लेखाचे विषय

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

ओळख एका डॉनच्या जडणघडणीची -

 दाऊद इब्राहिम कासकर ....... . मुंबईच्या पोलिस दलातील आचरणाने धार्मिक वृत्तीचा असलेल्या  कॉन्स्टेबल  इब्राहिम कासकर याचा मुलगा  अर्थात भारताला हवा असणारा डॉन दाऊद इब्राहिम . या दाऊदविषयी इंग्रजी भाषेत बरेच काही लिहून आलेले आहे . मात्र मराठी मुलखात जन्मलेल्या या डॉन विषयी मराठीत तसे कमीच लिहून आलेले आपणास दिसते .त्यातही मुळातील इंग्रजी भाषेतील  मजकुराचा मराठीत केलेला अनुवादाचं अधिक . याच अनुवादित मजकुराच्या मालिकेतील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ज्यावर आधारित बॉलीवूडमध्ये शूट आऊट लोखंडवाला हा चित्रपट तयार आला ते पुस्तक अर्थात डोंगरी ते दुबई . मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले . ओघवती सहज सोप्या मराठीत अनुवादित झालेले हे पुस्तक  त्याच्या भाषाशैलीमुळे पाहिल्या बरोबरच मनाचा ठाव घेते

              अनुवादकाचे मनोगत , अनुवादित पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाचे हितगुज अशी इतर अनुवादित पुस्तकात दिसणारी आणि मूळच्या पुस्तकात नसणारी वाढीव पाने या पुस्तकामध्ये नाहीत हे या पुस्तकाचे वैशिष्टच म्हणता येईल . हे पुस्तक  दोन भागात विभागले असून दोन्ही भागात विविध प्रकरणाच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर मुंबईत गुन्हेगारीची सुरवात कशी झाली हे सांगत दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी विश्वाचा आढावा घेण्यात आला आहे .  ज्यामध्ये सदर पुस्तकाच्या एका प्रकरणात  या पुस्तकाच्या लेखकाने घेतलेली दाऊद इब्राहिमची मुलाखत समाविष्ट केलेली आहे . तसेच दाऊद इब्राहिम च्या गुन्हेगारी कारकिर्दीत त्याचे सहकारी अथवा प्रतिस्पर्धी असलेल्या छोटा राजन, अबू सालेम, अरुण गवळी   आदी गुन्हेगारीच्या कारकिर्दीवर  देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकच्या सुरवातीला मुंबईतील टोळीयुद्ध कसे सुरु  झाले ? करीमलाला , वरदराजन , हाजी मस्तान आदींचा उदय  कसा  झाला त्याच बरोबर मुंबईतील टोळीयुधद यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

     दाऊदच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जो या पुस्तकाच्या मूळ विषय आहेया बाबत बोलायचे झाल्यास, दाऊदच्या उद्य कशा आणि कोणत्या प्रकारे झाला ? त्याचा पहिला गुन्हा कोणत्या प्रकारे झाला ?दाऊदला मुंबईतील एका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी काट्याने काटा काढणे या म्हणीचा आधार घेत मुंबईतील संघटित गुन्हेगारी मोडण्यासाठी त्याचा कश्या प्रकारे वापर केला ? त्याचे पहिले अयशस्वी प्रेम आणि दुसऱ्या मुलीवरचे यशस्वी प्रेम याबाबरोबरच   दाऊदने कोणत्या स्थितीत मुंबईतून पहिल्यांदा दुबईला पलायन केले ? दुबईतून

कराचीला कोणत्या स्थितीत गेला ? अमेरिकेवरील हल्ल्यानंतर , ओसामा बिन लादेनच्या मृत्यनंतर त्याने कराची कशी सोडली ? नंतर पुन्हा कराचीला कसा आला ?   पुस्तकाचा शेवटी सदर पुस्तक निर्मितीसाठी लागलेल्या संदर्भाचा उल्लेल्ख करण्यात आलेला आहे .

            एकंदरीत पुस्तक आपल्या गुन्हेगारी  विश्वाच्या ज्ञानात  मोठ्या प्रमाणात भर घालते . गुन्हेगारीच्या विश्वात जाण्यासाठी नव्हे तर त्यापासून कसे वाचावे ? याचे मार्गदर्शन होण्यासाठी हे पुस्तक वाचावेच . मित्रानो गुन्हेगारीचे  विश्व हे एकमार्गी आहे . यात फक्त जाण्याचा  मार्ग आहे . एकदा या विश्वात शिरल्यावर कितीही इच्छा असली तरी मागे फिरता येत नाही . मराठीत अनेक व्यक्तींची चरित्रे आहेत मात्र हि आयुष्यात कोणत्या प्रकारे चालावे हे सांगतात . मात्र आयुष्य कोणत्या प्रकारे नसावे ? हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावेच .

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची -

  "वाचाल  तर वाचाल, ' "एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्तीकिंवा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे ,प्रसंगी अखंडित वाचित जावे ,शहाणे करून सोडावे जना" अशी आपणास वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी वचने आपणास ज्ञात आहेतच . मात्र अनेकजण आपल्या  दैनंदिन अश्या व्यस्त वेळापत्रकामुळे इच्छा  असूनदेखील आपली वाचनाची भूक भागवू शकत नाही, अश्या लोंकाना सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात मिळणारी सुट्टी देखील कोणत्या पर्वणीसारखीच भासणार ना ? मी देखील या पर्वणीचा सदुपयोग साधत माझे गेल्या कित्येक दिवसापासून शांततेत वाचेल म्हणून  काहीसे दूर ठेवलेले ज्येष्ठ  पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या " पुतीन - महासतेच्या इतिहासाचे अस्वस्थ  वतर्मान " या पुस्तकाचे वाचन केले .   या पुस्तकावर या  आधी बरेच  काही लिहून आले आहे .न्यूज18लोकमत  (त्या वेळेचे आयबीएन लोकमत ) या वृत्तवाहिनीवर त्यांच्या रविवारी होणाऱ्या  पुस्तकविषयक कार्यक्रमात याचा उल्लेख करण्यात आला होता , हे आपल्यापैकी अनेकांना स्मरत असेलच . या सर्व बाबींचा विचार करता मी काहिस्या उशिरानेच सदर पुस्तक वाचावयास घेतले .

                जगातील एके काळच्या असणाऱ्या 2 महासत्तेपैकी एक असणाऱ्या   रशियाचा इसवीसनाच्या 9व्या

शतकापासून सद्यस्थितीपर्यंत  आढावा यात घेण्यात आलेला आहे .ज्यामध्ये सुमारे एक तृतीयांश भागात  हा रशियाचा  9व्या शतकापासून सध्याचे  राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पर्यतचा आढावा घेण्यात आला आहे .तर अन्य भागात पुस्तकाच्या नावात असणाऱ्या पुतीन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे .  पुस्तकाची भाषा गिरीश कुबेर यांच्या इतर पुस्तकांसारखीच सोपी आणि रंजक असल्याने पुस्तक इतर पुस्तकांसारखेच खिळवूनठेवते . रशियाच्या झेंड्याच्या रंगामध्ये विचारमग्न अवस्थेतील पुतीन यांची प्रतिमा पुस्तक आपल्याकडे अक्षरशः खेचून घेते

पुस्तकाची प्रस्तावना ही श्री गिरीश कुबेर यांनीच लिहलेली असून त्यामध्ये त्यांनी सदर विषयावर पुस्तक का लिहले ? हे सांगताना त्यांचा लेखनप्रवास कोणत्या वळणाने झाला ? या प्रवासात त्यांना कोणा कोणाची साथ मिळाली याबाबत सांगितले आहे ? पुस्तकाची रचना एकूण 16प्रकरणात केलेली आहे . पहिल्या चार प्रकरणात पुतीन सत्तासिहासनावर आरूढ होण्यापर्यंतचा रशियाचा इतिहास सांगितला आहे . पुढील दोन प्रकरणात पुतीन यांच्या वैयक्तिक इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे . अंतिम दोन प्रकरणात त्यांच्या समस्त वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच रशियाची पुनः एकदा  महासता बनण्यामागची मानसिकता विशद केली आहे . अन्य प्रकरणामध्ये पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून आणि केलेल्या कृतीमधून घेतलेला आहे . मात्र या प्रकारांमध्ये त्याचे चित्रण काहीश्या नकारत्मकतेने केल्याचे मला वाटते .

राजहंस प्रकाशन सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे . पुस्तकाची रचना नेहमीच्या कागदाच्या  कव्हरमध्ये केलेली आहे . जर त्याची रचना हार्ड बाउंड मध्ये केलेली असली तर पूस्तक अधिक आकर्षक झाले असते , असो .

       आपल्या मराठीत अश्या विषयांवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लेखक लेखन करतात , त्या पार्श्वभूमीवर गिरीश कुबेर यांचे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी डोळ्यासमोरून घातलेच पाहिजे . मला माहिती आहे , कुबेरांची ते लोकसताच्या संपादकीयातून मांडत असणारी मते काही जणांना आवडत नाहीत , मात्र कुबेरांच्या त्या मताच्या मागमूसदेखील या पुस्तकातून आढळत नाही . त्यामुळे ज्यांना जागतिक इतिहास आणि त्याचे वर्तमानातील परिणाम याचा मराठीमध्ये अभ्यासयाचा आहे ,अश्या व्यक्तींनी त्यांची संपादकीयेतून येणारी मते क्षणभर बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायलाच हवे

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक

सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतोव्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहेया पार्श्वभूमीवर या विषयाची  मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे "युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा  विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .

             पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात  सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा  झालेल्या  जैविक हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे . ज्याचा  सुरवातीला  याचा इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या एका अनामिक रोगाच्या साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स , सार्स आदी रोगांच्या आढावा घेण्यात आला आहे . जैविक हल्ल्याची संकल्पना ही आधुनिक संकल्पना नसून प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे आपणास या पुस्तकांद्वारे कळते . फक्त ही संकल्पना प्राचीन काली काहीशी विस्कळीत होती . तीला  व्यवस्थित स्वरूप आधुनिक काळात देण्यात आले इतकाच तो काय फरक  . प्राचीन काळी सुद्धा विविध जैविक हत्यारे वापरण्याचे प्रयोग झाले होते , या बाबत अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत . जसे रोमन साम्राजाची विविध युद्धे . गिरीश कुबेर यांच्या या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे हि युरोप खंडातील किंवा प्राचीन चीनमधील आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे संख्यने अधिक आहेत .भारत आणि जपान वगैरे भागात यावेळी काय घडत होते , याविषयी सादर पुस्तकाच्या या भागात काहीच सांगितले नाहीये . प्राचीन काळी संपूर्ण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग वगळता इतर भाग जगाला माहिती नसल्याने त्या भागाचा प्रश्नच येत नाही . मात्र हान्याय भारत जपान आदी भागाला लावता येत नसल्याने या भागातील युद्धांचा समावेश करण्यात येईल पाहिजे होता असे मला वाटते .

   पुस्तकाच्या दुसऱ्या भागात विविध रासायनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे .ज्यामध्ये जमिनीचा क्रूरकर्मा हिटलर यांनी या रासायनिक शस्त्रांचा कसा,  वापर केला ?  याची माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला अश्रूधूर या सारख्या शास्त्रांची माहिती तर देण्यात आली आहेच त्या प्रमाणे अनेक प्राणघातक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे . या भागात महाभारताचा उल्लेख करण्यात आला आहे . लेखकाच्या मते प्राचीन इतिहासात याचे फारसे दाखले मिळत नाहीत  सुरवात झाल्यावर हा प्राणघातक शस्त्रांचा वापर सुरु झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा पाश्चात्य देशांना दिले आहे , त्यातही याच्या निर्मितीचे पातक प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें आहे मात्र पुस्तक खूपच माहितीपूर्ण झाले आहे .

               मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक संख्येने निघत आहे . त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक त्याच्या भाषाशैलीमुळे  खूपच रंजक झाले आहे . प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे . गिरीश कुबेर  त्यांच्या संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना रुचणारी मते मांडत असले  तरी त्यांची राजकीय मते बाजूला ठेवून खऱ्या ज्ञानावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वाचावेच असे हे पुस्तक आहे . मग कधी घेताय पुस्तक वाचायला .

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...