लेखाचे विषय

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

वाचनाचे नव्या जगातील स्थान


 आज घरी टिव्ही बघत असताना एका बुक रिडर ची जाहीरात बघीतली आणी मनात विचार आला की वाचन ही संकल्पना किती बदलली आहे पुर्वी वाचन म्हटले की फक्त छापील मजकुर डोळ्यासमोर येत असे आता पुस्तक वाचन म्हणजे ईलेक्ट्रीक उपकरणाचा वापर करत केलेले वाचनच   समोर येते        

     पुस्तक ही संकल्पना पण सध्याचा काळात  किती बदलली आहे पुर्वी पुस्तके वाचली जायची आता पुस्तके वाचली जात नाही तर पुस्तके ऐकली जातात त्याला अॉडीयो बुक म्हणतात  श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दिसांमंजी काही तरी लिहावे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असे दासबोधात लिहले आहे. त्या काळात फक्त कागदावरची  पुस्तके होती  आणि तिही हाताने लिहलेली होती. छापलेली नसत. तरी त्यांनी वाचनाचे महत्व ओळखले होते                 

  छापलेली पुस्तके हातळण्यापेक्षा बुक हातळणे खुप सोईचे होते माझ्या स्वता:च्या मोबाईल मध्ये सुध्दा 8 बुक आहेत  .ऑडियो बुक ची तर गोष्ट वेगळी ती एकदा  डाउनलोड केली की झाले तुम्ही ज्या उपकरणात ते डाउनलोड केले (त्याला ब्ल्युटुथ असली तर तर सोने पे सूहाणा  आणी तुयच्याकडे कानाच्या मागे ब्ल्युटुथ च्या मार्फत डेटा हस्तांतरण करणारे उपकरण असले की दुधात साखर  दोघांच्या संपर्क झाला की  एका बाजुला गाडी

चालवत असताना सुध्दा  या उपकरणाच्या  साह्याने मोबाईलवर बोलता येते अश्या पध्दतीने मोबाईल वर बोलले तर मानेच्या विविध कसरती करता मोबाईल वर बोलता येते आणि सध्या च्या काळात नाशकात तरी मानेच्या कसरती करत मोबाईलवर बोलले तरच पकडले जाते आणि पकडली जाते. ती चोरी अशे आपल्याकडे म्हटले जात असल्याने नाशकात हा कायदेभंग चालू शकतो ,असे माझे मत अहे मी माञ हे करत नाही याची नोंद घ्यावी )

     तंञज्ञानामुळे  ज्याप्रकारे पुर्वी घराघरात म्हणत त्याच धर्तीवर बोलायचे झाल्यास मोबाईल मोबाईल मध्ये वाचनालये आली आहेत ते पुस्तकांचे जतन करा ती फाटणार नाहीत वाळवी लागणार नाहीना त्यांना याची चिंता करत बसा त्यांचे तेल पाणी अश्या घटकांपासून रक्षण करा

               सगळ्या कटकटी संपल्या ना या मुळे जर वाचनालयात  आपणास पाहीजे असणाऱ्या पुस्तकाच्या मर्यादित प्रती असल्या की ते  वाट बघत बसा या सगळ्या  कटकटीला सुट्टी आले मनात करा पुस्तक डाउनलोड (त्यातही मँकडोनाल्ड सारख्या काही वेळ फुकट वाय फाय देणार्या गोष्टीच्या जवळ  गेले तर इंटरनेटचे पैसै पण लागत नाही ) वाचून झाले की करा डिलीट कोण ते सांभाळयाचे कष्ट घेणार त्याला कव्हर वगैरे घालत वेळ वाया घालवणार ? सगळे कसे सुटसुटीत आणी छापील पुस्तके जाणार म्हणून रडण्याचे काही कारण नाही कारण मराठीतील एक ज्येष्ठ कवी  केशवसुत यांनी जून्या गोष्टीचा त्याग करण्यास त्यांचा कवीतेत सांगीतले आहेच  त्यांनीच सांगीतले आहे जुने ल्गू द्या मरणा लागूनी जाळूनि अथवा पुरुनी टाका  या ठिकाणी छापील पुस्तके म्हणजे त्या जून्या गोष्टी तरी जूने ते सोने या प्रमाणे छापील पुस्तकाबाबत अश्रु ढाळणे संयूक्तिक नाही असे माझे प्रामाणीक मत आहे  तरी काही अनंत फंदिचे वंशज धोपटमार्गाचा अवलंबन करण्याचा सल्ला विचारात घेउन बदल स्विकारणार नाहीत याची मला जाणीव आहेच बघू कोण जिंकते ? या विषयावर खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

         तूम्ही  एका बाजुला दूसरे काम करत असताना सूध्दा पुस्तकाचा आस्वाद घेवू शकता आणि या प्रकारासाठी पण बुक प्रमाणे फारशी जागा लागत नाही. मी जेमतेम दिड जीबी जागेत किमान  साडे चारशे पानाचे  पुस्तक घेउन  फिरु शकतो ते पण माझ्या मोबाईल फोन मध्ये .

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

कथा सोन्याचा व्यवसायाची

 

आपल्याकडे गुरु पुष्पामृत योग, दसरा,लग्न आदी प्रसंगी सोने खरेदीची प्रथा आहे. काही लोक दागिन्यांसाठी तर काही लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतातमात्र या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींचे जीवन कसे असते ? सोन्याचे दागिने तयार करणारे  सुवर्णकार आणि सोने विकणारे सराफ यांचा खेरीज अन्य कोणते घटक या व्यवहाराशी संबंधित असतात . त्यांचे जीवन कसे असते ? सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघावे की दागिने करण्याचा एक धातू म्हणून बघावे ? सोने कसे खरेदी करावे?,  ज्यामुळे ते मोडताना घट येणार नाही सध्याची या व्यवसायाची परिस्थिती कशी आहे ? सोन्याच्या व्यवसायातील  सध्याच्या  अडचणी काय आहेत . दागिने कसे तयार करतात . सोन्यातील भेसळ कशी ओळखावीसोन्याविषयी  कोणते विविध कायदे होते आणि सध्या आहेत ? सराफ आणि सुवर्णकारांनी आपल्या उद्योगाच्या रक्षणासाठी आंदोलने केली का ? त्याची फलनिश्चिती काय झाली ? आदी अनेक प्रश्नाची सहजसोप्या ओघवत्या  मराठी भाषेत माहिती देणारी अत्यंत मोजकी पुस्तके मराठीत आहेत . आणि या मोजक्या पुस्तकांमध्ये नाशिकच्या सोमवार पेठेतील सराफ श्री सुनील शिरवाडकर यांनी लिहलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या " सोन्याचा संगतीत " या पुस्तकाच्या समावेश करावाच लागेल .

            मराठीतील एक श्रेष्ठ लेखक , विनायक पाटील यांची प्रस्तावना लाभलेल्या या  150 पानाच्या  पुस्तकात लेखकाने 31 प्रकरणातून त्याचे स्वतःचे व्यवसायातील अनुभव आणि  व्यवसायाविषयक माहिती सांगितली आहेच त्याखेरीज सध्याच्या नोकऱ्या जाण्याचा काळात चरितार्थ चालवण्यासाठी काय करावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे . त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्रतील महत्तवाचे शहर असलेल्या  नाशिक शहरातील सराफ 

बाजाराचा इतिहास, त्याचा पुढील आव्हाने समस्या, सोन्या इतकाच मौल्यवान धातू असणाऱ्या चांदीचा  व्यवसाय कसा चालतो ,?  महाराष्ट्राखेरीज गुजरात राज्यातील  राजकोट आणि कर्नाटक  आणि  महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात  अर्थात कोल्हापूर आणि  बेळगाव जिल्ह्यात सोन्याचा आणि  चांदीचा व्यवसाय कशा चालतो याचीही माहिती आपणास या पुस्तकातून मिळते  

हे पुस्तक निवळ माहिती देणारे पुस्तक  नसून सुमारे 40 वर्ष लेखकाने  स्वतः सोन्याचा व्यवसायात विविध पदावर काम केल्याने आणि त्याचा योग्य त्या ठिकाणी यथोचित वापर केल्याने पुस्तक सुरवातीपासून शेवटाकडे अधिकाधिक रंजक होत जाते . लेखकाने पिढीजात व्यवसायात कसा  प्रवेश केला ?   व्यवसायात स्थिरस्थावर

होण्यासाठी लेखकाने कोणकोणत्या खस्त्या खाल्या ? वेळोवेळी मिळणाऱ्या अनुभवातून लेखक कशा पद्धतीने शिकत गेला लेखकाने या पिढीजात व्यवसायाखेरीज अन्यत्र काही चरितार्थासाठी काही केलेलं का ? नाशिकचे विश्व सन 1929पासून  कशे कशे आधुनिक बनत गेले ? याबाबत देखील माहिती यात मिळते

मी नुकतेच हे पुस्तक वाचले . पुस्तक उत्तम आहे . सध्याचा काळात पुस्तकाच्या  किमती गगनाला भिडलेल्या असताना फक्त 200 रुपयातील हे पुस्तक संग्रही आसवेच असे आहे मग कधी घेताय हे पुस्तक वाचायला

शनिवार, १६ मे, २०२०

कश्यासाठी वाचनासाठी

 

कालचीच गोष्ट आहे, मी सहजच टीव्हीवर सर्फिंग करत असताना लोकसभा टीव्ही या वाहिनीवर एक साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिसला , अन मनात विचार आला, टीव्हीसारख्या ताकदवान माध्यमांचा साहित्यप्रसार अश्या गोष्टीसाठी वापर फक्त सरकारी मालकीच्या वाहिन्यांनीच का करावा ? नाही म्हणायला  नेटवर्क 18लोकमत या वाहिनीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी दर रविवारी साहित्यीकांचा मुलाखतीचा कार्यक्रम लागत असे . (त्यावेळी या वाहिनीचे नाव आय बी एन लोकमत होते ) मात्र सध्या तो कार्यक्रम बंद आहे   त्यामुळे माझ्या

माहितीत लोकसभा टीव्हीवरील सदर कार्यक्रम वगळता , पुस्तके आणि साहित्यिकांचा बाबत दुसरा कार्यक्रम नाही . जर असेल तो या पोस्टच्या खाली सांगावा ?  त्याचप्रमाणे डीडी नॅशनलवर 'किताबनामा हा कार्यक्रम प्रकशित होत असे मात्र ते देखील सरकारी मालकीचेच ठरते ना  .

                                     विविध वृत्तपत्रातून आणि काही  नियतकालिकांमधून  नवीन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती येते .मराठीतील तुरळक अशी फक्त याचसाठी प्रकाशित होणारी काही नियतकालिके मला माहिती आहेत . आणि अशी नियतकालिके मला नाशिकमध्ये दिसत नाही . पुण्यामध्ये काही प्रमाणात

दिसतात . मात्र प्रिंट माध्यमांपेक्षा अधिक बलशाली असणाऱ्या  इलेट्रीक चॅनेलवर मात्र या बाबाबत अनास्थाच जास्त दिसतेय . कोणतेही माध्यम हे आर्थिक बाजूच्या विचार करूनच चालवले जात असले तरी कोणत्याही टीव्ही चॅनेलला यात रस वाटू नये ? हे आपले दुर्दैव नाही का ?

                 नाही म्हणायला चित्र फारच वाईट नाही , फेसबुक , व्हाट्सअप आधी समाजमाध्यांव्दारे पुस्तकांबाबत चर्चा केली जाते . स्टोरी टेल , प्रतिलिपी सारखी अँप यासाठी आहेत .  मात्र याला काही प्रमाणात मर्यादा आहेत . इलेट्रीक वाहिन्यांसारखी याला सहजता नाही . त्यामुळे या सर्व माध्यमांमुळे जरी काही प्रमाणात पुस्तकांचा परिचय होत असला तरी  इलेट्रीक वाहिन्यांचे  अपयश लपत नाही . काही म्हणतील

सरकारी वाहिन्यांवरील का होईना पुस्तकाविषयी कार्यक्रम आहेना ? मला  त्यांना विचारायचे आहे ? या सरकारी चॅनेलची दर्शक संख्या किती ? किती जण त्या वाहिन्या बघतात .? मराठी दिन, जागतिक पुस्तक दिन अश्या

मोजक्या दिवशी पुस्तकांविषयी बोलता , जर इलेट्रीक चॅनेलवर कायस्वरूपी पुस्तकाविषयी कार्यक्रम झाल्यास सोन्याहून पिवळे ठरेल हेच खरे ! ते करण्याची सुबुद्धी लवकरात लवकर इलेट्रीक माध्यांना  येवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो , नमस्कार .

रविवार, ३ मे, २०२०

ओळख एका वन कथा संग्रहाची

   मारुती चितमपल्ली....... पेशाने वनखात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे मराठीतील नामवंत साहित्यिक . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्याक्ष . जंगले आणि त्यातील समाजजवीन तसेच  प्राणीजीवनावर आधारित साहित्य जगविख्यात आहेत . त्यांच्या \प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यामध्ये "केशराचा पाऊस " या कथासंग्रहाचा बराच वरचा क्रमांक लागतो . सध्याच्या लोकडाऊनच्या काळात मी ते पुस्तक   नुकतेच वाचले .

            पुस्तकात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळाळतील आठवणी कथारूपाने सांगण्यात आलेल्या आहेत . पुस्तकात 16कथा असून पहिल्या दोन कथांमध्ये अनेक प्रकरणे आहेतपुस्तकाची भाषा संवादी असल्याने पुस्तक जरी माहितीविषयी असले तरी पुस्तक वाचणे कंटाळवाणे होता ज्याला  ज्ञानवर्धक (  INFOTAINMENT ) म्हणता येईल असे झाले आहे .सदर पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख माधव असा केला असून . या कथासंग्रहातील कथांमध्ये सुरवातीच्या 9 कथांमध्ये नायका बरोबर त्याची नायिका "सुमित्रा  यांच्या भावविश्वाचा आधार घेत लेखक मेळघाटातील वनांची तेथील प्राण्यांची वैशिष्ट्ये अलगदपणे उलगडली आहेत , ज्यामध्ये अस्वलाशी कसे वागावे ? मेळघाटातील आदिवासी जनतेचे

जीवन कॊणत्या प्रकारचे आहे ? तेथील वनस्पती जीवन कोणत्या प्रकारचे आहे ? भारतातील वन खात्यातील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते ?जंगलात कसे वागावे ? जर जंगलात काही अडचण आल्यास त्यास कोणत्या प्रकारे तोंड देता येऊ शकतेआदी मुद्यांशी आपली ओळख होते   पुस्तकाच्या 10ते 16 क्रमांकाच्या कथा या कोणत्याही एका नायका अथवा नायिका भोवती गुंफलेल्या नाहीत . या कथांमध्ये प्रत्येक कथाच नायक वेगळा आहे . काही कथांमध्ये तर नायिकेचा उल्लेख देखील करण्यात  आलेला नाहीये . पहिल्या भागाच्या तुलनेत या भागातील कथा काहिस्या कंटाळवाण्या वाटतात . मात्र पहिल्यादाच सांगितल्याप्रमाणे संबंध पुस्तकातील भाषा संवादी असल्याने पुस्तकाची रंजकता कमी होत नाही . या कथांमध्ये मेळघाट परिसरातील आदिवासींच्या खाद्य संस्कृती , तसेच वनाधिकाऱ्याचे कार्य अधिक पहिल्या भागापेक्षा  विस्तुतपणे सांगितले आहे . तसेच मेळघाटच्या आदिवासी भागातील विविध लोककथा , समजुतीवर भाष्य करण्यात आले आहे .  दोनशे पानाच्या या पुस्तकात असणाऱ्या सर्वच कथा या ज्ञान देणाऱ्या आहेत . काही कथांमध्ये विविध तत्वज्ञानाची चर्चा देखील करण्यात आली आहे . एकंदरीत सदर पुस्तक किमान एकदा तरी वाचावे या सदरामध्ये मोडणारे आहे . तर मग वाचताय ना हे पुस्तक मिळवून

 

 

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...