या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- अच्युत गोडबोले यांनी लिहलेली (15)
- अनुवादित पुस्तके (9)
- अभिनेता गुरुदत्त (5)
- अर्थशास्त्राविषयक (2)
- इंग्रजी पुस्तक (2)
- इतिहास (4)
- कथासंग्रह (4)
- कादंबरी (7)
- काव्यसंग्रह (1)
- गिरीश कुबेर यांनी लिहलेली (6)
- गुन्हेगारी (1)
- चरित्र . (20)
- चीन (4)
- तंत्रज्ञान विषयक (10)
- दलित साहित्य (3)
- नाटक (1)
- नाशिक (6)
- नियतकालिके (7)
- पश्चिमी आशिया (3)
- प्रवासवर्णने (3)
- मराठी पुस्तके (69)
- महिलांच्या भावविश्वाशी निगडित (6)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- मानसशास्त्र (8)
- माहितीपर (52)
- राजकीय (21)
- ललित लेखन (2)
- विद्रोही साहित्य (3)
- विनोदी या प्रकारात मोडणारे साहित्य (1)
- वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (3)
- व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (2)
- सर्वसाधारण (8)
- स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३
परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.
शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३
स्वामी विवेकानंद यांची पत्रे...मनाला नैराश्यापासून दूर ठेवणारे पुस्तक
स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाल्यानंतर संन्यासधर्म स्वीकारुन भारतभ्रमण केले. भारतभ्रमण केल्यानंतर ते सर्वधर्म परीषदेसाठी अमेरीकेला गेले. (तेथील त्यांचे भाषण प्रसिद्धच आहे.)सर्वधर्म परिषदेनंतर ते सुमारे चार वर्ष अमेरिका आणि इंग्लंडमध्ये
वास्तव्यास होते. या भारतभ्रमण आणि पाश्चात्य देशात असताना त्यांनी गुरुबंधू आणि आपल्या विविध शिष्यांना त्यांनी पत्रे लिहिली ,जी यात समाविष्ट करण्यात आली आहे .वर्षांच्या हिशोबाचे सांगायचे तर इसवीसन 1888ते 1898 या काळातील सुमारे साडेपाचशे पत्रे या सुमारे साडे आठशे पानाच्या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. जी खुद्द स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेली असल्या कारणाने अत्यंत तेजस्वी झाली आहेत. या ग्रंथातील कोणतेही पान उघडुन वाचन करायला सुरुवात करावी,आपण कितीही नैराश्याने ग्रासलेलेस असाल, आपण प्रसन्न होणारच, यात कोणालाही तिळमात्र शंका नसावी.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांचे आणि पाश्चात्य देशांतील नागरिकांचे चांगले गुण आणि अवगुण ओळखले होते,आणि दोन्हींचा चांगल्या गुणांचा मिलाफ बांधत ते उत्तम अस्या समाजासाठी झटत होते,यामागची त्यांची तळमळ आपणास या पत्रांचा शब्दाशब्दात दिसते. भारतासारख्या विविधांगी समाजात एखादे संघटन कोणत्या प्रकारे उभारता येवू शकते?ते उभारताना काय अडचणी येवू शकतात, या अडचणींवर कमी मात करता येते?याचा वस्तूपाठच स्वामीजींनी त्यांचा गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रातील दिसून येते.स्वामी विवेकानंद यांच्यावेळी भारत पारतंत्र्यात होता, तरी पाश्चात्यांच्या चांगल्या गुणांची त्यांनी अवहेलना केली नाही.पाश्चात्यांची संघटन क्षमता आपण आपल्यामध्ये रूजवलीच पाहिजे याबाबत त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रातून हे आपणास सहजतेने दिसून येते. गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांच्या विविध दौषांवर प्रखर
शद्बात कोरडे आसुड ओढलेले आहेत, त्याचवेळी गुरुबंधू या शद्बानी निरास होवु नये म्हणून त्याचं पत्रात मायेची पाखरण देखील केली आहे.किंबहुना स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या सर्वच पत्रांमध्ये आसुड आणि मायेची सावली यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेला दिसतो,असे म्हटल्यास वावगे ठरु नये, अत्यं कडक आणि त्याचवेळी अत्यंत मायाळू, प्रेमळ अस्या मार्गदर्शकाची भुमिका घेवून स्वामी विवेकानंद यांनी ही पत्रे वाचताना पदोपदी जाणवते.ही पत्रे स्वामीजींनी बंगाली आणि इंग्रजी भाषेत लिहलेली आहे. मी वाचलेल्या मराठी भाषांतरात बंगाली पत्रांना तारांकित केले आहे, त्यामुळे आपण मुळ बंगालीत लिहलेली पत्रे कोणती? हे आपण सहजतेने समजू शकतो. आपण सर्वांनी ही सर्व पत्रे किमान एकदातरी नजरेखालून घातलीच पाहिजे.सध्या जगभरातील लोकांच्या मृत्यूचे पहिल्या क्रमांकाचे कारण असलेल्या आत्महत्येचा विचार आपल्याकडे येणारच नाही.किंबहुना जर आपणास कधीही नैराश्य वाटले तर यातील कोणतेही एक पान वाचलेच पाहिजे असे मी स्व अनुभवातून सुचवतो आहे.मग वाचणार ना हे पुस्तक
बुधवार, ३१ मे, २०२३
समर्थ रामदास स्वामी यांचे कांदबरी स्वरुपात चरीत्र सांगणारे पुस्तक "दास डोंगरी रहातो"
एखादी समजण्यास अवघड बोजड विषय जर गोष्टीवेल्हाळ स्वरुपात सांगितल्यास सहजतेने समजतो. गोष्टीवेल्हाळ स्वरुपात कथन केल्यामुळे त्यातील अनेक महत्तवाचे दुवे निसटत असले, तरी ज्यास संबंधित विषयाची काहीच माहिती नाही, अस्या व्यक्तींना संबंधित घटकाची किमानपक्षी तोंडओळख तरी या प्रकारामुळे होते.आपल्या मराठीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुजला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरीत्र सांगणारी नेताजी ही कांदबरी, पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारीत पानिपत ही कांदबरी , रणजित देसाइ यांनी पेशव्यांच्या जिवनावर लिहलेली स्वामी ही कांदबरी असो अथवा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँ .जयंत नारळीकर यांनी लिहलेल्या विविध विज्ञान कथा याच वर्गवारीत मोडतात.याच वर्गवारीत मोडणारे आणि सुप्रसिद्ध पुस्तक म्हणजे ,'दास डोंगरी रहतो", हे पुस्तक . मराठीतील सिद्धहस्त लेखक गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात 'गोनिदा' यांनी लिहलेले हे पुस्तक समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत आपणास माहिती देते. जे मी नुकतेच नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्तवाची संस्था असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक (सा.वा.ना.) च्या सहकार्याने वाचले.
सुमारे तीनशे पानांच्या या पुस्तकात सर्व पुस्तकात भाषा संवादी ठेवली असल्याने, पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. गोनिदांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरील सर्व प्रसंग
अत्यंत कुशलतेने गुंफले आहेत. जे वाचताना वाचकास पुस्तकात गुंतवून ठेवतात.पुस्तकाची भाषा अत्यंत प्रवाही असुन संपूर्ण पुस्तकात तो प्रवाह कायम ठेवला आहे. पुस्तक वाचताना ते कुठेही रेंगाळलेले वाटत नाही.पुस्तकाची सुरवात होते ती, समर्थ रामदास स्वामी यांच्या विवाहातून पलायन करुन नाशिककडे प्रस्थान करण्याचा प्रसंगाने . त्यांचे टाकळी (नाशिक )येथील वास्तव्याचे कथन करायला सुमारे 75पाने लेखकाने व्यापली आहेत. जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील ठोसरांचा दुसरा मुलगा नारायण या काहीस्या वात्य खोडकर तसेच अत्यंत जिज्ञासू मुलाचे अत्यंत प्रग्लभ समाजाला दिशा देणाऱ्या समर्थ रामदास स्वामीमध्ये कसे रूपांतर होते. या काळात त्यांना सुरवातीला अनुभव लेखकाने त्यांचा टाकळी वास्तव्यात रेखाटले आहेत.शेवटची सुमारे 50 पाने. आणि समर्थाचे सज्जनगडावरील कार्यं आणि सध्याचा काळात काहीसा वादग्रस्त मुद्दा ठरलेले समर्थांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट याविषयी आपणास माहिती देतात.
पुस्तकाच्या साधरणतः मध्यापासून पुस्तकाच्या कथनाने वेग पकडला असल्याचे जाणवते. पुस्तकाच्या या भागात समर्थ रामदास स्वामी यांचे सज्जन गडावरील कार्य आणि दासबोधाची निर्मिती या बाबत आपणास माहिती देते समर्थ रामदास वामी त्यांचे पटशिष्य कल्याण याना आश्रमाची व्यवस्था कशी लावण्यता यावी याविषयी मार्गदर्शन करतात आणि पुस्तक संपते लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे यात सांगितलेल्या
बाबीना लौकिक अर्थाने पूर्णपणे चरित्र म्हणता येणार नाही कथानकाला सोईस्कर व्हावे यासाठी
यात काही बदल करण्यात आले आहेत मात्र पुस्तक वाचनाने समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत
काही माहिती नसलेल्या व्यक्तीस समर्थ रामदास यांचे कार्यपरिचय होण्यास नक्कीच मदत होते
ज्यांना समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र माहिती आहे त्यांना समर्थांचे चरित्र कश्या
प्रकारे खुलवता येते हे पुस्तक वाचनाने समजते . मग वाचणार ना पुस्तक
बुधवार, २४ मे, २०२३
टाटायन ...प्रवास एका सामाजभान असलेल्या उद्योग घराण्याचा
टाटा, आपल्या रोजच्या जगण्यातील अनेक उत्पादनाचे निर्माते . निव्वळ उत्पादनाचे निर्माते म्हणूनच टाटांची ओळख पुरेसी नाही. उत्तम उत्पादनाची विश्वासाह्यर्ता असणारा आणि त्याचवेळी सामाजिक भान असणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.स्वातंत्र्यपुर्व काळापासून अवाह्यत सुरु असणारा 150हुन अधिक वर्षाचा गौरवशाली इतिहास असणारा उद्योगसमुह म्हणजे टाटा उद्योगसमुह .आपल्या भारतात लोह पोलाद उद्योग, जलविद्युत प्रकल्प, विमान वाहतूक सेवा अस्या अनेक उद्योगाची पायाभरणी करणारा उद्योग समुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.या टाटासमुहाची सविस्तर माहिती हवी असल्यास आपणास ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहलेले "टाटायन", या पुस्तकाशिवाय अन्य उत्तम तो पर्याय तो कोणता? गिरीश कुबेर यांची भारतीय राजकारणाविषयीची मते अनेकांना आवडत नसली तरी ते क्षणभर बाजूला सारून हे पुस्तक वाचल्यास टाटा समुहाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.मी सुद्धा हे पुस्तक नुकतेच वाचले.
शुक्रवार, १९ मे, २०२३
अर्थशास्त्रातील गुंतागुंत सहजतेने मांडणारे पुस्तक अर्थात
अर्थशास्त्र अवघड वाटण्याचे कारण म्हणजे त्याचे विविध सिद्धांत आणि त्याची परिभाषा . मात्र सदर पुस्तकात अर्थशात्रातील विविध सिद्धांत स्पष्ट करताना अनेक उदाहरणे दिलेलीअसल्याने सिद्धांत सहजतेने समजतो त्यातील अवघडपणा सहजतेने समजतो. या पुस्तकात निव्वळ अर्थशात्रातील सिद्धांताच्या मागून सिद्धांत दिलेले नाहीत तर हे सिद्धांत मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांची माहिती देखील अत्यंत रंजकतेने दिली आहे त्यामुळे अन्य अर्थशात्रताविषयक पुस्र्के जशी कंटाळवाणी वाटतात तसे या पुस्तकाबाबत वाटत नाही परिभाषेतबाबत या पुस्तकात विशेष काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना समजते पुस्तक मराठीत आहे ना ? मग रोजच्या व्यवहारामध्ये वापरण्यात न येणाऱ्या संस्कृतचा पराभवा जाणवणाऱ्या अवघड परिभाषा या पुस्तकात जाणिवपूर्वक टाळलेली दिसतात पुस्तकात व्यवहारात रुळलेल्या इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरलेल्या आहेत रोजच्या वापरण्यात येणारे शब्द यांचा वापर केल्याने सिद्धांत चटकन समजतात मराठीत एखादा विषय समजून घेताना येणारा पारिभाषिक संज्ञांचा अडथळा यावेळी येत नाही
पुस्तक आठ प्रकरणात विभागले असून पहिल्या प्रकरणात अर्थशास्त्राची पार्श्वभूमी स्पष्ट करताना अर्थशात्र म्हणजे काय ? त्याचे किती आणि कोणते उपप्रकार पडतात ? आदी प्रशांबाबत उहापोह करण्यात आला आहे . तर शेवटच्या आठव्या प्रकरणात अर्थव्यवस्थेत अर्थशास्त्रात आता जाणवणाऱ्या समस्येबाबत, प्रश्नाबाबत भाष्य केले आहे पुस्तकाच्या दुसऱ्या ते सातव्या प्रकरणात विविध अर्थशास्त्रीय सिद्धांतआणि महागाई , परकीय चलन , जीडीपी सारख्या संकल्पना आणि मार्क्स केन्स सारख्या अर्थशात्रज्ञांची माहिती देण्यात आलेली आहे भांडवलशली साम्यवाद ,बँकिंग सिस्टीम यांची सुरवात कशी झाली /प्राचीन युगातील अर्थशाश्त्रज्ञाच्या अर्थशास्त्राबाबत कोणत्या संकल्पना होत्या प्राचीन काळातील भारतीय आणि ग्रीकांचे अर्थशास्त्रीय ज्ञान काय होते याविषयी आपणास या पुस्तकात अत्यंत रंजक माहिती मिळते हार्ड बाउंड कव्हर असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत रंजक आहे ज्यामध्ये एका बाजूला श्रीमती तर दुसऱ्या बाजूला गरीबीचे चित्र रेखाटले आहे ज्यामध्ये एका हातातून दुसऱ्या हातात नाणी बाहेर जाताना दिसतात निळ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर असणारे हे चित्र बघून कोणालाही पुस्तक हातात घ्यावेशे वाटते मग वाचणार ना तुम्ही हे पुस्तक
गुरुवार, १८ मे, २०२३
मानसोपचारावर इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक सायको थेरपीज !
भागाच्या दुसऱ्या प्रकरणात ; आठ विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली असून यामध्ये किचकट माहिती न देता ती पद्धती शोधणाऱ्या संशोधकाची माहिती तसेच थोडक्यात उपचार पद्धतीची ओळख करुन देण्यात आली आहे. उपचार पद्धतीची ओळख करुन देतान काही ठिकाणी नाट्यमयता देखील वापरण्यात आल्याने पुस्तक सहजतेने समजते. पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात युरोपातील मनोरुग्णालयाचा विकास कसा झाला.? युरोपीय जगतात मानसिक रोगाबाबत काय काय समजूती होत्या.?मध्ययुगात मानसिक रोग्यांना बरे करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला याविषयी सांगण्यात आले आहे. यातील काही पद्धती प्रचंड अमानुष होत्या, ज्यांचे वर्णन ऐकतानाच अंगावर काटा येवू शकतो
रविवार, ७ मे, २०२३
मानवाच्या मूलभूत गरजेवर सविस्तर माहिती देणारे पुस्तक "संवाद "
हिंदू मान्यतेनुसार या पृथ्वीवर मानवाखेरीज विविध प्रकारचे ८४ लाख वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जीवन जगत आहेत या ८४ लाख प्राण्यमध्ये मानवाचे ते वेगळे वैशिष्ट म्हणजे अन्य प्राण्यांपेक्षा अत्यंत विकसित झालेले स्वरयंत्र . या स्वरयंत्राच्या मदतीने मानवप्राणी विविध भाषा बोलू शकतो दुसऱ्या व्यक्तीशी अन्य प्राणी दुसऱ्या प्राणाशी ज्या प्रमाणे संवाद साधतात त्या पेक्षा प्रगव असा संवाद साधू शकतो भाषेपासून सुरु झालेली संवादाची हि प्रक्रिया आता फेसबुक सारख्या समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आहे या प्रक्रियेच्या आतापर्यंतच्या टप्यात मनुष्याच्या संवाद साधण्याच्या प्रकियेत मोठ्या प्रमाणात बदल झाले जसे अश्यामुगीन मनुष्याने काढलेली चित्रे कबुतरे निरोप्या , पोस्ट टेलिग्राफ , टेलिफोन वर्तमानपत्रे ,मोबाईल ,इंटरनेट आदी मात्र या वाटचालीला मोठा कालखंड जाऊ द्यावा लागला हे बदलपरिकथेप्रमाणे चुटकीसरशी झालेले नाहीत तसेच हे बदल एखाद्या एका व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसमूहाने केले नाहीत या विकासासाठी अनेक व्यक्तीचे योगदान आहे मनुष्याच्या संवादाच्या विकासाच्या या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वच व्यक्तींची नोंदही आपल्याकडे नाही अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तीचे परिश्रम या साठी लागलेले आहे मानवाच्या या वाटचालीचा इतिहास मोठा रंजक आहे हा रंजक इतिहास आपल्या मराठीत आणला आहे मराठीत विविध ज्ञान शाखांची माहिती पुस्तकांद्वारे करून देणारे ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या संव्वाद या सुमारे पावणे सहाशे पानाच्या पुस्तकातून आपल्याला हे इतिहास मुळासकट समजतो नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्था सावर्जनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले
सुमारे पावणेसहाशे पानांच्या या पुस्तकात १५ प्रकरणातून लेखकाने मानवी समूहात भाषेचा उगम कशा झाला ? पूर्वी संदेशवहनाच्या कोणत्या पद्धती वापरल्या जात असत ? पोस्ट या संकल्पनेचा उदय कशा झाल्या पोस्ट या संकल्पनेत वेळोवेळी कसे बदल झाले ? तार यंत्रणेचा विकास कश्या प्रकारे झाला त्या साठी अमेरिका आणि युरोपातील व्यक्तींनी काय हालअपेष्टा सोसल्या . तार यंत्रणेचा शोध लागल्यावर त्याचा विस्तार
करण्यासाठी मानवाने काय काय गोष्टी केल्या ? टेलिफोन आणि मोबाईलचा शोध कसा लागला ? सध्या संदेश जनसामान्यात पोहोचण्यात म्हह्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्तमानपत्राचा विकास कश्या प्रकारे होत गेला ? वर्तनमानपत्राच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकार आणि वृत्तसंस्थेचा विकास कसा कसा होत गेला इंटरनेटचे कार्य मुळातून कसे चालते ? त्याचा शोध कोणत्या कारणाने लागला ? फेसबुक सारख्या समाज माध्यमांचे कार्य कसे चालते आदी विषयांची अत्यंत सविस्तर माहिती देण्यात आली आहे सुमारे पावणे सहाशे पानाच्या या पुस्तकात दोन कॉलमचा वापर करत अन्य नेहमीच्या पुस्तकांपेक्षा काहीसा कमी फॉन्ट वापरत माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे आपण समजू शकतो या पुस्तकात किती माहिती देण्यात आली आहे पुत नसून अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखेच याही पुस्तकाची भाषा सहज सोपी आहे त्यामुळे पुस्तक रंजक झाले आहे अच्युत गोडबोले यांची पुस्तके वाचणाऱ्यास मोठया प्रमाणात ज्ञसमृद्ध करतात संवाद हे पुस्तक देखील यास अपवाद नाहीये कोणत्याही मनुष्याची मूलभूत
म्हणता येईल अशी
गरज संवादाची आहे त्यामुळे
अनेकदा अट्टल गुन्हेगारांना तुरुंगात
अन्य कैद्यांपेक्षा वेगळे
ठेवतात ज्यामूळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम
होऊन असे कैदी
पुढे तुरुंग प्रशासनास
सहकार्य करतात काही मानववंश
शास्त्रज्ञांच्या मते एखाद्या
मुनष्यास जर जास्त
काळ एकांतात ठेवले
तर संबंधित व्यक्ती
मनोरुग्य होनाची दाट शक्यता
आहे तत्यामुळे या संवादाची
कुळकथा सांगणारे पुस्तक किमान
एकदा तरी वाचलेच
पाहिजे असे मला
वाटते मग वाचणार
ना हे पुस्तक
उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'
आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने फोन करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले...


















