त्यामुळे आपल्या सर्वाना मानसशास्त्राची किमान तोंडओळख असणे सध्याच्या काळात आवश्यक आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्या मराठीत सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल, समजेल अश्या पद्धतीने आणि प्रकारची मानसशात्राची माहिती देणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. आपल्या मराठीतील मानसशास्त्राची माहिती देणारी बहुसंख्य पुस्तके अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने लिहण्यात आलेली आहेत ज्यामुळे ज्याला मानसशास्त्राची फक्त तोंड ओळख करून घेयचीआहे त्यात पारंगत होण्याची इच्छा नाही त्याला देखील कारण नसताना रटाळ पुस्तके वाचावी लागतात.तसेच या पुस्तकाची भाषा देखील परिभाषेत अडकलेली असल्याने समजायला अडचण येते. याला ऊत्तर काय तर जे मानसशास्त्राचे अभ्यासक नाही अश्या सर्वसामान्य व्यक्तींना उपयुक्त ठरेल अश्या पद्धतींची माहिती ती देखील रंजक पद्धतीने देण्यात आलेली पुस्तके वाचणे आणि या कामात आपल्याला मदत करते . अर्थशास्त्र, संगीत, अकाउंटिंग, गणित नॅनो टेक्नॉलॉजी, ए आय, साहित्य, नैसर्गिक शात्राच्या विविध शाखा, व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र अश्या विविध क्षेत्रातील विविध बाबींवर मराठीत सहजसोप्या मराठीत माहितीपूर्ण पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहलेले 'मनात हे पुस्तक. जे मी नुकतेच वाचले
अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात वापरलेल्या भाषसेबाबत त्यांना पूर्ण मार्क देणे आवश्यकच आहे. याही पुस्तकांची भाषा सहजसोपी ज्याला मानशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नाही, अश्या त्यांना देखील या शास्त्राची मोठ्या प्रमाणात माहिती करून देणारे पुस्तक म्हणून पण या पुस्तकाकडे बघू शकतो. क्रमिकपुस्तकात असलेला बोजडपणा या पुस्तकात आढळत नाही. पुस्तक सोप्या भाषेत लिहायचे आहे मग करा माहितीत काटछाट, हाही मुद्दा या पुस्तकात आढळत नाही. यात संगीतलेल्या घटकांविषयी मोठ्या प्रमाणात सविस्तर माहिती या पुस्तकातून आपणास मिळते. पुस्तक विविध विभागात विभागले आहे. त्यामुळे जर आपणास एखद्या ठराविक घटकाचीची माहिती हवी असेल तर आपण तो शोधू शकतो, प्रत्येक विभाग प्रकरणात विभागाला आहे त्यामुळे विषय समजण्यात काहीही अडचण येत नाही. या पुस्तकात एकूण १७ विभाग आहेत. प्रत्येक विभाग हा स्वतंत्र्य पुस्तक म्हणून बघितला तरी हरकत नसावीअशी या पुस्तकांची रचना आहे ढोबळमानाने मानसशास्त्रावरच्या १७ वेगवेगळ्या पुस्तकांचे एकत्रयीपणे छापलेले ७०० पानाचे पुस्तक म्हणजे सदर पुस्तक होय . मन कितीही अथांग आह. आपण त्यापैकी किती लहान भाग जाणतो ,हे सांगणारे पुस्तकाचे निळसर हिरव्या रंगातील हिमनगाच्या पार्श्वभूमीवरील मेंदूचे छायाचित्र आपणास पुस्तकाकडे सहजतेने खेचून घेते.
अच्युत गोडबोले यांचे मानसशास्त्रावरील मी वाचलेले हे सहावे पुस्तक. मी आधी अच्युत गोडबोले यांची मानसशास्त्रावरील मनकल्लोळ भाग १ आणि २ ,सायकोथेरपीज . ऑटिझम, संवाद ही पुस्तके वाचली आहेत . मात्र मनात या पुस्तकातील माहिती उचलून पुन्हा दिली आहे. असे आढळत नाही. अपवादात्मक स्थितीत माहिती पुन्हा दिल्याचे आढळते मात्र याचे प्रमाण २ ते अडीच टक्क्याच्या पुढे नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे असो .या पुस्तकात आपणास भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन , युरोपीय आणि अमेरिकन मानशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास, त्यांनी मांडलेल्या विविध संकल्पना, मानसिक आरोग्याचा आणि विकारबाबत झालेले वेगवेगळे संशोधन , या संशोधनाचे विविध टप्पे, विविध मानसिक विकारांचे ,आजारांची,व्याधींची माहिती , मानसिक आजार बरे व्हावे किंबहुना होऊच नये यासाठी कोणते मानसशास्त्रीय उपाय योजले जातात मानसशास्त्रांच्या विविध उपशाखांची माहिती, तसेच मानसशास्त्राशी जवळचा संबंध असलेले भावनांक, बुध्यांक आदी विषयांची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन सांगताना लेखकाने हिंदू धर्म ,बौद्ध धर्म, जैन धर्म अन्य पारंपरिक बाबींची माहिती दिली आहे .तसेच भारतीय सारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या ग्रीक संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक तसेच मनोरुग्णालायची स्थिती कशी सुधारत गेली मनोविकाराविषयी माहिती पहिल्या भागात सांगितली आहे दुसऱ्या भागात मेंदू आणि मज्जसंस्र्थानची माहिती देण्यात आली आहे तिसऱ्या आणि चवथ्या भागात अनुक्रमे सिग्मनफ्राईड पर्यतची मानसशास्त्राची वाटचाल आणि सिग्मनफ्राईड आणि युंग यांनी घातलेली भर सांगण्यात आली आहे. भाग क्रमांक ५ ,७, ,८,९ आणि १० मध्ये एक्सपिरिमेंटल सायकोलॉजी गेस्टेलास्ट सायकोलॉजी, डेव्हल्पमेंटल सायकोलॉजी, सोशल सायकोलॉजी ह्युमिनिस्टिक सायकोलॉजी यांची याचा क्रमाने माहिती देण्यात आली आहे सहाव्या भागात बिव्हेरिझम ची माहिती लेखकाने दिली आहे तर ११ व भाग आणि १२ तसेच भाग १३ वा अनुक्रमे बुध्यांक , व्यक्तिमत्व आणि भावना या घटकावर भाष्य करतो. १४ आणि १५ व भाग पुन्हा एकदा आपणांला अनुक्रमे कोंगीटीव्ह आणि परस्पेशन या मानसशास्त्राच्या उपशाखांबाबत माहिती देतो. शेवटून दुसरा भाग ऑटिझम,ओसीडी फोबिया, स्किझोफेनिया, डिप्रेशन, चिंता या आजाराविषयी माहिती देते .तर शेवटचे १७ वे प्रकरण विविध उपचार पद्धतीच्या थेअरीविषयी आपणास माहिती देते
लेखाच्या सुरवातीला सांगितले त्या परिमाणे मानसशास्त्र सध्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याने आपणास या विषयाची तोंड ओळख होण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा