकाश स्थानकाशीवाय अन्य कोणत्या घटकाद्वारे खगोलशास्त्राचा पृथ्वीबाहेर राहुन अभ्यास केला जातो?, या रंजक वाटणाऱ्या अवकाश संशोधन क्षेत्रात प्राणहानी करणाऱ्या घटना घडल्या आहेत का?घडल्या असल्यास त्या कोणत्या प्रकारे घडल्या, त्यात काय नुकसान झाले ? आपल्या भारताच्या अभिमानाची संस्था असलेल्या इस्रोची स्थापना कशी झाली ? अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे भारतीय कोण आहेत?, अवकाश संशोधन क्षेत्राची भविष्यातील वाटचाल कसी असेल,? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत.
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध
पुस्तकाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखीच सहजसोपी समजणारी आहे.विषयाची गरज नसली तरी सलग शब्द वाचण्यास कंटाळा येऊ शकतो हे लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चित्रे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही.
खगोलशास्त्रासारखा काहीसा किचकट वाटणारा विषय सुद्धा किती रंजकतेने मांडता येतो. तसेच खगोलशास्त्रातल्या अवघड संकल्पना जसे की क्वांटम मेकॅनिक्स, नॉन युक्लीड जॉमेट्री, वर्म होल, डार्क एनर्जी, डार्क मॅटर, स्टिंग्युलेरिटी या संकल्पना म्हणजेच खगोलशास्त्र नव्हे तर सर्वसामान्यांना रंजक वाटेल अश्या अनेक संकल्पना खगोलशास्त्रात आहेत. या संकल्पना वाचून सर्वसामान्यांना खगोलशास्त्रात इंटरेस्ट वाटू शकतो. यातून ते मी वरती सांगितल्या त्या संकल्पना सुद्धा माहिती करून घेऊ शकतात हे मला या पुस्तकातून पुन्हा एकदा समजले.
तसं बघायला गेलं तर मी तिसरी चौथी पासून समाजात खगोलशास्त्राचा प्रचार प्रसार करणाऱ्या खगोल मंडळ या संस्थेत सक्रिय होतो. त्यामुळे या पुस्तकात असणारी बरीच माहिती मला आधीच माहिती होती. मात्र ती किती रंजकतेने मांडता येते हे मला अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकातून समजले. ज्यांना खगोलशास्त्राची काहीच माहिती नाही किंवा ज्यांना आपल्या मराठी किती सहजतेने माहिती देता येऊ शकते हे जाणून घ्यायचे आहे ते सुद्धा हे पुस्तक वाचू शकतात



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा